
माझ्याहून तीन वर्षांनी मोठी एक शेतकरीण आहे ती आठवडी बाजारात भाज्या / माळवं घेऊन येते. ती खूप क्युट आहे. तिचे नाव सु*दा ह*ळे.
मी येणार म्हणून आमची आजी तिला खबर देते. तेव्हा ती मला आवडत्या सगळ्या भाज्या कुठून कुठून मिळवते. तिला एक पप्पी द्यावीशी वाटते पण जालीम समाज मध्ये येतो. मी तिला फक्त पिशवी देतो. आणि माझ्या कामाला जातो. ती सगळी पिशवी भरून ठेवते. माझ्याकडून ती नेहमी जास्तच पैसे घेते. तिला मी खरेतर नेहमी चॉकलेट देतो. यावेळी तिला खोबऱ्याचे कूकीज दिले, ती म्हणाली मळ्यावर ये आणि तिने केलेल्या वड्या घेऊन जा. तिच्यासाठी खास मळ्यावर गेलो तर गावभर बोंबाबोंब होणार म्हणून आजीला मध्ये घ्यावे लागते.
आज तिने मला दिलेल्या भाज्या :
१. जुन्या भेंड्या : मला भेंडीच्या बियांची देशी (म्हणजे बारक्या एकदम आंबट असे चेरी type ) घालून ओपन तव्यात केलेली दाट आमटी लै आवडते हे तिला माहिती आहे. त्यामुळे जुन्या राठ पिकलेल्या भेंड्या ती आणते.
२. Dwarf मुळ्याच्या फुगलेल्या आणि अजिबात लांबड्या नसलेल्या शेंगा (डिंगऱ्या ). पुण्यात मी त्या हातभर लांबड्या अत्यंत बेचव अशा डिंगऱ्या खाल्ल्या तेव्हा आपण किती लकी आहोत याची जाणीव झाली.
३. कोवळी पण शिरा भरलेली नाजूक दोडकी.
४. किंचित दाणे भरलेल्या काळ्या हुलग्याच्या शेंगा
५. कमी पाण्यावर केलेली स्ट्रेस देऊन आक्रसवलेली तिखट अशी ढोबळी मिरची. खरेतर अजून लहान ढोबळी मिळते. आता हिच्यावर भागावावे लागणार.
उद्या ती मला शेंदराची फळं आणून देणार आहे कारण त्याचे हळद घालून केलेलं लोणचं मला आवडते.

कोवळी पण शिरा भरलेली नाजूक
कोवळी पण शिरा भरलेली नाजूक दोडकी. >> शिरा भरलेली म्हणजे?
आपण सगळेच त्याच त्याच भाज्या खातो. पण प्रत्येकाची रांधण्याची पद्धत निराळी असते, आणि आपण जे खात आलोय, किंवा ज्या चवीची आपल्याला ओळख करून दिली जाते ती आयुष्यभर सोबत रहाते.
मी जुन्या भेंड्याची आमटी एकदा कधीतरी खाल्ल्याची आठवते आहे, पण त्यांनंतर कधी खाल्ली नाही. मी हुलग्याच्या शेंगा सुद्धा नाही खाल्लया कधी.
तुमचं जसं डिंगरी (म्हणजे मुळयाच्या शेंगा ना?) बाबत होतं तसं माझं अगदी सुरुवातीला शेपू बाबत व्हायचं. इथे शेपू घेतली की त्याला काही वासच नाही. आमच्या कोल्हापूरला शेपू आणली की घरभर वास सुटायचा. तरी कशिबशी सवय लावून घेतली खाण्याची.
मला शेपू, कारलं, मेथी, पडवळ, भेंडी या भाज्या कधीही आवडतात खायला.
मला तश्या सगळ्याच भाज्या आवडतात. आवडत नाही अशी कोणतीच भाजी नाही. अगदी चंदन बटवा, घोळू सुद्धा मला खूप आवडतात.
शिराळी : एकदम नाजूक अशी दोडकी
दक्षिणा,
शिराळी : एकदम नाजूक अशी दोडकी पण एकदम कोवळी देखील नाहीत आणि एकदम राठ देखील नाहीत. स्वतः च्या भाराने किंचित वाकतील अशी फ्लेक्सबल आणि शिरा तासल्या तर शिरांचे चाटण नक्की करता येतील अशा शिरा असणारी.
