अमेरिकेत बौद्ध भिक्खूंचा एक चमू आलोक नावाच्या कुत्र्यासोबत शांतीचा संदेश घेऊन पदयात्रा करत आहे. हा कुत्रा जागतिक शांतीचं प्रतिक बनला आहे. हे बौद्ध भिक्खू आणि तो कुत्रा बातम्यांचा विषय आहे. भारतात एका रस्ते अपघातात हा कुत्रा जखमी झाला होता. तेव्हां या दरम्यान भारतात पदयात्रा करत असलेल्या भिक्खूंना हा कुत्रा जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याला पूर्ण बरा केला. आता तो कुत्रा या भिक्खूंना सोडायला तयार नाही. ते जिथे जातील तिथे तो त्यांच्या सोबतच असतो. अमेरिकेत ठिकठिकाणी या भिक्खूंचे स्वागत होते, कौतुक होते आणि आलोकसोबत सेल्फी काढून घेतल्या जातात. हे सर्व चित्र अमेरिका जागतिक शांतीसाठी किती आसुसलेली आहे हे दर्शवणारं आहे.
दुसरीकडे तीच अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करून त्यांचा राष्ट्राध्यक्ष पकडून स्वतःच्या देशात आणते आणि त्याच्यावर स्वतःच्या न्यायालयात खटला भरते. जागतिक संकेतांना पायदळी तुडवून न्यायालयेही खटला दाखल करून घेतात. कल्पना करा कि आर्थिक आघाडीवर बारा वाजलेल्या इंग्लंडच्या पंतप्रधानांना चीनचं सैन्य उचलून घेऊन जातं आणि स्वतःच्या देशात खटला भरतं. तर काय होईल ? त्या वेळी जागतिक कायदे, आंतरराष्ट्रीय संकेत आणि परंपरा यांची ग्वाही दिली जाईल. आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनविरोधात खटला भरला जाईल आणि चीनला युद्धखोर देश म्हणून घोषित केले जाईल . कारण अमेरिकेच्या बाजूने उभ्या राहणार्या प्रभावी राष्ट्रांची संख्या अधिक आहे.
याचाच दुसरा अर्थ असा आहे कि जगातल्या सव्वाशे पेक्षा जास्त देशांना कोणतीही किंमत नाही. त्यांचे मत काय आहे याला आवाजच नाही. ज्यांना आवाज आहे तेच जागतिक मत समजले जात आहे. आर्थिक दृष्ट्या संपन्न देश म्हणजेच जागतिक मत झाले आहे.
एक जहाज इराणच्या आखातातून निघते आणि ते व्हेनेझुएलातून अमेरिकन फ्लीट पाहून पळ काढते. त्याच्या मागे अमेरिकन नौदल लागते. त्याचा चकवा देत ते बिटनच्या जवळ येते. इथे आल्यावर अमेरिकन नौदल दिसत नाही म्हणून ते ट्रान्सपाँडर चालू करते आणि ब्रिटन अमेरिकेच्या सांगण्यावरून ते जहाज ट्रॅक करते. त्यामुळे जवळच्या अमेरिकन जहाजांना सिग्नल दिला जातो. हे पाहून ते जहाज पुन्हा उलट्या दिशेने वळते पण मागून आलेले नौदल त्या जहाजाला वेढा घालते.
बेला १ चा मार्ग
या चित्रात बेला १ चा मार्ग स्पष्ट होत आहे. ते इराण मधे वेगळ्या नावाने होते. सुएझ कॅनॉलमधे आल्यावर ते बेला १ झाले. इथे त्याने व्हेनेझुएलाचा झेंडा लावला. त्या वेळी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला नव्हता. जहाजाला प्रवासाला वेळ लागतो. त्यामुळे जेव्हां ते पश्चिम अटलांटिक मधे पोहोचले तेव्हां परिस्थिती पूर्ण पणे बदललेली होती. ते व्हेनेझुएलाजवळ येऊन उत्तरेकडे वळाले आणि ब्रिटनच्या क्षेत्रात शिरले.
