भारतातील इन्शुरन्स विषयी माहिती- स्व:त अनुभवलेले.

Submitted by देवीका on 19 December, 2025 - 19:40

कृपया मला मदत हवी आहे.

भारतातील कुठली हेल्थ इन्शुरन्स कंपनी चांगली आहे. खास करून परदेशीस्थित लोकांना(असे काही आहे का माहिती नाही).
मला हेल्थ इन्शुरन्स हवा आहे भारतासाठी.
काय व कसे कवरेज असते? कुठले डॉक्टर्स व हॉस्पिटल्स प्रोवायडर्स म्हणून असु शकतात..
काय ऑप्शन्स घेणे उत्तम?

तुमचे बरे वाईट अनुभव लिहिण्यासाठी हा धागा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी परदेशात हायकिंगला गेलो तर World Nomads travel insurance घेतो. जेव्हा फिरायला जातो तेव्हा GeoBlue चा ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतो जो बहुतेक सर्व देशात चालतो.
अजूनपर्यंत क्लेम करायची वेळ आली नाही त्यामुळे त्याबद्दल कल्पना नाही.

आधार कार्ड नसेल तर भारतात इन्शुरन्स सहजासहजी मिळत नाही, असे मित्राकडून कळले (जो स्वतः इन्शुरन्स एजंट आहे). पण तो Tata AIG कडे चौकशी करणार आहे. (त्याच्या चौकशीला HDFC ने काहीच उत्तर दिले नाही).

आम्ही गेल्या भारतवारीत घेतले होते ट्रॅवल इंशुरन्स कवरेज. आम्ही खाली दिलेले दुवे माहितीसाठी वापरले होते.
Travel Medical Insurance info from nerd wallet
https://www.squaremouth.com/
https://www.insuremytrip.com/
https://www.travelguard.com/

लेकाच्या सल्ल्याने अँथम ब्लू क्रॉस चा घेतला होता. पण ते कवरेज वापरायला लागले नाही त्यामुळे किती चांगले होते कळायला मार्ग नाही.

थँक्स सर्वांना.
स्वाती२, मी बघते वरील लिंक. थँक्स.

सॉरी, मी आधी नीट लिहिले नाही. मला दिर्घ उपचाराकरता हवा आहे. अमेरीकेतील अनुभव हा त्रासदायक, खर्चिक आणि निराशाजनक झाला आहे. तो मुद्दा वेगळाच आहे पण चर्चा ह्याचसाठी हवी आहे की, कोणी कुठला इन्शुरान्स घेतला वरील परीस्थितीत?

मी भारतात काही काळ राहुन उपचार करायचा विचार करतेय. त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स हवा आहे. फक्त फिरायला येत नाहीये( टूरीस्ट नाही).
कुठले प्रोवाईडर्स किंवा चांगले हॉस्पिटल कवर होतात असा हेल्थ इन्शुरन्स हवा आहे.

>>अमेरीकेतील अनुभव हा त्रासदायक, खर्चिक आणि निराशाजनक झाला आहे.<<
अगदिच अवांतर नसेल आणि प्रायवसीची बाउंडरी क्रॉस होत नसेल तर यावर सविस्तर वाचायला आवडेल. इतरांनाहि त्याचा कदाचित फायदा होउ शकतो. बाय्दवे, जगात कुठलिहि हेल्थकेअर सिस्टम फूल्प्रूफ नाहि. युके मधे कॉरिडोर केअर तर कॅनडामधे डिलेड केअर, अगदि पेशंट दगावण्या इतपत. असो, तुमच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...

मी भारतात काही काळ राहुन उपचार करायचा विचार करतेय. त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स हवा आहे. फक्त फिरायला येत नाहीये( टूरीस्ट नाही).
>>>

जर वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येत असाल तर विमा कसा काय मिळेल? विमा देणारी कंपनी तो क्लेम किती होणार या शक्यतेचा अंदाज घेऊन विमा देते. जर तुम्ही उपचारांसाठीच येणार असाल तर कसे काय तुम्हाला इन्शुरन्स मिळेल?

खाजगी कारणाने आजाराविषयी खोलात नाही सांगु शकत. स्पेशालिस्ट डॉक्टरांची फक्त अपॉईंटमेंट मिळायला ३ माहिने लागले.
प्रायमरी केअर डॉक्टर नुसती, मी काही सांगु शकत नाही फक्त रेफेरल देते व पेनकिलर्स दिले. एमराय काढायला स्पेशालिस्टची नोट हवी होती. मग प्रायवेट मध्ये सुद्धा गेले पण तो हि डॉक्टर काही बरोबर नाही निघाला. मुळात कोणालाच खोल निदान करण्यात रस न्हवता.
आता मनाची अवस्था अशी आहे कि, काही चमत्कार होतील अशी भोळी आशा आहे.
आता आणाखी ह्या मुद्द्यावर काही लिहु इच्छित नाही. सॉरी.

>>कुठलिहि हेल्थकेअर सिस्टम फूल्प्रूफ नाहि<<.
मान्य आहे, पण तुम्ही जर स्पेशालिस्टकडे गेलात तर लक्षणांवरून व त्या स्पेशालिस्टच्या अनुभवावरून काहीतरी मार्गदर्शन करून आजारी माणसाला थोडासा मानसिक दिलासा देवु शकता. पण तो हि प्रयत्न कोणीच नाही करत.

- भारतीयांना विमा का नाही मिळणार? प्री कंडिशन क्लॉजबद्दल माहिती आहे मला.
---
मला इन्शुरन्स विषयी माहिती हवी आहे की, भारतातच रहाणारे कोणता खाजगी कंपनीचा विमा घेतात?

