जोडी
हल्लीच्या मल्टीमीडिया जमान्यात रामायण या सिरीज लोकं 9 ते 10 टीव्ही भोवती गर्दी करत आणि त्या प्रक्षेपणाच्या वेळी रस्ते सुद्धा ओस पडत असत. टीव्हीचा उदय होण्या अगोदरही रेडिओ हा करमणुकीचा एकुलता एक सोअर्स होता. सरकारी मालकीच्या आकाशवाणी केंद्रावर सिने संगीताला पूर्ण मज्याव होता. हिंदी चित्रपट त्यावेळी संगीतावर जास्त चालायचे. अशा परिस्थितीत एका सुपीक डोक्यातून सिलोन रेडिओ ही कल्पना बाहेर पडली. हा विचार बहुतेक दुबे नावाच्या माणसाचा असावा. त्याहून शॉर्ट वेबवर भारतभर पोहचेल असे प्रक्षेपण सुरु केले गेले. त्यावेळी आकाशवाणीची बहुतेक केंद्रे मिडीयम वेव असून त्याचे प्रक्षेपण मर्यादित अंतरापर्यंतच होते असे. रेडिओ सिलोन हे फक्त हिंदी गाणी किंवा तत्सम कार्यक्रम प्रक्षेपित करू लागले. अर्थातच सिने जगताला अशी प्रसिद्धी हवीच होती. बरेसे स्पॉन्सरड कार्यक्रम मुंबईत रेकॉर्ड होत आणि त्या टेप्स विमानाने कोलोंबोला जात. त्यावेळेला कोलोंबो स्टुडिओ म्हणजे अंऊन्सरची खोली आणि टेप जॉकीची खोली एवढंच मर्यादित होती. मधल्या काचेतून एकमेकांकडे बघून त्याप्रमाणे टेप जॉकी त्याच्या समोरच्या चार - पाच टेप रेकॉर्डरवर गाणी , कार्यक्रम किंवा जाहिराती लावायचा. अगदी सुरवातीला चित्रपटात काम करणाऱ्याला स्वतःच गाणे म्हणावे लागायचे. त्यानंतर बॅकग्राऊंड म्युजिक सिस्टिम सुरु झाल्यावर गाण्यांना, गायकांना , संगीतकारांना अक्षरशः पेव फुटले. लता मंगेशकर, अशा भोसले , सुरय्या , शमशाद बेगम , महंमद रफी , मुकेश , मान्ना डे अशा असंख्य गायकांचा उदय झाला. सुरय्याचा आवाजही चांगला होता आणि ती दिसायलाही सुंदर होती. एका शूटिंग मध्ये त्या चित्रपटाला नायक मिळाला नव्हता त्यावेळी सर्व कलाकारांना आणि टेक्निशियनला मासिक पगार मिळत असल्याने एखादा नट नाही तरी इतरांचं शूटिंग चालू ठेवत असत. तीन चार दिवसाच्या शूटिंग मध्ये सुरय्याला एका खुर्चीत बसलेला तरुण आपल्याकडेच सतत पाहत आहे अशी जाणीव झाली. तिने डिरेक्टरला बोलावले आणि सांगितले तो ग्रेगरीपेक सारखा दिसणारा तरुण पहा तो सतत माझ्याकडे पाहत आहे. डायरेक्टर म्हणाला त्याला हाकलून देऊ का? सुरय्या म्हणाली नको , त्याला विचार तो सिनेमात काम करेल का ? म्हणजे आपल्यालाही नायक मिळेल . नाहीतरी पिक्चर माझ्या दिसण्यावर आणि गाणी गाण्यावरच चालणार आहे. डिरेक्टरने त्या तरुणाला सुरय्या समोर उभे केलं . सुरय्याने त्याला विचारलं माझ्याबरोबर काम करशील का ? तो देवानंद होता. देव साहेब आणि सुरय्या यांचे नंतर फारच सूत जमले. देव साहेब रात्री बेरात्री पेडरर रोड आणि मरीन ड्राईव्हवर चकरा मारू लागले. पण नंतर काय झाले हे निश्चित कळत नाही. प्रकरण फसले हे निश्चितच . देवानंद याने नंतर कल्पना कार्तिक हिच्याशी विवाह केला आणि जन्मभर त्याला लोकं अतिशय सज्जन म्हणून ओळखत. सुरवातीच्या काळात देवानंद -राजकपूर - दिलीपकुमार हे गाजलेले त्रिकुट होते. राज कपूरला त्याच्या एक सिनियरने सल्ला दिला होता की तू सिने तारकेसोबत अजिबात लग्न करू नकोस. ही