इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत

Submitted by माझेमन on 19 March, 2026 - 08:48

मुळात या युद्धमागचं कारण 'इराण हा देश अण्वस्त्रसज्ज बनू नये' हे ' हे तकलादू आहे. ज्या दिवशी अणुबॉम्बची पहिली यशस्वी चाचणी झाली आणि हिरोशिमा, नागासाकीमध्ये प्रचंड नरसंहार केला गेला त्यादिवशी जग एका पॉईंट ऑफ नो रिटर्नवर पोहोचले. प्रत्येक देशाला संदेश मिळाला की अणुबॉम्ब हा तुमचा शेवटचा बचाव आणि शेवटचं शस्त्र आहे. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धातल्या मित्र देशांनी अणुचाचण्या केल्या, अण्वस्त्रं बनवली. त्यामागोमाग चीनसारख्या महत्वाकांक्षी व आश्चर्यकारकरित्या भारतासारख्या अहिंसेचा गजर करणाऱ्या देशानेही अण्वस्त्रसज्जतेचा मार्ग चोखाळला.

त्यानंतर जगभरातल्या सेन्सिबल माणसांना जाग येऊन अजून तरी चाचण्या होऊ नयेत ही मागणी पुढे आली व मुळात
अण्वस्त्रसज्ज असलेल्या देशांनी इतरांवर बंधन घालायला सुरुवात केली. मी माझी शस्त्रं नष्ट करणार नाही पण तुम्ही मात्र ही शस्त्रं निर्माण करायची नाहीत एवढा दुटप्पीपणा इतर देश का म्हणून खपवून घेतील? सुदैवाने हे तंत्रज्ञान सहजसाध्य नाही, अफाट
संसाधने व आर्थिक समृद्धी असल्याशिवाय त्यात पाय घातला की काय होते याचे उत्तम उदाहरण आपला शेजारी देश आहे. एके काळी तिथल्या राज्यकर्त्यांनी वल्गना केली होती की गवत खाऊन राहून पण अण्वस्त्र निर्माण करू. आज जगाने आर्थिक मदत केली नाही तर तिथल्या सामान्य जनतेवर खरोखर गवत खाण्याची वेळ येईल. असो मूळ विषयाकडे वळू. अण्वस्त्रप्रसार बंदी (Non Proliferation Treaty) व Comprehensive Test Ban treaty CTBT चा वापर करून आणि आर्थिक निर्बंध लादून इतर देशांना अण्वस्त्रसज्जतेपासून प्रवृत्त करण्यात मित्र देश यशस्वी ठरले.

स्वतः अण्वस्त्रसज्ज असलेल्या (पण जाहीर न केलेल्या) इस्रायलची इराणकडे अण्वस्त्रं येण्याबद्दल धास्ती मी समजू शकते. कारण एक अण्वस्त्रं इवलुश्या इस्राएलचे अस्तित्व कायमचे मिटवू शकते. पण ज्या देशाने इराणला प्रथम अणुशक्तीची झलक दाखवली, त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले त्या अमेरिकेला नागरी अणुशक्ती कालांतराने मिलिटरीकडे जाईल हा अंदाज नव्हता हे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. आत्ताचा त्यांचा सहभाग म्हणजे त्यांनीच बाटलीतून बाहेर काढलेल्या राक्षसाला बाटलीमध्ये कोंबायचा
आटापिटा आहे.

अनुक्रमणिका :
भाग १ : इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत
भाग २ : इराणमधील इस्लामिक क्रान्ती
भाग ३ : इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम
भाग ४ : इराण आणि भारत
भाग ५ : भारत इस्राएल संबंध
भाग ६ : IMEC – India Middle East Europe Economic Corridor
भाग ७ : भारत सद्यस्थिती

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले त्या अमेरिकेला नागरी अणुशक्ती कालांतराने मिलिटरीकडे जाईल हा अंदाज नव्हता हे म्हणणे फार धाडसाचे ठरेल.<<
याकरता तुम्हाला १०-१५ वर्षं मागे जावं लागेल. इराणने एनपिटि वर सहि करुनहि त्यांची अणुबाँब बनवण्याकडे जोरदार वाटचाल सुरु आहे याची कुणकुण अमेरिकेला ओबामाच्या काळातंच लागली होती. मूळात ट्रंपने आता केलेली कारवाई त्यावेळेसच होणं गरजेचं होतं, पण ज्या कणाहिन नेतृत्वाने क्रेडिबल इंटेल असुनहि ओसामाला ठोकायला एक वर्षं घेतलं त्यांच्याकडुन इराणची नुक्लियर केपबिलिटि नष्ट करण्याची अपेक्षा बाळगणं इज लाइक.. व्हेन पिग्स फ्लाय...

