‘वंदे मातरम्’
श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की श्री. नेहरू हे हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये फूट पडण्यास जबाबदार होते. मूलतः आपण त्यांना सनातन आणि मुस्लिम समुदाय असे म्हणूया. काँग्रेसचे नेते मात्र या विधानाचा जोरदार विरोध करत आहेत. असे दिसते की काँग्रेसच्या वरच्या पातळीवरील नेत्यांनी भारताचा इतिहास नीट शिकलेलाच नाही.
मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी भारतात सनातन, बौद्ध आणि जैन असे समुदाय अस्तित्वात होते. त्या काळी भारतातील राजकीय संरचना अनेक राज्यांत विभागलेली होती. सीमेवरील काही राज्यांवर हल्ले होत असले तरी मोठ्या प्रमाणातील मुस्लिम सत्ता स्थापन करणारा पहिला शासक शेरशहा होता. तो मोगल नव्हता, तो अफगाण होता. अफगाण भारतात जिहादासाठी आले नव्हते; त्यांना मुख्यतः भारतातील संपत्ती लुटण्यात रस होता.
बाबर भारतात आल्यानंतरच दोन समुदायांतील संघर्ष वाढू लागला. मोगल काळात मुस्लीम लोकसंख्या वाढली, पण बहुतांशी युद्धे जमीन आणि सत्तेच्या नियंत्रणासाठीच होत होती. दक्षिणेतील बहमनी साम्राज्य आणि मोगलही एकमेकांच्या विरोधात होते—आणि दोन्हीही मुस्लिम राजवटी होत्या. या सगळ्यांकडे इतर समुदायांतील वीरसैनिकही होते.
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध सर्व समुदायांतील सैनिकांनी मिळून ब्रिटिशांविरुद्ध लढले. बहादुर शाह झफर हे त्या लढ्याचे प्रतीक होते. त्यानंतर काही वर्षांत बंकिमचंद्रांनी ‘वंदे मातरम्’ लिहिले आणि ते स्वातंत्र्यसैनिकांची ओळख पटवण्याचे सूत्र बनले. ‘वंदे मातरम्’ला सहा कडवी आहेत. हे गीत गायल्यामुळे अनेक लोक, अगदी शाळकरी मुलांनाही ब्रिटिशांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागले.
या काळातच जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम्’चे तुकडे करून मुस्लिम समुदायाला खूष करण्याचा प्रयत्न केला. हाच तो ठिणगीचा क्षण, जो पुढे ज्वालामुखी झाला आणि दोन्ही समुदायातील लाखो लोकांचा बळी गेला. बंगालचे विभाजन १९४७ मध्ये झाले नाही; ब्रिटिशांनी ते १९०५ मध्ये केले होते. पहिल्या महायुद्धानंतर खलिफत आंदोलन सुरू झाले. केरळमध्ये अनेक हिंदू कुटुंबांवर जिहाद म्हणून हल्ले झाले. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला, ज्यामुळे तणाव आणखी वाढत गेला.
१९४७ मधील फाळणी ही नेहरू आणि बॅरिस्टर जिना यांच्या राजकीय उद्दिष्टांना पूरक ठरली. संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्यासाठी सैन्याला रोखण्याचे कारण आजतागायत समजलेले नाही. यामुळे पाकिस्तानसारख्या दुष्ट राष्ट्राचा जन्म झाला.
इंदिरा गांधींनी किमान पूर्व पाकिस्तानचा नाश करून बांगलादेश निर्माण केला, परंतु ९६,००० युद्धकैद्यांची सुटका करताना त्यांनी POK विषयी चर्चा का केली नाही हेही कोडेच राहते.
त्यांच्या मुलाने श्रीलंकेत तमिळांविरुद्ध सेना पाठवली, हे विसरून की दक्षिण भारतातील तमिळ आपलेच नागरिक आहेत. यामुळे उत्तर आणि दक्षिण यांच्यात फूट वाढली.
