युद्धस्य कथा रम्यहं

Submitted by अविनाश जोशी on 29 October, 2025 - 03:57

युद्धस्य कथा रम्य:
भारताकडे दोन विमानवाहू जहाजे आहेत. सध्याच्या काळात आशियायी देशांसाठी सध्याच्या परिस्थितीत बऱ्याच छोट्या युद्धात विमान वाहू जहाजांचे महत्व अनन्य साधारण आहे. परंतु दुसऱ्या महायुद्धातले शस्त्र अस्त्रांच्या आकड्यानी मन स्टीमित होते. उदा; पर्ल हार्बर वरील हल्याच . मुळातच पर्ल हार्बर हे बंदर अमेरिकेने हवाई बेटांपासून हिसकावून घेतलेले आहे आणि त्यानंतर अमेरिकेचा मोठा विमानतळ व आरमारी तळ तेथे बांधला गेला. या तळामुळे अमेरिकेचे सर्व पॅसिफिकभर वर्चस्व होते. अशा परिस्थिती जपानचे ऑपरेशन टोरा (टायगर) हे यशस्वी झाले. 1941 च्या या हल्ल्यात जपानच्या सहा विमानवाहू नौका व त्यावरील सुमारे तीनशे साठ विमाने सामील झाली होती. दोन अडीच तासात या विमानाच्या ताफ्याने दोनदा बॉम्ब हल्ले करून अमेरिकेचे प्रचंड नुकसान केले. या हल्ल्याने जपानला सर्व पॅसिफिक समुद्र मोकळा मिळाला. बऱ्याच जणांची अशी समजूत आहे की , जपान ने अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा न करताच हा हल्ला केला. येथे जपानने कायदेशीर चतुराई दाखवली होती. जपानने येथे आंतरराष्ट्रीय डे लाइन चा फायदा घेतला. त्यामुळे हल्ल्यानंतर जरी युद्ध घोषणा झाली तरी अमेरिकन तारखेत ती आदल्या दिवशीच नोंदली गेली आहेत. म्हणतात ना EVERYTHING IS FAIR IN LOVE AND WAR.
धर्मराजाचे 'अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो वा' हे उद्गार प्रसिध्दच आहेत.
हे आकडे तर काहीच नाहीत. प्रत्यक्ष युद्धात न उतरता अमेरिकेने प्रचंड युद्ध साहित्य ब्रिटन आणि दोस्तांना पुरवण्यात जो व्यापारी मुत्सद्दीपणा दाखवला होता त्याला तोड नाही. प्रेसिडेंट रुझवेल्टनी दोस्त राष्ट्रांना चाळीस हजार लढाऊ विमाने, चाळीस हजार शेरमन रणगाडे, वीस हजार विमान विरोधी तोफा , सहा लाखाहून जास्त मशीन गन्स आणि असंख्य दारुगोळा देण्याचे मान्य केले.
छोट्या जलदगती अग्नी बाणाच्या हल्ल्यापासून शत्रूला बचाव करणे अवघड होते. आपण ब्राम्होसच्या बाबतीत पाकिस्तान सैन्यांनी केलेली शरणागती पाहिलीच आहे. अति वेगवान गतीमुळे त्याचा मागोवा घेणे अवघड जाते. त्याचप्रमाणे त्याच्यावर मारागीरी करणेही अवघड असते. ब्राम्होस अत्याधुनिक शस्त्र असले तरी त्या मागचे तत्व दुसऱ्या महायुद्धातही वापरले गेले आहे.
जर्मनीचे V1 किंवा बझ बॉम्ब हे अशा प्रकारचे अस्त्र होते. V1 हा अग्निबाण सरळ रेषेत उडायचा आणि अचानक दिशा बदलून जमिनीकडे जायचा. जमिनीकडे जाताना त्याचा स्फोट वयाचा आणि खालील प्रदेशाचे प्रचंड नुकसान व्हायचे. लढाऊ विमाने अथवा विमान विरोधी तोफा या अस्त्रापुढे हतप्रभ झाल्या होत्या. जर्मनीने लंडनवर अशा शेकडो बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे हजारो लोकं मृत्युमुखी पडले. इतर बरच नुकसान झाले.
या सत्रापासून रक्षणासाठी अनेक कल्पना लढवल्या गेल्या त्यातल्या एका कल्पनेत प्रचंड बलून आकाशात सोडून त्या खाली प्रंचड मोठ्या जाळ्या वापरल्या गेल्या परंतु या जाळ्या एकतर फाटल्या किंवा गाळून खाली पडल्या. V1 ची सुधारित आवृत्ती V2 तर प्रचंड नुकसान करणारे ठरले. उदारणार्थ बकिंग हॅम पॅलेस जवळच्या एका चर्चवर हा फ्लयिंग बॉम्ब पडल्याने आतील दोनशे लोकं मेली. ब्रिटनच्या आणि लंडन वासियांच्या सुदैवामुळे हिटलरला त्याच वेळेस माघार घ्यावी लागली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूरस्थाः पर्वताः रम्याः वेश्याः च मुखमण्डने |
युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरतः

