धनि - rmd गटग @ पुणे

Submitted by ऋतुराज. on 3 January, 2026 - 00:35

सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे

दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK

या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.

सगळ्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत.
गटगला नक्की या.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉटस् ॲप ग्रुप बनवलात तर मला ॲड करा. मी १ला पुण्यात कामानिमित्ताने असेन कदाचित. थोडा वेळ भेटण्याचा प्रयत्न करेन.

व्हॅलेंटाईन महिन्यात मी फक्त डेटवर जात असल्याने गटग जमणार नाही पण मनाने तिथेच तुमच्यासोबत मांसाहार करत गप्पा मारत असेन Happy
२ फेब्रुवारीला येणाऱ्या वृत्तांताची वाट बघतोय Happy

गटगसाठी शुभेच्छा. ऐश करा पोट्टेवा! (पोट्ट्यांनो)
एखादा चित्रपटा रसग्रहणाचा प्रोग्राम सुद्धा होऊन जाऊ द्या.

गटगसाठी शुभेच्छा!
अत्तापासुनच गप्पा-टप्पा आणि खाद्यंतीच्या फोटोंसहीत वृत्तांताच्या प्रतिक्षेत आहे...
फुल्टु धमाल करा 👍

@सियोना, पुढच्या आठवड्यात काढतो what's app ग्रुप.
लिंक इथे पाठवतो.
एखादा चित्रपटा रसग्रहणाचा प्रोग्राम सुद्धा होऊन जाऊ द्या.>>>> नक्की. तुम्हीच सुचवा एखादा चित्रपट.
@ तिता, नक्की या.
@ साधनाताई, बघा जमले तर... जमवाच

@ साधनाताई, बघा जमले तर... जमवाच
सहमत..
तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे, प्लिज प्लिज या गटग ला. १ फेब ला पहाटे मुंबईला जाणार ते दुपारी जाता येईल का तुम्हाला ? थोडा वेळ तरी या प्लिज आई

अरे मजा करा! आणि व्हॉअ‍ॅ बनवलात तरी तिकडे फक्त संपर्क वगैरे करा. मजा इथे करा. म्हणजे आम्हाला वाचता येईल. Happy

धन्यवाद ऋतुराज.

साधनाताई, माझ्या वरील मेसेजचा शेवटचा शब्दाकडे दुर्लक्ष करा. Typo आहे आणि आता एडिट नाही करता येत.

मी आलो तर चालेल का

@ साधनाताई, बघा जमले तर... जमवाच>>> +१

गटगसाठी वेगळा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप नकोच शक्यतो.

माझा मुलगा त्यादरम्यान अमेरिकेतून सुट्टीसाठी येतोय. त्यामुळे त्याच्या येण्या-जाण्यावर माझं अवलंबून आहे. अगदी शेवटच्या क्षणी कन्फर्म केलं, तर चालेल ना?

सांगली मिरज किंवा इचलकरंजी कोल्हापूर इथून कुणी येणार असेल तर सांगा कृपया.
एकटा ड्रायव्हिंग करत जाणे आणि येणे जरा वैताग येतो.

गटग चे टॅरॉट कार्ड नंबर १३ - 'डेथ' आले याचा अर्थ मृत्यु नाही. तर काहीतरी ट्रान्स्फॉर्मेशनल आहे. आमूलाग्र बदल. काहीतरी संपून, नवीन आशा. पॉवरफुल कार्ड आहे हे. पॉवर कपल येणार तर पॉवरफुल कार्डच हवे Happy
.

------------------
मुंबईहून कोण येतय?
---------
@तिता पहील्यांदा? अरे वा! मस्त.

Pages