हरप्रीत तर स्त्री होती आणि एका स्त्रीहून अधिक कोणाला दुसर्या स्त्रीचे मन कळणार? हरप्रीत हसली व तिने विचारले "क्या हुआ, नींद खो गई क्या? रात्र रात्र ऑफिस ची आठवण येउ लागलेली दिसतेय
" तिच्या प्रश्नातील गर्भितार्थ कळल्याने लाल झालेल्या यामिनीने तिला विचारले " यु टु ब्रुटस? तुला कळू नये माझे मन?" कळतय म्हणुनच म्हणतेय. गेला आठवडाभर मी बघतेय - मिस्टर श्रीनीं शिवाय दुसरा विषयच नाहीये आपल्या लंचटाईममधे. पूर्वी शॉपिंग, चवीला पॉलिटिक्स आणि ऑफिस गॉसिप वर बोलणारे आपण फक्त श्रीनी एके श्रीनी करतोय - लक्षात येतय का तुझ्या?" यामिनीकरता, ही एपिफनी मोमेन्ट, होती. मग यामिनीनेच विषयांतर केले.
.
मग आला डिसेंबर आणि मग वेध सुरु झाले व्हाईट एलिफंट गेम्स गिफ्ट एक्स्चेन्ज, आणि ख्रिसमस आणि न्यु ईयर अन काय अन काय. लोकांच्या रजांचा ऋतु. आतापर्यंत यामिनी, श्रीनीच्या प्रेझेन्सला सरावली होती. अधुन मधुन संभाषणाच्या - पश्चिम वार्यासारख्या, सुगंधी शीतल झुळूकाही त्या दोघात वहात होत्या. तिला त्याचा वीकेन्डचा कार्यक्रम कळत होता, त्याला तिचे वैयक्तिक अपडेटस थोडेफार मिळत. थोडक्यात, यामिनीची धुसफुस कमी होउन आता टिकाळू मनाची सुलतानी नियंत्रणात आलेली होती.
.
व्हाईट एलेफंट गिफ्टस $२५ पर्यंत आणायच्या होत्या. सरप्राईझ गिफ्टस असल्याने, छान गुळगुळीत रॅपिंग पेपरमधे ठेवायच्या होत्या. सर्वांचा उत्साह ओसंडून वहात होता. अग्ली स्वेटर डेही होता. सगळेजण लाल-हिरवे-शुभ्र ख्रिसमसी रंगाचे स्वेटर्स घालून आलेले होते. यामिनीने मोठ्ठा लाल बो विणलेला, काळा स्वेटर घातला होता आणि शुभ्र सॅटिनचा स्कर्ट. एलेगंट पर्ल नेकलेसमध्ये, शी वॉज लुकिंग स्टनिंग. आणि त्यात वरताण तिचा तो ब्लंट हेअरकट. मान वळवली की गिरक्या घेत थरथरत सेटल होणारे ते सुंदर केस. कसलातरी जीवघेणा पर्फ्युम शिंपडून आलेली ती. तिला बघताच श्रीनीचे डोळे तिच्यावर खिळून राहीले मात्र भानावर येत तो तिला "हॅपी हॉलिडेज" बोलता झाला. आणि हे यामिनीने टिपले. तिला निव्वळ गोड वाटत राहीले. धक-धक-धक-धक!!! माय हार्ट इज बिटिंग, कीप्स ऑन रिपीटींग ...... दुसरे मन अराऊंड डिसेंबर भलतेच आगाव होत असे. कारण एकच तिचा वाढदिवस ख्रिसमसच्या आसपास असे. आणि वाढदिवसाच्या महीन्यात, मनात आपण सगळेजण लहानच असतो.
ते काही का असेना, तिचा मूड प्र-ह-चं-ड चीअरफुल होता. पार्टी झाली .... श्रीनीशी गप्पा झाल्या ..... इट वॉज अ हिडी (heady) ईव्हिनिंग लाल कॅश्मिर वुल स्वेटरमध्ये तो फार देखणा दिसत होता. फा-र-र-र-र!!!!! 
.
दोघे एकत्रच बाहेर पडले. आणि त्याने तिला विचारले "यामिनी, तुला कधीतरी माझ्याबरोबर डेटवर जायला आवडेल का?" शी वॉज अॅब्सोलूटली फ्लोअरड अॅट धिस प्रपोझल. तिला काय बोलावे ते कळेना. एवढेच ती बोलली "मला वेळ दे. मी माझे कॅलेन्डर बघून कळवते."
- क्रमशः
स्पर्धा - ३
खूप लहान होताहेत भाग.
खूप लहान होताहेत भाग.
येऊ देत पुढचे.
छान वेगळ्या वातावरणाचा अनुभव
छान वेगळ्या वातावरणाचा अनुभव मिळतोय.
नव्या दमाची लेखिका !
मोठ्ठा लाल बो विणलेला, काळा
मोठ्ठा लाल बो विणलेला, काळा स्वेटर घातला होता आणि शुभ्र सॅटिनचा स्कर्ट. एलेगंट पर्ल नेकलेसमध्ये, शी वॉज लुकिंग स्टनिंग. आणि त्यात वरताण तिचा तो ब्लंट हेअरकट>>>> मस्त वर्णन .स्टनिंग यामिनी डोळ्यासमोर आली .
क्रमशः पण मस्त पॉईंट वर केलीय शेवटी आजची यामिनी प्रोफेशनल आहे.
भारी लिहितेस तेही इतक्या लगेच.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद शर्मिला, राभु, सि.
धन्यवाद शर्मिला, राभु, सि.
तिच्या वागण्यात, विचार करण्यातही ते बेअरिंग असणारे.
>>>>आजची यामिनी प्रोफेशनल आहे.
होयच मुळी.