वर-वर वाटलं तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..
हसतो आपण हसता हसता, रडतो आपण रडता रडता ,
जीवात जीव ओतत ओतत, उतू जातो डोह पुरता ;
शिडास वादळ भिडतं जेव्हा, आपल्या पायी जळतं तेव्हा,
सारं दिसून मनात त्यांच्या सलंत-बिलंत काही नसतं,
वर-वर वाटलं, तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..
एक गोत्र एक छत्रं , सारं अगदी साजुक दिसतं,
फांद्या फार असल्या, तरी मुळ मात्रं नाजूक असतं,
घरटं सोडून , आभाळाची पहिली भेट घेऊ म्हटलं,
तेच नातं जीव तोडून ,आपलेच पर छाटत असतं,
वर-वर वाटलं तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..
स्पर्धेमध्ये कमवण्याच्या आई-बाप गढून जातं,
त्याचं रडणं, त्याचं हसणं एकलं एकलं घडून जातं,
शिष्टाचारापाई नातं असल्यासारखं दिसतं जेव्हा,
कुत्सितपणं तेच नातं परिस्थितीवर हसत असतं,
वर-वर वाटलं तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं...
वेळ त्यांची नसते, तोवर आपुलकीचा आव असतो,
पारडं जड होतं, तसा जुलमालाही वाव असतो,
मग नातं ठरतं डिल, फायनल होऊन जातं विल,
सगळं सगळं संपतं, तेव्हा मन पुन्हा म्हणत बसतं,
वर-वर वाटलं, तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..
- मंदार खांबेटे ©
#कवी_मी
❣️❣️❣️
सत्य आहे.
सत्य आहे.
छान !
छान !
छान !
छान !
छान कविता..!
छान कविता..!