बोहल्यावर चढले तेव्हापासून
दोन गोष्टीशी जुळवून घेतलं
एक जोडवं अन् दुसरा तो
बघता बघता जीवच जडाला दोघांवर
पायी चमचमतं चांदीचं जोडवं
तो अंगाला सतत बिलगल्याचा भास
प्रीत रंगात आली की
तो म्हणायचा तुझ्या कोमल पावलांना
मी धुळ लागू देणार नाही
यावर मी म्हणायची
तुझा संसार तो माझाही
संसाराची धुळमाती
माझ्या कपाळीचं कुंकू
तो गोड हसायचा अन्
हलकेच मला मिठीत घेई
जोडवं जसं कधी ठसठसायचं
तसा तो ही अधूनमधून खुपायचा
पण सवय झाली होती
मला जोडव्याचा पारंपारिक, शास्त्रीय
अर्था पलीकडला अर्थ उमगला होता
जोडवं संसार जोडावा म्हणून असेल
असं समजून जोडले सासू,सासरे
दीर, ननंदं, भावजया आणि तोही
धनाची कवडी, कवडी जमवावी तशी
सगळ्यांशी उत्तम भावनिक गुंतवणूक करून
आलेलं संसारसुखाचं माझं स्त्रीधन
अगदी उदास विचारे वेचलं
राग,रूसवे,मान,अपमान आणि मला विसरून
पण खरच जोडव्यात भारी सहनशक्ती
अन् संसार रेटायची क्लृप्ती
हल्ली लग़्न अल्पजीवी झालीत
शुल्लक कारणावरून होतात काडीमोड
हेच का त्या गोड नात्याचं प्राक्तन
कुठं जाते ती सप्तपदीच्या वेळी
मारलेली लग्नगाठ,
सुखदुःखात एकमेकांना साथ द्यायचा
वचननामा
मला मात्र हेच नात्यांचे बंध
गळाहार होत दरवळतात
आयुष्य गंधाळून जातं
उजळून निघतं
© दत्तात्रय साळुंके
वा ! चांगली आहे.
वा ! चांगली आहे.
* पण खरच जोडव्यात भारी सहनशक्ती
अन् संसार रेटायची क्लृप्ती >>>>> छान.
या वेळेला ठिकठाक वाटली. ते
या वेळेला ठिकठाक वाटली. ते जोडवं / जोडवी खरच टोचतं/ते. इथे टो-रिंग म्हणतात.

इथे मी घेतलेल्या २. पण एक तर त्या मोठ्या होता, जाड्या होत्या व त्यांना जोड नव्हता म्हणजे मध्ये चीर होती - अॅडजस्टिबल. पण त्यामुळे चिमटा बसे. सापडल्या तर फोटो टाकते. व त्या चिरीमुळे, मोज्यात अडकत ते वेगळच.
.
>>>>>>पायी चमचमतं चांदीचं
>>>>>>पायी चमचमतं चांदीचं जोडवं
होय होय चांदीचीच असते जोडवी. आपण पायात सोनं नाही घालत.
आपण पायात सोनं नाही घालत.>>
आपण पायात सोनं नाही घालत.>> हल्ली नवश्रीमंत बायका पायात सोनं घालायला लागल्यात.(जोडवी. पैंजण)
छान कविता..!
छान कविता..!
मला चांदीची साधी, नाजूक जोडवी आवडतात.
शर्मिला हे माहीत नव्हते.
शर्मिला हे माहीत नव्हते.