खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
त्या वेळी जपानमधे एक सम्राट होता. हा सम्राट शक्तिशाली होता आणि त्याला युद्धाची एव्हढी भूक होती कि फावल्या वेळेतही तो कोंबड्यांच्या झुंजी बघत असे. त्यासाठी त्याच्याकडे अनेक जातींचे हिंस्त्र आणि युद्धकुशल कोंबडे होते. त्यांना त्याने राजयोद्ध्यांचा दर्जा दिला होता. त्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाई.
पण एव्हढे करूनही सम्राटाची भूक काही कमी होत नव्हती. त्याला एक असा अजेय योद्धा हवा होता ज्याच्या नुसत्या दर्शनानेच समोरचा कोंबडा भयभीत होईल. त्या काळी चीनमधेही असाच एक कोंबड्याच्या झुंजींचा एक विशेषज्ञ होता ज्याचा कोंबडा अजेय आहे असा त्याचा दावा होता. त्याची ही कीर्ती सम्राटापर्यंत पोहोचल्यापासूनच तो अस्वस्थ झाला होता. त्या काळी चीन हा दुर्बल देश होता. जपान हा सामर्थशाली देश होता. त्यामुळे चीन मधल्या कोंबड्याने जपानी कोंबड्याला आव्हान द्यावे हे सम्राटाला सहन होत नव्हते.
त्याने मग असा विश्वविजेता कोंबडा तयार करण्यासाठी मंत्र्यांची बैठक घेतली. त्यात त्याने विचारलं कि असा कोंबडा कोण तयार करेल ? सर्वांनी सम्राटाला सांगितलं कि सीमेवरच्या डोंगरात राहणारा म्हातारा झेन गुरू चौआंग तोकौंग हाच हे काम करण्यासाठी योग्य आहे.
सम्राटाने मग एक सर्वश्रेष्ठ कोंंबडा सोबत घेतला आणि स्वतः फारसा लवाजमा न घेता त्या झेन गुरूची भेट घेतली. त्याला सन्मान दिला आणि आपल्या येण्याचं कारण सांगितले. चौआंग तौकोंग ने कोंबडा ठेवून घेतला आणि एक शब्दही न बोलता सम्राटाला ये आता अशा अर्थाची खूण केली.
एक महीन्याने सम्राटाने झेन गुरूला आपला संदेश पाठवला. त्यात त्याने कोंबडा तयार झाला का ही पृच्छा केली होती. गुरू ने निरोप दिला कि अजून नाही. हा कोंबडा खूप चंचल आहे. याला स्थिर करावे लागेल.
पुन्हा महीन्याने सम्राटाचा तोच निरोप आला. गुरूने पुन्हा सांगितले "अजून यात खूप अॅटीट्यूड शिल्लक आहे. याच्यात भरपूर गर्व आहे. हा कुठल्याही कोंबड्याला बघून अस्वस्थ होतो, त्याच्यातला ज्वर उफाळून येतो. त्याला संयम पाळण्याची गरज आहे"
पुन्हा सम्राटाचा निरोप आला. पुन्हा सम्राटाने सांगितले कि कोंबड्याला अजूनही आपला प्राधान्यक्रम समजत नाही. त्याच्यावर काम चालू आहे.
असे करता करता बराच कालावधी झाला. मग एके दिवशी गुरूचा निरोप आला कि कोंबडा तयार आहे.
सम्राटाने कोंबड्याला वाजत गाजत आणले. जेणे करून सर्वांना कळावे कि राजाकडे एक अजेय योद्धा आला आहे. एक दिवस चीनच्या त्या कोंबड्याच्या झुंजी खेळणार्या माणसाचा सम्राटाला निरोप आला. त्यात त्याने आव्हान दिले होते. सम्राटाला चिनी माणसाचे आव्हान जिवावर आले होते, पण आव्हान न स्विकारावे तरी पंचाईतच. शिवाय आता त्याच्याकडे एक असा अजेय योद्धा होता ज्याला झेन गुरूने घडवले होते.
