Submitted by रॉय on 20 January, 2026 - 02:41
१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे.
आता साहित्य संमेलन म्हणजे अध्यक्ष आलाच.
या एका मोठ्या माइलस्टोन साठी कोण अध्यक्ष असावेत असे वाटते? मला खालील नावे सुचवावीशी वाटतात.
१. भालचंद्र नेमाडे (काही नेम नाही यांचा, होऊही शकतात)
२. रंगनाथ पठारे
३. चं प्र देशपांडे
४. मेघना पेठे
५. मिलिंद बोकील
६. सतीश तांबे
७. श्याम मनोहर (भरत यांची पसंती)
९. सलील वाघ
१०. संदीप खरे
११. नितीन वैद्य (पट्टीचे वाचक)
१२. निखिलेश चित्रे (पट्टीचे वाचक)
१३. शशिकांत सावंत (पट्टीचे वाचक)
१४. वीणा गवाणकर
१५. मंगला गोडबोले
८. हेमंतकुमार (कुमार१)
क्रम ज्येष्ठतेनुसार किंवा इम्पॅक्ट नुसार नाहीत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कार्यक्रम नियोजन समिती असेल
कार्यक्रम नियोजन समिती असेल तर तिचे अध्यक्ष रॉय. कोणाला बोलवायचं, कोणाला नाही. काय विषय ठरवायचे यासाठी.
भरत, सॉरी तुमचा अनुल्लेख केला
भरत, सॉरी तुमचा अनुल्लेख केला!
अध्यक्षांनी शिवीगाळ न
अध्यक्षांनी शिवीगाळ न करण्याची परंपरा मोडीत काढून क्रांती करण्यासाठी रॉय हाच शिवराळ आयडी अध्यक्ष नेमावा.
बाकिचे रिकामटेकडे नाहीत.
माझी पसंती - भालचंद्र नेमाडे.
माझी पसंती - भालचंद्र नेमाडे.
साहित्य संमेलन
साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचा उद्योग असं नेमाडे म्हणालेत
ते केव्हा यू-टर्न घेतील, आणि
ते केव्हा यू-टर्न घेतील, आणि शिवाय त्याचं समर्थनही करतील- याचा नेम नाही. एका पुरस्कार स्वीकारण्याच्या प्रसंगात (बहुतेक बीएमएमचा असावा) ते 'पुरस्कार वगैरे सगळाच भंपकपणा आहे, पण मी नाही घेतला, तर दुसर्या एखाद्या जास्त मूर्ख असलेल्याला तो हे लोक देतील, या भीतीपोटी मी पुरस्कार घेतला' असं ते एकदा म्हणालेले आहेत.
(No subject)
जास्त मूर्ख
वृत्तपत्रं, साहित्यसंमेलनं,
वृत्तपत्रं, साहित्यसंमेलनं, त्यांचे अध्यक्ष आणि संमेलनांचे वृत्तांत यावरचे त्यांचे विचार फारच मनोज्ञ आहेत. करमणुकीची फुल गॅरंटी.
करमणुकीची फुल गॅरंटी.
करमणुकीची फुल गॅरंटी.
लिहा हो ! एका संमेलनाला थेट राष्ट्रपतीच आले होते, त्यांच्या एडीसी ने 'अध्यक्षीय भाषण लवकर आटोपा' अशी 'विनंती' केली होती.
संमेलनाध्यक्षपदासाठी माझी
संमेलनाध्यक्षपदासाठी माझी पसंती श्याम मनोहर.
अध्यक्षांना न्युक्लीअर
अध्यक्षांना न्युक्लीअर फिजिक्सचे ज्ञान असावे.
अनुमोदन. श्याम मनोहर.
अनुमोदन. श्याम मनोहर. दुर्दैवाने त्यांची लॉबी नाही. (ते राहत असलेल्या इमारतीतही नाही, असं ते म्हणालेले). दुसरं म्हणजे ते जे काय बोलतील ते जुन्या संमेलनाध्यक्षांनाही कळणार नाही. बाकी दूरच राहिले.
तिसरं म्हणजे ते ८५ वर्षांचे आहेत.
चौथं म्हणजे- एकच गोष्ट गेली ४०-५० वर्षं कानीकपाळी ओरडत असलेला हा माणूस इतक्या वयाचा झाला तरीही आपल्याला काहीच कळत नाही. त्याला संमेलनाध्यक्ष करणं म्हणजे त्याचाच अपमान. पण हे सारं आपल्याला काहीच न कळता ते होतीलही कदाचित संमेलनाध्यक्ष. मसापच्या सभागृहात एका कार्यक्रमात ते दिसले याचा अर्थ मसापला ते माहिती आहेत असं दिसतं.
साहीत्य संमेलनाचा दर्जा आणि
साहीत्य संमेलनाचा दर्जा आणि उपयोग काहीही असले तरी ठराव मात्र दणकून होतात.
या वेळी भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश ताब्यात घ्यावे असा ठराव करायला हरकत नाही.