कोल्हापुरात चहात साखर घालावी लागत नाही असे दूध असते. तिकडचा ऊस देखील इतका गोड असतो की उसाचा रस पिल्यावर महिनाभर साखर नाही खाल्ली तरी चालेल.
मी कोल्हापूरकर व्हायचा खूप प्रयत्न केला पण आता सांगलीकर होत आहे. सांगलीची वांगी तर जगात फेमस आहेत. आमच्याइथली तर अजून चवदार लागतात कारण पाणी नाही.
माझी एक मैत्रीण मिरजचपुन्य,
माझी एक मैत्रीण मिरजची आहे.
ती तर अजूनही म्हणते की इथल्या (पुण्याच्या) शेपूला आपल्याकडच्या म्हशी पण तोंड नाही लावणार.
अरेच्या माझी इथली, भोपळी
अरेच्या माझी इथली, भोपळी मिरची + टोमॅटो + टुना ... पोस्ट कुठे गेली?
२ धागे झालेत चुकून -
२ धागे झालेत चुकून -
>>>> ढोबळी मिरची
ढोबळी/ भोपळी/ सिमला मिर्ची कोणत्याही स्वरुपात आवडते.
मी मिरची, भरपूर वाफवुन + टोमॅटो घालून व परत भरपूर वाफवुन + टुना घालून करते
पण त्यात थोडा गूळ घालतेच. सवय आहे. आणि भरपूर लाल तिखट व मग हवे तसे मसाले (गरम किंवा धणे-जीरे पूड) वगैरे
ढोबळी : आम्ही न फोडता (म्हणजे
ढोबळी : आम्ही न फोडता (म्हणजे आतल्या सगळ्या बियांसकट) फक्त,जिरे आणि मीठ घालून तव्यात तेलात थेट Maillard reaction होइस्तो परतवून वरती झाकण ठेवून एक वाफ काढतो. थेट चपाती बरोबर खायला.
>>>>आम्ही न फोडता (म्हणजे
>>>>आम्ही न फोडता (म्हणजे आतल्या सगळ्या बियांसकट) फक्त,जिरे आणि मीठ घालून तव्यात तेलात थेट Maillard reaction होइस्तो परतवून वरती झाकण ठेवून एक वाफ काढतो. थेट चपाती बरोबर खायला.
अरे मस्त. हे करुन पहायला हवे.
>>>>>थेट Maillard reaction
>>>>>थेट Maillard reaction होइस्तो
The Maillard reaction is the chemical process that browns food and creates savory flavors when heated, typically above 285°F
हां हे मीही करते. म्हणजे भाजी जरा लागली की छान लागते म्हणतो ना आपण ते हेच.
धनश्री, मी हे लहान तिखट
धनश्री, मी हे लहान तिखट ढोबळ्यांबद्दल बोलतोय बरं का. ते लवकर लागतात,
तुमच्याकडे गॅस/फ्लेम आहे का ते माहीत नाही. असेल तर त्यावर थेट शिजेपर्यंत भाजा आणि नंतर वरचे काळपट आवरण धुवून घ्या. त्याचे भरीत करून खा.
किंवा लहान लहान पेपर्स मिळाले तर तेलात ते घालून झाकण घालून करपेपर्यंत (पांढरट फोड येतात वरती आणि खाली थोडे खरपते) भाजून घ्या. मग त्यांचा चुरा करून त्यावर साधी फोडणी दिलीत तरी चालेल. मी तो स्मॅशड ऐवज पुन्हा हळद + दाण्यांचे कूट + हिरव्या मिरच्या + जरूरीपुरते पाणी यांच्या फोडणीत शिजवतो. हे जरासे दाट केले की ढोबळी काय दोडकी काय एकदम मस्त शिजली की मस्त लागतात.
असे भाजल्यावर त्यांचा मस्त खाट उठतो. कॅप्सिसियम असलेल्या सगळ्या मिरच्यामंध्ये असा खाट उठतो. तो खाट उठला की ढोबळ्या खमंग लागतात.
होय करते. तुम्ही खाट म्हणता
होय करते. तुम्ही खाट म्हणता आम्ही खकाणा उडाला असे म्हणतो
मिरचीचा खकाणा उडतो.
फोटोतल्या त्या चुण्या
फोटोतल्या त्या चुण्या पडलेल्या भोपळी मिरच्या लहानश्या आणि सुंदर आहेत. नक्की चविष्ट असणार. मी ही अश्या बसक्या, चुणीदार निवडुन घेते. मला त्या ढबाड्या, इस्त्री केलेल्या आवडत नाहीत.