
ध्रुवीय बर्फ वितळत आहे........
जर मानवाने ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ करणे थांबवले नाही, तर फक्त शंभर वर्षांत, आपल्या सभोवतालचे जग पूर्णतः बदललेलं असेल.
जेव्हा बहुतेक लोक उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील बर्फाच्या वितळण्याचा विचार करतात, तेव्हा ते आपोआप समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीचा विचार करु लागतात. पण हिमनगाच्या वरच्या व खालच्या भागांच्या वितळण्याचा अर्थ महासागरांमध्ये फक्त अतिरिक्त पाणी वाढण्यापेक्षा खूपच जास्त आहे. ध्रुवांवर बर्फ नसला तर महासागरातील पाण्याच्या प्रवाहात बदल होतील आणि त्यानुसार पृथ्वीवरील हवामान ठरवले जाईल. किती वेगाने हा ध्रुवीय बर्फ अदृश्य होईल हे जगाच्या प्रदूषण कमी करण्याच्या प्रभावी उपाय योजनांवर अवलंबून आहे. जसे ग्रीनहाऊस वायूचे, कार्बन डाय ऑक्साईड, पाण्याची वाफ, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन यांचे नियमन करणे, त्याची निर्मिती कमी करणे किवां पूर्णतः संपवणे, यासाठी जर जागतिक स्थरावर प्रभावी उपाय योजना केली गेली नाही तर, महासागरमध्ये फक्त समुद्र पातळीपेक्षाहि खूप अधिक बदलू घडू शकतात. बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये की आर्क्टिक प्रदेशातील हिमखंड वितळण्याचा व समुद्राची पातळी वाढण्याचा फार थोडा संबंध आहे. कारण पाण्यात बुडालेल्या या हिमखंडामुळे अगोदरच समुद्रातील पाणी काहीप्रमाणात विस्तापित झालेले असते. जसा हा बर्फ वितळतो तशी समुद्राची पातळीत थोडासा फरक पडतो पण त्यापेक्षाही जास्त प्रमाणात हवामानात बदल होतो.
समुद्राच्या पातळीतील बदलाचा खरा धोका हा ग्रीनलँड आणि अंटार्क्टिक हिमखंडा पासून येतो कारण त्यात जगातील सर्व गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के पाणीसाठा आहे. हवामान तज्ञ सांगतात की, जेव्हा अंटार्क्टिक हिमखंड वितळतील तेव्हा समुद्रपातळी २०० फुटांपर्यंत वाढू शकते. ग्रीनलँडचा बर्फ वितळल्यामुळे आणखी २० फूट समुद्रपातळी वाढेल. त्यामुळे सर्व मिळून,ध्रुवीय बर्फांच्या वितळल्यामुळे संपूर्ण जगभरातील समुद्रपातळी समुद्रसपाटीपासून २२० फूट वा अधिक वाढू शकेल. नॅशनल जिऑग्राफिक च्या अंदाजानुसार समुद्र सपाटीत २१६ फूट वाढ झाली तर संपूर्ण पूर्व समुद्राचा किनार, अखाती किनारपट्टी आणि फ्लोरिडा अदृश्य होईल. सॅन फ्रान्सिस्कोची टेकडी हि कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल व्हॅलीमध्ये अंतर्देशीय समुद्रासह तयार झालेल्या द्वीप समूहाची एक श्रृंखला बनवेल. लॉस ऍन्जेलिस आणि सॅन दिएगो हे सिएटलसह कॅनडातील पोर्टलंड, ओरेगॉन आणि ब्रिटिश कोलंबियाचे काही भाग होतील.