गेलं वर्ष सव्वा वर्षं तारा
गेलं वर्ष सव्वा वर्षं तारा भवाळकरांच्या भाषणाने आणि मुलाखतींनी आपल्या त्या ह्या लोकांचा कपाळशूळ उठत होता. श्याम मनोहर अध्यक्ष झाले तर अंतर्गत दबावाने डोक्याची कवटी फुटून मेंदूच्या ठिकर्या ठिकर्या बाहेर पडतील
पुण्यातल्या गेल्या साहित्य
पुण्यातल्या गेल्या साहित्य संमेलनापासून, म्हणजे ८५व्या मराठी साहित्य संमेलनापासून अशोक शहणे हे अध्यक्ष व्हावेत असं मनापासून वाटत होतं. मात्र, एकवेळ नेमाडे होतील, पण शहाणे तयार होणार नाहीत हे नक्की. आणखी एक म्हणजे बहुधा ९० पेक्षा जास्त वय आहे त्यांचं.
शहाण्यांबद्दल सर्च करायला हरकत नाही. हा माणूस मोलाचा आहे. पण अशी अनेक माणसं आपण ओळखली नाहीत, त्यांचा सन्मान केला नाही. संमेलनाध्यक्ष म्हणजे सर्वोच्च सन्मान आहे असं नाही, पण मग लिहिणार्यांचा, विचार करणार्यांचा सन्मान करायच्या कोणत्या आणखी पद्धती आणि परंपरा आपण तयार केल्यात आणि जिवंत ठेवल्यात..
खरंय.
खरंय.
<<पण मी नाही घेतला, तर दुसर्
<<पण मी नाही घेतला, तर दुसर्या एखाद्या जास्त मूर्ख असलेल्याला तो हे लोक देतील, या भीतीपोटी मी पुरस्कार घेतला>>
संमेलनाध्यक्ष असा असावा की
संमेलनाध्यक्ष असा असावा की त्या व्यक्तीबद्दल बहुसंख्य वाचकांना आदर असेल. संमेलनाध्यक्ष समाजाच्या प्रगतीसाठी परखड मत मांडू शकेल. त्याचे व्यक्तिमत्व असे असेल की प्रस्थापित यंत्रणेला त्याची दखल घ्यावीच लागेल. एक वर्षाचा कालावधी छोटा आहे पण समाजाला दिशा देण्यासाठी आणि जडत्वावर मात करण्यासाठी पुरेसा असू शकतो. हे करण्याची ताकद असणारा संमेलनाध्यक्ष व्हावा. माझ्या मते भालचंद्र नेमाडे हे सक्षम आहेत.
वयाची मर्यादा आहे म्हणून
वयाची मर्यादा आहे म्हणून यातून खूप ज्येष्ठ लोक काढून टाकावे लागतील. चंप्र देखील आले यात.
परंतु १०० वे साहित्य समेलन असल्याने ज्यांच्या साहित्याचा एकूण साहित्यावर बराच मोठा परिणाम झालेला आहे असा निकष लावला तर असे एकमेव व्यक्ती नेमाडेच असावेत.
प्रकाशकांपैकी कुणीतरी होऊ
प्रकाशकांपैकी कुणीतरी होऊ शकेल का? किंवा एखादा पट्टीचा वाचकच साहित्य समेलनाचा अध्यक्ष व्हावा.
फडणवीस अध्यक्ष, आठवले प्रमुख
फडणवीस अध्यक्ष, आठवले प्रमुख पाहुणे.
अशोक शहाणे आणि गॅंग (कोलटकर)
अशोक शहाणे आणि गॅंग (कोलटकर) वगैरे यांची एक वेगळीच दुनिया आहे.
त्यांच्या पायावर पाय ठेवून अभिदानंतर वाले चौथी नवता वगैरे काहीतरी घेऊन आले. मला तर त्यांच्यातला एकही आवडत नाही सलील वाघ सोडला तर. याचेही नाव add करतो. मराठी साठी खूप आक्रमक झालेला आहे सलील वाघ अलीकडे.
श्रीधर तिळवे गुरुजींनी देखील साहित्य समेलनाचा अध्यक्ष व्ह्यायला हरकत नाही मात्र त्यांचे भाषणात पूर्णविराम असेल का कुणास ठाऊक.
>> वृत्तपत्रं, साहित्यसंमेलनं
>> वृत्तपत्रं, साहित्यसंमेलनं, त्यांचे अध्यक्ष आणि संमेलनांचे वृत्तांत यावरचे त्यांचे विचार फारच मनोज्ञ आहेत. करमणुकीची फुल गॅरंटी. <<
साजिरा, माझी तर हीच इच्छा आहे. चार घटका मस्त करमणूक होईल. बेनं लय आगाव हाय या वयातही.
संदीप खरे या कवीचे एकूण मराठी
संदीप खरे या कवीचे एकूण मराठी साठी काँट्रिब्युशन बघता त्यालाही द्यायला काही हरकत नाही कारण त्याने एका पिढीला मराठी कवितेकडे वळवून आणले आहे.
पट्टीचे वाचणार्यात निखिलेश
पट्टीचे वाचणार्यात निखिलेश चित्रे, नितिन वैद्य ही नावे येतील.
चिनम्य दामलेंना पण अॅड करा. त्यांचे मराठी भाषेतून शास्त्रीय, सामाजिक, भाषेसंदर्भातील लेख सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचे योगदान मोलाचे आहे.
चिन्मय दामले अजून यंग आहेत
चिन्मय दामले अजून यंग आहेत बरेच पुण्य जमा व्हायचे आहे त्यांचे. १२५ व्या साहित्य समेलनाला त्यांचा विचार करता येईल.