मुंबई - विकासाबद्दल गप्पा - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वाढती गृहनिर्मिती

Submitted by भरत. on 22 January, 2026 - 09:41

मुंबईकर असल्याने मुंबईबद्दल थोडीफार माहीत आहे. इथल्या घडामोडींबद्दलची माहिती आणि बातम्या सतत डोळ्यांसमोर येत असतात. त्या वाचताना काही प्रश्न पडले.
मुद्देसूद लिहिणं कठीण आहे इतके वेगवेगळे विषय यात गुंतले आहेत. तसंच विषयाशी संबंधित नेहमी वापरात येणार्‍या इंग्रजी
संज्ञांची मराठी रूपे मला कृत्रिम वाटतात म्हणून इथे वापरली नाहीत.

१. मेट्रो ३ च्या आरेमधल्या कारशेडला विरोध झाला (मेट्रो ३ ला नव्हे) Yes, Mumbai Metro Line 3 (MML3) is projected to significantly reduce carbon emissions by shifting passengers from private vehicles to public transport, with estimates suggesting annual reductions of around 2.61 lakh tonnes of CO2 by cutting millions of vehicular trips and fuel consumption असं सांगितलं गेलं. तसं झालंय का ते कळलेलं नाही.

२. ब्लू लाइन वन - वर्सोवा घाट कोपरमध्ये लोकल ट्रेनसारखी गर्दी असते, असं कळतं. हे साहजिक आहे. वेस्टर्न आणि सेंट्रलच्या लोकांना लाइन बदलायला दादर शिवाय एक चांगला पर्याय निर्माण झाला. ही सगळ्यात गर्दीची आणि जुनी लाइन असूनही तोट्यात आहे. मुंबईच्या तुलनेत अत्याधुनिक इन्फ्रास्ट्र्क्चरला येणारा अवाढव्य खर्च आणि प्रकल्प पूर्ण होण्यात येणा री दिरंगाई यामुळे हे साहजिक आहे. पण रनिंग कॉस्ट्स तरी रिकव्हर होत आहेत का ? या लाइनच्या गाड्या ४ डब्या च्या होत्या त्या आता ६ डब्याच्या होतील. पुढच्या गर्दीचा अंदाज घेण्यात तेव्हाचे नियोजनकर्ते कमी पडले की त्यांची गणितं चुकली , माहीत नाही.

३. मेट्रो खात्रीची, वक्तशीर, आरामदायीही सेवा आहे. यासाठी ती आवडते. सगळं आधुनिक इन्फ्रास्ट्र्क्चर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा इम्प्रेसिव्ह वाटलं होतं. माझ्या मॉर्निंग वॉकचा काही भाग दहिसर अंधेरी मेट्रोच्या बाजूने जातो, त्यामुळे ते काम किती शिस्त शीर चालत होतं ते पाहत होतो. रात्री बेरात्री
दुरून आवाजही यायचे. मेट्रो च्या लगत राहणार्‍या लोकांना त्याचा साहजिकच त्रास झाला असेल.

४. मेट्रो मुळे लोकल गाड्यांतली वा दूर पल्ल्याच्या बेस्ट बसेसमधली गर्दी कमी झालेली नाही. रस्त्यावरच्या वाहनांची गर्दी कमी झाली का माहीत नाही. आकडेवारी शोधू. पण काहींना तरी हा सुखावह पर्याय उपयोगी पडतोय हे चांगलंच आहे. वाहतुकीसाठी जेवढे अधिक पर्याय असतील, तेवढं बरंच आहे.

५. वर मेट्रो तोट्यात चालत असल्याचा उल्लेख आला. मागे वाचलं त्यानुसार भारतातल्या बहुतेक मेट्रोजची हीच स्थिती आहे. तिकिटाचे दर वाढवले तर प्रवाशांची संख्या कमी होईल का? अशाने कॉस्ट कधी रिकव्हर होईल? बहुधा कधीच नाही.
६. गर्दीने ओसंडून वाहणार्‍या मुंबईच्या लोकल्स सुद्धा तोट्यातच चालतात. Mumbai's local trains have historically run at significant losses, often running into thousands of crores, due to low fares (social service mandate), high operational costs (maintenance, energy), and massive passenger volume that outstrips revenue, despite being the city's lifeline; recent reports highlight huge deficits for Western Railway's suburban network

Past studies have estimated that the suburban railway system carries an estimated 40% of Indian Railway’s (IR)
daily passenger traffic (measured in terms of passengers). This represents 12% of the overall passenger traffic
(measured in terms of passenger-km), and about 7% of IR’s total traffic including freight4. However, the system
generates only 1.5% of IR’s total revenue, indicating a high level of cross-subsidization.
It is also observed that between 93% and 95% of the total revenues of the suburban railway system is
contributed from fare-box sources, through sale of tickets. Railway fares in the city network have been one of
the cheapest, while offering one of the fastest transit modes, creating significant value to commuters
तेव्हा या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सबसिडीवर चालतील हे धरून चालायला हवं. भाडेवाढ हा भावनिक मुद्दा केला जातो. पेपरातल्या बातम्या असोत की त्या त्या वेळचा विरोधी पक्ष.

७ As of 2013, advertising and station rentals contribute a modest amount to the suburban system’s top-line (~5 -6% of the total revenues). However, this is low when compared with leading public transit systems around the world, non-fare box revenues वाढवायचा प्रयत्न होतो आहे. मेट्रो ३ च्या स्टेशनांची नावं विकली ते पर्याय वाईट नाहीत. उपनगरी रेल्वे सुद्धा हे करताहेत. Mumbai Suburban Railway's non-traffic (Non-Fare Revenue - NFR) comes from advertising, leasing station spaces, "One Station One Product" (OSOP) stalls, and commercial development of railway land/airspace, with Central Railway and Western Railway zones earning significant figures, like over ₹122 Cr by Central Railway in FY 2023-24, showing strong growth in monetizing assets beyond tickets सरकारी मालमत्ता विकली म्हणून रडण्यात अर्थ नाही. ते पारदर्शीपणे व्हावं, त्यात निकोप स्पर्धा असावी .

८. आरे कार शेडसाठी झाडं तोडली. त्यांची भरपाई कुठे किती कशी झाली माहीत नाही. डोंगरी - मीरा भाइंदर या ९ क्रमांकाच्या लाइनसाठी १००००-१२००० झाडं तोडली जाणार होती. इथल्याच सागरी महामार्गासाठी खारफुटीची जंगलं तोडली जाणार आहेत. या वृक्षतोडीची भरपाई दूर चंद्रपूर् गडचिरोलीसारख्या ठिकाणी होते.

