पूर्वार्ध
आदित्य हा एक यशस्वी पण अंतर्मुख शिल्पकार आहे, ज्याच्या कलेत सौंदर्य असले तरी त्याला त्यात 'प्राण' नसल्याची खंत आहे.
शहराच्या गोंगाटापासून दूर, तो आपल्या एकांत वाड्यात येतो, एक अशी अप्सरेची मूर्ती घडवण्यासाठी, जी केवळ सुंदर नसून जिवंत वाटेल. मात्र, महिनाभर प्रयत्न करूनही त्याला त्या दगडावर पहिला स्पर्श करता येत नाही.
एका वादळी रात्री, अचानक वाड्याच्या दरवाजावर थाप पडते. बाहेर उभी असते एक अनोळखी, विलक्षण सुंदर स्त्री आणि कथा एका गूढ वळणावर येते.
*************************************************************************************************************************
शिल्पवेध - भाग २ - अंतिम - देहाचा पाषाण आणि पाषाणाचा देह
“आत येऊ शकते का?”
तिचा आवाज मंद होता, पण तो पावसाच्या प्रचंड आवाजालाही सहज भेदून गेला.
"कोण तू? आणि एवढ्या पावसात, इकडे कुठे?" आदित्यने विचारले. त्याचा आवाज सभ्य होता, पण त्यात संशयही होता.
या दुर्गम वाड्यात एखादी अनोळखी स्त्री अशा रात्री येणे हे सहज मानण्यासारखे नव्हते.
विजांच्या प्रकाशात तिचा चेहरा कधी उजळत होता, कधी अंधारात विरत होता. तिच्या डोळ्यांतली ती अनाकलनीय चमक अजूनही तशीच होती.
"मी माया... रस्ता चुकले आणि पाऊस वाढला, म्हणून इथे आसरा शोधत आले," ती म्हणाली.
आदित्यने काही न बोलता तिला वाट दिली. ती आत आली आणि वाड्याच्या मधल्या चौकात उभी राहिली.
ती चालत असताना तिच्या पायांखालील दगडी जमिनीवर पाण्याचे थेंब पडत होते. तिच्या अंगावरून निथळणाऱ्या पाण्याचे छोटे छोटे प्रवाह जमिनीवर ओघळ तयार करत होते.
दरवाजा बंद होताच बाहेरचा वाऱ्याचा आवाज थोडा कमी झाला, पण पावसाचा अखंड गजर अजूनही ऐकू येत होता.
तो चौक चौकोनी होता. वरून आकाश उघडे होते आणि तिथून पावसाचे थेंब थेट खाली पडत होते. चौकाच्या चारही बाजूंना दगडी कमानी आणि लांब कॉरिडॉर होते.
तिने हलकेच हाताने केसांवरून पाणी झटकले.
आदित्यने शांतपणे तिला कोरडी वस्त्रे दिली तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती.
ही स्त्री कोण आहे, ती इथे कशी आली हे प्रश्न त्याच्या मनात होतेच, पण त्याहून जास्त काहीतरी वेगळंच त्याला जाणवत होतं.
“वरच्या खोलीत जा… तिथे दिवा आहे,” तो म्हणाला.
मायाने फक्त हलकी मान डोलावली.
ती जिन्याकडे वळली. तिच्या ओल्या पावलांचे ठसे दगडी फरशीवर उमटत गेले... लहान, स्पष्ट, आणि काही क्षणांतच विरून जाणारे. आदित्य त्या ठशांकडे काही क्षण बघत राहिला जणू तेही एखाद्या अदृश्य कथेतले संकेत होते.
आदित्य माजघरात परत आला.
समोर तो काळा पाषाण अजूनही तसाच उभा होता...स्थिर, शांत, आणि जणू त्याचीच वाट पाहत.
काही वेळाने वरच्या मजल्यावरून हलकेच पावलांचा आवाज आला.
आदित्यने मागे वळून पाहिले. माया जिन्यावरून खाली उतरत होती. तिने परिधान केलेली गर्द जांभळ्या रंगाची साडी तिच्या गोऱ्या वर्णावर अधिकच खुलून दिसत होती.
