शाहरूख खानची जीभ छाटणाऱ्यास एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. संगीत सोम यांचे नाव समोर आले होते.
पण आता देवेंद्र प्रसाद पाठक, अनिरुद्ध महाराज, मीरा आणि हिंदू महासभेच्या बऱ्याच जणांचे नाव पुढे येतेय.
प्रश्न हा नाही कि जीभ छाटली तर अभिनयाचै काय? सर्व मुक्यानेच कसे करणार?
कारण हाडाच्या कलाकारांना जुबान महत्वाची नसते. कोशिश मधे संजीव कुमार, पुष्पक मधे कमल हसन ने एकही संवाद न बोलता खुर्चीला खिळेवून ठेवले होते.
रेश्मा और शेरा मधे महानायक अमिताभ बच्चन सुद्धा मुके होते. दादा कोंडके पण मुका घ्या मुका मधे मुकेच होते.
स्वतः शाहरुख खान कोयला मधे गूंगा होता. त्यामुळे ती अडचण नाही.
प्रश्न आहे तो फॅन्स असताना जीभ छाटली जाण्याचा.
ज्या फॅन्सच्या जिवावर शाहरूख खान निश्चित आहे त्यांनी आतापर्यंत धरणे धरायला हवे होते. शाहरुख खानच्या किल्लेवजा घराला कडेकोट बंदोबस्त पुरवायला हवा होता.
पण यातले काही ना करता ते निवांत आहेत. हे धक्कादायक आहे.
किमान एखाद्या फॅनने प्रत्युत्तरादाखल बक्षीस लावणाऱ्याची जीभ किंवा मिळेल ते छाटणाऱ्यास दहा कोटी चे बक्षीस जाहीर करायला नको का?
जीभ छाटणार्याला बक्षीस? काय
जीभ छाटणार्याला बक्षीस? काय विकृतपणा आहे हा.
>>>>>>>पण आता देवेंद्र प्रसाद पाठक, अनिरुद्ध महाराज, मीरा आणि हिंदू महासभेच्या बऱ्याच जणांचे नाव पुढे येतेय.
अच्छा यांची जीभ कापणार्याला बक्षीस? मला वाटले नाव पुढे आलेले आहे म्हणजे यांनीसुद्धा शाहरुख खानच्या जीभेवर बक्षीस लावले आहे
अरे वाह
अरे वाह
नवीन वर्षाचा पहिला शाहरुखचा धागा आला
धुरंधर मुळे शाहरूखची काळजी
धुरंधर मुळे शाहरूखची काळजी वाटत होती.
शाहरुख हा भारताच्या खऱ्या
शाहरुख हा भारताच्या खऱ्या खुऱ्या सर्वधर्मसमभाव संस्कृतीचा चेहरा आहे!
तो या देशातील सर्वात लोकप्रिय आणि जगातील सर्वात श्रीमंत कलाकार होताना हे दाखवून देतो की तुम्ही धार्मिक द्वेषाची लाख बीजे पेरा पण आम्हा भारतीयांना त्याचा घंटा फरक पडत नाही.
देव त्याला उदंड आयुष्य देवो..
बोलो आमीन!