९. मुंबईचे हे प्रश्न गर्दीमुळे आहेत. पण मुंबईची वाढ व्हायचं काही थांबणार नाही. आडवी वाढ व्हायचा वाव संपला. आता ती उभी वाढू लागली. रेक्लमेशन तर १०० वर्षे जुनं आहे. आता कोस्टल रोड , सी वे हेही आहेत. मेट्रो जमिनीखाली आहे किंवा वर आहे. डबल डेकर फ्लायओव्हरही येऊ घातलेत.
सगळीकडे रिडेव्हलपमेंट जोरात सुरू आहे. फ्लोअर स्पेस इंडेक्स कित्येक पट वाढला आहे. एस आर ए करताना त्यापेक्षा मोठा टॉवर विकून बिल्डरचा नफा सांभाळला जातो. यात गैर काही नाही. पण याचा अर्थ शहर अधिकाधिक लोकांना सामावून घेण्याच्याच मागे आहे. टॉवरमध्ये राहणा र्‍या लोकांत चार चाकी वाल्यांचं प्रमाण मोठं आहे. तिथे पार्किंग साठी अनेक मजले असतात. एस आर ए च्या टॉवरमध्ये मात्र पार्किंगची सोय नसते. ती तुम्ही आवारात करायची तर आवार तेवढं नसतं. इतक्या लोकसंख्येसाठी जलवाहतूक आणि मलनि:सारण व्यवस्था यांची क्षमता वाढवावी लागेल.

१०. एफ एस आय वाढला म्हणजे गेटेड कम्युनिटीजमधल्या झाडांसाठी जागा कमी झाली. आमच्या ५२-५३ वर्षे जुन्या कॉलनीत प्रत्येक सोसायटीच्या प्रत्येक विंगच्या मागे पुढे मोकळी जागा आहे. तिथे भरपूर झाडं असतात. कॉलनीतही भरपूर झाडं आहेत. अर्थात तेव्हा जंगल तोडूनच ही कॉलनी वसवली आहे. त्यामुळे आता वेगळं काय होत असेल तर घरांच्या तुलनेत त्या परिसरातल्या झाडांचं प्रमाण कमी होतं.
शिवाय नव्या बांधकामांत सगळं आवार काँक्रीटचं असतं. माती दिसतच नाही. आमच्या कॉलनीतही काही सोसायट्यांनी हे केलं आहे. त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरणं, झाडं आणि मातीमुळे तापमान कमी राहणं या गोष्टींना वाव नाही. माझ्या घरापासून २ किलो मीटरच्या नातलगांच्या घरी गेलं तरी लक्षणीय तपमान वाढ जाणवते. आमच्या कॉ लनीच्या रिडेव्हलपमेंटचीही चर्चा आहे, आणि इथेही हेच होणार आहे. झाडं तोडायला बंदी वगैरे खरंच किती पाळलं जातं माहीत नाही. आमच्या कॉलनीच्या शेजारी बंगलेवाली कॉलनी होती. तिथे बंगले वनराजीत लपलेले असत.
आता तिथे इमारती झाल्या तर झाडं शोधावी लागतात. चुकून असलीच तर सरळसोट वाढणारी अशोकाची. - ही सावलीही देऊ शकत नाहीत.
काहींकडे सुबत्ता येते आहे, विषमता वाढते आहे, कर्जे सहज मिळतात. अशा अनेक कारणांमुळे गुंतवणूक म्हणून आणखी घर घेणं, गरजेपेक्षा मोठी घरं घेणं याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच लक्षणीय संख्येने घरं विकली जात नाहीत. Mumbai has a significant number of unsold houses, with estimates around 1.8 lakh (180,000) units in the Mumbai Metropolitan Region (MMR) by early 2025, though this figure saw a slight dip to about 179,228 units by year-end 2025 निम्नमध्यमवर्गाला परवडणारी घरे म्हाडा आणि एस आर ए अंतर्गत बांधली जातात. म्हाडासुद्धा लक्झरी हाउसेस बांधते आहे.
पण त्यांचे स्वतंत्र प्रोजेक्ट्स दिसत नाहीत. आणि यांचा दर्जा पाहिला तर ही नाईलाज म्हणून बांधल्यासारखी वाटतात.
Lower Parel (2018): Approximately 80% of winners (29 out of 36) returned their 1-BHK flats due to "exorbitant prices" (ranging from Rs 1.42 crore to Rs 1.96 crore) and "tiny sizes" (363-475 sq ft).
Powai: Winners also returned flats in Powai, which were priced around Rs 1.39 crore.
Kandivli (2013): 25 high-income group (HIG) 1-BHK flats were returned in Shimpoli, Kandivli (W), because they were considered too expensive.

११. मेट्रो, रेल्वेचं आधुनिकीकरण , रस्त्यांचं काँक्रीटीकरण आणि अंडरग्राउंड पाइप्स यामुळे सतत सगळीकडे बांधकाम सुरू असतं. ते रात्री थांबेल याची खात्री नाही. गेल्या दोन महिन्यांत वायू प्रदूषण वाढून नॅशनल पार्क असलेल्या बोरिवली पूर्व भागात हवेची गुणवत्ता AQI विक्रमी घसरली होती. आमच्या भागात घरबसल्या स्मॉग जाणवायचं. सूर्यदर्शन व्हायचंच नाही. आता ते जाळीचे पडदे लावणं आणि AQI मॉनिटर लावणं अनिवार्य केलं तरी ते न पाळणारे काँट्रॅक्टर्स आणि बिल्डर्स आहेत.

१२. सतत चालत असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे गुगल मॅप्स गंडतात. काल मी उबर बुक केली ती चार मिनिटात येतेय म्हणता म्हणता २० मिनिटांनी आली कारण मधले रस्ते बंद होते. अर्थात आता अनेक पर्यायी रस्ते तयार होत आहेत. अगदी एका उपनगरात अ जागेवरून ब कडे जायला तीनचार पर्याय असत. आमच्याकडे पूर्वी मोजकेच मुख्य रस्ते, त्यासाठी स्टेशन गाठा आणि मग कुठे ते जा असं होतं. अजूनही स्टेशनवरून बाहेर पडायला स्कायवॉक घेतला तर संध्याकाळी सतत हॉर्न्स ऐकत चालावं लागतं.
अंधेरी भागात फ्लायओव्हर च्या बांधकामामुळे कित्येक वर्षे ट्रॅफिक जाम होत असे.
अर्थात रस्ते रुंदीकरणामुळे आणि पर्यायी र स्त्यांमुळे काही वेळा ट्राफिक जाम कमी झाल्यासारखं वाटतं. एकाच जागी १०- १० मिनिटे अडकून पडलोय असा अ अनुभव येत नाही. पण माझा जो काही प्रवास होतो, तो बहुतेक सुटीच्या दिवशी आणि नॉन पीक अवर्समध्ये होतो.

१३. यात बेस्ट बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. बेस्टच्या मालकीच्या बसेसची संख्या लक्षणीय घटली आहे.
२००९ मध्ये ४४०० बसेस होत्या. आता २६७३ आहेत. त्यातल्या ८७% लीझवर आहेत. जुन्या बसेस मोडीत काढल्यावर नव्या घेतल्या जात नाहीत. लीझ बसेसचे वाहक चालक कंत्राटी तत्त्वावर असतात. त्यांच्याकडून गेल्या वर्षभरात दोन सिली म्हणावेत असे अपघात होऊन पादचारी प्राणाला मुकलेत.
बसेसची संख्या वाढवणं , त्यांच्यासाठी वेगळ्या लेन्स किंवा रस्ते ठेवणं हे केलं तर त्याचा फायदा तुलनेने कमी खर्चात अधिक प्रवाशांना होईल का? सकाळी स्टेशन वा शाळांच्या दिशेने जाणार्‍या बसेस गच्च भरलेल्या आणि संध्याकाळी उलट दिशेने गच्च भरलेल्या दिसतात. म्हणजे मागणी आहे. कार रिक्षा यांच्या प्रचंड संख्येमुळे त्या वेळेवर मात्र येत नाहीत.