प्रत्यक्ष झुंजीचा दिवस आला. झुंजीच्या मैदानात चिनी कोंबडा मोठ्याने बांग देत होता. त्याच्या आवाजाने अन्य कोंबड्यांच्या जिवाचा थरकाप उडत होता. तो अत्यंत हिंस्त्र होता. क्षणार्धातच तो सम्राटाच्या राजकुक्कुटांचा फडशा पाडत असे. त्याची लढण्याची तर्हा क्रूर होती. त्याचा पराभव कुणी करेल असे जनतेला वाटत नव्हते.
सम्राटाने मग आपला राखीव कोंबडा मैदानात उतरवला.
तो कोंबडा मैदानात आला. त्याने चिनी कोंबड्याकडे लक्षही दिले नाही. चिनी कोंबड्याने जोरदार आरोळी दिली. पण हा कोंबडा शांतच राहिला. त्याने पंख फुलवले आणि तो सम्राटाच्या कोंबड्यावर चालून आला. पण त्याने शांतच राहणे पसंत केले. तो इतका शांत असल्याने चिनी कोंबड्याचा पारा चढला आणि तो मोठमोठ्याने आवाज करू लागला. फडफड करून त्याला घाबरवू लागला. मात्र जपानी कोंबडा शांतच. त्याच्या मनातून भीती निघून गेली होती. त्याला मृत्यूचेच भय वाटत नव्हते.
यामुळे चिनी कोंबडा आधी बुचकळ्यात पडला.मग त्याला अजून राग आला. रागाची परिसीमा गाठल्यावर तो कोंबड्यावर चालून आला. पण जपानी कोंबड्याने त्याला शांतपणे अडवले. त्याने प्रतिवार केला नाही. ना शरण आला. फक्त शांततेने त्याने त्याला मागे लोटले. आता चिनी कोंबड्याला काय करावे हे सुचेना. त्याने आयुष्यात पहिल्यांदा असा कोंबडा पाहिला होता जो त्याला भीत नव्हता. तो भीतही नव्हता आणि आक्रमणही करत नव्हता. तो फक्त शांत होता.
आता चिनी कोबड्याला त्याच्या शांततेची भीती वाटू लागली. त्याची शांतता म्हणजे त्याला एक अंधारी गुहा वाटू लागली. ज्या गुहेत कितीही थयथयाट केला तरी त्याचा परिणाम शून्यच असतो. तिथे कितीही मर्मभेदी आरोळ्या ठोकल्या तरी त्या व्यर्थच असतात.
चिनी कोंबड्याने आपली युद्धकला अशी विकसित केली होती ज्याच्यात भय हे त्याचे प्रमुख अस्त्र होते. तो दहशत उत्पन्न करत असे. त्या दहशतीला समोरचा कोंबडा घाबरला कि भयमोहनामुळे तो मुग्ध होऊन प्रतिकारच करत नसे. मात्र हा कोंबडा भीतच नसल्याने चिनी कोंबडा निष्प्रभ झाला. आता तो जपानी कोंबडा कधी आक्रमण करतोय याची वाट पाहू लागला.
मात्र जपानी कोंबड्याने आक्रमण केलेच नाही. ती वाट पाहण्याचा अवधी एव्हढा प्रदीर्घ झाला कि चिनी कोंबड्याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने स्वतःचेच केस उपटायला सुरूवात केली. तो स्वतःलाच जखमी करू लागला. भिंतींवर धडका घेऊ लागला. शेवटी त्यातच तो मृत्यू पावला.
सम्राटाला आपल्या कोंबड्याची ही पद्धत अजब वाटली. मग तो झेन गुरू कडे गेला.