खरे तर कोणतेही जहाज जेव्हां समुद्रात असते तेव्हां त्यावर धोकादायक काही नाही एव्हढेच त्या त्या देशाच्या क्षेत्राच्या नौदलाला तपासता येते. हे जहाज ऑईल टँकर होते. त्यामुळे ते ताब्यात घेता येत नाही. तसे करणे हे जागतिक व्यापार कायदा , समुद्री वाहतुकीचे संकेत यांचा भंग ठरतो. पण अमेरिकेने ते ताब्यात घेतले. डीप सी मधे कोणत्याही देशाची हद्द नसते. पण अमेरिकेने वेस्टर्न अॅटलांटिकचा उत्तर आणि दक्षिण गोलार्ध आपल्याच मालकीचा करून ठेवला आहे.
आता रशिया हे आमचेच जहाज आहे हे क्लेम करत आहे. जर रशियाने क्लेम केले तर अमेरिकेने मान्य केले पाहीजे. पण जर ते जहाज रशियन आहे हे माहिती असताना पकडले तर तो कबुलीजबाब होईल. म्हणून अमेरिका आता ते व्हेनेझुएलाचे आहे असा दावा करत आहे. कारण त्यांनी ते जहाज ट्रॅक केले तेव्हां त्यावर बेला १ हे नाव होते. आणि पकडले जाण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हां त्याने रशियन झेंडा लावून मेरीनेरा असे नाव धारण केले असे अमिरेकेचे म्हणणे आहे. अमेरिकेला आता माघार घेणे शक्य नाही कारण या वेळी रशियाशी पंगा आहे. आणि आता जहाज सोडले तर अमेरिका बॅकफूटवर गेली हा हंगामा होईल शिवाय रशियाच्या हाती अमेरिकेला कोंडीत पकडून निर्बंध उठवण्यासाठी आयतेच कोलीत हातात दिल्यासारखे होईल.
मग ही भानगड काय आहे ?
रशिया, इराण आणि व्हेनेझुएला या देशांवर अमेरिकेचे निर्बंध आहेत. या तीनही देशांकडे तेल आहे पण ते विकता येत नाही. यासाठी रशियाने भारतातल्या चार चाकी टँकरवाल्यांची युक्ती कॉपी केली आहे. (हे उदाहरण आहे, शब्दशः घेऊ नये).
हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशच्या काही भागात डाकूंचे साम्राज्य संपल्यापासून ट्रक्सच्या सहाय्याने अवैध व्यापार चालू झाला आहे. अंमली पदार्थ, शस्त्रे व अन्य काही वस्तू यांचा व्यापार हे ट्र्क्स करतात. कसे ? तर ते जेव्हां हरियाणात प्रवेश करतात तेव्हां हरियाणाची नंबर प्लेट लावतात. राजस्थानात गेले कि राजस्थानची नंबर प्लेट लावतात. असे ट्रक्स हजारोंच्या संख्येने आहेत आणि ते एकमेकांची नंबर प्लेट लावतात. त्यामुळे राज्यांतर्गत वाहतूक हा काही प्रतिबंधित नसलेल्या जिन्नसांसाठी अपराध होत नाही. हे ट्र्क्स कर चुकवतातच शिवाय एका राज्याचा अनुदानित माल दुसर्या राज्यात नेतात. त्यामुळे तिथे व्यापारी नफा कमावतात. आता हे बंद झाले असावे. कारण सेंट्रलाईज्ड करामुळे अगदी थोड्या वस्तूंवर फायदा होतो.
रशियाने एक्झॅक्टली हेच तंत्र वापरले आहे. रशियाने शॅडो फ्लीट बनवली आहे. जवळपास चौदाशे ऑईल टँकर्स जहाजे समुद्रात उतरवली आहेत. त्यांचे रजिस्ट्रेशन रशियात झाले आहे. हेच तंत्र रशियाने इराण आणि व्हेनेझुएलाला शिकवले आहे. त्यांनीही आपापल्या शॅडो फ्लीट्स बनवलेल्या आहेत. याशिवाय रशियाने किरकोळ असलेल्या देशांची जहाजे विकत घेतली आहेत. ती या फ्लीट मधे सामील आहेत.