१४ रिक्षांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आमच्या जवळच्या रस्त्यावर पन्नास साठ रिक्षा दुपारी १ ते ४ वेळात नुसत्या पार्क असतात . ड्राय व्हर झोपतात. एवढं करूनही त्यांचं जीवन त्यावर चालतं. पूर्वीच्या तुलनेने बेस्ट बसने प्रवास करायची सवय कमी झाली आहे. घराजवळ बस स्टेशन आहे. तिथे समोर रिकामी बस दिसत असली तरी अनेक जण रिक्षानेच जातात. लोकांकडे तेवढा पैसाही आहे. काही भागात शेअर रिक्षाही आहेत आणि त्यांचा धंदा जोरात चालतो.

१५ एक प्रश्न पार्किंगचा आहे. नव्या टॉवर्समध्ये पार्किंगची सोय असते. पण कामाच्या ठिकाणी वा जिथे अन्य कारणाने जायचे तिथे असेलच असे नाही. तुमच्याकडे मालकीची पार्किंगची जागा नसेल तर चारचाकी वाहन विकत घेता येणार नाही, असा नियम येऊ घातल्याचे वाचले होते. पण मी शॉपिंगला, नातेवाईकांकडे वा ऑफिसात गेलो तर तिथे पार्किंगची सोय असेलच असे नाही. सरकारी पेड पार्किंगची सोय आहे. पण ती चारचाकी वाल्यांनाही महाग वाटते. किंवा पार्किंगसाठी पैसे मोजायची मानसिकता तयार झाली नसेल.

१६. गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या वाढली. सामान्य माणसालाही विमानाने प्रवास करता यावा असा बेत आहे. सामान्य माणसाने विमान प्रवास करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. पण तरीही अनेक नवी, लहान विमानतळं बंद पडल्यात जमा आहेत. आता यासाठी ही सरकार - तेही राज्यसरकार विमान कंपन्यांना सबसिडी द्यायचा विचार करतं आहे. या क्षेत्रातली मोनोपॉली . त्यांची मनमानी हा आणखी एक प्रश्न.

१७. सबर्बन रेल्वेच्या गर्दी वर आणि त्यात पडून लोक मर ण्यावर एसी ट्रेन्स हा उपाय येऊ घातलाय असं दिसतं. त ऐकल्यावर मग चेंगराचेंगरी वाढेल, दारं बंद व्हायला वेळ लागेल आणि गाड्या लेट होत राहतील, असे प्रश्न पडले.

१८ तूर्तास शेवटचा मुद्दा. हा असा विकास आता सतत होत जाणार. नवे टॉवर्स , नवे रस्ते, फ्लायओव्हर्स , रेल्वे लाइन्स वाढवणं हे सगळं चालणार. त्यामुळे प्रदूषण आणि वाहतूक खोळंबा होणार. हे मी म्हणणं दुटप्पीपणाचं आहे हे मान्य आहे. पण असं किती काळ चालेल ? कधी थांबेल का?
मुंबई उभी वाढवा, तिसरी आणि चौथी मुंबई बांधा यापेक्षा सगळ्या भागाचा विकास करायचा व त्या लोकांना पोटासाठी शहरात यावं लागू नये असं करायचं म्हटलं की प्रकल्पबाधितांचे, विस्थापनाचे आणि वृक्षतोडीचे व पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. प्रदूषणामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. पालघरमध्ये सध्या मोठे आंदोलन सुरू आहे. या सगळ्याचा समतोल कसा साधता येईल? की हा भस्मासूर आहे आणि असाच वाढत राहील.

या बाबत सगळे राजकीय पक्ष एकसारखेच असं म्हणता येईल. तज्ञांची मतं न घेणं, गुंडाळून ठेवणं , पर्यावरण रक्षणाचे नियम मोडीत काढणं याचं प्रमाण आता वाढतं आहे.

तपशीलात तफावत दाखवण्याचे आणि मांडलेल्या मुद्द्यांवर वेगळ्या विचारांचे स्वागत आहे. इथे मी मते मांडलेली नाहीत. मला पडलेले प्रश्न लिहिलेत.

या चर्चेने पॉलिसीमेकर्स आणि प्रोजेक्ट राबवणार्‍यांना काही फरक पडेल का माहीत नाही. प्रसा रमाध्यमांत याबद्दल चर्चा होतेच. तज्ज्ञ म्हणवणारे लोक काही बाही सांगत असतात. त्या सगळ्याचा उपयोग होतो का माहीत नाही. पण हा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्न आहे, म्हणून लिहिलं

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईकर असल्याने (आता नाही, पण तरीही) आणि सार्वजनिक वाहतुक आवडत असल्याने तिकडच्या बातम्या, घडामोडी, बदल वाचत असतो. हा धागा आणि मांडलेले विचार आवडले. यावरील चर्चा, अपडेट्स वाचायला आवडतील.

बदलून असं दिसेल त्यांच्यासाठी . ८ मध्ये "इथल्याच सागरी महामार्गासाठी खारफुटीची जंगलं तोडली जाणार आहेत " हे वाक्य वाढवलं.

घाटकोपर - वर्सोवा मेट्रो ज्यावेळी सुरु झाली तेव्हा रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीत लक्षणीय फरक पडला होता आणि तो जाणवतही असे गाडी चालवत जाताना. पण नंतर त्या मेट्रोचे भाडे वाढवले आणि पहिले पाढे पंचावन्न झाले. अर्थात मधल्या काळात सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनवर लोकसंख्या आणि ऑफिसेस वाढली आणि मेट्रोत गर्दीपण. मेट्रोच्या बांधकामाचा वेग हळू वाटत आहे कारण कित्येक वर्ष होऊन पण ना स्टेशन तयार असते वा पिलर उभारले तरी त्यावर गर्डरच महिनोंमहिने चढत नाहीत.

भरत, छान आढावा घेतला आहे.
गर्दी, प्रदूषण, वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतेच आहे.
गेल्या वीसेक वर्षाच प्रचंड बांधकाम झाले आहे. तरीही तेवढ्या सदनिका विकल्या जात आहेत. मोकळी जागा कमी होत चालली आहे. बरीच वृक्षतोड झाली आहे. धारावी इतकीच, कदाचित त्याहून मोठी अशी वस्ती गणपत पाटील नगर इथे वसली आहे. त्या वस्तीने खारफुटीचा बरासचा भाग गिळंकृत केला आहे. मुंबईत येणारा लोंढा वाढत चालला आहे.
सध्यातरी मेट्रो रेड लाईन ते ॲक्वा लाइन जोडलेली नाही. त्यामुळे इकडच्या लोकांना विमानतळावर जायची डायरेक्ट सोय नाही. त्यामानाने ॲक्वा लाईन ची स्थानके अगदी विमानतळाबाहेर आहेत. रेड लाइन ॲक्वा लाइनला जोडायचे काम बहुतेक अजून चालू आहे.