असं सुभाषित आहे. मराठीतील 'दुरून डोंगर साजरे' ह्या म्हणीचा उगम इथे आहे तर!

युद्धस्य कथा रम्यहं >> युद्धस्य कथा रम्या पाहिजे. >>> ते फक्त "त्यांना" रम्य आहेत असे म्हणत असतील Happy संस्कृत फाकोचा प्रयत्न आहे. माहीत नाही चपखल आहे का Happy

ब्रिटनच्या आणि लंडन वासियांच्या सुदैवामुळे हिटलरला त्याच वेळेस माघार घ्यावी लागली. >>> त्यांच्या एअर फोर्सनेही २-३ जर्मन विमाने पाडली असे वाचले आहे Happy इंग्लंडने शरणागती पत्करली नाही व शेवटी हिटलरलाही तिकडे रशियावर हल्ला करायचा होता. त्यामुळे ते बॉम्बिंग थांबले.

लेखातली बाकी माहिती इंटरेस्टिंग आहे. पण हे अजून एकः
मुळातच पर्ल हार्बर हे बंदर अमेरिकेने हवाई बेटांपासून हिसकावून घेतलेले आहे >>> याचा दुसर्‍या महायुद्धाशी काय संबंध? १९ व्या शतकात अनेक देशांनी इतर अनेक देशांचे भूभाग बळकावले आहेत.

सर ही AI मधील माहिती नाही. १९७६ पासून माझ्या ४७ देशातून असंख्य ट्रिप झालेल्या आहेत. युरोप मध्ये भटकत असताना मी कुठल्याही मोठ्या शहरात राहत नाही. यूरेल चा पास खिश्यात ठेऊन एखाद्या छोट्या गावामध्ये फॅमिली हॉटेल मध्येच राहायचे त्यामुळे छान गप्पा रंगायच्या आणि युद्धात भाग घेतलेले बरेच लोकही भेटायचे. मला जर्मनही चांगले येते. आणि मी पार (पोलंड) जवळच्याऑश्विट्स च्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला भेटी दिल्या आहेत. युरोप मधील पन्नासहून जास्त झालेल्या फेरांमध्ये माहितीची भांडारे जमा झाली आहेत. अशामुळे पब्लिश माहिती ऐवजी वेगळी माहिती असू शकते.

सर ही AI मधील माहिती नाही. १९७६ पासून माझ्या ४७ देशातून असंख्य ट्रिप झालेल्या आहेत. युरोप मध्ये भटकत असताना मी कुठल्याही मोठ्या शहरात राहत नाही. यूरेल चा पास खिश्यात ठेऊन एखाद्या छोट्या गावामध्ये फॅमिली हॉटेल मध्येच राहायचे त्यामुळे छान गप्पा रंगायच्या आणि युद्धात भाग घेतलेले बरेच लोकही भेटायचे. मला जर्मनही चांगले येते. आणि मी पार (पोलंड) जवळच्याऑश्विट्स च्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला भेटी दिल्या आहेत. युरोप मधील पन्नासहून जास्त झालेल्या फेरांमध्ये माहितीची भांडारे जमा झाली आहेत. अशामुळे पब्लिश माहिती ऐवजी वेगळी माहिती असू शकते.

छान.

तुमचा अनुभव इतका असेल तर पब्लिक डोमेनमधली माहिती देण्यापेक्षा तुमचे त्या मंडळींमार्फत मिळालेले युद्धाचे अनुभव वाचायला आवडतील.

>>>>>>>> ते फक्त "त्यांना" रम्य आहेत असे म्हणत असतील Happy संस्कृत फाकोचा प्रयत्न आहे. माहीत नाही चपखल आहे का Happy
रम्य: अहं!! Happy