झेन गुरूने फक्त स्मित केले. त्या स्मितातच सगळे काही सामावलेले होते. त्याने तयार केलेला कोंबडा एव्हढा शांत झाला होता कि चिनी कोंबड्याला कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्याचा हिंस्त्र स्वभाव प्रतिक्रियेची वाट बघत होता. त्याला भीती किंवा प्रतिकाराची अपेक्षा होती. त्याला अशी भिंत हवी होती ज्यावर तो धडका मारून ती तोडेल. पण त्याला यातलं काहीच मिळालं नाही. तिथे त्याला न पराभवाची भीती दिसली ना विजयाची हांव !
त्याला तिथे एक शून्य मिळालं. शून्याशी कुणीच लढू शकत नाही. युद्धाचा शेवट शून्यात होतो. मात्र युद्धाच्या आधीच शून्य समोर ठाकलं तर काय ? शेवटी त्याच्यातली हिंसाच त्याच्यावर आरूढ झाली ज्यात त्याचा शेवट झाला.
सम्राटाला आपली चूक समजली. पुन्हा त्याने कधीही कुणावर आक्रमण केले नाही. त्याने शांतीच्या शोधात आपले उर्वरीत जीवन व्यतित केले आणि राजधर्माचे पालन करत राज्यातल्या नागरिकांना शांतीपूर्ण जीवन प्रदान केले.
( कृपया या कथेचा समाज माध्यमावरच्या चर्चांशी सुतराम संबंध लावू नये ही विनंती )
वाह..!!
वाह..!!
कथा छान जमली आहे.
कथा छान जमली आहे.
धग
छान बोधकथा !
अर्थात, सर्वत्र उपयोगी पडेलच, ह्याची मात्र खात्री नाही -
माबोवर कांहीतरी वाचून खुळ्यासारखं मला न घाबरल्याचं सोंग आणू नका व मला उगीचच आवाज चढवायला लावू नका !!!
भाऊ
भाऊ
अरे वाह मस्तच जमली आहे कथा.
अरे वाह मस्तच जमली आहे कथा.
भाऊ
अर्थात, सर्वत्र उपयोगी पडेलच,
अर्थात, सर्वत्र उपयोगी पडेलच, ह्याची मात्र खात्री नाही ->>> नक्कीच, बेभान झालेला हा नशेच्या अंमलाखाली असल्या सारखा असतो आणि कुणीही सारासर विचार तेव्हाच करु शकतो जेव्हा त्याची बुद्धी चालवण्याची शक्यता शाबूत असते.
भाऊ, दंडवत स्विकारा!
भाऊ, दंडवत स्विकारा!

- (बायकोसमोर शून्य असलेला ) सोकाजी
मस्त कथा
मस्त कथा
मस्त कथा! भाऊ
मस्त कथा!
भाऊ
लेखाचे शीर्षक वाचले आणि
लेखाचे शीर्षक वाचले आणि वातकुक्कुट जसा वारा फिरेल तशी दिशा बदलतो तशी प्रत्येक निवडणुकीत दिशा बदलणाऱ्या राजकुक्कुट वर हा लेख आहे की काय असे वाटले होते.
बोधकथा मात्र छान आहे.
भाऊ
भाऊ

झेन कथा आणि भाऊंचे व्यंगचित्र
झेन कथा आणि भाऊंचे व्यंगचित्र दोन्हीही मस्त.
भाऊ
*बायकोसमोर शून्य असलेला * -
*बायकोसमोर शून्य असलेला * - सोकाजीराव, आपणच जणू एकमेव अपवाद असल्याचा कृपया आव आणू नका; हम भी कुछ कम नहीं !!
भाऊ, अलबत!
भाऊ, अलबत!
'अखिल भारतीय बायकोसमोर शून्य असलेले नवरे संघटने'चा एक नगण्य सदस्य ह्या नात्यानेच तो प्रतिसाद दिला होता, पण तसं स्पष्ट न केल्याबद्दल एकडाव माफी द्या ही विनंती विशेष.
- (नगण्य सदस्य) सोकाजी
मस्त आहे.
मस्त आहे.
जबरी बोधकथा. आवडली.
जबरी बोधकथा. आवडली.