या पद्धतीने ही जहाजे आपल्या ताफ्यातल्या कोणत्याही देशाचा झेंडा समुद्राच्या त्या त्या भागात लावतात. त्या देशाचे जहाज त्या भागात हा काही गुन्हा नाही. समजा जरी त्यांच्यावर नजर ठेवली तरी ही जहाजे ट्रान्सपाँडर ऑफ करतात. मग त्यांना ट्रेक करता येत नाही. मग त्यांना सॅटेलाईटद्वारे ट्रेक करण्याचा प्रयत्न होतो. पण रशियाने इथे एक युक्ती शोधून काढली आहे. त्यांना वास लागला कि आपल्या एखाद्या जहाजाचा पाठलाग होतोय तर ते आजूबाजूची असंख्य जहाजे समुद्राच्या त्या भागात आणतात. आणि संशयित जहाज वेगळ्याच देशाचा झेंडा लावते आणि त्या जहाजाचा झेंडा "निरूपद्रवी" जहाज लावते. असंख्य जहाजे आल्याने सॅटेलाईट ट्रेकिंग मधे गोंधळ उडतो. या दरम्यान हे जहाज जवळच्या एखाद्या जहाजावर माल पोहोचवते. हे भर समुद्रात चालते. सिनेमात नाही का एका ट्रकमधला माल दुसर्या ट्रकमधे जातो तसेच.
मग ते भलतेच जहाज अन्य देशाला तेल विकते. भारताने अधिकृत रित्या जरी रशियाकडून आम्ही तेलखरेदी थांबवली आहे असे जाहीर केले असले तरी रशिया आणि भारत यांच्यातही असाच व्यापार अद्याप चालू आहे असा अमेरिकेला दाट संशय आहे. या पद्धतीने रशियाची अर्थव्यवस्था चालू राहते. रशियाच्या नाड्या आवळण्याकरता अमेरिकेने बेला १ जहाज ताब्यात घेतले. मात्र रशियाने समोर येऊन जहाज आमचेच आहे हा दावा केला आहे. ते मूळचे रशियनच आहे. त्यामुळे त्यांच्या सिस्टीम मधे या जहाजाचे डिटेल्स आहेत. ही सिस्टीम हा पुरावा आहे.
आता जगाचे लक्ष लागलेय कि अमेरिका रशिया युद्ध होणार का ?
जगाच्या दृष्टीने अमेरिकेने व्हेनेझुएलात जे पाप केले आहे तो त्यांचा शंभरावा अपराध ठरला पाहीजे. पण त्यासाठी रशिया आणि अमेरिका एकमेकांसमोर ठाकले पाहीजेत. जर रशियाने आक्रमक भूमिका घेतली तर महायुद्धाच्या चिंतेने अमेरिकेतूनच ट्रंपवर दबाव वाढेल.
याउलट रशियात पुतिन यांच्यावर दबाव वाढत आहे तो न्युकीअर वेपन्स चा वापर करण्याचा. जागतिक महायुद्धाचा धोका काही तास निर्माणही झाला होता. कारण एक रशियन युद्धपोत आणि एक आण्विक पाणबुडी जिच्यावर आण्विक मिसाईल्स आहेत, ती बेला १ च्या दिशेने अमेरिकन समुद्रात आली होती. हा दावा दस्तुरखुद्द ट्रंप यांनी फॉक्स टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.
पण मग त्यांनी क्षेपणास्त्रे न डागता माघार का घेतली ?
इथे पुतीन यांचे डावपेच दिसतात. पुतीन यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अनुभव आजचा नाही. ते रशियाच्या नेतेपदी, उपनेतेपदी येण्याच्या आधी केजीबीचे प्रमुख होते. त्यामुळे अमेरिका रशियाला उकसावून त्यांना युद्धखोर जाहीर करेल ही अटकळ पुतीन यांना होती. व्हेनेझुएला आणि रशिया यांच्यात संरक्षणाचा करार होता. त्यामुळे व्हेनेझुएलावर हल्ला झाला कि रशियाने धावून यायला हवे होते. पण रशियाने तसे केले नाही. हा ट्रॅप आहे हे ओळखून रशियाने सावध पवित्रा घेतला.
चीनने रशियाची बाजू घेतली नाही. दोन्हीचे कारण एकच. जागतिक मीडीया.
चीनचा विस्तारवादी प्लॅन चालूच आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा वेग पाहता २०४० मधे ते अमेरिकेला मागे टाकतील . तोपर्यंत थेट अमेरिकेशी चीन पंगा घेणार नाही. तो देश अजगराप्रमाणे आपली ताकद वाढवत आहे.
