स्पर्धा - ३

Submitted by धनश्री- on 21 December, 2025 - 09:30

स्पर्धा - २

नंतर एक दोन आठवडे तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. ना नाही ना होय कारण तिच विचार आणि अ ति विश्लेषण करत बसली - ऑफिसातील को-वर्कर बरोबर फिरणे बरोबर होइल का व तिला याची खात्रीही अजुन नव्हती की त्याचा हेतू बर्‍यापैकी स्ट्रेटफॉर्वर्ड आहे अथवा नाही. स्ट्रेटफॉर्वर्ड कसला डोंबल्याचा? तो काय तिला खाणार होता का तिचा बुद्धीभेद करणार होता? आणि ती काय लहान कुक्कुलं बाळ होती का? काही का असेना, यामिनीला यात रेकलेसली ऊडी मारणे अप्रशस्त वाटत होते.
.
त्यात ऑफिसात त्या प्रॉजेक्टचे घोंगडे भिजत पडले ते पडलेच होते. बिझनेस केस मध्ये दोन्ही सोलुशन्स चे प्रोज व लिमिटेशन्स मांडुन झालेली होती. फोरकास्टिंग & मॉडेलिंगचे एक्सेल कॅल्क्युलेटर्स पार आऊटडेटेड झाले होते. एक्सेल मध्ये डेटा फारच वाढून बसल्यामुळे, काम करणे फार मंद आणि अवघड होत चालले होते. काहीतरी अ‍ॅक्शन घेणे गरजेचे होते. जरी एखादे प्रॉडक्ट रेंट केले असते, तरी कस्टमायझेशन लागलेच असते त्यामुळे इन-हाऊस टिम लागणारच होती. मग पूर्ण टीम आपलीच का असू नये, वगैरे वगैरे क्लिष्ट सिच्युएशन होती. स्टेकहोल्डर्सच्या निर्णयक्षमतेचा कस लागणार होता. इकडे ना प्रॉजेक्ट पुढे जात होते ना यांची मैत्री. मात्र अनाठाई स्पर्धेची धार आता बोथट झालेली होती.
.
२ महीने लोटले आणि आता खरे तर फेब्रुवारी, मार्च, सॄष्टीला वसंताचे वेध लागले. उन्हाळा सुरु होणार होता. हरप्रीतशी बोलून झाले होते. हरप्रीतने तिला 'एखाद्या कॉफीवर तर आधी भेटा' वगैरे सल्ले देउन झाले होते. आज हंप डे म्हणजे बुधवार होता. आज तिने ठरवले की सुतोवाच करायचे. तिने मस्त भारतिय पेहेराव केला. सहसा फक्त शर्ट पँट व सुटमध्ये वावरणारी ती आज सलवार कमिज घालून आली होती. सुंदर दिसत होती. आत्मविश्वासाची तर तिच्याकडे वानवा नव्हतीच. ऑफिसच्या टीम (अ‍ॅप) वरती पर्सनल बोलणे ती कधीच करत नसे. दूर एका क्युबिकलमधे तो बसे. आजही तिला तो दिसला, नेहमीप्रमाणे डॅशिंग आणि अगदी प्रोफेशनल. एव्हाना त्यांनी त्यांचे वयक्तिक फोन नंबर्स एक्सचेन्ज केलेले होते. तिने मेसेज पाठविला, "श्रीनी आर यु फ्री धिस सॅटर्डे? आय वुड लव्ह टू मीट यु ओव्हर कॉफी .... ऑर डिनर" आणि त्याचा होकार आला. " नक्की भेटू." आणि तिच्या हृदयाने परत एकदा समरसॉल्ट घेतली. युहु!!! तिने त्याला परत मेसेज केला "थॅन्क्स आय अ‍ॅम लुकिंग फॉरवर्ड."
.
त्याच शुक्रवारी स्टेकहोल्डर्स नी डिसिजन घेतला होता, अर्धवट रेंटेड सोल्युशन घेउन, परत इन-हाऊस कस्टमायझेशन करत बसण्यापेक्षा, इन-हाऊस पूर्ण टिम हायर करणार होते व हवे तसे प्रॉडक्ट स्वतःच बनवायचे ठरले होते. म्हणजे तिने सुचविलेला ऑप्शन मान्य झाला होता. शी वॉज गोइंग टु बी द प्रॉडक्ट मॅनेजर आणि तो टेक्निकल टीम हँडल करणार होता. समहाऊ प्रोफेशनल आनंदाहून त्याच्याबरोबर उद्या डिनरला जायला मिळणार याचाच आनंद तिला काकणभर जास्तच झाला होता.
.
"अरे काय हे - किती अनप्रोफेशनल. किती मिसप्लेस्ड प्रायॉरिटीज. आपल्या कर्तुत्वाचा आनंद व्हायला हवा होता तर हे काय डेटिंगचा आनंद कसला होतोय तुला...... जरा तरी काही भान." - पहीले ड्रामॅटिक मन म्हणत होते. तर दुसरे मन गातच होते. त्याचे गाणे थांबत नव्हते हळूहळू त्याच्या गाण्याच्या आवाजात तिच्या टिका करणार्‍या मनाचा आवाज क्षीण .... क्षीण होत गेला. प्रोफेशनल असली म्हणुन काय झाले तरुण स्त्री होती ती. आण अश्या रितीने स्पर्धेचे रुपांतर मैत्रीत झाले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users