बोरिवली स्टेशनची लहानशी गोष्ट.
आम्ही इथे राहायला आलो, तेव्हा ५ फलाट होते. पुढे पूर्वेला सहावा झाला. गेल्या दहा वर्षांत पश्चिमेला आणखी दोन फलाट वाढवायचे होते, पण तिथे स्टेशनबाहेर जागा नव्हती. तेव्हा आधीच्या १ नंबरच्या फलाटाला लागून सरळ रेषेत कांदिवलीच्या दिशेने आणखी दोन फलाट बांधले गेले.
हे नवे फलाट १ आणि २ नंबर. जुना १ आता ३ झाला. पूर्वी १,२,३ चर्चगेट - बो रिवली लोकलसाठी , ४ आणि ५ विरार लोकलसाठी आणि बाहेरगावच्या गाड्यांसाठी . ४ आणि ५ नंबरला एकदम गाड्या आल्या तर ब्रिजवर चेंगराचेंगरीची भीती.

आता ३ नंबरला विरारला जाणार्‍या गाड्या थांबतात. बोरिवली चर्चगेट स्लो लोक ल्स १ आणि २ नंबर आणि फास्ट लोकल ४ आणि ५ नंबर म्हणजे पूर्वीचे २ आणि ३.

त्यामुळे चर्चगेट स्लो लोकल पकडायची तर बरंच चालावं लागतं. परतीच्या प्रवासात १ आणि २ नंबरला गाडी आली तर दहिसर लिंवा गोराईच्या दिशेने जाणार्‍यांना भरपूर चालायला लागायचं. यावरून लहानशी आंदोल ने झाली होती. बरेच वर्षांपासून मालाड आणि कांदिवलीला गाडी पोचली की ती बोरिवलीला १ नंबर वा २ नंबरला येणार असेल तर तशी घोषणा होते. लोक मग कांदिवलीला उतरून पुढची लोकल घेतात. इतका चालायचा कंटाळा. १ नंबरच्या बाहेर स्काय वॉक आहे, पूर्वेला जायला भुयारी मार्ग आहे. पण पूर्वी तरी तिथे फार वर्दळ नसे.
फलाट ओलांडून जायचं तर गाडीतून बाहेर पडलेली गर्दी फोन वाचत वाचत चालत असते, त्यामुळे भरभर चालू इच्छिणार्‍यांची चीडचीड होते.

१ नंबरवरून एस व्ही रोड वर रस्ता ओलांडायला भुयारी मार्ग होता. पण तिथे अस्वच्छता, गर्दुल्ले आणि दारुडे. आता स्कायवॉक आहे, तो उपयोगी पडतो. तरीही बहुतेक लोक रस्ता ओलांडूनच जातात. स्काय वॉकच्या पायर्‍या अनेक ठिकाणी फुटलेल्या असतात.

स्काय वॉकच्या पायर्‍या अनेक ठिकाणी फुटलेल्या असतात. > हे मुंबईतील सगळ्याच स्काय वॉक च्या नशीबात आहे. स्काय वॉकवर गरीब/ बेघर लोकांचे रहण्याचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे अस्वच्छपणा, दुर्गंधी त्यातच फेरिवाले ... रस्त्यातुन चालताना जीव आणि स्काय वॉक वरुन चालताना नाक मुठीत धरून चालणे क्रमप्राप्त आहे.

गोरेगावात ओबेरॉय मॉल ते स्टेशन चालत 20 मिनिटे लागतात पण तेच रिक्शा किंवा चारचाकीने अर्धा तास लागतो. बहुतेक सर्वच स्टेशन बाहेर रिक्षा वाले हवे तसे उभे असतात., यामधून मार्ग काढत जावे तर फेरीवाले / खाद्यपदार्थ विकणारे असतातच.

बोरिवली फलाट १ २ ३ चे दिव्य रोजच पार करावे लागते.
खरे तर स्काय वॉक खूप सोयीस्कर आहेत पण जवळ जवळ सर्व स्काय वॉक वर फेरीवाले असतात नाहीतर त्यांची दुर्दशा झालेली असते
बरेच बंद केले आहेत. उदा. दहिसर पश्चिम.

मला मुंबईने कधीही आकर्षित केलं नाही. एवढं अजस्त्र शहर आहे मात्र अत्यंत टोकाची विषमता असल्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी राहून माझ्या डोक्याचं भजं झालं असतं. या शहराचा व्याप बघता टोकाच्या पावसात आणि सगळीकडे पसरलेल्या भ्रष्ट व्यवस्थेत हे शहर चालते कसे हे एक मला नेहमी पडलेले कोडे आहे या शहराला स्वतःची लय आहे मात्र ती गुदमरवणारी आहे. मी मुंबईत आयुष्यात फक्त दोनदाच आलोय आणि कधी एकदा मला मुंबईच्या बाहेर पडू असे झाले आहे. बाकी इतर वेळेस नाईलाजाने केवळ नाईलाजाने एअरपोर्टवर यावे लागते आणि दीड दोन तास शहर ओलांडायला लागते. एवढाच काय तो मुंबईची माझा संबंध येतो.

मला मध्ये एकदा हुक्की आली होती आणि मी मुंबईच्या एका कंपनीचा इंटरव्यू द्यायला गेलो होतो. जाताना चुकून फर्स्ट क्लास मध्ये चढलो आणि मला नेमकं तिकीट चेकर ने धरले. या लोकलमध्ये फर्स्ट क्लास हा प्रकार का असतो जो जगातल्या कुठल्याही सिटी ट्रान्सपोर्ट मध्ये नसतो. त्यामुळे मी तसाच माघारी फिरलो आणि परत घरी आलो. कितीही पैसे मिळाले तरी मुंबईत आपण राहू शकत नाही असे जाणवले.

बाकी मुंबई स्पिरिट वगैरे जे काही म्हणतात तो एक हास्यास्पद प्रकार मला कधीही समजलेला नाही. नामुष्कीला स्पिरिट म्हणायला लावणारे मुंबई हे एकमेव शहर असावे. पण ठीक आहे इतक्या प्रचंड प्रमाणात पिचलेल्या माणसांना दिल को बेहलाने के लिए खयाल अच्छा है म्हणून ही मुंबई स्पिरिटची अस्मिता बाळगू द्यायला काही हरकत नाही.

आणि दुसरा प्रकार म्हणजे मेट्रो अर्थात पांढरा हत्ती ज्याचा बहुतांश लोकांना फारसा उपयोग नसतो कारण पॉईंट टू पॉईंट ट्रान्सपोर्ट हा सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट ने होण्यासाठी जी इंटिग्रेटेड व्यवस्था लागते ती भारताच्या कुठल्याही शहरांमध्ये नाही त्यामुळे मेट्रो स्टेशन ओलांडल्यावर रिक्षा घेऊन दुसरीकडे जावे लागते आणि पुन्हा पुढचे प्रवास करण्यासाठी वेगवेगळी खाजगी वाहने वापरावी लागतात. पुन्हा प्रत्येक व्यवस्थेचे तिकीट स्वतंत्र काढायला लागते.