हे सगळे इतिहासात अनेक ठिकाणी दस्तऐवजीकृत आहे. श्री. मोदी यांनी जे सांगितले ते चुकीचे नव्हते. काँग्रेस नेत्यांनी संसद आणि सभांमध्ये ओरडण्याऐवजी स्वतःचा इतिहास शिकणे आवश्यक आहे. मी BJPचा समर्थक नाही आणि कोणत्याही पक्षाचा विरोधकही नाही. पण माझ्या देशासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी मी शंभर टक्के उभा आहे
माहितीचा अभाव आणि लिखाणाची
माहितीचा अभाव आणि लिखाणाची सुरसुरी याचे सुरेख मिश्रण या ठिकाणी कथेत आहे. ज्ञान सोडा माहिती नसतानाही ब्रह्मांडाचा वेध घेण्याची शक्ती कशी असू शकते याचं एक सुंदर प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. यातून येणारे तर्क तर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या रचनाकारासाठी आदर्श ठरावेत असे आहे.
उदा. काश्मीरमधे सैन्य का पाठवले नाही याची माहिती ठेवता येऊ शकते. पण ती ठेवली नाही तरी काहीही बिघडत नाही. पण त्यावरून पडणारे प्रश्न हे मनुष्याच्या बुद्ध्यांकाचा अभ्यास करण्यासाठी संधोधकांना प्रेरित करू शकतात.
याचप्रमाणे स्वातंत्र्ययुद्धात मुस्लिमांसाठी धार्मिक घोषणा होती का ? दीन दीन किंवा अल्ला हू अकबर अशी घोषणा जर मुस्लिमांनी ठरवली असती तर ती गैर मुस्लिमांनी दिली असती का ? मुस्लिमांनी आपली स्वतंत्र घोषणा का ठरवली नाही असे प्रश्न का पडत नाहीत हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. वंदे मातरम हे संस्कृतप्रचुर बंगालीतले गीतच सर्वांनी का स्विकारायला हवे होते ?
ज्यांनी प्राण दिले पण ही घोषणा दिली नाही ते ही देशद्रोही आहेत का ? ज्यांनी घोषणा दिली पण प्राण तर सोडाच स्वातंत्र्ययुद्धात सहभागच नोंदवला नाही ते देशप्रेमी ठरतात का असे अनेक प्रश्न या कल्पनारम्य कथेमुळे पडले आहेत.
माहितीचा अभाव दुसरे काय ?
छान कथा.
छान कथा.
लेखनकर्त्याचे नाव वाचून लेख न
लेखनकर्त्याचे नाव वाचून लेख न वाचताच फाट्यावर मारण्यात आला आहे.
कळावे. लोभ असावा.
लेख ? चुकताय मग.
लेख ? चुकताय मग.
पो म्हणणे बरोबर वाटणार नाही.
पो म्हणणे बरोबर वाटणार नाही.
सांगतो मोकळे पणी की लेख नाही
सांगतो मोकळे पणी की लेख नाही तर शेणाचा पो आहे.
सांगतो मोकळे पणी की लेख नाही
सांगतो मोकळे पणी की लेख नाही तर शेणाचा पो आहे. COEP आणि IISC मध्ये शिकलेल्या माणसाकडून ही अपेक्षा न्हवती.
आपण जे बोलतो ते आपण पाळु नये
आपण जे बोलतो ते आपण पाळु नये का?
काही भाबडे प्रश्न
काही भाबडे प्रश्न
१.‘वंदे मातरम्’ला सहा कडवी आहेत. - ही सहा कडवी अगदी सुरुवातीपा सून होती का? काही लोक म्हणतात की १८७५ साली बंकिम
दाचंद्रांनी दोनच कडवी लिहिली होती. पुढची कडवी त्यांनी हे गीत आनंदमठ या कादंबरीत घेतले तेव्हा जोडली.जिथे या गीताचे गायन व्हायचे तिथे दोनच कडवी गायली जात.
काही लोक असेही सांगतात काँग्रेसच्या अधिवेशनांत वंदे मातरम् गायले जायचे, अगदी अजूनही गायले जाते.
संघशाखांमध्ये आणि भाजपच्या अधिवेशनांत गातात का?
