Submitted by रानभुली on 16 December, 2025 - 03:52
वेशीवरच्या रस्त्याभोवती दाट तरूंची राई
पिंपळदेवाभवती भरते गूढ विधींची घाई
माथी मळवट भरून रडते कुणी बंधक बाई
मंत्र तंत्राच्या जयघोषाने देवराई स्तब्धत जाई
गुंतलेल्या सर्पिल्या लहरीं चमचम धावत येती
शेवटची ती निघते नौका, पाय थिजूनी जाई
गजबजलेल्या एक शहरी नवयौवना कोणी
नकार देई बंधनसूत्रा भरून ये नवलाई
या क्षितिजाखाली आहे मुक्त पंखांची जोडी
घे उचलुनी जरा या भिंती, घे नभी भरारी
विहरत नित नवीन उंची, ओळख ती मिळावी
वेशीवरती धास्तावली दाट तरूंची राई
शहरातुनी येतो गावी जुनाट उखडी रस्ता
पिंपळदेवाभवती प्रकटते जीर्ण संस्कृतखाई
ग्राम्यबेड्यानी जखडून गेली बंडखोर ही बाई
शहर असो वा गाव असो , जागते गं देवराई
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली.
आवडली.
धनश्री धन्यवाद.
धनश्री धन्यवाद.
खूप दिवस कविता लिहीलेली नाही. जमलीय कि नाही कल्पना नाही.
रंगरंगोटी,कलाकुसर करायचा पेशन्स नव्हता , अशीच पोस्ट केली.
*जागते गं देवराई छान! आवडली.
*जागते गं देवराई
छान! आवडली.
धन्यवाद् , कुमार सर !
धन्यवाद् , कुमार सर !
छानच !
छानच !