<अणुबॉम्ब हा तुमचा शेवटचा बचाव आणि शेवटचं शस्त्र आहे > +१
<मी माझी शस्त्रं नष्ट करणार नाही पण तुम्ही मात्र ही शस्त्रं निर्माण करायची नाहीत एवढा दुटप्पीपणा इतर देश का म्हणून खपवून घेतील?> +१.
इराणने अण्वस्त्रसज्ज व्हावं असं माझं मत आहे.

अच्छा ! गेली १०-१५ वर्षे इराण अण्वस्त्रे तयार करत आहे तर !
इस्रायल ला तर एन पीटी वर सही न करताच अण्वस्त्रे बाळगायची परवानगी !
आजपासून १०० वर्षांनी पेपर मध्ये हेडलाईन असेल
'Iran weeks away from atomic bombs, Israel urges US to act'

जर अमेरीका अण्वस्त्रधारी देश झाल्या नंतर लगेचच रशियाची शकलं झाली असती आणि एकही तुल्यबळ जागतिक महासत्ता उरली नसती तर इतरांना अण्वस्त्रधारी देश बनण्यासाठी बफर काळ मिळाला नसता आणि साऱ्या जगाने अमेरीकेच्या अण्वस्त्रांच नंगा नाच पहीला असता व निमूट सहनही करवा लागला असता....सर्वांकडे अण्वस्त्रे आल्यानेच हे गेली ६० वर्षे आटोक्यात राहीले आहेत.

गेली १०-१५ वर्षे इराण अण्वस्त्रे तयार करत आहे तर >>>
या लेखमालेतील तिसरा लेख पूर्णतया इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमाबद्दल आहे.

>>> मूळात ट्रंपने आता केलेली कारवाई त्यावेळेसच होणं गरजेचं होतं
अगंबाई! हे बघा एक लब्बाड माणूस तेच्च म्हणत होतं तेव्हाच्च!!

>>> आधीच्या प्रेसिडेंटला फोन केला वगैरे झाहिरात सुरु होती
त्याबद्दल दोन थिअरीज ऐकल्या. एकतर डम्बलडोअरच्या ऑफिससारखी वेस्ट विंगमधली डेड प्रेसिडेन्ट्सची पोर्ट्रेट्स बोलत असावीत किंवा लब्बाड माणूस आरशात बघून तसं स्वतःच स्वत:लाच म्हणालं असावं.
लब्बाड माणूस एकाच वेळी सिटिंग आणि एक्स प्रेसिडेन्ट नाही का?

>> लब्बाड माणूस आरशात बघून तसं स्वतःच स्वत:लाच म्हणालं असावं.
लब्बाड माणूस एकाच वेळी सिटिंग आणि एक्स प्रेसिडेन्ट नाही का?>> होच की! माझ्या मंद बुद्धीला हे लक्षातच आले नाही! Proud

चांगली लेखमाला आहे. वाचतोय.

मला यातली खूप माहिती नाही पण जितकी आहे त्यावरून लिहीतो.

मी माझी शस्त्रं नष्ट करणार नाही पण तुम्ही मात्र ही शस्त्रं निर्माण करायची नाहीत एवढा दुटप्पीपणा इतर देश का म्हणून खपवून घेतील? >> हे इतके एकतर्फी आर्ग्युमेण्ट नसावे. तुम्ही त्यापेक्षा नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य ई मधे लक्ष घाला, त्याकरता आम्ही काही निधी उपलब्ध करून देऊ. पण त्याबदल्यात आण्विक शस्त्रे निर्माण करायची नाहीत हे बंधन - असे काहीतरी एकत्र असेल असा अंदाज आहे. नाहीतर देश मुळात असली चर्चाच कशाला करतील. कॅरट आणि स्टिक सारखे असेल.

"कारवाई तेव्हाच व्हायला हवी होती" बद्दल. कधी कधी आपण हा निर्णय योग्य आहे का हे येणारा काळ ठरवेल म्हणतो, तसे इथे त्यानंतर आलेल्या काळाने ऑलरेडी ठरवले आहे. ओबामाचा कालावधी संपूनही आता दहा वर्षे होत आली. मधल्या काळात इराणकडून अमेरिकेला असलेला धोका वाढल्याचा काही पुरावा नाही. म्हणजे तेव्हा हल्ला न करण्याचा निर्णय बरोबरच होता असे म्हणावे लागेल. खुद्द ट्रम्पही ओबामाच्या काळात "ओबामाला निगोशिएशन करता येत नाही म्हणून तो इराणवर हल्ला करून अमेरिकेला युद्धात लोटेल" असे म्हणत होता. नंतर पहिल्या टर्म मधे ट्रम्पनेही केला नाही. इव्हन २०२४ च्या कॅम्पेनमधे अनावश्यक युद्धे लादणार नाही हा त्याचा एक मुख्य पॉईण्ट होता. जर २०१२ पासून हा धोका त्याला माहीत होता तर कॅम्पेनच्या वेळेस नव्हता व आता अचानक आला असेही होऊ शकत नाही. त्यानंतर आताही सबळ पुरावा कोठेच दिसत नाही. तेव्हा गरज तेव्हाही नव्हती आणि आताही, असेच चित्र आहे. काही वेगळा पुरावा समोर आला तर ठीक. पण तसे दिसत नाही. त्याचे मेगिन केली, टकर कार्लसनसारखे मीडिया समर्थकही बुचकळ्यात पडलेत आणि गॅबार्ड, हॅगसेथ ई ना नीट उत्तरे देता येत नाहीयेत.