२ या काळातच जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम्’चे तुकडे करून मुस्लिम समुदायाला खूष करण्याचा प्रयत्न केला - या काळात म्हणजे नक्की केव्हा? काही लोक म्हणतात की याबद्दल १९३७ साली काँग्रेस कार्यकारिणीच्या कोलकत्ता येथील बैठकीत यावर चर्चा झाली व पहिली दोन कडवीच गाण्याचा ठराव करण्यात आला. या कार्यकारिणीत नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद हेही होते. रवींद्रनाथ टागोर यांचा याबाबत सल्ला घेण्यात आला. तेही फक्त पहिली दोन कडवी गायच्या बाजूनेच होते. असं असताना आदर्णीय मोदीजींनी फक्त नेहरूंचं नाव का घेतलं? बंगाल निवडणुकींत त्यांना हा प्रचाराचा मुद्दा करायचा असेल तर ते टागोर ( दाढी वाढवून आणि शाल ओढून मोदीजींनी मागच्या बंगाल निवडणुका होईपर्यंत टागोरांसारखे दिसण्याचा प्रयत्न केला होता आणो बोस यांची नावे या संदर्भात ते घेतील का? पटेलांचं काय करतील?
३. राष्ट्राय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा यांच्यातल्या कोणाला वंदे मातरम् गायल्याबद्दल अथवा तशी घोषणा दिल्याबद्दल ब्रिटिशांनी शिक्षा केली का?
४ मुस्लिम लीग इतकी वाईट आहे तर १९३९ पासून दोन प्रांतांत हिंदू महासभेने लीगसोबत युती करून सरकार का स्थापन केले?
मी काँग्रेस समर्थक आहे आणि हे सांगायला मला अभिमान वाटतो.
पुन्हा पुन्हा तेच तेच काय
पुन्हा पुन्हा तेच तेच काय लिहायचे??
बेरोजगारी, महागाई, महिला
बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा , इंडिगो, पीएमओ मधील संशयास्पद व्यवहार इत्यादी प्रकरणाचा निकाल लागला आहे का ? वंदे मातरम वगैरेवर करदात्याच्या पैशाने चर्चा होते आहे म्हणून म्हटले .
संसदेत दहा तास वंदे मातरम
संसदेत दहा तास वंदे मातरम चर्चा ही सरकारची प्राथमिकता असेल आणि लोकांना ते मान्य असेल तर खरंच कठीण आहे एव्हढेच म्हणू शकतो. मी हा लेख वाचला हा तर माझाच दोष आहे.
आत्ताच वाचनात आले हा
आत्ताच वाचनात आले :
Quote by Stephen Hawking :
“The greatest enemy of knowledge is not ignorance, it is the illusion of knowledge.”
>>
>>
वंदे मातरम्’ला सहा कडवी आहेत. - ही सहा कडवी अगदी सुरुवातीपा सून होती का? काही लोक म्हणतात की १८७५ साली बंकिमदाचंद्रांनी दोनच कडवी लिहिली होती. पुढची कडवी त्यांनी हे गीत आनंदमठ या कादंबरीत घेतले तेव्हा जोडली.
जिथे या गीताचे गायन व्हायचे तिथे दोनच कडवी गायली जात.
काही लोक असेही सांगतात काँग्रेसच्या अधिवेशनांत वंदे मातरम् गायले जायचे, अगदी अजूनही गायले जाते.
संघशाखांमध्ये आणि भाजपच्या अधिवेशनांत गातात का?
>>
या काळातच जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम्’चे तुकडे करून मुस्लिम समुदायाला खूष करण्याचा प्रयत्न केला - या काळात म्हणजे नक्की केव्हा? काही लोक म्हणतात की याबद्दल १९३७ साली काँग्रेस कार्यकारिणीच्या कोलकत्ता येथील बैठकीत यावर चर्चा झाली व पहिली दोन कडवीच गाण्याचा ठराव करण्यात आला. या कार्यकारिणीत नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद हेही होते. रवींद्रनाथ टागोर यांचा याबाबत सल्ला घेण्यात आला. तेही फक्त पहिली दोन कडवी गायच्या बाजूनेच होते. असं असताना आदर्णीय मोदीजींनी फक्त नेहरूंचं नाव का घेतलं? बंगाल निवडणुकींत त्यांना हा प्रचाराचा मुद्दा करायचा असेल तर ते टागोर ( दाढी वाढवून आणि शाल ओढून मोदीजींनी मागच्या बंगाल निवडणुका होईपर्यंत टागोरांसारखे दिसण्याचा प्रयत्न केला होता आणो बोस यांची नावे या संदर्भात ते घेतील का? पटेलांचं काय करतील?
