मिटिंग संपली काय, यामिनी धुसफुसतच बाहेर पडली. किती अवघड होतं प्रोफेशनल मुखवटा धारण करणे आणि या ...... या मनुष्याला शांत पण स्पष्ट रितीने आपला मुद्दा पटवुन देणे. आणि हु केअर्स मुद्दा त्याला पटतो अथवा नाही. स्टेकहोल्डर्सना पटला की झाले असते की. पण नाही आपल्याला श्रीनिच्या डोक्यातच आपला मुद्दा घुसावा, त्याने हार मानावी, त्याने आपले ऐकावे ...... अरे असे काय सोने लागलेले आहे त्याच्या मताला. हु इज ही? आपल्यासारखाच प्रॉडक्ट मॅनेजर. ते ही काल परवा कंपनीत आलेला. - पहील्या मनाने टकळी लावली.
.
पण असं आहे ना आपलं दुसरं स्पेशली दुसरंच मन महा महाव्रात्य असते ते एन्ट्री उशीरा घेते पण बेफाम सुटते (अगदी तूने मारी एंट्रियां ... दिलमे बजी घंटियां टाईप्स) . आणि या मनाने त्याची टकळी सुरु केली की मग थांबणे मुष्किल होते. तसेच झाले. दुसर्या कायमस्वरुपी फितूर मनाला आता कंठ फुटला. - पण दिसायला काय सुंदर आहे ना तो. उंच व देखणा. शिवाय एफर्टलेस सेन्स ऑफ ह्युमर. अर्रे यार!!! क्वचित कॉफी घेताना, नजरानजर होते तेव्हा हृदयात कळ उमटते की नाही! आणि जेव्हा तो स्मित करतो, हसून बघतो .... पण असा मिष्किल का बघत असेल तो? त्यालाही आपण आवडत असू का?
.
अरे काय मूर्खासारखा बोलतोयस - टिकाळू मन
.
ते काहीही असो आज मिटिंगमधे दोघांत चकमक झाली होतीच. प्रॉडक्ट इन-हाऊस असावे की आर एफ पी (रिक्वेस्ट फॉर प्रॉक्यरमेन्ट) च्या राऊटने जाउन, रेंटवर घ्यावे यावर वाद झाला. यामिनीचे मत होते जर प्रॉडक्ट, इन-हाऊस बिल्ट केले तर रहेगा बांस ना बजेगी बासुरी म्हणजे, प्रॉडक्ट मेन्टेनन्सचा, स्केलेबिलीटी, एक्स्पान्शनचा खर्च नगण्य राहील. आपलेच रिसोर्स, आपलेच प्रॉडक्ट एक्स्पान्ड करु शकतील.
यावरती श्रीनीचे म्हणणे की आत्ता कंपनीकडे रिसोर्सेस ( मनुष्यबळ, टुल्स आणि डेव्हलेपमेन्ट केपेबिलिटी) नसणे हाच तर खोलीमधला हत्ती आहे. जे की खरेच होते. कंपनी सुरु होउन हार्डली ५ वर्षे झाली होती आणि जरी वेगाने, कंपनी वाढत होती, यश मिळत होते तरी, अजुन ती बाल्यावस्थेतच होती. डेव्हलेपमेन्ट टीम हायर करुन हवे ते प्रॉडक्ट बनविणे - वुड हॅव्ह बीन अ लीप ऑफ फेथ. रिस्की, कदाचित रेकलेस. त्याचा मुद्दा अगदी सुयोग्य होता. यामिनीच्या चहाटळ मनाला, संस्कृतोद्भव साऊंडिंग शब्द वापरायला फार आवडत म्हणजे योग्य च्या जागी सुयोग्य 
.
टीकाळू मनाने या आत्मसंवादात, मुसंडी मारली - अरे प्रतिस्पर्धी आहे तो. कुछ तो शरम करो. थोडी तरी सेल्फ-एस्टिम, सेल्फ-रिस्पेक्ट ठेवा - आय बेग यु. त्याच्यावर लट्टू होतेस? कुफेहेपा? तो मस्तपैकी तुला रेड कार्पेट करुन, वरच्या पदावर चालत जाईल. मग बसा घडी घालत या रेड कार्पेटची. हे जे टीकाकारी (क्रीटीझाइझ करणारे) मन होते, याला ड्रामाबाजी फार आवडे. जरा खुट्ट झालं की आभाळ कोसळल्यासारखे वागे ते. त्यामुळे यामिनीला ते मुळ्ळीच आवडत नसे. - उदाहरणार्थ जरा चॉकलेट, लाडू खायला गेले की हे पहीले टीकाळू मन - ते कुल्ल्यावर चढतायत हां बघतोय मी वगैरे टकळी सुरु करे याउलट दुसरे कनवाळू मन म्हणे - तरुण आहेस. आत्ता नाही खाणार तर काय म्हातारपणी मधुमेह झाल्यावर?
.
तर असा आहे यामिनीचा इमोशनल सेट अप. मात्र होती ती टफ कुकी. महत्वाकांक्षी, करीअरला महत्व देणारी, व्यायाम करुन स्वतःला मेन्टेन केलेली व प्लेझंट. सहजासहजी ती प्रेमात पडलीच नसती पण हा श्रीनी ...... अर्रे यार हा तोंडाने कमी आणि त्याच्या महामिष्किल डोळ्यांनी जास्त बोलतो. काय करायचं अश्या माणसाचं? असो मे बी पुढच्या मिटींगमध्ये काटा काढावा. या विचाराने स्वतःला दिलासा देत ती लिफ्टमधे शिरली. खालती तिच्या मैत्रीणीबरोबर, हरप्रीतबरोबर डबा खाण्यासाठी.
-क्रमशः
@सिमरन - तुझ्या
@सिमरन - तुझ्या म्हणाण्याप्रमाणे ऑफिसातील कलिग्ज वरती कथा लिहायचा प्रयत्न करतेय.
मस्तच आहे . उत्कंठा वाढली
मस्तच आहे . उत्कंठा वाढली पुढच्या भागाची.
थँक्स राभु
थँक्स राभु
मस्त झालीय. पुभाप्र....
मस्त झालीय.
पुभाप्र....
थँक्स शर्मिला.
मस्त.
मस्त.
मस्त आवडली.
मस्त
आवडली.
सिमरन ,कुमार धन्यवाद.
सिमरन ,कुमार धन्यवाद.