राष्ट्रीय समुद्रीय आणि वातावरणीय प्रशासनाद्वारे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा २०१७ मध्ये जन्मलेली व्यक्ती 33 वर्ष्यांची होईपर्यंत समुद्राचा स्तर हा २ ते ४.५ फूट इतका वाढलेला असेल आणि २१०० पर्यंत तो दुप्पट होईल. २०५० नंतर, समुद्राच्या पाण्याची पातळी किती झपाट्याने वाढेल हे अनेक घटकांवर अवलंबून असेल. सातत्याने वाढणाऱ्या उष्णतेने आणि किनाऱ्याची धूप झाल्यामुळे, या पातळीत लक्षणीयरीत्या वाढ होऊ शकते. यामुळे केवळ जगभरातील किनारपट्टी प्रदेशात राहणाऱ्या समुदायांवरच याचा प्रभाव पडेल असे नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचे देखील यात नुकसान होईल. ज्यामुळे नागरिकांचे निर्वासन आणि प्रमुख शिपिंग बंदरांचे आणि व्यवसायांचे पुनर्स्थापना करणे आवश्यक होईल.
नॅशनल स्नो अँड आईस डेटा सेंटर नुसार ग्रीनलँड आणि अंटार्क्टिक ग्लेशियर हे दैनंदिन हवामान आणि दीर्घकालीन हवामानावर परिणाम करतात. बर्फाचे उच्चपातळीवरील वादळ त्यांचे मार्ग बदलतात आणि ग्लेशियरच्या पृष्ठभागावरून प्रवास करत तेथे थंड वातावरण निर्माण करतात. आर्क्टिक समुद्रातील बर्फ अश्याप्रकारे हवा थंड ठेवून वातावरणाचे नियमन करण्यास मदत करते. या समुद्रातील बर्फ वितळत असल्याने, सूर्याची उष्णता पुन्हा अवकाशात परावर्तीत होण्या ऐवजी महासागरांद्वारे शोषली जाते व समुद्राचे तापमान वाढीस ती कारणीभूत होते, ज्यामुळे पाण्याचे अधिक
2 / 2
पसरण होते व समुद्रातील पाण्याचे प्रवाह बदलतात. आर्क्टिकमध्ये जरी थोडेसे तापमान बदलले तरी संपूर्ण जगभराचे हवामान मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकते.
महासागरांनी अधिक उष्णता शोषली जात असल्याने, ते सकारात्मक पुनर्प्रभाव निर्माण करणारी साखळी निर्माण करते ज्यात वातावरण आणि महासागरांच्या अभिसरणांमध्ये आवश्यक बदल होतो. ध्रुवीय हिमनगाच्या वितळण्याने गोडपाणी समुद्रात सामावते व समुद्राच्या खारटपणात बदल होतो. समुद्रात ज्यावेळेस ग्लेशियर वितळते तेव्हा त्यातील गोडेपाणी वर व समुद्राचे खारे पाणी जड असल्याने खाली राहते. यामुळे समुद्रातील नैसर्गिकरीत्या गरम पाणी पुन्हा ध्रुवीय आर्टिक प्रदेशाकडे "थर्मोहोलिक अभिसरणाद्वारे पाठवले जातात प्रवाह प्रभावित होतात. खूप खोल समुद्रातील थंड पाण्याचा प्रवाह जेव्हा गरम होतो तेव्हा दक्षिणेकडे वाहायला सूरवात करतो, व पुन्हा जेव्हा गरम होते तेव्हा विषुववृत्त भागात वर येतात व हे चक्र पूर्ण होते.
एक सर्वपरिचित असा समुद्रीपाण्याचा प्रवाह " गल्फ स्ट्रीम" यामुळे प्रभावित होईल. या आखातीय प्रवाहा मधील बदल उत्तर अमेरिका आणि युरोपला प्रभावित करतात. ज्यामुळे काही आठवड्यातच तेथे थंड वातावरण निर्माण होते व हवामानात लक्षणीय बदल घडवून येतात. मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित हॉलिवूड चित्रपट, "द डे फॉर टुमारो" याच परिस्थितीचा संदर्भ घेते. काही शास्त्रज्ञांना असे वाटते की नवीन हिमयुगात होणारे हे बदल इतक्या जलद शक्य नाही. कारण ज्या वेगाने वारे वाहतात त्या वेगाने समुद्रातील प्रवाह वाहू शकत नाही. पण सभोवताली घडणाऱ्या निसर्गाच्या अकल्पित घटना याला दुजोराच देतात.