तिचे केस अजूनही थोडे ओले होते. त्या ओल्या केसांतून पाण्याचे काही थेंब हळूहळू खाली सरकत ... मानेला स्पर्श करत, पाठीच्या त्या खोल वळणावरून घसरत होते.
ती स्टुडिओत आली आणि शांतपणे त्या पाषाणासमोर बसली.
दोघांमध्ये काही क्षण शांतता होती.
फक्त बाहेरचा पाऊस आणि कधीमधी दूरवरचा विजेचा आवाज.
मायाने त्या दगडाकडे पाहिले आणि आजूबाजूच्या अर्धवट तर काही पूर्ण शिल्पाकडे बघत तिने विचारले, "तू शिल्पकार आहेस?"
आदित्यने त्या काळ्या दगडाकडे हरवल्यासारखे बघत उत्तर दिले , "हो".
“हा दगड अजून असाच का? अक्षत. तू या दगडाला का नाही स्पर्श करत?”
आदित्य काही क्षण विचारात पडला.
त्याने दीर्घ श्वास घेतला.
“मला तो आकार सापडत नाहीये,” तो म्हणाला.
"कसला आकार ?" तिने विचारले.
“मी अनेक स्त्रियांची शिल्पे घडवली आहेत. त्यांच्या चेहऱ्यांचे, त्यांच्या भावांचे, त्यांच्या देहाच्या रेषांचे… पण यावेळी मला काहीतरी वेगळं करायचं आहे.”
तो दगडाकडे पाहत म्हणाला,
“मला या पाषाणात 'यौवन' साठवायचे आहे. खजुराहोच्या नर्तकींच्या कंबरेचा तो वळसा, त्यांच्या देहावरल्या नागमोडी रेषा आणि त्यांच्या डोळ्यांतील ती निमूट आमंत्रण देणारी भावना... मला हे सर्व या एका दगडावर कोरून काढायचे आहे.”
मायाचे डोळे शांतपणे त्याच्याकडे पाहत होते.
त्याच्या आवाजात एक प्रामाणिकता होती. जणू तो फक्त एक शिल्प नव्हे, तर एक अनुभूती घडवू इच्छित होता.
माया काही क्षण शांत बसली. मग ती हलकेच हसली. ते हसू खूप मंद होते, पण त्यात एक लय होती जणू एखाद्या सुरावटीचा पहिला स्वर.
ती हळूहळू उठली. कंदिलाच्या प्रकाशात तिची सावली दगडी भिंतीवर मोठी होऊन हलत होती.
ती त्या काळ्या पाषाणाजवळ गेली. काही क्षण ती त्याच्याकडे पाहत उभी राहिली.
मग ती आदित्यकडे वळली.
"शिल्पकारा…” ती शांतपणे म्हणाली, "त्यासाठी तुला स्त्रीच्या देहाची भाषा शिकावी लागेल.”
“तुला माहित आहे का… खजुराहोच्या मंदिरांमधील शिल्पकारांनी जेव्हा त्या अप्सरा, नायिका आणि देवतांच्या मूर्ती घडवल्या”
ती दगडावर हलकेच हात फिरवत म्हणाली, “ते फक्त कल्पनेतून घडवलं नव्हतं.”
तिने त्याच्याकडे पाहिले. “त्यांनी आधी त्या रसाचा अनुभव घेतला. जीवनाच्या, सौंदर्याच्या, शृंगाराच्या त्या भावात ते स्वतः बुडाले… मगच त्यांनी दगडाला स्पर्श केला.”
तिचा आवाज मंद झाला. “म्हणूनच ते दगड आजही जिवंत वाटतात.” ती पुन्हा त्या पाषाणाकडे वळली.
आदित्यच्या मनात एक विचित्र अस्वस्थता आणि आकर्षण एकाच वेळी उमटत होते.
