"म आं जा" च्या संक्षेपांची यादी-भाग (१)?

Submitted by अनन्त्_यात्री on 6 January, 2026 - 01:36

"रच्याकने" जाता जाता कविता पाडली
"पुलेशु"च्या पावसात टंकून टाकली

" कृ ह घ्या" च्या उपदेशे माझी सटकली
" डू आयडी" ची पिल्ले तेव्हा जन्माला घातली

"हा का ना का", "हा का ना का" नेहमी वाटले
"ह ह पु वा", "ह ह पु वा" क्वचितच झाले

"म आं जा" च्या संक्षेपांची यादी आटपली?
"पु भा प्र" च्या आशेवर आठोळी संपली Happy
~~~~~~~~~~~~~~~~

शब्दार्थ:
म आंजा= मराठी आंतर-जाल

रच्याकने = रस्त्याच्या कडेने
पुलेशु= पुढील लेखनास शुभेच्छा
कृ ह घ्या= कृपया हलके घ्या
डू आयडी= माझे clones
हा का ना का= हाय काय नाय काय
ह ह पु वा= हसून हसून पुरे वाट
पु भा प्र= पुढील भागाची प्रतिक्षा

Group content visibility: 
Use group defaults

पुभाप्र.

आताच दिसलेली गंमत

प्रतिसाद १ - उत्तम आरंभ. पुलेशु.

उत्तर - धन्यवाद पुलेशु..

प्रतिसाद २ -पुलेशु म्हणजे पुनर्लेखनास शुभेच्छा

Wink

भारी Proud

गेटटूगेदर च्या GTG चे मराठी गटग झाले. >>> ओह.. मला वाटायचे एखादा लोकांचा गट जेव्हा एकत्र जमतो त्याला गटग असे म्हणतात. म्हणजे हा मूळचा मराठी शब्द वाटायचा..

जुन्या माबोवरचे अजून संक्षेप सांगू काय ? कविता वाढीस लागेल मग Happy

विबांस - विवाह बाह्य संबंध
मूशो - मुद्रित शोधन
पां शा - पांढरी शाई
आ बु दो स - आपल्या बुद्धीचा दोष समजावा

हहगलो - मला या वर फार हसू येते. << Rofl

यावरुन पण मला 'हसतील त्याचे दात दिसतील', आठवलं..
आणि सहाजिकच अजून एक अशीच ओळ मनात आली.. Rofl

पां शा - पांढरी शाई>>>> बाकी सर्व संक्षेप ठीक आहेत, पण हे अख्खा जन्म डोकेफोड केली असती तरी उमगलं नसतं Rofl

लापि
हेमाशेपो
हे हल्ली दिसत नाही - हाटि किंवा हाति
काना

मुंबईत जुहू बीचवरचा ऐतिहासिक लीला बंगला विक्रीसाठी उपलब्ध आहे. कुणी धनाढ्य मायबोलीकराने विकत घेतला तर गटग साठी हक्काची सोय होईल. फक्त 250 कोटी रुपये किंमत आहे.
कमिशन 1 टक्का फक्त.

जुन्या मायबोलीवर अक्षरांचा रंग बदलणे वगैरे माफक फॉर्मॅटींग जमायचे. त्यात कोणी नेहेमी हिरव्या रंगाने , तर कोणी नेहेमी निळ्या रंगाने लिहित. एक हिरवी अश्विनी होती जी नेहेमी हिरव्या रंगाने लिहित असे.
लिम्ब्यासारखे बहाद्दर मध्येच पांढर्‍या शाईने लिहित जे नुसते बघताना दिसते नसे. मध्येच गॅप पडल्यासारखी दिसे. वाचायला तेव्हडा भाग सिलेक्ट करायला लागे म्हणजे मागच्या निळ्या / काळ्या पार्श्वभुमीवर ती अक्षरे दिसत. बहुतेक स्पॉइलर अ‍ॅलर्ट साठीही वापरत. पण मला लिम्ब्याच आठवतो पांशा वापरणारा. बहुतेक त्याला काहितरी गुप्त खलिता वगैरे पाठवल्याचे समाधान मिळत असे.

अ या: टचकन डोळ्यात पाणी.
ह पा: टचकन डोळा म्हणजे काय, टचकन येतं ते पाणी, डोटपा हवे हे मान्य आहे. पण माबोकरांनी फार पूर्वीच टडोपा केल्याने आपण दोघंही हतबल आहोत. Light 1

>>>>डोटपा हवे हे मान्य आहे. पण माबोकरांनी फार पूर्वीच टडोपा केल्याने आपण दोघंही हतबल आहोत. Light 1
हाहाहा ते ट,डोपा असे हवे.

Pages