<<
मुस्लिम लांगुलचालन ह्या विषयात गांधी नेहरू कठोर पाषाण असतील तर पटेल वीट आहेत. दोघातील फरक इतकाच आहे. काही प्रसंगी पटेल आपली टोकाची मुस्लिम अनुययाची, मूर्ख अहिंसेची भूमिका सोडत. पण गांधी नेहरू कदापि नाही. त्यामुळे पटेल त्यातल्या त्यात बरे इतकेच. शिवाय गांधी नेहरू घराण्याने पूर्णपणे पटेलांचे नाव टाकले असल्यामुळे भाजपाला पटेलांचे नाव पुढे करण्यात आनंद मिळतो.
<<
संघात आणि संघातून प्रेरणा घेऊन बनलेल्या समस्त संघटना विविध प्रसंगी वंदे मातरम गायले जाते. ह्या संघटनेतील कुणीही ह्या गाण्याला कधीही विरोध केल्याचे ऐकलेले नाही. आपण तसे ऐकले आहे का?
>>
राष्ट्राय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा यांच्यातल्या कोणाला वंदे मातरम् गायल्याबद्दल अथवा तशी घोषणा दिल्याबद्दल ब्रिटिशांनी शिक्षा केली का?
<<
असेल किंवा नसेल . त्याने काही फरक पडत नाही. मुस्लिमांच्या लाळ घोटण्याच्या हव्यासापोटी काँग्रेसने वंदे मातरमचे मातम साजरे केले हा इतिहास आहे.
>>
मुस्लिम लीग इतकी वाईट आहे तर १९३९ पासून दोन प्रांतांत हिंदू महासभेने लीगसोबत युती करून सरकार का स्थापन केले?
<<
हे खरे असेल तर हिंदू महासभेने एक नालायक कृत्य केले. हिंदू महासभेची स्तुतीच केली पाहिजे असे काही हिंदुत्ववादी लोकांवर बंधन नाही. त्यांच्या चुकीच्या धोरणांना ठणकावून चूक म्हणायला कुणाची हरकत असायचे कारण नाही. (ह्याचा अर्थ हिंदू महासभेचे सगळेच चूक असाही होत नाही. )
तसेही हिंदू महासभा हा एक नामशेष झालेला पक्ष आहे. त्याचे राजकीय स्थान शून्य आहे. सध्या आघाडीवर असणारा पक्ष आहे भाजप.
आणि हो मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळत कुरवाळत वंदे मातरमला कचऱ्याच्या डब्यात फेकण्याचे पातक कोंग्रेसचेच.
काकीनाडा इथे काँग्रेसचे अधिवेशन भरलेले असताना पंडित पलुस्कर वंदे मातरम म्हणायला उभे राहिले तेव्हा अली बंधूनी त्यांना विरोध केला आणि तो न जुमानता त्यांनी ते गीत म्हटले. गांधी नेहरूंनी ह्या अनाठायी अडथळ्याचा निषेध केला नाही. कारण मुस्लिमाना वाईट कसे म्हणणार? लांगूलचालनाचे काय?
वंदे मातरम् ला राष्ट्रगानाचा
वंदे मातरम् ला राष्ट्रगानाचा दर्जा देणे म्हणहे कचर्याच्या डब्यात फेकणे हे सांगितल्याबद्दल आभार.
आपल्या सोयीने भूतकाळातल्या गोष्टी उगाळायच्या किंवा दुर्लक्षित करायच्या.
सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली नव्हती, उलट ते शाखेत जाऊन नमस्ते सदा वत्सले गायचे असेही सांगून टाका.
