फटा पोस्टर .......... निकला तेजस्वी

Submitted by अविनाश जोशी on 28 October, 2025 - 07:05

फटा पोस्टर .......... निकला तेजस्वी
आता बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारात बरीच रणधुमाळी चालू आहे. यात RJD हा एक प्रमुख पक्ष आहे. बरेच विरोधी पक्षकार RJD चा अर्थ रावडी, जंगली आणि दादागिरी असा लावतात. या पक्षाबरोबर काँग्रेस निवडणूक लढत आहे. काँग्रेसचे सर्वेसर्वः आणि नेहरू घराण्यातील चौथ्या पिढीचे वारसदार राजीव गांधी सीट वाटपाकरिता बिहारमध्ये काहीदिवस तळ ठोकून होते. RJD चा स्टार हिरो तेजस्वी यादव हा लालूप्रसाद यादव यांचा मुलगा. तेजस्वी हा बाप से बेटा सवाई असा आहे. आई-वडिलांसारखा त्याच्यावरही अनेक खटले चालू आहेत. राहुल गांधींना बरेच दिवस झुलवत ठेवल्यावर त्याने RJD च्या एकशे त्रेचाळीस जागांवर हक्क सांगितला. आणि उरलेल्या एकसष्ट जागांवर त्यांनी हक्क सोडला. त्यानंतर तेजस्वीच्या भावाने, तेजप्रतापने जवळ जवळ पस्तीस जागांवर हक्क सांगितला. यातलं पुढील भाग म्हणजे अर्ज परत घेण्याची शेवटी तारखा निघून गेल्यामुळे प्रत्येक जागांसाठी संख्या उमेदवार उभे आहेत.
यातच नुकत्याच पार पडलेल्या भव्य प्रचार रॅलीत जे मोठाले बॅनर्स लावले होते त्याच्यावर फक्त तेजस्वी यादवचेच छायाचित्र होते. राहुल गांधींचे छायाचित्र तर सोडाच पण त्याचे नावही बॅनर्सवर नव्हते. कणा नसलेली काँग्रेस आज काहीही करण्यास असमर्थ आहे.
चीन मधील एका गोष्टीची आठवण झाली. माओसेतूंग याने प्रचंड आकाराचा चीन विविध प्रकारच्या जोखडाखालून सोडवला आणि एकसंध चीन उभा केला. आकाराने आणि लोकसंख्येने चीन भरपूर मोठा असला तरी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. चीनला जगाने अजून मान्यता दिली नव्हती. रशियाचा त्यावेळेला स्टालिन हा हुकमशाह होता. चीन कॉम्युनिस्ट असल्यामुळे त्याला चीनला मान्यता देणे भाग होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज तागायत कोणत्याही देशात लोकशाही मार्गाने कॉम्युनिस्ट सरकार आले नाही. चीनचे माओसेतूंग हे राष्ट्र प्रमुख स्टालिनला भेटायला मॉस्कोला गेले. एकराष्ट्र प्रमुख येणार असे माहिती असूनही कोणतेही राजकीय शिष्टाचार पळाले गेले नाहीत. माओ चीनमधील एका मित्रांकडे राहत होते. ठरल्यावेळी क्रेमलिनमध्ये भेटावयास गेलेल्या माओना बरच काळ थंडीत कुडकुडत बसावे लागले शेवटी स्टालिनकडे त्यांना घेऊन आले पण हा आढ्यताखोर हुकमशहा माओंशी धड बोलला नाही. थोड्याच वेळात लज्जास्पद माओ तेथून बाहेर पडले व तातडीने चीनला परत गेले. काही वर्षांनी चीनला आपली नौसेना आणि बंदरे आधुनिक करायची गरज भासू लागली. त्याकरिता त्यांनी रशियाची मदत मागितली. या वेळेपर्यंत स्टालिन जाऊन त्याच्या जागी निकिता ख्रिच्व आले होते.
रशियाने बंदराचे व नौसेनेचे आधुनिकीकरण करावयाचे मान्य केले पण त्यात एक प्रमुख अट घातली. या अटीमुळे ही सर्व बंदरे व त्यांचा कारभार रशियाच्या ताब्यात राहणार होता. हे वाचल्यावर माओ संतप्त झाले. त्यांनी रशियाला कळवले कि चीनची सर्व बंदरे ताब्यात घेण्यास काहीच हरकत नाही. पण तेवढे करून थांबू नका तर सर्व देशच ताब्यात घ्या. तुम्ही तसे केल्यावर मी परत डोंगरात राहायला जाईन आणि तुमच्या विरुद्ध गुररीला वारफेअर सुरु करेन. असे सांगून त्याने हा विषय बंद केला. थोड्या दिवसांनी चीनची सामसूट काढण्याकरिता ख्रिच्वणे चीनला भेट द्यायचे ठरवले. त्याप्रमाणे ख्रिच्व राजधानीत आल्यावर त्यांना एका सध्या हॉटेलात नेण्यात आले. त्यावेळेपर्यंत रशियाचा दूतावास चीन मध्ये नव्हता. ख्रिच्वच्या रूम मधील ऐरकंडिशनेर सतत बंद पडत होता व चालू असेल तेव्हा प्रचंड आवाज करत होता. शेवटी कंटाळून ख्रिच्व बाल्कनीत झोपले. तिथे रात्रभर डासाच्या संगीताने त्यांना मंत्रमुग्ध केले.

दुसऱ्यादिवशी सकाळी आठ वाजता त्यांना निरोप मिळाला की साडेनऊ वाजता माओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी मिटिंग आहे पण ही मिटिंग स्विमिंग पूल मध्ये असून सर्व बोलणी पोहता पोहता होतील तरी ख्रिच्व यांनी योग्य पोशाखात यावे. एका अतिभव्य स्विमिंग पूल जवळ ख्रिच्व वेळेवर पोहचले. पण एक गोची अशी होते की ख्रिच्वना अजिबात पोहता येत नव्हते त्या विरुद्ध माओ व त्यांचे सहकारी पोहण्यात अतियश निष्णात होते. शेवटी ख्रिच्वच्या पोटाला आणि पाठीला फुगे बांधून त्यांना स्विमिंग पूल मध्ये सोडण्यात आले. बाकीचे सर्व त्यांची गंमत पाहत होते. हळू हळू ख्रिच्वच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले त्यावेळी रक्षकांनी त्याला तलावाबाहेर काढले व इतर सर्वानी स्विमिंग पुलाशेजारी बैठक सुरु केली.
यानंतर माओच्या सर्व मॉस्को भेटीत त्यांना अतिशय आदराने वागवले गेले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users