मुंबई मेट्रो सिस्टीम मॅनेज करायला चार चार वेगवेगळी आस्थापने आहेत महा मेट्रो, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, इत्यादी इत्यादी..

ही सगळी इनफिशियन्सी का आहे म्हणून त्यापेक्षा मुंबई आणि आसपासचे सगळे नागरी प्रदेश हे एक स्वतंत्र राज्य का करू नये? जगात कुठे काय सिटी स्टेट नाहीत का? मराठी माणूस वगैरे हे फारच उथळ वाटायला लागले आहे आता.

मागे मी म्हटल्याप्रमाणे मला स्वतःला मुंबई महाराष्ट्रात असली काय नसली काय याने काहीही फरक पडत नाही आणि कुठल्या मुंबई करायलाही फरक पडत असेल असे मला वाटत नाही. ते जे 105 हुतात्मे वगैरे जे सांगत असतात त्या सर्व हुतात्म्यांच्या पैकी दोन हुतात्म्यांची नावे त्यांचे तरी नावे कोणाला ठाऊक असतात का? म्हणजे ते असेच निनावी मेलेले आणि तिथल्या दंगलीमध्ये दुर्दैवाने सापडलेले अभागी जीव असणार ज्यांचा या भाषिक अस्मितेशी काही फारसा संबंध असेल असे मला वाटत नाही. म्हणजे कोणीतरी सांगितले की मुंबई महाराष्ट्रात असली तर तुमचे आता आहे त्यापेक्षा जास्त भले होईल तर ते त्यांना पटले असावे किंवा एरवी भारतीय लोक जशी गर्दी बघायला ही गर्दी करतात तशी त्यांनी केली असावी आणि त्यात झालेल्या गोळीबारात त्यांचा जीव गेला असावा. त्यांच्या हौतात्म्याचा त्यांच्या कुटुंबीयांना देखील काही फायदा ( म्हणजे नुकसान भरपाई) झाला नसणारे मात्र अस्मितांचे खेळ खेळणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्यापुरता फक्त उपयोग झालेला आहे. कारण त्यांच्या पुढच्या पिढ्यांना गिरणी संप वगैरे या भाषिक अस्मितेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या घटनांनी मुंबई बाहेर ढकललेच की.

काय फायदा आम्हाला आहे आम्हा उर्वरित मराठी लोकांना मुंबईचा? साध्या महाराष्ट्राचे सिमकार्ड जरी घेऊन गेलो तरी रोमिंग लागते. मग कसली मुंबई आमची?

बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून एवढं आंदोलन वगैरे झालं. आज कर्नाटकात कोल्हापुरातून जाताना रस्त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जाणवणारा फरक लगेच जाणवतो, जर एखाद्या बेळगावी मराठी माणसाला पकडून विचारलं की खरं सांग तुला आता यावसं वाटेल का महाराष्ट्रामध्ये तर तो म्हणेल नाही नाही राहू दे गरज नाही आम्हाला. मात्र अजूनही साहित्य संमेलनात बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असले हास्यास्पद ठराव केले जातात.

रॉय, तुमच्या पहिल्या प्रतिसादाच्या उत्तरार्धाशी सहमत. पूर्वार्धातील विषमतेच्या मताशीही सहमत. इथे ती अधिक दृश्य आहे, असं वाटतं.
इतर पूर्वार्धाशी नाही , कारण जन्माने मुंबईकर आहे. आणि ते नातं तोडणं अशक्य वाटतं. हे भावनिक कारण झालं खरं.

मी इतर शहरं फार कमी पाहिलीत. पण नाही आवडली. मुंबईचा वेग आवडतो. न थांबणं आवडतं. हे काम करणार्‍यांचं शहर वाटतं. पण मी रोज घराबाहेर पडायचो तो काळ आता जवळपास दोन तपे मागे गेला. तेव्हाही गाड्या बंद, पावसाने पाणी तुंबल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प , बाँबस्फोट हे अनुभवले आहे. पण तरीही प्रत्येक वेळी मध्यरात्रीच्या आत घरी पोचलो आहे. ट्रॅकवरून किंवा रस्त्याने चालत जायची वेळ आली नाही. त्यानंतरच्या काळातली म्हणजे गेल्या दहा वर्षांतली अशा वेळची भयानक परिस्थिती एकदाच अनुभवली आहे. तेव्हाही रात्री बाराच्या आत घरी पोचलो आहे. यापेक्षा भयानक परि स्थिती फक्त ऐकून वाचून माहिती आहे.

मुंबई महाराष्ट्रात धरल्याने महाराष्टृ प्रगत, समृद्ध राज्य असल्याचा आभास निर्माण होतो. मुंबईशिवायचा महाराष्ट्र तमिळनाडू, कर्नाटक, हरयाणाच्या तुलनेत मागेच दिसेल.
शिवाय उर्वरित महाराष्ट्रातून मुंबईत येणार्‍यांपेक्षा मुंबई महानगर प्रदेशात देशाच्या अन्य भागातून येणार्‍यांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. याचं कारण त्यांची स्थिती तुलनेने प्रचंड हलाखीची आहे.
मला वाटतं सध्या मुंबईत सर्वाधिक स्थलांतरित मजूर बांधकाम क्षेत्रात असावेत.

>>बाकी मुंबई स्पिरिट वगैरे जे काही म्हणतात तो एक हास्यास्पद प्रकार मला कधीही समजलेला नाही. नामुष्कीला स्पिरिट म्हणायला लावणारे मुंबई हे एकमेव शहर असावे.<<
तुम्हि ज्याला नामुष्कि म्हणताय त्याला रुढार्थाने रेझिलियंस म्हणतात. मुंबई नेहेमीच बाउंसबॅक करते, मग तो मुसळधार पाऊस असो किंवा २६/११. बाकि मांडलेल्या तक्रारी दखलपात्र नाहित. मुंबईकर हा जात्याच हसलर असतो, बाहेरुन आलेल्यांना ती कला जमली नाहि तर त्यांचा मुंबईत टिकाव लागु शकत नाहि..

संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन हा उपर्‍यांना समजणारा विषय नाहि. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा, आत्मसंन्मानाचा विषय आहे.

नॉननिगोशिएबल अंडर एनी सर्कमस्टँसेस..

राज>>> पूर्ण सहमत.
ह्याच चालीवर तालात आपल्याला असे पण म्हणता येईल
अरुणाचल! कुठे आहे ? माझा त्याच्याशी काय संबंध? मी आयुष्यात कधी तिथे जाणार नाहीये. चीनला पाहिजे आहे? देऊन टाका.
असे करत करत आपल्याला बरेच काही साध्य करता येईल. मात्र आपली आई बहिण बायका मुले सांभाळा. नाहीतर...