मोदी आणि शहा वंदे मातरम ची
मोदी आणि शहा वंदे मातरम ची सहा कडवी गाऊन का दाखवत नाहीत? सहाही कडवी आतापर्यंत गायली गेली असती तर - संघी लोकांनी मुख्यालयावर तिरंगा फडकवला असता का? आपल्या घरात चड्डी घालून संचलन करण्याऐवजी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले असते का? 80 कोटी जनता अजुनही दारिद्ररेषेखाली राहिली असती का? मोदींना चहा विकावा लागला नसता का? ह्या देशात स्त्रिया सुरक्षित राहिल्या असत्या का? सौ करोड की विधवा, हायब्रीड असे विकृत विचार सडक्या मेंदूत आले नसते का? हिमन्त सर्मा, अजित पवार, अशोक चव्हाण ह्यांना आपल्या मांडीवर बसवून पप्पी घ्यावी लागली असती का? अमेरिकेत जाऊन डॉलर कमवण्यासाठी फक्त सदा वछले म्हणून चाललं असतं का?
पलुस्करांना ईडीची भीती दाखवली
पलुस्करांना ईडीची भीती दाखवली नाही का नेहरूंनी?
>>
>>
वंदे मातरम् ला राष्ट्रगानाचा दर्जा देणे म्हणहे कचर्याच्या डब्यात फेकणे हे सांगितल्याबद्दल आभार.
<<
ज्या गीताला राष्ट्रगीत बनवावे इतके अफाट कर्तृत्व होते. अनेक क्रांतिकारक जे म्हणत फासावर गेले. अनेक देशभक्त गोळ्या खाताना हे गाणे म्हणत होते. अनेक आंदोलक काठ्या लाठ्या खाताना त्वेषाने हे गाणे म्हणत होते त्या गाण्याने स्वातंत्र्ययुद्धात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. त्या गाण्याचा स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत ह्या पदावर हक्क असताना मुस्लिम लांगूलचालनाचा लांच्छनास्पद हव्यास उरी बाळगून त्या गाण्याला गौण दर्जा दिला. राष्ट्रीय गीत नामक आगापिछा नसणारे एक पद देऊन ते गाणे कचऱ्याच्या डब्यात टाकल्यात जमा केले. होय. हे काँग्रेसचेच कृष्णकृत्य आहे.
धर्मान्ध मुस्लिमांसाठी
धर्मान्ध मुस्लिमांसाठी काँग्रेसने देशाचे दोन मोठे लचके तोडून वेगळा देश दिल्यावरही मुस्लिम लांगूलचालनाची खाज शमली नाही आणि वंदे मातरम ह्या गीताला सापत्न वागणूक दिली गेली हे जास्त संतापजनक आहे. ज्यांना म्हणे भारताबद्दल खूप खूप नितांत प्रेम होते असे मुस्लिम म्हणे पाकिस्तानात न जाता भारतातच राहिले. तरी त्यांच्या हळव्या भावना वंदे मातरम मुळे दुखावू नयेत याकरता काँग्रेस कित्ती कित्ती तत्पर होती ना?
<अनेक क्रांतिकारक जे म्हणत
<अनेक क्रांतिकारक जे म्हणत फासावर गेले. अनेक देशभक्त गोळ्या खाताना हे गाणे म्हणत होते. अनेक आंदोलक काठ्या लाठ्या खाताना त्वेषाने हे गाणे म्हणत होते त्या गाण्याने स्वातंत्र्ययुद्धात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. > यातलं काय भाजपच्या वैचारिक पूर्वजांनी आणि मातृसंस्थेने केले यावर संसदेत दहा तासांची चर्चा व्हावी.
राष्ट्रीय गीताचा, तिरंग्याचा आणि संविधानाचा अपमान करायची संघभाजपची रीत इथेही पाळल्याबद्दल अभिनंदन.
वंदे मातरम
वंदे मातरम
नशेत उडता पंजाभरियाणम
दंगलप्रदेशम द्वेष सुफलाम
सत्ता सुंदरी अंबादानी समर्पणम
दुखदाम शापिताम मातरम
वंदे मातरम
वरील सर्व विधाने म्हणजे सध्या
वरील सर्व विधाने म्हणजे सध्या काँगेसच्या नेत्यांच्या विधानासारखेच वाटत आहे. वंदेमातरमला दहा तास घालवले पण विरोधी पक्षाने तीन दिवस संसदेत जो तमाशा चालवला आहे त्याला काय म्हणायचे ? अमित शहाच्या दीड तासाच्या भाषणातही विरोधी पक्ष सतत दंगा करत होती. आपल्या भाषणात अमित शहाने वोट चोरी कशाला म्हणतात याची तीन उदाहरणे दिली.