रशियाने इथे बुद्धीबळाचा डाव खेळला.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून शह दिला. त्यांनी थेट रशियावर हल्ला नाही केलेला. अशा वेळी थेट अमेरिकन युद्धनौका बुडवणे हा आत्मघात ठरला असता. तेव्हां रशियाने तीच चाल खेळत माघारी परतताच युक्रेनवर हल्ला केला. पुतीन यांच्या घरावर हल्ला झाला तेव्हांच ही अटकळ बांधली जात होती. मात्र पुतीन यांनी जी वेळ निवडली ती त्यांचे आंतराराष्ट्रीय राजकारणातले टायमिंगचे भान स्पष्ट करणारी आहे.
या युद्धात रशियाने हजारो ड्रोन्स वापरलेच. पण सर्वात धोकादायक असे आर्शेनिक मिसाईल्स वापरले. आर्शेनिकचा डेमोच त्यांनी जगापुढे ठेवला .
आर्सेनिक मिसाईल हे एकाच वेळी अनेक ठिकाणी मारा करू शकते. ते आण्विक हेड वाहून नेते. आकाशात गेल्यावर दिवाळीच्या एका फटाक्याप्रमाणे त्यातून सहा वेगवेगळी मिसाईल्स बाहेर पडतात आणि ती वेगवेगळ्या टार्गेटवर हाय प्रिसिजन हल्ला करू शकतात. त्यामुळे कोणतीही मिसाईल विरोधी संरक्षण यंत्रणा त्या विरोधात अचूकतेने काम करू शकत नाही. कारण ती वेध घेताना एकाच मिसाईलचा वेध घेत असते. जवळचे अँटी मिसाईल अॅक्टिवेट होऊन वेध घेण्यापूर्वीच त्यातून सहा मिसाईल बाहेर पडलेली असतात.

हा रशियाने दिलेला इशाराच आहे.
युक्रेनला बेचिराख करताना आकाशात दिवाळी चालू आहे असा भास होत होता. आकाशात स्ट्रीट लाईट्स लावलेत कि काय असे ते दृश्य दिसत होते. हल्ला एकाच भागात जेल्याने त्याची तीव्रता वाढली.
आटा युक्रेनच्या संरक्षणार्थ अमेरिका येते का हा प्रश्न जगासमोर आहे. जर अमेरिका नाही येऊ शकली तर रशियाने आपली पत राखली आणि महायुद्धही टाळले असा त्याचा अर्थ होतो. आता युक्रेन अमेरिकेच्या नावाने शंख करेल. अमेरिकेवर रशियाच्या हल्ल्याला उत्तर देण्याचा दबाव वाढले. खुद्द अमेरिकेतून तसा दबाव येईल.
नैतिकदृष्ट्याही अमेरिकेने तो अधिकार गमावला आहे आणि रशियावर हल्ला करण्यासाठी आता मित्रदेश साथ देणार नाहीत. रशिया कदाचित ब्रिटनवर सुद्धा हल्ळा करेल अशी भीती व्यक्त केली ़जात आहे. कारण अमेरिका आणि इस्त्राएल बेला १ प्रकरणावरून इराणवर हल्ला करणार अशा बातम्या आहेत.
तर काहीजण रशिया, अमेरिका आणी चीन या देशांनी गरीब देशांचा बळी देऊन आपसात समझौता केल्याचे म्हटले आहे. प्रत्येकाच्या मताचे स्वागतच केले पाहीजे. ते खोडून काढण्याची गरज नसते. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा शक्यता नाकारता येत नाहीत. या मागे एक ठोस पुरावा सुद्धा आहे. रशियाचा हा हल्ला एव्हढा अचानक होता कि भल्याभल्यांना त्याची खबर नव्हती. असे असतानाही अमेरिकेने आपल्या वकिलातींना अॅडव्हायजरी जारी केली होती कि आज हल्ळा होईल बाहेर पडू नका. पुतीन काका आज युक्रेनचा बोर्या वाजवतील तेव्हां सुरक्षित रहा, हा इशारा अमेरिका कधी देऊ शकते ? अचानक झालेल्या हल्ल्याची खबर इंटेलिजन्स देऊ शकत नाहीत. म्हणजेच रशियानेच अमेरिकेला हा सावधानतेचा इशारा दिला का?