आज्ञा शिरोधारा मानून त्याने कृष्णा कपूर सोबत विवाह केला नंतर राज कपूर-वैजंतीमाला , राज कपूर-झीनत अमान अशी असंख्य नावे जोडली गेली. दिलीपकुमार-मधुबाला यांचे प्रेम मात्र कित्येक वर्ष चालू होते. मधुबालाच्या घरून विरोध असूनही कित्येक वर्ष त्यांचे प्रेम टिकले. त्याच दरम्यान बी आर चोप्राच्या नया दौर या चित्रपटही दोघे होते. चित्रपटाचे काही चित्रीकरण मध्य प्रदेशात होतं. मधुबालेला मुंबई सोडून तिचे वडील कुठेही पाठवत नसत. चोप्राने करार करताना, करारात लोकेशन शूटिंगची अट घातलेली होती ती न पाळल्यामुळे बी आर चोप्राने मधुबालाला काढून वैजंतीमालाला घेतले. त्यामुळे बरेच शूटिंग वाया गेले होते. चोप्राने भरलेल्या खटल्यात दिलीप कुमारने चोप्राच्या बाजूने साक्ष दिली त्यामुळे मधुबालाचे वडील फार चिडले. मधुबालाने दिलीपकुमारला वडिलांची माफी माग असे सांगितले. त्याने त्याला ठामपणे नकार दिला. यात मुगले आझमचे शूटिंग पण रखडले गेले. दिलीप कुमारला या मूड मधून बाहेर काढण्यासाठी के असिफने त्याला सांगितले. आजच्या शूटमध्ये मधुबाला तुझ्याकडे येईल त्यावेळेस तू अतिशय संतप्त झालेला असतोस आणि तू अनारकलीच्या थोबाडात मारतोस असा शॉट आहे, या शॉट मध्ये तू खरोखरच तिला जोरात थोबाडीत मार आणि या शॉट चे मी तीन चार तरी रिटेक करेन. दिलीप कुमारने मारलेली थोबाडीत एवढी जोरात होती कि सेटवरचे सर्व हादरले . के असिफने दोन -तीन वेळा शॉट रिटेक केला आणि मधुबालाचे गाल सुजल्यासारखे झाले तरीही तिने तो शॉट पूर्ण केला. तसे असूनही दिलीप कुमार मधुबालेला कधीच विसरला नाही. मधुबालेने लवकरच किशोर कुमार सोबत लग्न केले आणि तिचा एका आजारात अंत झाला. त्यानंतर कित्येक वर्षांनी मुगले आझमची, डिजिटायझेशन करून पूर्ण कलर प्रिंट तयार झाली व ती रिलीझ झाली. त्यावेळी नवशादच्या ऑफिस मध्ये दिलीप कुमार बसला होता. बाहेर पडताच मुगले आझमच्या मोठ्या पोस्टरकडे त्याचे लक्ष गेले. त्याच्यावर त्याचे , मधुबाला आणि पृथ्वीराज कपूर यांची छायाचित्र होते. तो स्वतःशीच हरवल्यासारखा त्या पोस्टरपाशी उभा राहत म्हणाला She was the most beautiful girl on the earth. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले आपण कुठे आहोत आणि तो पुढे म्हणाला There is second in my house आणि तो तडक चालत निघून गेला.
नट नट्यांची अनेक लग्न झाली. कपूर कुटुंबातच शशी कपूर - जेनिफर , शम्मी कपूर - गीता बाली. पुढल्या पिढीतील ऋषी कपूर आणि नितु सिंग यांचे प्रेम प्रकरण बरेच गाजले होते.
मराठी चित्रपट सृष्टीत एकुलते एक गाजलेले प्रकार म्हणजे रमेश देव आणि सीमा . गेल्या दोन दशकात तर रिलेशन्स फार बदलत गेली आहेत. Relations have become like job offer, if you get better, change it.
त्यानंतरचा काळ हा संगीताचा सुवर्णकाळच होता.
जोडी
Submitted by अविनाश जोशी on 13 December, 2025 - 06:43
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पॅरा का पाडत नाही ?
पॅरा का पाडत नाही ?
पॅरा का पाडत नाही ?
पॅरा का पाडत नाही ?