वल्लभाई पटेलांना चौदा मते असून, पंडित नेहरूंना एकच मत असताना, पंडित नेहरू विजयी झाले ही वोट चोरी.
75 साली अलाहाबाद हिकोर्टाने इंदिरागांधीनी अवैध मार्ग वापरून निवडणूक जिंकली असे जाहीर केल्यावर इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली ती वोट चोरी.
सोनिया गांधी नागरिकत्व मिळण्याच्या अगोदरच त्यांनी मतदान केले ही वोट चोरी.
ही सर्व वोट चोरीची उदाहरणे नेहरू घराण्याशी संबंधित आहेत.
संसदेचा अधिवेशन फारच छोटे आहे असे म्हणत असतानाच राजीव गांधी मध्येच नऊ दिवस जर्मनीला जात आहेत त्यामुळे संसदेचं अधिवेशन लांबणार आहे का ?
सरकार आता तीसएक देशात सात -आठ डेलिगेशन पाठवत आहेत या डेलिगेशन मध्ये सर्व पक्षांचा समावेश आहे तर एवढेच नव्हे तर प्रत्येक डेलिगेशन मध्ये एक मुस्लिम सभासदही आहे. कित्येक डेलिगेशनचे प्रमुख BJP आणि मित्र पक्षांचे नाहीत . उदारणार्थ सुप्रिया सुळे. अशा डेलिगेशन मध्ये जाऊन जर काँग्रेस नेत्यांनी देश विरोधी विधाने केली तर जगात त्यांचीच नाचक्की होईल. विरोधक जयशंकर सारख्या माणसाला पाकिस्तानचा फितूर आणि हेर म्हणतात, कारण काय तर त्याने पाकिस्तानला पूर्व सूचना दिली होती 'आमचे हल्ले फक्त दहशतवाद्यावर असतील आणि कुठल्याही सैनिकी किंवा नागरिक वस्तीवर हल्ले नसतील' ज्यांना साधे इंग्रजीही कळत नाही असे लोक विरोधी पक्षात दिसतात. या उद्गाराबद्दल DGMO ने चांगलेच सुनावले आहे. ही लोकं डोनाल्ड टृम्पला देवता म्हणतात. एका शहरात डोनाल्ड ट्रम्प अवेन्यू म्हणून रस्त्यालाही नाव देत आहेत.
वाचकांनी रोजच्या बातम्या नीट वाचाव्यात बरेच काही लक्षात येईल. मोदीचा उदो उदो करावा असे माझे म्हणणे नाही. पण राष्ट्र विरोधी चुकूनसुद्धा बोलू नये हे मात्र निश्चित. वाचकांनी 'खिलाफत मूमेंट' वरची पुस्तके आणि पालकरांनी लिहलेले 'डॉक्टर हेडगेवार' याचे चरित्र अवश्य वाचावे. यामध्ये कॉइप किंवा इतर संस्थेचा काहीही संबंध नाही.
पंजाब हरियाणम् चे
पंजाब हरियाणम् चे पंजाभरियाणम् झालेलं दिसतंय.
ब + ह = भ केलं ")
ब + ह = भ केलं ")
ओके.
ओके.
आँ? मी भाजपचा समर्थक नाही
आँ? मी भाजपचा समर्थक नाही म्हणत मोदी शहांची विधाने इथे मांडलेली चालतात. मी तर उघडपणे काँग्रेस समर्थक आहे असे सांगून प्रियांका गांधींच्या भाषणातले मुद्दे इथे लिहिले. ते खोटे किंवा चुकीचे आहेत का?
वंदे मातरमवर च्या चर्चेत आता व्होट चोरी आणि ऑपरेशन सिंदूर पण आले का? आणि तेही आता? चुकून रद्दीतला पेपर आज वाचायला मिळाला का?