मी कट्टर मुंबईकर प्रेमी आहे.
पण तरीही मी म्हणालो ना, रॉय आपल्या जागी योग्य आहेत.

कारण जे मी नेहमी म्हणतो तेच.
मुंबई ही त्या एक हत्ती आणि चार आंधळ्यांच्या गोष्टी सारखी आहे. ज्याला मुंबईचे जे रूप दिसते त्याला ती तशी वाटते. माझे आयुष्य दक्षिण आणि दक्षिण-मध्य मुंबईत गेले आहे मी त्या हत्तीचा माहूत आहे. त्यामुळे मी त्या आंधळ्यापेक्षा स्वतःच्या मताला महत्व देतो Happy

तळटीप – इथे आंधळे म्हणून कोणाला हिणवले नाही की आंधळ्याना हलके लेखले नाही. फक्त गोष्टीचे उदाहरण देऊन सांगितले आहे की मुंबई अशी बाहेरच्यांना पटकन कळत नाही.

बरं धागा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेबद्दल आहे. भावनिक मुद्दे आणून भरकटवू नये व त्या समस्या trivialize करू नये, कृपया.
धन्यवाद.

मुंबई अशी बाहेरच्यांना पटकन कळत नाही. >>> अगदी अगदी. राज ही तेच म्हणत आहेत. ज्याचा मुंबईशी काही दिवसापुरता संबंध आला आहे त्यांनी त्यांनी बेधडक सांगाव कि मुंबई केंद्र शासित करा. ह्याला काही अर्थ आहे का?

भरत
एक तर तुम्हीच नसत्या प्रतिसादावर प्रतिसाद दिला. त्यामुळे मुद्दा चिघळला.
मी तसा मुंबईचा नाही पण अनेक वर्षे मुंबईत काढली आहेत. वाहतूक ब्याबास्थेवर माझे विचार मांडू शकेन.
अर्बन प्लानिंग असा हा विषय आहे . त्याच्यावर बोट ठेवायची कुणाची इच्छा नाही. मुंबईत येणारे लोंढे कसे थांबवयाचे ह्या पेक्षा त्यांचे वाहतुकीचे प्रश्न कसे सोडवायचे ह्याचाच जास्त विचार चालला आहे.

रोग एक असतो त्याची अठरा लक्षणे दिसतात,
चांगला डॉक्टर बाह्य लक्षणावर इलाज करतोच पण जर मूळ रोगावर इलाज केला तर ...
हा काही केवळ मुंबईचा रोग नाही हा सर्व जगात पसरलेला आहे.
जाऊ द्यात, जास्त बोलण्यात काही अर्थ बाही.

मी सध्या नवी मुंबईत राहतो. इथे सुद्धा सार्वजनिक वाहतुकीला बसेस आहेत. रिक्षापेक्षा स्वस्त आहेत. पण मध्यमवर्गीय गोरगरीब जनता सर्रास रिक्षा वापरते. का ते मला आधी समजायचे नाही. पण नंतर मलाही सवय लागली.

हेच चित्र मी पुण्यात सुद्धा पाहिले. अजूनही काही शहरात पाहिले. मुंबईसारखी बेस्ट बसची वाहतूक पाहण्यात आली नाही. म्हणून तिला बेस्ट म्हणत असावेत. अर्थात मीच स्वतः बसचा प्रवास करून कित्येक वर्षे झाली आहेत. पण आजही तशीच स्थिती असावी.

जुन्या मुंबईत बसेसची व्यवस्था चांगली आहेच पण लोकल रेल्वेच्या सेंट्रल हार्बर वेस्टर्न तिन्ही लाईन एकत्र आल्याने कुठूनही कुठेही सहज जाता येते. सार्वजनिक वाहतुकीचे जाळे घट्ट विणले गेले आहे.

पण सध्या मुंबईची स्कायलाईन बदलत आहे. खाजगी वाहने वापरणाऱ्यांची संख्या मुंबईच नाही तर सगळीकडेच वाढत आहे.

दिवाळीला फटाके वाजवू नका प्रदूषण होते म्हणून काळजी व्यक्त करणारी जनता देखील कधीच स्वतःचे खाजगी वाहन सोडून पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणार नाही. कारण आता हेच नॉर्मल झाले आहे. प्रत्येकाला आपले ते स्टेटस जपायचे आहे. आणि ती जनता सुद्धा आपल्या जागी बरोबर आहे. कोण कश्याला इतका पर्यावरणाचा, वाहतूक व्यवस्थेवर ताण पडतो याचा विचार का करेल?

तुम्हि ज्याला नामुष्कि म्हणताय त्याला रुढार्थाने रेझिलियंस लाचारी (हिंदीत मजबूरी) म्हणतात.

धागा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेबद्दल आहे. >> मुंबईतील वाहतूक, मुंबई आणि चीन, मुंबई आणि जपान.

संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन हा उपर्‍यांना समजणारा विषय नाहि. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा, आत्मसंन्मानाचा विषय आहे>> हो पण हे सगळे नव्या पिढीत transfer झाल नाही. त्यांचे विचार राॅय सारखेच आहेत. बेळगाव वगैरे तर आता outdated विषय झालाय.

जुन्या मुंबईत बसेसची व्यवस्था चांगली आहेच पण लोकल रेल्वेच्या सेंट्रल हार्बर वेस्टर्न तिन्ही लाईन एकत्र आल्याने कुठूनही कुठेही सहज जाता येते. सार्वजनिक वाहतुकीचे जाळे घट्ट विणले गेले आहे.
+१
महाराष्ट्रातील इतर शहरात गेल्यावर जाणवते की मुंबईत पिण्याच्या पाण्यापासून ते सार्वजनिक वाहतुकीपर्यंत सगळे स्वस्त आणि दर्जेदार आहे. एकदा का मुबईतील दमटपणा स्वीकारला की मुंबईसारखे शहर नाही.

मुंबई चिंचोळी असल्याने लोकलच्या तीन लाईन्स आणि बसने छान कव्हर झालीय. त्यात बेस्ट सर्व्हिस उत्तम आहेच.

दिल्ली, कलकत्ता येथे सोम्या गोम्यांना खाजगी सिटी बस काँट्रॅक्ट दिल्याने मासळी बाजार आहे. सिव्हीलायझेशन एवढ्यातच सुरू झालंय त्यात बसचा नुकताच शोध लागलाय. जत्रा भरली आहे भरली आहे आणि आज खेड्यापाड्यातून झुंडीने लोक आले आहेत, हौशी ट्रकवाले रंगवतात तशा रंगवलेल्या बसेस घेऊन बसवाले ओरडून ओरडून आपल्या बस मध्ये या सांगत आहेत असे दृश्य असते रोजच.