कारण त्याला अचानक जाणवले, माया केवळ शिल्पाविषयी बोलत नव्हती. ती जणू त्याला काहीतरी अनुभवायला सांगत होती.
तिने हळूच आपल्या हाताचे बोट त्या थंड दगडावरून फिरवले. तो स्पर्श इतका हलका होता की जणू ती दगडाला स्पर्श करत नव्हती, तर त्याच्याशी संवाद साधत होती.
आश्चर्य म्हणजे, जिथे जिथे तिचे बोट फिरले, तिथे तिथे त्या काळ्या दगडावर एक वेगळीच चमक उमटली.
आदित्य काही क्षण स्तब्ध पाहत राहिला.
माया हळूहळू त्याच्याकडे वळली.
"तुला जो आकार हवाय त्याचा शोध संपलाय" ती त्याच्या अगदी जवळ येत म्हणाली.
आता ती इतकी जवळ होती की आदित्यला तिच्या श्वासाची ऊब जाणवत होती.
त्या श्वासात एक मंद सुगंध होता मोगऱ्याचा… आणि ओल्या मातीचा. तो सुगंध इतका नाजूक आणि गूढ होता की आदित्यला क्षणभर भोवळ आल्यासारखे वाटले.
त्याने नकळत तिचा हात धरला. तो हात मखमलीपेक्षाही मऊ होता. पण त्या मऊपणात एक विचित्र उष्णता होती जणू तिच्या हातांतून काहीतरी प्रवाहित होत आहे.
तिने सावकाश आपल्या खांद्यावरचा पदर ढळू दिला. तिचा उजवा खांदा मेणबत्तीच्या प्रकाशात सोन्यासारखा चमकू लागला. "ज्या वळणांचा तुला शोध आहे, ती इथे साक्षात उभी आहेत. तुझी बोटे ही तुझी छन्नी समज आणि त्यांचा अनुभव घे."
आदित्यचा हात नकळत पुढे सरसावला. त्याने आपल्या हाताच्या बोटांनी तिच्या खांद्यावरून खाली, तिच्या दंडाच्या कोमल त्वचेला स्पर्श केला. मायाने आपले डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला.
तिची ती हालचाल पाहून आदित्यला जाणवले की हा एखादा मानवी देह नसून साक्षात शृंगाराची एक जिवंत कविता आहे.
मेणबत्त्यांची ज्योत आता वाऱ्याने नव्हे, तर तिथे निर्माण झालेल्या ऊष्म्याने थरथरत होती. मायाने साडीचा पदर सैल करताच कंदिलाच्या प्रकाशाने तिच्या देहाभोवती एक मृदू तेज निर्माण केले.
जांभळ्या साडीच्या घड्या तिच्या कंबरेभोवती हळुवारपणे पडल्या होत्या, आणि त्या घड्यांच्या मध्ये तिच्या देहाची लय स्पष्ट जाणवत होती जणू एखाद्या सुरेल रागाची मंद चढ-उतार.
मायाने आपले वस्त्र पूर्णपणे त्यागले होते. प्रकाशाच्या त्या मंद पिवळसर छटा तिच्या अंगावर खेळत होत्या, जणू एखाद्या सोन्याच्या मूर्तीवर अभिषेक होत असावा.
तिची त्वचा पावसामुळे अजूनही किंचित ओलसर होती, ज्यावर मेणबत्तीचा प्रकाश हिऱ्यासारखा चमकत होता.
आदित्य काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
त्याला जाणवत होते की त्याच्या समोर केवळ एक स्त्री उभी नाही तर त्याच्या कल्पनेतील अप्सरेचा आकार हळूहळू वास्तवात उतरतो आहे.
मायाने त्याच्याकडे एक दीर्घ नजर टाकली. त्या नजरेत लाज नव्हती… संकोच नव्हता… पण एक प्रकारचा स्वाभाविक आत्मविश्वास होता, जसा खजुराहोच्या शिल्पांतील नायिकांच्या चेहऱ्यावर दिसतो.
