बोर्ड मिटींग चालू होती.
सर्व मेंबर्सचे लक्ष चेअरवूमन वर होते.
चेअरवूमन म्हणजे लाल कुंकू इंडस्ट्रीजची भाग्यलक्ष्मी आगलावे ही नवतरूणी होती. तिचं सौंदर्य असं कि साक्षात इंद्रालाही मोह पडावा. फिल्म इंडस्ट्री मधल्या हिरॉईन्स तिच्यापुढे ओशाळे होत. दिखाऊ इंडस्ट्रीत असूनही असं सौंदर्य त्यांच्या पाशी नव्हतंं. शिवाय भाग्यलक्ष्मी ने ज्या पद्धतीने मेंटेन केलेलं होतं, त्यामुळे स्त्रीला कॉम्प्लेक्स आलाच असता. विशेष म्हणजे ती फक्त २१ वर्षांची होती आणि मीडीयाची डार्लिंग होती. ज्या पद्धतीने ती न्यूज मधे राहत होती त्यामुळे लाल कुंकू इंडस्ट्रीजला फायदाच व्हायला हवा होता. पण तो होत नव्हता.
यामुळेच आजची मीटींंग तिने बोलावली होती.
कंपनीला रोजचा १२० कोटींचा तोटा होत होता. एके काळी लाल कुंकू कंपनीचा शेअर म्हटलं कि गुंतवणूकदारांच्या उड्या पडत होत्या. बारकू सिंघानिया हा ऑफीसेस मधे चहा नेऊन देणारा मुलगा, त्याने ३६ रूपयांचा एक शेअर घेतला होता. त्याचे ८६ लाख रूपये झाले होते. पण गेल्या काही दिवसात हा शेअर ढासळल्याने त्याची किंमत तीन रूपये साठ पैसे झाली होती.
भाग्यलक्ष्मीचा आवाज चढलेला होता.
" वांगंतोडे, आय नीड अॅन एक्स्लेनेशन " ती कडाडली.
वांगतोडे हे कंपनीचे जनरल मॅनेजर मान खाली घालून उभे होते. काय सांगावं हे त्यांना समजत नव्हतं.
कंपनीचा व्हाईस चेअरमन एकनाथ वाघभिववे हाच काही वर्षे कंपनी पाहत होता. एकनाथ सुद्धा तरूणच होता. त्याचेही कंपनीत शेअर्स असल्याने आणि काही वर्षे आगलावे कुंटुंबाला वेळ नसल्याने त्याने कंपनी सांभाळली होती.
कंपनीला तोटा का होत होता हे कुणालाही सांगता येत नव्हते.
बाहेर काही तरी हल्ला झाला.
एकनाथ लगेचच सिक्युरिटी कडे वळून म्हणाला "अंबानी, बघ जरा बाहेर काय चालू आहे ते ? इथे आम्हाला डिस्टर्ब होतंय"
भाग्यलक्ष्मीने चमकून पाहीलं.
"आपली कॉन्फरन्स रूम तर साऊंडप्रूफ आहे ना ?"
" होय मॅडम, पण उंदरांनी पॅनेलच्या मधले फीलिंग पोखरलंय आणि काही ठिकाणी आरपार भोकं पाडल्याने बाहेरचे आवाज स्पष्ट ऐकू येतात"
"अरे मग रिपेअर नाही का करायचं ?"
" मॅडम रिपेअरिंगचा खर्च साडेसात हजार रूपये आहे"
" अरे मग तुमच्या अधिकारात करून टाकायचा ना ? थांबलात कशाला ?"
" मॅडम खात्यात फक्त शेवटचे साडेसातशे रूपये आहेत ?"
भाग्यलक्ष्मीने कानावर हात ठेवले आणि ती जोरात ओरडली
"काय ? काय ?काय ?"
बाहेर एक तरूण आत जायच्या प्रयत्नात होता. पण त्याला गार्डस आत जायला रोखत होते.
"सोडा मला. मी कुलदीपक वाटलावे आहे, कळतंय का तुम्हाला ?"
" अरे हा तर मॅडमच्या घरातला नोकर आहे . "
" ए तुला सांगिfunction at() { [native code] }अलेलं समजत नाही का ? आत मीटींग चालू आहे ते ?"
कुलदीपक वाटलावे म्हणाला
"मला जाऊ द्या.मी गेलो नाही तर अनर्थ होईल "
" आणि तुला जाऊ दिलं तर साहेब आमची नोकरी घालवंल "
" अरे,कंपनी बंद पडली तर अशीही तुमची नोकरी जाणार आहे" कुलदीपक म्हणाला.
एव्हढ्यात मिस वाघजई जोशीने त्याच्याकडे पाहीलं.
"अरे त्यांना असं का कॉलरला धरलंय ? तुम्हाला माहीती ना का ते मॅडमचे पती आहेत ?"
गार्डसचा विश्वासच बसेना.
"काय वाघजई मॅडम मस्करी करताय ? हा नोकर आणि मॅडमचा मालक ?"
"अरे मूर्खांनो ,खरंच आहे ते "
गार्डसना आता काय करावं समजेना. कारण त्यांनी नेहमी त्याला मॅडमच्या बॅगा उचलताना, गाडी साफ करताना, भाजी आणताना पाहीलं होतं. हा नवरा कसा असू शकेल ?
पण वाघजई आत गेली. तिला बघताच एकनाथ तिच्याजवळ आला.
"काय चालू आहे हे ?" एनकाथने खुसफुसत्या आवाजात तिला विचारले.
" सर मॅडमचे हजबंड बाहेर आले आहेत "
" कोण तो भिकारी ? त्याला हाकलून दे "
हे शब्द उच्चारताना एकनाथचा आवाज नकळत चढल्याने भाग्यलक्ष्मीला ते शब्द ऐकू गेले.
"एकनाथ, कसाही असला तरी तो माझा नवरा आहे, नीट बोलायचं त्याच्याबद्दल "
असं म्हणत ती कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली.
क्रमशः
आपणाला पुढचा भाग वाचायची इच्छा असल्यास कृपया खालच्या लिंकवर जाऊन स्वेच्छेने जी काही योग्य वाटेल ती देणगी द्यावी ही विनंती. तीच माझी बिदागी समजून आनंद मानून घेईन.
https://www.puneblindschool.org/donate