ध्रुवीय बर्फ वितळण्याचा वन्यजीवनावर होणारा परिणाम आर्क्टिक समुद्रातील लहान लहान बर्फाच्या तुकड्यांवर तरंगणाऱ्या ध्रुवीय अस्वलांचे फोटो अधिक तीव्रतेचे दर्शवितात. परंतु केवळ ध्रुवीय अस्वलच यामुळे प्रभावित आहेत असे नाहीत. वाढत्या वसंत ऋतुतील बर्फ वितळल्यामुळे नॉर्दर्न गोलार्धातील शिकारीचा हंगाम कमी झाल्याचे ते अनुभवत आहेत. हि अस्वले मुख्यत्वे आर्क्टिक जवळ किनारपट्टीच्या क्षेत्रांमध्ये वास्तव्य करतात म्हणून, प्रवासासाठी आणि शिकारीसाठी समुद्रातील लांबच लांब पसरलेल्या बर्फावर ते अवलंबून आहेत. जसा बर्फ वितळत आहे, त्यांच्या या प्रवासावर व शिकारीवर बंधने येत आहेत. आदिवासी लोक देखील गेल्या काही दशकांपासून जागतिक हवामानातील बदल अंकित करीत आहेत. त्यांना आता पूर्वी सारखे ढग, वारा आणि महासागरांच्या प्रवाहावरून मिळणाऱ्या हवामानाचा अंदाज काढणे शक्य होत नाहीये.
पृथ्वीवर असे काही भूभाग आहेत जे पुरातनकाळापासून गोठलेल्या अवस्थेत आहेत. अलास्का आणि सायबेरियामध्ये,पुरातन हिमनदी वितळल्याने त्यात दडलेले आजारचे जीवाणू पसरून नव्याने रोगराई निर्माण झाली. काही शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, अश्याच एका पुरातन हिमनदीच्या वितळण्याणे ऑगस्ट २०१६ मध्ये सायबरियाच्या एका छोट्या कोपऱ्यातून अॅन्थ्रॉक्सचा उद्रेक झाला. यमाल पनिन्सला (रशिया) जवळ ७५ वर्ष जुन्या व पिवळ्या पडलेल्या रेनडियरचे बर्फात पडलेले प्रेत वितळले, त्यातून हवेत पसरलेल्या रोगजंतूमुळे २००० पेक्षा अधिक रेनडिअर संक्रमित झाले आणि डझनभर लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अश्या पुरातन बर्फाखाली निद्रावस्थेत असलेला ऍन्थ्रॅक्स हाच एकमेव व्हायरस नाही. शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की प्लेग आणि कांजण्या याचे जीवाणू सुद्धा सायबेरियाच्या बर्फात दफन अवस्थेत आहेत. आर्क्टिक प्रदेशातील जमिनीमध्ये हजारो वर्षांपुर्वी अडकलेला मिथेन आणि इतर वायू सुद्धा बर्फ वितळण्या बरोबर वातावरणात मुक्त होईल. यामुळे हे ग्रीनहाऊस वायू, ग्लोबल वार्मिगला अधिक चालना देतील.
हे दुष्टचक्र थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जगभरातील सर्व देशांच्या सरकारांनी वातावरणात ग्रीनहाऊस वायू सोडण्याच्या नियमांचे पालन करणे हा आहे. जर मानवाने ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ करणे थांबवले नाही, तर फक्त शंभर वर्षांत, आपल्याला जे सुंदर जग आज दिसत आहे ते पूर्णपणे बदललेलं असेल.
डॉ. चेतन सु. जावळे. ९४२२७७०८६९ zoology@rediffmail.com
चांगली माहिती दिली आहे आपण.
चांगली माहिती दिली आहे आपण.