ती हळूहळू त्याच्या जवळ आली. "शिल्पकारा, दगडाला स्पर्श करण्यापूर्वी या जिवंत ऊर्जेला स्पर्श कर..." ती श्वास रोखून म्हणाली.
आदित्य तिच्या जवळ गेला. त्याच्या बोटांनी पहिल्यांदा तिच्या गळ्याखालच्या त्या नाजूक हाडाला हलकेच स्पर्श केला.
तो स्पर्श अत्यंत सावध होता जणू तो दगडावर पहिला प्रहार करण्याआधीची तपासणी करत आहे.
मायाने आपले डोळे मिटले. तिच्या कंठातून एक हलकासा हुंकार बाहेर पडला.
तो आवाज इतका मंद होता की तो शब्द नव्हता तो जणू संगीताचा एक सूक्ष्म स्वर होता.
आदित्यच्या बोटांनी हळूहळू तिच्या देहाच्या रेषांचा मागोवा घ्यायला सुरुवात केली.
मानेलगतची ती रेषा खाली उतरली… आणि तिच्या वक्षस्थळाच्या मृदू गोलाईजवळ थांबली.
त्या प्रकाशात त्या रेषा एखाद्या शिल्पासारख्या दिसत होत्या जणू निसर्गाने स्वतः काळजीपूर्वक कोरलेल्या.
मायाचा श्वास आता किंचित खोल झाला होता.
आदित्यचे बोट पुढे सरकले. ते तिच्या देहाच्या मध्यभागी आले जिथे तिची नाभी एक छोटया, गूढ बिंदूसारखी दिसत होती.
त्या नाभीभोवतीचा मृदू उतार कंबरेकडे जाताना अचानक लयीने वाकत होता.
आदित्यच्या डोळ्यांत कलाकाराची तन्मयता चमकत होती.
“ही रेषा…” तो कुजबुजला.
त्याच्या बोटांनी तिच्या कंबरेच्या त्या मोहक वळणाचा मागोवा घेतला.
“हे वळणच शिल्पाला जिवंत करतं.”
माया मंद स्मित करत होती. ती अजूनही स्थिर उभी होती जणू एखाद्या प्राचीन मंदिरातील अप्सरेची मुद्रा.
आदित्यची नजर आता त्या वळणाच्या पुढे गेली जिथे कंबर हळूहळू विस्तारत नितंबांच्या गोलाईत मिसळत होती.
तो क्षणभर थांबला. जणू त्याच्या मनात एक आकृती अचानक पूर्ण झाली होती.
मायाने हळू आवाजात विचारले, “आता दिसते आहे का तुला…?”
आदित्यने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत आता गोंधळ नव्हता.
फक्त एक चमक होती एक कलाकाराला अचानक सापडलेल्या आकाराची चमक.
आदित्यने आपले दोन्ही तळहात तिच्या कमरेच्या खोल वळसावर ठेवले. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे उमटले. त्याने आपले ओठ तिच्या मानेच्या वळणावरून फिरवले, तिथे असलेल्या तिच्या नाडीची धडधड त्याला आपल्या ओठांवर स्पष्ट जाणवली.
मायाने एक आर्त हुंकार दिला आणि तिने आदित्यला स्वतःकडे खेचले, तेव्हा त्याला जाणवले की जगातील सर्व कला या एका स्पर्शासमोर फिक्या आहेत. शृंगाराचा हा प्रवाह आता अडवणे अशक्य होते.
आदित्य तिच्या पायाच्या नखापासून ते तिच्या केसांच्या बटांपर्यंत आपल्या स्पर्शाने जणू तो आकार त्याच्या हातांच्या स्मृतींमध्ये साठवून ठेवत होता. त्याचा तो प्रत्येक स्पर्श त्या पाषाणात जणू प्राण फुंकणार होता.
जजसजसा त्या शृंगाराचा आवेग वाढत गेला, तसतसे त्या काळ्या पाषाणावर विलक्षण स्थित्यंतर घडू लागले.
