
गेली काही वर्षे कोकणपट्ट्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही प्रवास झाला की शक्य झाल्यास तिथल्या नव्वारी(किंवा थोडी कमीजास्त पण काष्टा असलेली) नेसण्याच्या पद्धती गोळा करण्याचा माझा प्रयत्न असतो.
2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सारीज:ट्रॅडिशन अँड बियॉण्ड या रिता कपूर लिखित संदर्भग्रंथात मराठी साड्यांच्या संदर्भात याप्रकारचे किंचित योगदान दिले होते त्यानंतर हे काम मी सुरू केले. याबद्दल पूर्वी मायबोलीवर लिहिले होते. https://www.maayboli.com/node/35903
मुंगीच्या पावलाने हे काम चालू असले तरी इतका सगळा वेळ डोक्यात संदर्भ, कल्पना, प्रश्न चालू होतेच. लांबलेला वेळ ही एक इष्टापत्ती असल्यासारखे झाले आहे कारण आता हे संशोधन/ डॉक्युमेंटेशन व्यवस्थितपणे करण्यासाठी असायला हवी ती वैचारिक बैठक आणि ठहराव दोन्ही माझ्याकडे तयार झाले आहेत असे वाटते. वय पण वाढल्याने विविध जातीजमातींच्यातल्या बायकांशी संवाद साधता येणे थोडे सोपे झाले आहे हा तर अनुभव येतच असतो.
आधी जाताजाता जे काम झाले होते त्यातून मिळालेली काही सूत्रे, काही विचार याबद्दल माझा एक टॉक-डेमो कालच्या रविवारी(30 नोव्हेंबर 2025) वर्सोव्याला क्राफ्ट सर्कल नावाच्या दुकानाच्या कल्चर क्लबमध्ये झाला.
त्याचेच पोस्टर वरती आहे
दोन आठवड्यांपूर्वी पुण्याहून निघताना अचानक वरदाशी भेट जुळून आली तेव्हा आमचे फार मस्त बोलणे झाले. नंतर फोनवरही बोललो. ती हाडाची रिसर्चर असल्याने माझ्या गोंधळगुंत्याला आवरून नीट मांडता येणे तिच्याशी झालेल्या चर्चेने सोपे झाले.
सेशन साठी साड्या, टेक्स्टाईल्स या विषयात आवड असलेल्यांपासून रिसर्चर्स पर्यंत असे सगळ्या प्रकारचे लोक होते. एक कलर डिझायनर पण होती. सेशन खूपच आवडले सगळ्यांना. मला जिच्या कामाबद्दल आदर आहे त्या सविता सुरीने एक सुरेख पोस्ट लिहिली आहे फेसबुकवर. ही त्या पोस्टची लिंक.
https://www.facebook.com/share/p/1CsPASMBjm/
फार मस्त वाटतंय. हे काही फोटो या सेशनचे

इंटरेस्टींग !
इंटरेस्टींग !
लिंक्स निवांत बघेन.
चांगला उपक्रम @नीरजा.
चांगला उपक्रम @नीरजा.
नववारी साडी आणि त्याची
नववारी साडी आणि त्याची नेसण्याची पद्धत जातीनुसार बदलते.
कोकणातच कुळवाडी, कोळी, भंडारी, तेली, ब्राम्हण, धनगर वगैरे वेगवेगळी पद्धत पाहिलीय.
आमच्यकडच्या एक पैरीणी ताई कुंणबी होत्या.. त्या तर सुटसुटीत असा ओचा बांधून नेसायच्या वगैरे…
गोव्यात, वसईत पण फरक बघायला मिळतो.
छान उपक्रम.
छान उपक्रम.
Thank you!
Thank you!
जाती जमातींप्रमाणे पद्धती बदलतात याची मला कल्पना आहे.