खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात स्वरचित पदार्थांने करतो. म्हणजे तुमच्यासाठी नेहमीचे असेल माझ्यासाठी दुर्मिळ घटना.
पहिल्यांदाच एकाच वेळी तीन बायकांसाठी नाश्ता बनवला. ते देखील महिला दिन नसताना Happy आणि त्यांना तो चक्क पुन्हा पुन्हा मागावा इतका आवडला Happy

IMG-20251227-WA0017.jpg

इडली फ्राय आहे ते सामो Happy अमूल बटर मध्ये शॅलो फ्राय.
अर्थात इथे इडलीचे श्रेय बायकोचे. पण इडली फ्राय ड्यूटी नेहमीच माझी असते.
आणि दुसरा प्रयोगाचा पदार्थ एग चीज ऑमलेट सँडविच वगैरे..

>>>>इडली फ्राय आहे ते सामो Happy अमूल बटर मध्ये शॅलो फ्राय.
हां तेच म्हटलं बटाट्याला हा शेप दिलाच कसा? Happy छान दिसतायत.

WhatsApp Image 2025-12-24 at 11.20.47 PM.jpegScreenshot_20251229_180412_WhatsApp.jpgScreenshot_20251229_180349_WhatsApp.jpg

नवरा आणि सासरे- एकाच दिवशी वाढदिवस. 24 डिसेंबर. सासरे 75 वर्षांचे झाले म्हणून केकवर जेम्स च्या गोळ्यांनी 75 असं सजवलं आहे. सजावट आर्टिस्ट माझी मुलगी. Milky bar white chocolate किसून टाकलंय. रगडा पॅटिस पण बड्डे स्पेशल.

केक आणि रगडा पॅटीस दोन्ही मस्त.
लॉकडाउन मध्ये सासूबाईंचा ७५ वा वाढदिवस साजरा केला होता आम्ही दिवाळीच्या दिवसात. त्यावेळी मी केक बनवून त्यावर आधीच जेम्स आणि चॉकलेट च्या तुकड्यांनी ७५ लिहिलं होतं. त्यांचा वाढदिवस खरंतर ऑगस्ट मध्ये असतो पण त्यावेळी आम्ही कोणीच तिथे जावू शकलो नव्हतो म्हणून मग दिवाळीला गेल्यावर साजरा केला होता. वरचा केक बघून तो केक आठवला एकदम.

वाह लाईनीत केक सुरू झाले..
मी सुद्धा एक पीस खाऊन येतो Happy

<<< नवरा आणि सासरे- एकाच दिवशी वाढदिवस >>> किती भारी प्लॅनिंग. आणि किती धमाल असेल दरवर्षी त्या दिवशी

जगात भारी चायनीज फूड.
आणि चायनीजमध्ये सिचुआन फूड.
सिचुआन स्टाईल मापो टोफू घरी बनवण्याचा प्रयत्न. त्या निमित्ताने सिचुआन पेपर, चिली बीन पेस्ट अशा चित्रविचित्र पदार्थांची ओळख झाली.
तिखटपणामध्ये कोणतीही दयामाया दाखवलेली नाही. 'माइल्ड' मंडळींना फोटो पाहूनच ठसका लागल्यास आम्ही जबाबदार नाही!

mapo.jpg

खूप काय भारी नाहीये. फ्रेंच सॉफ्ट सावर्डो लोफ आदल्या दिवशीच बनवून ठेवला होता. काल दुसरा एक ब्रेड बनवून झाल्यावर गरम ओव्हन मध्ये थोडे चीज ठेवून त्यावर काही ब्रेड चे स्लाइस ठेवले आणि काही तसेच ठेवून १२-१३ मिनिटे बेक केलं.
हे होत असताना एका गॅस वर कांदा, टोमॅटो, चेरी टोमॅटो आणि बेसिल वगैरे घालून मरिनारा सॉस तयार होत होता आणि एअर फ्रायर मध्ये बीट, गाजर आणि थोडे चेरी टोमॅटो एकत्रच ग्रील होत होते. झुकिनी आणि मशरूम गॅस वर फ्राय पॅन मध्ये थोड्या तेलावर भाजले, ब्रोकली आणि बीन्स थोडी वाफवू. मग फ्राय पॅन मध्ये परतली.
दही बांधून ठेवलं होते. एका पेस्तो इन्स्पायर चटणी साठी अक्रोड, बेसिल, लसूण, हिरवी मिरची इत्यादी वाटून त्यात थोडं हे बांधलेलं दही आणि लिंबू घातले. दुसऱ्या डीप साठी लसणाच्या पातीच्या ठेच्यात थोडे ऑलिव्ह ऑईल घातले. उरलेल्या दह्यात थोडे पनीर, तिखट - मीठ घालून अजून एक डीप झाले. फळं चिरली. उरलेले थोडे वाफवलेले कॉर्न होते ते घेतलं आणि सगळं असेम्बल केलं. चिकन पण फ्राय पॅन मध्ये परतून शिजवलं.
यात फळं चिरणे, भाज्या फ्राय आणि चिकन फ्राय पॅन मध्ये परतणे आणि सगळं प्लेटिंग नवऱ्याने केलं आहे. मी फक्त ब्रेड बनवणे आणि चटण्या + सीझनिंग आणि नवऱ्याला थोड्या सुचना देणे इतकेच केलं आहे.

या उचला एकेक..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा Happy

IMG-20260101-WA0020.jpg

व्वा
सगळ्या नवीन एन्ट्री जबरी आहेत.
तोंडाला पाणी सुटले....

अल्पना, तू खूप काय भारी नाहीये. ..म्हणून जे काही वर्णन केले आहे... तेच आमच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे...!!!
कोण करतं इतका भारी स्वयंपाक घरी!

Keep it up !