आदित्यच्या प्रत्येक स्पर्शानुसार त्या दगडावर आपोआप सूक्ष्म ओरखडे आणि रेखीव नक्षी उमटू लागली; जणू त्यांच्या मीलनातून उत्सर्जित होणारी ती आदिम ऊर्जा तो पाषाण तृषेने शोषून घेत होता. मायाचे ते आर्त हुंकार आणि आदित्यचा तो व्याकुळ, जड झालेला श्वास त्या रात्रीच्या गूढ शांततेला छेद देत होते.
त्या एका रात्रीत, खजुराहोच्या सहस्र वर्षांच्या शृंगाराचा संपूर्ण सारांश त्या वाड्यात अवतरला होता. आदित्यला क्षणोक्षणी जाणवत होते की, हा केवळ देहांचा खेळ नाही, तर ही एका देवतेची केलेली परम पूजा आहे जिच्या मुक्तीचा मार्ग याच शृंगारिक यज्ञातून जात होता.
त्याने थरथरत्या हातांनी आपली छन्नी उचलली...आणि त्या काळ्या पाषाणाच्या काळजावर पहिला प्रहार केला.
'टक…'
तो तीक्ष्ण आवाज त्या रिकाम्या खोलीत प्रतिध्वनित झाला. माया तिथेच निश्चल उभी होती, तिचे अनावृत्त सौंदर्य मेणबत्तीच्या प्रकाशात थरथरत होते. तिच्या ओठांवर पुन्हा तेच गूढ, चिरंतन स्मित उमलले होते.
कारण तिला ठाऊक होते त्या रात्री, त्या जीर्ण वाड्याच्या अंधारात, पाषाणातून केवळ एका स्त्रीची मूर्ती साकारत नव्हती. तर त्या रात्री, एक ध्येयवेडा शिल्पकार आणि सौंदर्याचे ते आदिम, अतींद्रिय रहस्य एकमेकांच्या आत्म्याला स्पर्श करत होते.
जेव्हा ते मीलन आपल्या अत्युच्च शिखरावर पोहोचले आणि दोघांचेही देह एका विलक्षण तृप्तीने शांत झाले, तेव्हा त्या काळ्या पाषाणातून एक मंद, अलौकिक निळसर प्रकाश बाहेर पडला. क्षणात ती संपूर्ण खोली त्या प्रकाशाने न्हाऊन निघाली.
त्या दिव्य शृंगाराचा तो परमोच्च बिंदू गाठला गेला, तसा रत्नदुर्गच्या त्या प्राचीन भिंतीही मुळापासून थरथरल्या.
आदित्य आणि माया यांच्या मीलनातून निर्माण झालेली ती ऊब केवळ शारीरिक नव्हती; ती एका कलाकाराच्या निष्ठेची आणि एका देवतेच्या युगायुगांच्या अतृप्त इच्छेची एक भव्य परिणती होती.
पहाटेच्या सुमारास, जेव्हा आकाशाचा रंग निळसर-राखाडी होऊ लागला, तेव्हा आदित्यला एका विलक्षण शांततेने जाग आली.
त्याचे अंग शृंगारिक थकव्याने जड झाले होते, पण मनात एक अनामिक समाधान होते. त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याला जाणवले की त्याचे हात अजूनही त्याच काळ्या पाषाणाला विळखा घालून आहेत, पण...
त्याच्या हाताखाली आता तो खडबडीत, थंड दगड नव्हता. त्याला एक मऊ, उबदार आणि मखमली स्पर्श जाणवत होता. तो दचकून मागे सरकला.
समोर जे दृश्य होते, ते पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला.
तो काळा पाषाण आता पूर्णपणे रूपांतरित झाला होता. तिथे आता माया नव्हती, पण त्या पाषाणातून साक्षात मायाच प्रकटली होती. खजुराहोच्या भिंतीवरची एखादी 'शालभंजिका' जशी जिवंत होऊन बाहेर यावी, तशी ती मूर्ती दिसत होती.
