व्याज

Submitted by आर्त on 23 January, 2026 - 09:28

आदल्या आठवड्यात आलेल्या
हिच्या मैत्रिणी, दोन दिवस राहायला
पाच-सात जणींचा गट होता
साऱ्या अगदी जुन्या; शाळेतल्या

जवळपास राहतात सगळ्या
अधूनमधून भेटत असतात
आयुष्याबद्दल बोलतात
लहानपणापासूनच्या आठवणी काढतात

माझे मित्र, माझ्यासारखे
दूर गेले सोडून घरदार
चहुदिशी बिथरले सारे
परागांचे तुषार

समोर बघून शर्यत पळताना
मागे वळून बघायचे राहून गेले
आणि सरलेले अंतर दशकांचे
आठवणींना खाऊन गेले

उच्च शिक्षणाचे आर्थिक ऋण
बॅंकेकडे कधीच केले पोहोचते
आणि या हरलेल्या नात्यांचे मूल्य
आयुष्यभर करायचे आहे चुकते;
ते ही वाढत्या व्याजासोबत

२३.०१.२०२६

Group content visibility: 
Use group defaults

असं उदास होऊ नये. मित्र सोडून गेले तरी बायकोच्या मैत्रिणी आहेत ना ? मैत्री कायम रहे !

हाहाहा ते तर झालच. उदास होणे हा जीवनाचा आणि माणसाच्या स्वभावाचा भाग आहे. पण औदासिन्य व्यक्त करायचं म्हणून ही कविता नाही लिहिली. नवीन मैत्र्या सदैव होत राहतात. तरीही लहानपणीचे मित्र ही एक वेगळा शाखा असते, हो की नाही? ही कविता माझ्या स्थितीचे निरीक्षण आहे. म्हणून लिहिली Happy

आर्त माफ करा पण
>>>>नवीन मैत्र्या
मैत्री चे अनेकवचन मैत्रीच होते. उदा - ईकारान्त शब्द तसेच रहातात असे वाचलेले आहे. मैत्री हा ईकारान्त शब्द आहे.

नवीन प्रतिसाद लिहा