मुंबई ची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खूप वर्ष जुनी आहे, लोकांच्या सवयीची आहे. इथे वरिष्ठ कनिष्ठ सगळे इतकी वर्ष लोकलनेच फिरायचे पण हल्ली भयंकर गर्दीमुळे मध्यमवर्गीयांनी लोकल ट्रेन कडे पाठ फिरवली आहे. आता मेट्रो चे जाळे विणल्या नंतर ह्यात फरक पडू शकेल, लोकं पुन्हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरू लागतील, रस्त्यावरच्या खाजगी मोटारी कमी होतील अशी आशा आहे.
मुद्दा क्रमांक पाच, मेट्रो कधी फायद्यात जाणार ? हा लोकोपयोगी प्रकल्प आहे, ह्याची गुंतवणूक प्रचंड आहे, त्यामुळे भाड्यातून ती कधीच भरून निघणार नाही, तशी अपेक्षा ही नसते. चालू खर्च भरून निघावा चालू मिळकतीतून एवढी अपेक्षा असते. चालू मिळकतीत फक्त तिकीट विक्री न धरता स्टेशन परिसरातील दुकाने वगैरे व्यावसायिक जागांचे भाडे, जाहिराती वगैरे सगळे उत्पन्नाचे स्रोत ह्यात येतात.
अश्विनी भिडे (मेट्रो वूमन ) ग्रेट आहेत. मेट्रोच्या शिल्पकार वाटतात त्या मला.

रस्त्यावरच्या खाजगी मोटारी कमी होतील अशी आशा आहे. >> मला तरी अशी काही अपेक्षा नाही. तुमची आशा ही निराशेत बदलू नये, ही सदिच्छा. मुंबईत सध्या अशी परिस्थिती आहे की एखाद्या गल्लीतपण २-३ रीडेव्हलपमेंट किंवा नवी प्रोजेक्ट चालू असतात, प्रत्येक टॉवरमध्ये किमान २-३ मजले कारपार्किंगसाठी असतात. या सगळ्या मोटारी रस्त्यावरच येणार ना की लोक फक्त शोभेसाठी गाड्या घेऊन तिथे पार्क करून ठेवणार आहेत?

अश्विनी भिडे (मेट्रो वूमन ) ग्रेट आहेत. >> सहमत. ई. श्रीधरन यांच्यानंतर अश्विनी भिडे यांचे नाव लक्षात येते.

इंटरेस्टिंग आणि आवडीचा विषय आहे. कधीकधी वाहत्या धाग्यांवर हे मुद्दे निघतात. पण असे सलग एकत्र नाही.

त्यात मुंबईचे लहानपणापासून खूप फॅसिनेशन होते आणि अजूनही आहे. काही वर्षांपूर्वी कामाकरता फोर्टला राहिलो होतो तेव्हा लोकल, बस व चालत मनसोक्त फिरलो आहे त्या भागात. काही महिने लोकलचा प्रवास गर्दीच्या दिशेने केलेलाही आहे. मेट्रो आल्यानंतर फारसा गेलेलो नाही.

"१७ आणि "१८" बद्दल. आता तर १८ डब्यांच्या लोकल्स येणार असेल ऐकले. उद्या २४ च्या केल्या तरी तात्पुरता काही वर्षे फरक पडून पुन्हा त्याही भरतील. कारण येणार्‍या लोंढ्याचे प्रमाण अमर्यादित आहे. त्यापेक्षा मुंबईतील कंपन्यांना बाहेर जायला इन्सेण्टिव्हज देणे, नवीन कंपन्यांना येउ न देणे असे काही केले जाते का माहीत नाही.

ते एफएसाआय वाढवणे पुण्यातही भरपूर चालू असावे. ठिकठिकाणी जुन्या २-३ मजली इमारती पाडून मोठमोठे टॉवर बांधले जात आहे. प्रत्येक चौकात ते निळे ताडपत्रीसारखे कापड लावून आत बांधकामे सुरू आहेत. हे अशा भागांत की जेथे ऑलरेडी ट्रॅफिक जाम सतत होतोय. मग अशा वेळी आहे त्या इमारतींना, सोसायट्यांना एफएसाआय वाढवून देण्यापेक्षा वाढीव जागा शहराबाहेर द्यायला हव्यात. आहे तसे राहायचे असेल तर राहा. नाहीतर तुम्हाला ५०० स्क्वे फूट जागा तुम्हाला भूगावच्या पुढे देउ असे काहीतरी. डम्ब कल्पना असेल. फार विचार करून लिहीलेले नाही. हे नुसते लोकांवर लादून चालणार नाही. अशा नवीन ठिकाणी किमान सोयी हव्यात. लोक नवीन एरियातील सोसायट्यांत राहायला जातात तेथे सुरूवातीला आजूबाजूला काही नसतेच. नंतर डेव्हलप होते. पण किमान तितके हवे.

"१४" बद्दल. रिक्षावाल्यांचे इकॉनॉमिक मॉडेल काय आहे एकदा खरेच कळायला हवे. मुंबईच्या उपनगरांत काही वर्षांपूर्वी रिक्षा हा प्रकार सतत वाहता असे. कदाचित अजूनही असेल. स्टेशन-सेण्ट्रिक असे सगळे. कोठूनही शेअर किंवा सिंगल रिक्षा पकडून स्टेशनला किंवा उलटे हे अव्याहत चालू असते. याउलट पुण्यात स्टॅण्डवर आरामशीर ८-१० रिक्षा पहुडलेल्या असतात. सोसायट्यांमधल्या कार्सचे ड्रायव्हर जर घरातील लोकांना कोठे जायचे नसेल तर दुपारी आरामात असतात तशा. त्या रिक्षावाल्यांना कोठेही जायचे नसते. यांच्यावर यांची घरे अवलंबून असतील तर ती कशी चालत असतील माहीत नाही.

मला म्हणायचे आहे मला काय मुंबईतल्या माणसांविषयी द्वेष नाही सगळ्या भारतात जशी माणसं असतात तशीच ती मुंबईत असणारे त्यात काही फार वेगळे नसणारे मुंबईतली बहुतांश माणसं इतर भारतीयांसारखेच असणार आहेत.
ती मुंबईची होतात तेव्हा साहजिक आहे मुंबईच्या वेगाचा मुंबईच्या हसल कल्चरचा त्यांच्यावर परिणाम होतो. ती मुंबईशी एकरूप होत असतील मुंबईतल्या गर्दीशी एकरूप होत असतील हे सगळे ठीक आहे. परंतु मुंबईचे प्रॉब्लेम आणि उर्वरित महाराष्ट्राचे प्रॉब्लेम हे काही एकमेकांमध्ये खूप जटीलरित्या गुंतलेले नाहीत. मुंबईचे जिओग्राफिक लोकेशन बघता आणि मुंबईची लोकसंख्या बघता तिथे येणारे लोंढे बघता मुंबईचे अनेक प्रॉब्लेम्स हे युनिक आहेत. युनिक आहेत. भाषिक अस्मितेशी जोडून घेतल्याने मुंबईचा काय फार फायदा होणार नाही. हे मुंबईकरांना समजते पण उर्वरित महाराष्ट्राला समजत नाही. उर्वरित महाराष्ट्राला मुंबईवर एक प्रकारचा हक्क वाटतो. अर्थात मुंबईमध्ये उर्वरित महाराष्ट्राचा माल जात असेल पण तो सगळीकडूनच येतो फक्त महाराष्ट्रातूनच येत नाही. त्या बदल्यात मुंबई महाराष्ट्राला फारसं काही देत पण नाही. जि ती उर्वरित भारताला देते त्यात आणि महाराष्ट्राला ती जी काही देते त्यात काही विशेष फारसा फरक नाही. मग महाराष्ट्राने मुंबईला पोसायचा लोड कशाला घ्यावा? आणि हा लोड घेऊन मुंबई वरती महाराष्ट्राचा काही ताबाही राहिलेला नाही. महाराष्ट्राने मुंबईतल्या मराठी माणसांना महाराष्ट्राचा प्रॉक्सी केला आहे पण तो कितपत खरा आहे? मुंबईतल्या मराठी माणसांना आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहोत असे कधी वाटत असते काय? नसेल वाटत तर मान्य करावे आणि मुंबईचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तिच्यावरून महाराष्ट्राची राजधानी असण्याचा बोजा काढून टाकला पाहिजे. मग महाराष्ट्र आणि मुंबईशी इतर राज्यां प्रमाणे व्यवहार करावा. म्हणजे महाराष्ट्राला अदानी सारख्या राक्षसांशी जरा नीटपणे लढता येईल.

