टूटेंगे भरम सारे धीरे धीरे

Submitted by एक लेखक on 6 March, 2026 - 03:42

शेजारच्या बुद्धूरामने एक दिवस चक्क वाघ आणला.
त्याला सर्वांनी सांगितले की "रानटी जनावर आहे, महागात पडेल.
तर सर्वांना तो म्हणाला," शेर पाला है, खर्चा तो होगा ही"
महाग म्हणजे त्याने शब्दशः अर्थ घेतला.

एकूणच घरी वाघ आणणाऱ्या इसमाला सल्ला देणारे सुद्धा कमी नाहीत असेच तुम्हाला वाटेल. पण त्याच्या या हौसेने आमचा जीव धोक्यात आला होता ना!

मात्र काही दिवसातच शंका येऊ लागली.
म्हटलं "हुषाराम नक्की वाघच आहे ना? " बु ला मी हु म्हणतो.
तर म्हणाला "जलो मत. शेर पाला है"

हिंदीत शेर म्हणजे सिंह. वाघाला बाघच म्हणतात. सांगून बघितलं तर म्हणतो.
" ये बब्बर शेर है."
आहे मराठीच. पण गेल्या दोन वर्षांपासून सतत हिंदी बोलून दोघांची पंचाईत करत असतो. अधून मधून गुजराती बोलतो.
"गुजरात मा शेर छे, इसलिये प्रॅक्टीस करूं छू "

छू कि छे विचारणार होतो तो इतक्यात वाघ पळत सुटला. पळता पळता त्याने हंबरडा पण फोडला..
एक शुभ्र घोडा चालला होता. त्याला जाऊन मिठी मारली आणि जमिनीवर लोळण घेतली.

लोक म्हणाले " अरेरे कसला रे वाघ? इज्जत घालवली"
बुद्धू म्हणाला" शेर है, घोडे को प्यार से औकात दिखा दी"

त्याला पिंट्या म्हणाला "गुजरात मधे तर Lions आहेत. Tiger बंगाल मधे आहे."
तर हा पिंट्याचं बौद्धिक घेणार इतक्यात त्याचाच मुलगा चिन्तन्मय आला..
" बाबा. बरोबर आहे पिंट्या. गुजरात मधले लायन्स तर पाळीव प्राणी आहेत. ते चावत नाहीत. ते जोरात पळू शकत नाहीत. त्यांना यू यू किंवा च्चु च्चु चुचकारलं कि ते येऊन पाय चाटतात. बंगाली टायगर एका फटक्यात माणसाला मारतो"

बुद्धूने मुलाला जोरात दम भरला आणि घरात जाऊन स्वयंपाकघरातला चौकोन शेणाने सावरायची आज्ञा केली. बाकि फुल्या फुल्या तत्काळ Admin ने गोठवल्या.

पण मला शंकाच होती..
आणि एक दिवस ते झालंच. तारेतून जाताना..

पण त्या आधी हा वाघ घोड्याकडे गवत खायची परवानगी मागत होता तेव्हाच शंका आली होती. पण आता तुम्हीही बघा.

Screenshot_20260306_133409_Facebook.jpg
पण बुद्धू?
अजूनही तो मान्य करत नाही. बुद्धूचे फॉलोअर्स सोडून गेलेत. त्यांचा भ्रमनिरास झाला.

बुद्धू बद्दल प्रार्थना करू कि,

ओ मोहन प्यारे
निर्गुण और न्यारे
इतनी बुद्धि इसे दे कि इसके
टूटेंगे भरम सारे
धीरे धीरे

( संपूर्ण रूप से काल्पनिक. कथा मे का कोई भी पात्र अपनेच किसी को मिल्या तो योगायोग समझो.)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची पोस्ट मजेशीर आहे पण मुद्दा नेमका मांडलात.

आपण चुकीची गोष्ट करूच शकत नाही हा इगो आपल्याला आपली चूक मान्य करू देत नाही. त्यामुळे घोडा पाळला असला तरीही आपण 'शेर' पाळल्याच्या भावनेत जगत असतो. आजूबाजूचे लोक वेळोवेळी सावध करतात. काही संथपणे साथ देत रहातात, काही सावध करून दूर निघून जातात.

लोक तुम्ही वाघ पाळला आहे म्हणून घाबरून तुमच्या पासून दूर जात नाहीत तर तुम्ही पाळलेल्या घोड्याला वाघ समजता आणि तो भ्रम टिकवण्याचा तुमचा अट्टहास त्यांना तुमच्यापासून दूर करतो.