पण ही मूर्ती दगडी नव्हती. तिचे शरीर पाषाणाचे असले तरी त्यात रक्ताभिसरण होत असल्याचा भास होत होता. तिच्या अंगावर त्या रात्रीच्या शृंगाराच्या खुणा... नखांचे ओरखडे आणि दंतक्षत अगदी स्पष्टपणे दिसत होते.
"माया?" आदित्यचा आवाज कातर झाला.
त्याने स्टुडिओत चहूकडे पाहिले. मायाचे ते जांभळे वस्त्र कोपऱ्यात पडले होते, पण माया गायब होती. वाड्याचा तो विशाल दरवाजा अजूनही आतून घट्ट बंद होता. मग ती गेली कुठे?
आदित्यने पुन्हा त्या मूर्तीकडे पाहिले. तिचे ओठ अर्धवट उघडलेले होते, जणू ती अजूनही तो शृंगारिक हुंकार देत असावी. तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात आनंदाश्रूंचा एक थेंब साचला होता, जो आता हळूहळू पाषाणात गोठत होता.
त्याला अचानक खजुराहोच्या त्या प्राचीन दंतकथेची आठवण झाली. असे म्हणतात की, काही अप्सरा शापित होऊन पाषाणात बंदी होतात आणि जोपर्यंत एखादा शिल्पकार त्यांना केवळ कलेने नव्हे, तर आपल्या आत्म्याच्या आणि देहाच्या संपूर्ण अर्पणाने स्पर्श करत नाही, तोपर्यंत त्या मुक्त होत नाहीत.
आदित्यने त्या मूर्तीच्या पायाशी मस्तक टेकवले. त्याला जाणवले की त्याने केवळ एक शिल्प घडवले नव्हते, तर एका देवतेला तिचे अस्तित्व परत मिळवून दिले होते. त्या मूर्तीच्या शरीरातून अजूनही तोच मोगऱ्याचा आणि ओल्या मातीचा गंध येत होता, जो मायाच्या शरीरातून येत होता.
त्या दिवसापासून आदित्यने पुन्हा कधीही छन्नी हातात घेतली नाही. त्याची कला परिपूर्ण झाली होती. त्याने जे साध्य केले होते, ते जगातील कोणत्याही शिल्पकाराला जमले नव्हते.
लोक म्हणतात की रत्नदुर्गच्या त्या वाड्यातून आजही रात्रीच्या वेळी कुजबुज ऐकू येते. जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा त्या पाषाणमूर्तीवर घामाचे थेंब साचतात आणि वाड्याच्या खिडक्यांमधून दोन सावल्या एकमेकांत मिसळताना दिसतात.
आदित्य आता त्या वाड्याचा वारसदार राहिला नव्हता, तो त्या 'जिवंत शिल्पाचा' पुजारी झाला होता.
त्याने जगाला सांगणे सोडून दिले की तो दगड आहे; कारण त्याला माहित होते की, दर पौर्णिमेला जेव्हा चंद्र डोक्यावर येतो, तेव्हा ती मूर्ती पुन्हा एकदा श्वास घेऊ लागते आणि त्या एका रात्रीसाठी रत्नदुर्ग पुन्हा एकदा शृंगाराच्या स्वर्गात रूपांतरित होतो.
*समाप्त*
अतिशय सुंदर, तरल कथा..
अतिशय सुंदर, तरल कथा..
चित्रदर्शी वर्णन.
आणि आधीचा भाग विसरायचा आत कथा पूर्ण करण्यासाठी धन्यवाद.
छान कथा.
छान कथा.
परिपुर्ण कथा
परिपुर्ण कथा
क्या बात है
क्या बात है
अतिशय सुंदर कथा, मोजून मापून वापरलेले शब्द पण केवढ अलंकारिक.
एकदम दोन्ही भाग वाचले.
सुरुवातीला वाटलं नेहमीसारखी भयकथा भुताटकी वैगरे असेल, पण खूप छान रंगवली कथा
धन्यवाद धनवन्ती, urmilas,
धन्यवाद धनवन्ती, urmilas, ekujadhav आणि manya!