जे बलवान आहेत त्यांना आपसात लढून नष्ट व्हायचे नाही हे भान चांगलेच आहे. रशियाने व्हेनेझुएलाचा बळी दिला. तर अमेरिकेने युक्रेनचा. पुढे अमेरिका ब्रिटनचा सुद्धा बळी देऊ शकते. ब्रिटन आज यदनीय अव्स्थेत आहे. इथून पुढे प्रभावशून्य ब्रिटनचा अमेरिकेला काही फायदा नसेल.
याचाच अर्थ भारताला सुद्धा हा धोका लक्षात घ्यावा लागेल. रशिया चीन अमेरिका यांच्या चेंगराचेंगरीत भारताचा सुद्धा बळी जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन भारताने आता पावले टाकायला सुरूवात केली पाहीजे.
पूर्वी रशियाला खल समजणार्या उजव्यांनी आता रशियाला मित्रदेश म्हणायला सुरूवात केली आहे. कारण असहाय्यतेतून आता त्यांना रशियात तारणहार दिसू लागला आहे. पण आपल्या इच्छेने जग चालत नाही. उद्या रशिया भारत आणि चीन यामधून एक निवडायची वेळ येईल तेव्हां चीनला निवडेल. कारण भारताची इमेज सुद्धा पलटीमारच आहे. ब्रिक्समधे सुद्धा भारताच्या भूमिकेत सातत्य नाही. यात देशाचे हितच आहे यात शंका नाही. मात्र प्रत्येक देशाच्या भूमिकेतून पाहताना रशियाला ही भूमिका परवडणारी नाही.
रशियाला आज गरज आहे ती पैशांची. ती चीन पूर्ण करू शकतो. भारत नाही.
अमेरिकेपाठोपाठ जर रशियाही मस्तवाल झाला तर आपल्याला आजच आपले धोरण बदलावे लागणार आहे. कुणावर विसंबून शेवटी अवसानघातच होणार आहे हे नक्की.
एकंदरीत युद्ध टळेलच पण अनेक निरूपद्रवी देशांचा बळी जाईल.
लेटेस्ट अपडेट - ब्रिक्स + देशातल्या द. आप्रिका, चीन , रशिया आणि इराण या देशांचा द आफिकेजवळच्या समुद्रात युद्धसराव सुरू. अमेरिकेने रशियन युद्धकैदी सोडून दिले आहेत.
देश संकट मे है.
देश संकट मे है.
सध्याच्या परिस्थितीचा फायदा
सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन चीन तैवान ताब्यात घेऊ शकते. तर भारत चिकन नेक आसपासाचा बंगलादेशी परिसर ताब्यात घेण्याचा विचार करू शकतो.
दोन्ही भाग वाचले, छान आढावा
दोन्ही भाग वाचले, छान आढावा घेतला आहे.
व्हेनेझुएला आणि नंतर हे जहाज ताब्यात घेणे या बातम्या तेवढ्या थोडक्यात वाचल्या होत्या.
दोन्ही भाग माहितीपूर्ण आहेत.
दोन्ही भाग माहितीपूर्ण आहेत. वाचतोय, अजून लिहित रहा.
>>सध्याच्या परिस्थितीचा फायदा
>>सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन चीन तैवान ताब्यात घेऊ शकते.<<
आणि रश्या युक्रेन, अमेरिका ग्रीनलंड.. कुठलंहि मिलिटरी ऑपरेशन न करता...
झेलेन्स्कीच्या नादाला लागून
झेलेन्स्कीच्या नादाला लागून युरोपची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे.
धन्यवाद सर्वांचे. सद्य
धन्यवाद सर्वांचे. सद्य परिस्थितीत भारत कोणतेही दु:साहस करणार नाही.
युरोपची अवस्था डफली सारखी झाली आहे. फ्रान्स आणि इटलीने नुकतेच आता रशियाचीही बाजू ऐकायला हवी होती असे म्हटले आहे. उशिराने सुचलेले शहाणपण आहे. भारत हे तीन वर्षांपासून सांगत होता.
हा भागही आवडला. छान आढावा..!
हा भागही आवडला.
छान आढावा..!
पुभाप्र
पुभाप्र