टू बी फेअर, मी ऐकले त्याप्रमाणे इराणशी वाटाघाटी करायचे आत्ताही प्रयत्न झाले. त्यात त्यांच्या लोकांनी आम्ही दोन आठवड्यात बाँब तयार करू शकतो असे छातीठोकपणे सांगितले. हे सगळे कितपत खरे आहे माहीत नाही. पण तरीही त्यांनी वाटाघाटीत सांगितले म्हणजे अमेरिकन इंटेल पेक्षा ते जास्त ग्राह्य झाले असे होत नाही. निगोशिएशन च्या बाबतीत ट्रम्पला इतके नक्कीच माहीत असेल.

तुम्ही त्यापेक्षा नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य ई मधे लक्ष घाला, त्याकरता आम्ही काही निधी उपलब्ध करून देऊ
>>> हो बरोबर आहे की निगोसिएशन्स अशीच होतात.

पण एखाद्या देशाला फारश्या अंतर्गत समस्या नसतील किंवा अंतर्गत समस्यांइतकाच धोका बाह्य शत्रूंकडून वाटत असेल (उदा. भारत) तर त्याने मला माझं सार्वभौमत्व जपण्यासाठी अण्वस्त्र निर्माण करायचीच आहेत असं म्हटलं तर त्याच्यावर आर्थिक बंधनं लादणं हे एकतर्फीच आहे ना? बरं ही बंधनं लादताना त्या देशांनी स्वतःची अण्वस्त्र नष्ट केलीत का , तर नाही. मग काय अधिकार आहे असा प्रश्न विचारला जाणारच.
दुसरी गोष्ट म्हणजे इराणकडे क्रुड ऑईलमार्फत सुबत्ता येत असताना त्यांना कदाचित अमेरीकन मदतीची गरज नसेल तर ते निगोसिएशन टेबलवर येणारच नाहीत.
तिसरा मुद्दा म्हणजे मित्र देशांनी क्रुड ऑईलच्या शोधानंतर त्यावर येनकेनप्रकारे आपला ताबा राखण्यासाठी जी सत्तांतरं घडवून आणली आहेत त्यामुळे त्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण होतात. उदा. इराणने तेलसाठ्यांचे राष्ट्रीयीकरण केल्यावर ब्रिटीश राजदूत सर फ्रान्सिस शेपहर्ड यांचे उद्गार आहेत की इराणी लोक त्यांच्या तेलसाठे मॅनेज करण्यास अक्षम आहेत. अशीच काहीशी वसाहतवादी मानसिकता विन्स्टन चर्चिल यांनी भारताच्या स्वातंत्र्याविषयी दाखवली होती.

इराणमधल्या सत्तांतराबद्दल पुढच्या लेखात माहिती आहे.

अमेरिका हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणारा देश आहे. पण ते स्वतःपुरते. इतर जगासाठी तो एक महत्त्वाकांक्षी देश आहे. त्याला जगातली महासत्ता बनून राहायचे आहे. यासाठी त्याला इंधन, पैसा, अण्वस्त्र सर्व हवे आहे. इस्त्राईलला तो सोबत घेऊन आहे कारण टेक्नॉलॉजी सुद्धा हवी आहे जे या आणि येत्या काळातले सर्वात मोठे शस्त्र आहे.

वाचतेय.
<अणुबॉम्ब हा तुमचा शेवटचा बचाव आणि शेवटचं शस्त्र आहे > +१
<मी माझी शस्त्रं नष्ट करणार नाही पण तुम्ही मात्र ही शस्त्रं निर्माण करायची नाहीत एवढा दुटप्पीपणा इतर देश का म्हणून खपवून घेतील?> +१.
शाळकरी मुलींवर झालेल्या हल्ल्याने जीव कळवळला व हिरोशिमा, नागासाकीचीच आठवण आली.

रुल बेस्ड जग राहिलेलं नाही हे मार्क कार्नी म्हणालेला ते खरं आहे. सध्या ब्लॅक अँड व्हाईट उत्तर द्यायचं झालं तर इराण माझ्या गुड बुक्स मध्ये आहे. शिवाय शत्रूचा शत्रू तो आपला मित्र न्यायही आहेच. इराणने स्वसंरक्षणार्थ आणि डिटरंट म्हणून आण्विक सामर्थ्य तयार करावेच. तो नक्की अमेरिका आणि इस्रायल पेक्षा जबाबदार वापर करेल.