देवीका, एक सुचवू का? तुम्ही अमेरीकेत कुठे रहाता ते माहीती नाही पण स्थानिकांच्या मदतीने -रेफरन्सने चांगला प्रायमरी केअर गिवर शोधा. तुमचा पीपीओ प्लॅन असेल, आणि चांगला प्रायमरी केअर डॉक नेटवर्कच्या बाहेर असला तर आधी फोन करुन काय कॉस्ट वगैरे विचारुन घ्या, निगोशिएट करता येते का बघा. अमेरीकेत बरेचदा विचारले तर मिळते असा प्रकार असतो. प्रायमरी केअर गिवर किती चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहे, तुमच्यासाठी किती उभा रहायला तयार आहे त्यानुसार बाकी स्पेशालिस्ट वगैरेची अपॉइंटमेंट वगैरे गोष्टी होतात. आमच्या बाबतीत फॅमिली डॉक शक्यतो त्याच्या स्वतःच्या कुटुंबीयांसाठी जे स्पेशालिस्ट वापरलेत तिथेच पाठवतो. तारीख मिळायला वेळ लागतो तर तो 'माझा पेशंट' म्हणून संपर्क करुन वेटिंग पिरीयड महिना-दीड महिन्यावर आणतो. त्याने स्पेशालिस्ट बद्दल खात्री दिली असल्याने आम्ही तेवढा काळ प्रार्थना करत काढतो. आमचा फॅमिली डॉक हा खरे तर ५० मैलावर आहे पण हे बाकीचे प्लस पॉइंट लक्षात घेवून गावं बदलली तरी डॉक बदलला नाही.

भारतात इंशुरन्स साठी
https://www.policybazaar.com/health-insurance/nri/

वेटिंग पिरीयड असला तरी तुमच्या बाबतीत जर आजाराचे योग्य निदानच झाले नसेल तर प्री एक्झिटिंग कंडीशन हा मुद्दा येवू नये.
तुम्हाला योग्य उपचार मिळण्यासाठी शुभेच्छा!

तुम्हाला योग्य उपचार मिळण्यासाठी शुभेच्छा! >>> अगदी अगदी. माझ्याकडूनही शुभेच्छा. टेक केअर.

>>आता आणाखी ह्या मुद्द्यावर काही लिहु इच्छित नाही. <<
फेअर पॉइंट.

तुम्हि लिहिलंय तसं पिसिपि करतात, आणि त्यांचं नेटवर्क मर्यादित असणं शक्य आहे. अशा सिचुएशन मधे तुम्हि सरळ हेल्थ्केअर इंशोरंसच्या कस्टमर सर्विसला फोन करुन स्पेशलिस्ट निवडा. इंशोरंस पिपिओ असेल तर पिसिपिचं रेफरल लागत नाहि. ३ महिन्या नंतर अपॉइंटमेंट इज टू मच.

गेल्या महिन्यात माहिती असावी म्हणुन मी चौकशी केली होती. एनारआय्जना भारतात इंशोरंस मिळवणं कठिण अजिबात नाहि. किती लाखांचं कवरेज हवं त्यानुसार वार्षिक प्रिमियम बसतो. ५०-५५च्या पुढिल व्यक्तीला रु. १ कोटिपर्यंतच्या कवरेज करता साधारण रु. ८० हजार ते १ लाख वर्षाला प्रिमियम + अ‍ॅडऑन कॉस्ट जी लागणार्‍या उपचारांवर अबलंबुन असते. वेटिंग पिरियड नाहि. अर्थात हि ऐकिव बाब आहे, बॉलपार्क नंबर म्हणुन एका एजंट कडुन मिळवलेली. प्रत्यक्षात नंबर वर-खाली होउ शकतो..

माझ्यामते चांगल्या एजंटशी विचार-विनिमय करुन पुढचा निर्णय घ्या...

माझी प्रायमरी केअर गिव्हर बंडल आहे म्हणुन मी दुसरी शोधली. तिची अपॉइन्ट्मेन्ट तीन-साडे तीन महीन्यांनी मिळालेली आहे. इथे हे असेच आहे.
--------
तुम्हाला लवकरात लवकर बरे होण्याकरता सदिच्छा.

तुम्हाला लवकरात लवकर बरे होण्याकरता सदिच्छा. >>+१

negative points
भारतात इंशुरन्स प्रिमियम वयानुसार वाढत जाते. १००% पैसे मिळण्यासाठी ६०+ वयात coverage च्या १५% प्रिमियम तर ८०+ ला ३३% पर्यन्त जाते. deductable and max limit per treatment घेतले तर प्रिमियम कमी असते पण coverage पण कमी असते. त्यात १८% GST असल्याने प्रिमियम आजुन वाढते. प्रत्येक insurance मध्ये अटी लागु असतात त्या नीट वाचाव्या लागतात.

positive points.
भारतात इंशुरन्स चे पैसे document दिल्यापासुन एका तासात मिळतत. cashless hopital मध्ये जे पैसे मिळाले ते वजा करुन बाकीचे पैसे भरावे लागतात . कंपनीचा किती जणाना १ तासात पैसे देले तो डाटा publicly available असतो.

आमचा आधी इंशुरन्स होता पण जसे वय वाढत गेले तसे प्रिमियम वाढत जात होते म्हणुन इंशुरन्स बंद करुन तेवढेच पैसे बाजुला काढुन FD करत आहे.

तुम्हाला लवकरात लवकर बरे होण्याकरता सदिच्छा. >>+१

जीएसटी मधील सुधारणां नंतर (आठवा जीएसटी बचत उत्सव) वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर जीएसटी नाही. = ०%. आधी १८% होता.