तु ही केला होता कधीकाळी एल्गार गांधी
इंग्रज पळे पाहून अहिंसेची तलवार गांधी
तु ही नाकारले होते देवळातल्या धर्माला..
दिली माणसाच्या एकीची ललकार गांधी
भ्रष्टाचार, गरिबी, दिरंगाई नि उजाड गावे
तुझे रामराज्य ना झाले साकार गांधी ..
तुझ्या ब्रम्हचर्यची चर्चा हाय! खुप झाली
कोणी ना घेतले सत्याग्रहाचे हत्यार गांधी
तुझी किंमत भारताने इतकी अरे! केली
तुला बांधून दिला यमुनेचा किनार गांधी
गोडसेने तुला जिवंत एकदा मारले होते
येथे तुझ्यावर रोज होतो गोळीबार गांधी
हे उद्ध्वस्त देश नि जळणारी माणूसकी
तु ओरडून सांग जगाला बुद्धाचे सार गांधी
काल माझा मनाचा कोपरा करपून गेला
एक नेता सभेत म्हणाला धिक्कार गांधी
देश माझा विलायती कपड्यात गुंडाळला
किमया चरख्याची कुणा कळणार गांधी ?
झोपला आहे देश माझा नि मी अस्वस्थ!
तुला ही शांतता राजघाटची प्यार गांधी
ना वागला देश हे सत्य आहे रामाप्रमाणे
जाळले त्यांनी कधीच तुझे विचार गांधी
गांधी
Submitted by Kalpesh Gaikwad on 25 January, 2026 - 04:38
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दाहक वाटली. मनातून आतून आलेली
दाहक वाटली. मनातून आतून आलेली आहे. तळतळ पोचली.
धनश्री +१
धनश्री +१
धन्यवाद धनश्री
धन्यवाद धनश्री