तुम्ही घुसवलेच आहे तर या बद्दलच्या एका मुलाखतीत तुमचे विद्वान परराष्ट्रमंत्री काय म्हणाले ते बघून घ्या.
तुम्हांला कदाचित बघवणार नाही म्हणून लिहूनही ठेवतो.
Where was the US in this process?
Well, the US was in the United States.
इतके समर्थ परराष्ट्रमंत्री असल्यामुळेच मोदींना विरोधी पक्षांच्या खासदारांची मदत मागावी लागली.
--
बरं. ते वंदे मातरम् चे तथाकथित तुकडे करण्याच्या निर्णयात टागोर , गांधी , बोस आणि पटेलही सामील होते हे व्यवस्थित रेकॉर्डेड आहे. मग दोष एकट्या नेहरूंना का? आणि नेहरू एवढे पॉवरफुल होते मग ते पहिले पंतप्रधान बनणे साहजिकच नाही का ;)?
याबद्दलचा हा सविस्तर लेख
सोनिया गांधी नागरिक व्हायच्या आधी मतदार झा ल्या ही भाजपने पसरवलेली आणखी एक अफवा.
इंदिरा गांधींची निवडणूक ज्या कारणाने रद्द झाली तो प्रकार आताचे पंतप्रधान वर्षाचे ३६५ दिवस करत असतात.
या अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी इथे म्हणजे मायबोलीवर धागे आहेत आणि त्यावर चर्चाही झाली आहे. तुमच्यावर आणखी वेळ घालवायचा की नाही हे तुमचे आणि तुमच्या मदतीला धावलेल्यांचे मनोरंजन मूल्य किती आहे त्यावर ठरवेन.
<मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी
<मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी भारतात सनातन, बौद्ध आणि जैन असे समुदाय अस्तित्वात होते. ? यताले बौद्ध आणि जैन धर्म भारतातून जवळपास नामशेष कसे झाले? या धर्मांशी संबंधित लेणी, गुंफा इ. हिंदू धर्माशी संबंधित वास्तूंच्या आधीच्या आहेत ना?
कंगना आणि सुप्रिया यांचं वंदे
कंगनाजी राणावत ,महुआजी मोईत्रा आणि सुप्रियाजी सुळे यांचं वंदे मातरम वरून घनघोर युद्ध बघाच.
https://www.youtube.com/watch?v=ZSr_4FZLFfk
संसदेतील काही वायरल व्हिडिओ
संसदेतील काही वायरल व्हिडिओ फेसबुक वर स्क्रोल करताना बघण्यात आले.
काँग्रेसने सत्तेसाठी बरेच वाह्यात प्रकार केले आहेत.
आता भाजप त्यांचाच कित्ता गिरवत आहेत.
आजच्या तारखेला दोन्ही पक्ष संसदेत एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत.
देशाची कोणाला काही पडली नाहीये. या देशाचे काही खरे नाहीये.
ऋन्मेष यांच्याशी सहमत.
ऋन्मेष यांच्याशी सहमत.
संसद लोकांचे प्रश्न मांडायला आहे कि या दोन चोर, दंगलखोर, लुटारू पक्षांच्या जाहीरातीसाठी आहे ?
वंदे मातरमचा रिलेव्हन्स होता. आज ही स्लोगन देऊन काय साध्य करायचंय ?
काँग्रेस ही चळवळ असताना स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी सहभाग नोंदवला. त्यात सर्वांनीच सहभाग नोंदवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून.
यानंतर राजकीय पक्ष म्हणून काम करायचे असेल तर काँग्रेस विसर्जित करावी हा गांधीजींचा आग्रह होता.
स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल या नेत्यांचे आभार.
पण या युद्धात सहभागी झालेल्या अनेकांचे रेकॉर्डस नसतील. प्रत्येक गावागावात प्रत्येकाने सहभाग नोंदवला आहे. प्रभातफेरीत भाग घेतला आहे. पेन्शन काय सर्वांनाच मिळाली का ?
आज सत्तेत असलेल्यांचं योगदान काय ? नुसते खा खा खातात आणि हिंदू मुस्लीम करून पांघरूणं घालतात. बास की.
Pages