आता विषय वाहतुकीचा. मोनोरेल हा काय प्रकार आहे? किती उपयोग होतो या मोनोरेलचा? मला तर त्या नेहमी मोकळेच दिसतात. अश्विनी भिडे यांना मेट्रो वुमन म्हणतात, परंतु त्या फडणवीसांच्या मर्जीतल्या आहेत. आणि फडणवीस हे महाराष्ट्र हितासाठी काम करतात असे माझे अजिबात मत नाही.

जगात जिथे जिथे मेट्रोचे जाळे आहे म्हणजे अजस्त्र शहरांमध्ये तिथे हे जाळे नेहमी इतर सर्व पब्लिक ट्रान्सपोर्ट बरोबर अत्यंत काळजीपूर्वकरीत्या जुळवलेले असते म्हणून संपूर्ण शहरासाठी एकच एक प्रकारचा पास उपलब्ध होऊ शकतो किंवा जे ट्रान्सपोर्ट चे वेगवेगळे मोड आहेत त्यांच्यामध्ये एक समन्वय असतो.

ऑर्गनायझेशनल पातळीवरती कोणत्या कंपन्या मेट्रो ऑपरेट करत आहेत आणि त्या कशा करत आहेत हे तपासले तर बहुतेक वेळ डिसिजन मेकिंग या सगळ्यांसाठी इतका वेळ का लागतो हे कळेल आणि बजेट दुप्पट का होते एकही टाईम लाईन पाळली जात नाही हेही कळेल. या सगळ्या ऑपरेशनल इन एफिशियन्सी घालवायच्या असतील तर मुंबईची सगळीच व्यवस्था स्वतंत्र आणि केंद्रभूत झालेली पाहिजे. मुंबईचे स्वतःचे विधान भवन असेल तर ते सोपे जाणार नाही काय? तसाही मुंबईतला एक नगरसेवक मराठवाड्यातल्या चार आमदारांच्या तुल्यबळ पैसा आणि रिसोर्स बाळगून असतो.
मग मुंबईच्या लोकल नगरसेवक आणि आमदार या दोन रोल ना एकत्र का करू नये? मुंबईचा स्वतंत्र मुख्यमंत्री का असू नये? एक शिवसेना सोडल्यास दुसरा कुठलाही पक्ष मुंबईत जन्माला येऊन आणि वाढून महाराष्ट्रभर पसरलेला नाही.

महाराष्ट्राच्या नागरिकरणाचा नकाशा जर पाहिला तर ते सहज लक्षात येईल की मुंबई आणि मुंबईच्या आसपासचा परिसर हा उर्वरित महाराष्ट्रापेक्षा खूप पुढारलेला आहे आणि त्याचे स्वतःचे वेगळे इशूज आहेत. आता चौथी मुंबई आणणार आहेत जिथे पुन्हा मराठी माणसाला म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला किती जागा मिळणार आहे हे जग जाहीरच आहे. तर हा वेगळे आणि काय गोंधळ घालायचा तो घाला तुमचा तुम्ही.

साऊथ कोरिया च्या राजधानी उदाहरणार्थ तिकीट कापताना पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये येतानाचा पॉईंट ते तो सोडतानाचा पॉईंट, वेळ आणि अंतर या सगळ्याचा विचार करून तिकीट ठरते. मग त्या दोन्ही पॉईंट मध्ये तुम्ही दहा बस बदलल्या किंवा दोन मेट्रो बदलल्या तरी चालतात. आणि मेट्रो स्टेशन असेल तर त्याच्या बाहेरच त्या त्या लोकल एरियामध्ये फिरणाऱ्या सिटी बसेस यांचे स्थानक असतेच. शिवाय प्रत्येक मोठ्या रेल्वे स्थानकावर किंवा बस स्थानकावर मेट्रो स्टेशन असते. किंवा शहराच्या जवळचा एअरपोर्ट आणि इतर महत्त्वाची ट्रान्सपोर्टची ठिकाणे या ठिकाणी सुद्धा मेट्रो स्टेशन असतात. असे हे सगळे पूर्ण इंटिग्रेटेड जाळे असल्यावरच या सगळ्याचा फायदा शहराच्या विकासाला होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या आयुष्याला शिस्त येते, त्यांना बेटर प्लॅनिंग करता येतं. मुंबईमध्ये हा प्रकार थोडाफार प्रमाणात लोकलने केला मात्र मुंबईच्या जिओग्राफिकल रचनेचा तिला फायदा झालेला आहे. तरीही जी काही सिस्टीम तयार झालेली आहे तिचे लोक कितीही कौतुक करत असले तरी ती अक्षरशः एक जीवघेणी, माणसातला मेंढरू जागे करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे मला अशा व्यवस्थेच्या इफिशियन्सीवर सुद्धा मूलभूत शंका आहे. म्हणजे ती मोजताना नुसत्या रायडरशिप वरती का मोजावी? लोकल मधून एखादी गर्भवती महिला सातव्या आठव्या महिन्यात दवाखान्यात जाऊ शकेल का? किंवा तान्ह्या बाळाला घेऊन प्रवास करू शकेल का? अपंगांचे वगैरे तर लांबचंच. तरण्या ताठ्या पुरुषाला सुद्धा अक्षरशा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

===

केशव कुल,

मुंबईला देश सोडून जायला सांगितलेलं नाही मुंबईचे आणि मुंबईच्या आसपासच्या सगळ्या नागरी भागाचे जे जे इशूज आहेत ते नीटपणे सोडवण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करावी, ती केंद्रशासित करावी का तिचे स्वतंत्र राज्य करावे हे मी सुचवत आहे. आणि हा सगळा भाग इकॉलॉजी कधी सुद्धा सेन्सिटिव्ह आहे. आणि यापूर्वीही हा विचार किती लोकांनी मांडलेला असणार आहे. मला स्वतःला मुंबई आणि आसपासचा प्रदेश हा महाराष्ट्राचा जळू झालेला नको आहे.

Pages