शेरू परत आलाय ! S1 : E2

Submitted by एक लेखक on 22 November, 2025 - 07:52

भाग्यलक्ष्मी बाहेर आली. कुलदीपक कडे तिने पाहिले.
" तू इथे कसा आलास ?"
"मला असं वाटतं की तुला माझी गरज आहे"
"मला ?" असं म्हणून ती हसली.
मग पुन्हा वळून म्हणाली "तू काय मदत करणार ?"
"भाग्यलक्ष्मी, थांब, मला एक संधी दे. तुझं काहीच नुकसान होणार नाही. जास्तीत जास्त तुझी पंधरा मिनिटं जातील"
"अरे पण तू काय करणार ? तुला कळतंय का कंपनीची काय अवस्था आहे ?"
" हे बघ मला मीटींग मधे येऊ दे"
भाग्यलक्ष्मीने विचार केला. तसाही तिचा कुलदीपक वर विश्वास नव्हता.
तो सडकछापच होता. तिच्या आजोबांमुळे लग्न करावं लागलं होतं. त्या लग्नाला काहीच अर्थ नव्हता.
तिने त्याला नोकर बनवून ठेवलेलं होतं. त्यामुळं सगळे त्याला तीच ट्रीटमेंट देत होते.

तो मालकिणीचा नवरा असूनही सगळे त्याला हिडीस फिडीस करत. सर्वांच्या मते त्याची औकात तीच होती.
त्यामुळं तो बोर्ड रूम मधे येताच एकनाथ एकदम उठून उभा राहिला.
" हाऊ डेअर यू एंटर इन टू अवर बोर्ड मीटींग "
तो कडाडला.
भाग्यलक्ष्मीने थंड आवाजात त्याला सांगितले.
"एकनाथ, तुझी जीभ आवर. त्याला मी बोलावलंय. "
त्यावर एकनाथ चडफडत म्हणाला "म्हणजे नोकर सुद्धा आता इथे येणार का ? बेटर आय वुड लीव्ह धिस प्लेस "
"एकनाथ धिस इज लास्ट वॉर्निंग ! प्लीज डोण्ट फरगेट ,ही इज माय नवरा "

कुलदीपकने त्याच्या कुत्सित शेर्‍यांकडे साफ दुर्लक्ष केलं.
तो म्हणाला "मला कंपनीची बॅलन्स शीट्स आणि अकाउंट्स पहायचे आहेत "
भाग्यलक्ष्मी ज्यु. अकाउंट्स मॅनेजर कडे वळून म्हणाली "मिस्टर जिंदाल, त्याला आपली अकाउंट्स दाखवा "
"सॉरी मॅम, मी आपली अकाउंट्स त्यांना दाखवू शकत नाही "
" का ?" ती चिडली.
" कारण ही सीक्रेट डॉक्युमेंट्स आहेत "
" सीक्रेट ?"
" हो. म्हणजे आपण बाहेरच्या व्यक्तीला ती दाखवू शकत नाही"
" हाऊ डेअर यू ? ही इज माय हजबंड अ‍ॅण्ड युवर बॉस "
" पण मॅडम, ते आता कुठल्याच पदावर नाहीत ना ?"
" मी आत्ताच्या आत्ता त्याची कंपनीच्या डायरेक्टरपदी नेमणूक करत आहे"
" अशी कशी नेमणूक मॅडम ? त्यांच्याकडे शेअर्स तरी असायला हवेत ना ?"
तिने रागारागात आपले काही शेअर्स त्याच्या नावावर करत असल्याचं पत्र तत्काळ तयार करून त्याच्या तोंडावर भिरकावलं.
" एव्हढं बास कि अजून काही प्रोसिजर आहे ?"
एव्हढ्यात जनरल मॅनेजर वांगतोंडे यांनी जिंदालला रोखले. एव्हढ्या प्रोसीजरची गरज नाही. ती नंतरही करता येईल असे ते म्हणाले.

जिंदालचा अगदीच नाईलाज झाला. त्याने अकाउंट्सशी संबंधित सर्व फायली आणून कुलदीपक पुढे आणून फेकल्या.
नाहीतरी याला काय कळणार असेच भाव त्याच्या चेहर्‍यावर होते.

कुलदीपकने विचारले कि आत्ता कंपनीची स्थिती काय आहे ?
" आपण टोटल ८६००० कोटी रूपये लॉस अम्धे आहोत आणि कंपनी डूबण्याच्या मार्गावर आहे"
" आपल्याला आत्ता तत्काळ किती रूपये लागणार आहेत ?"
" आपल्याला बँकेचे ५०० कोटी रूपयांचे हप्ते आत्ता भरावे लागणार आहेत"
" कंपनीचे अन्य काही अ‍ॅसेट्स ?"
त्याने मान हलवली.

कुलदीपकने फायली पाहिल्या.
त्याने मान हलवली.
"यात फ्रॉड आहे. २०००० कोटी रूपये अन्य कंपन्यात वळवले गेलेले आहेत. तर ३३००० कोटींचा हिशेब ठेवलेला नाही. कंपनी लॉस मधे नाहीच. मधल्या मधे कुणी तरी पैसे फ्रॉड केले आहेत."

यावर एकनाथ ओरडला. " या मूर्खाला आताच्या आता इथून हाकला. याला काय समजतं ?"
कुलदीपक ने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
त्याने भाग्यलक्ष्मीकडे पाहून विचारलं.
"मी एक फोन करू का ?"
तिने मान हलवली.

कुलदीपक बाहेर आला.
त्याने फोन करायला सुरूवात केली/
" हॅलो , ऐक. मी एका कंपनीचे डिटेल्स पाठवत आहे. या कंपनीच्या खात्यात ५०० कोटी रूपये आताच्या आता भरायचे आहेत. "
" हॅलो, ते काही मला सांगू नकोस. कसं करायचं, कसं नाही ते तू बघ "
पाच मिनिटांनी त्याला पलिकडून फोन आला.
" हुं"
"२४ तास लागतील ? बरं ठीक आहे. आता ऐक . केंद्रीय मंत्री त्रिपाठींना फोन कर आणि फायटर प्लेन्सचं कॉण्ट्रॅक्ट लाल कुंकू इंडस्टॄजला द्यायला सांग "
" मी सांगतो ते कर. त्यांचं आय कमिशन असेल त्याच्या दुप्पट पैसे आपण ऑफर करू. मी राष्ट्रपतींना फोन करतो. बाकीचं तू बघ "

एव्हढं बोलून त्याने फोन बंद केला आणि पुन्हा जाण्यासाठी वळला.
तर भाग्यलक्ष्मी त्याच्या मागे उभी होती .

" हे आत्ता काय चाललं होतं ?"
"कुठं काय ? "
" मी सगळं ऐकलं आहे"
" काय ?"
"खरं खरं सांग. कोण आहेस तू ?"

कुलदीपक काहीच बोलला नाही.
" हे बघ, तुझं काम झालंय. उद्या अकाउंट्स चेक कर. आणि या नंबववर उद्या कॉल कर. लाल कुंकू इंडस्ट्रीजला काम मिळणार आहे"
" कसलं काम ?"
" बोफेल फायटर जेटचं ?"
" तू चेष्टा तर करत नाहीस ना ?"
त्याने मौन धारण केलं.
" खरं सांग कोण आहेस तू ?"
" मी निघतो. घरी भेटूयात. मला सांग बाजारातून भाजी काय आणायचीय ?"
ती त्याच्याकडे बघतच राहीली.

तिला प्रश्न पडलेला होता.

हा आहे तरी कोण ?
एक नोकर की अजून कुणी ?

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users