15 डिसेंबर 2020 . . .
जगभरात कोविड-19ने थैमान घातलेले, बहुतेक देशांत अधूनमधून टाळेबंदीचे वातावरण आणि जनता हवालदिल झालेली. त्या दिवशी मध्यरात्री फ्रान्समधील एका गावात एक चक्रावून टाकणारी अन् मती गुंग करणारी घटना घडली.
चाळीशीतल्या Jubillar जोडप्यातली पत्नी त्या मध्यरात्रीपासून बेपत्ता आहे. गेल्या पाच वर्षात तिचा ठावठिकाणा लागलेला नाही आणि तिचे प्रेतसुद्धा मिळालेले नाही - अगदी ‘दृश्यम’ आठवला असेल ना? मात्र पोलिसांनी त्या बाईच्या नवऱ्याला अटक करून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. तो खटला आता न्यायालयात चालू होतोय.
काय आहे तरी काय वैशिष्ट्य या प्रकरणाचे ?
बेपत्ता स्त्रीचा ५ वर्षे ठावठिकाणा नाही अन् तिचा मृतदेह आजवर मिळालेला नाही. त्या जोडप्याच्या घरात किंवा आसपास कुठेही खुनाच्या घटनेचा सबळ पुरावा सापडलेला नाही. खुनाचा कुणी प्रत्यक्ष साक्षीदार असण्याचा तर प्रश्नच नाही. बरं कुठलेही प्राणघातक हत्यार देखील त्या घरात मिळालेले नाही, ना कुठे रक्ताचे डाग किंवा डागाळलेले कपडे. मग डीएनए तपासणी तरी करणार कशाची?
दुसऱ्या बाजूला आरोपी नवरा आपण निर्दोष असल्याचे वारंवार सांगतो आहे. असे हे चक्रावून टाकणारे गूढ. एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाला थरारक गुन्हेगारीपटासाठी खाद्य पुरवणारी ही घटना आहे हे मात्र नक्की. एव्हाना अशा एखाद्याने या घटनेवर आधारित चित्रपट काढायचा विचार चालू सुद्धा केला असेल.
पाहूया घटनाक्रम काय होता तो :
38 वर्षीय सेड्रिक आणि 33 वर्षीय डेल्फिन यांच्या बिघडलेल्या संसाराची ही कहाणी. तो आहे एक चित्रकार व सजावटकार आणि कॅनाबिसचा व्यसनी. तर डेल्फिन जवळच्याच एका रुग्णालयातील नर्स. दोघांचे पटत नव्हते. त्यात डेल्फिनने एका परपुरुषाशी इंटरनेटवरून मैत्री व नंतर जवळीक केलेली. परिणामी या जोडप्याची विभक्त होण्याची तयारी चालू झालेली. या जोडप्याला दोन मुले - घटनेच्या वेळी मोठे सहा वर्षांचे तर धाकटे 18 महिन्यांचे.
15 डिसेंबरच्या मध्यरात्री पासून डेल्फिन गायब असल्याची तक्रार खुद्द तिच्या नवऱ्याने पोलिसांना फोन करून सांगितलेली होती. सकाळी जेव्हा पोलीस त्याच्या घरी आले तेव्हा घरच्या साध्या कपड्यांतला हा गृहस्थ त्याच्या फोनवरील ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये मग्न होता.
त्यानंतर कित्येक दिवस बेपत्ता डेल्फिनचा शोध न लागल्याने पोलिसांनी तिच्या घराच्या आसपासचा प्रदेश अक्षरशः खणून काढला परंतु त्यातून प्रेत अथवा अन्य कोणताही पुरावा अजूनही मिळालेला नाही.
या प्रकरणात आतापर्यंत खुनाचा कुठलाच ठोस पुरावा न मिळाल्याने अफवा आणि कंड्यांना तर स्थानिक परिसरात उत आलाय आणि त्यातून अनेकांच्या डोक्यात भन्नाट गुप्तहेरकथा देखील शिजताहेत.
पोलिसांनी तर त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करता -
सेड्रिकने बायकोचा खून केला आणि नंतर कणभर सुद्धा पुरावा सापडणार नाही याची तजवीज केली. आजवर पोलिसांना अज्ञात व निर्जन जागी प्रेत पुरले. त्याच रात्री घरी परतून पोलिसांना फोनवर शांतपणे बायको बेपत्ता असल्याची माहिती दिली आणि हे सगळे नाट्य घडत असताना त्या जोडप्याची दोन्ही मुले शांतपणे आपल्या खोलीत झोपलेली होती !
ज्याच्यासमोर 'दृश्यम'चा विजय साळगावकर किस झाड की पत्ती वाटावा असा हा वास्तवातील सेड्रीक. काय म्हणावे त्याच्याबद्दल ? अत्यंत बुद्धिमान गुन्हेगार, नशीबवान व्यसनी बुद्दू की गरीब बिचारा निर्दोष नवरा?
न्यायाधीशच याचा निवाडा करतील. कथालेखक यावर डोकं खाजवून छानशी गुन्हेगार कथा लिहू शकतील हे नक्की. दरम्यान खटला तर आता चालू होतोय . . .
फिर्यादी पक्षाचे मुद्दे असे असतील :
१. या नवरा बायकोचे पटत नसल्यामुळे आणि तिने परपुरुषाशी जवळीक केल्यामुळे नवऱ्याकडे खुनाचा उद्देश (motive) आहे.
२. 15 डिसेंबरच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीरावर शारीरिक झटापटीच्या खुणा होत्या आणि त्याचा चष्मा फुटलेला होता. त्याच्या शेजाऱ्याने एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला होता.
३. सेड्रीकच्या भूतपूर्व प्रेयसीने पोलिसांना सांगितले की त्याने तिच्याजवळ खुनाची कबुली दिली होती आणि प्रेताबद्दलही बोलला होता.
४. या जोडप्याचा मोठा मुलगा आता ११ वर्षाचा झाला असून त्याच्या म्हणण्यानुसार त्याने आई-वडिलांची झटापट आणि धक्काबुक्की पाहिली होती. आता तो बापाकडे रागाने बघत म्हणतो आहे,
" होय, यानेच माझ्या आईला मारले".
त्यांच्याकडून १६,००० पानी आरोपपत्र आणि ६५ साक्षीदार तर तयार आहेत.
परंतु…
गेल्या पाच वर्षात प्रेत अथवा अन्य कोणताही सबळ पुरावा न मिळाल्याने बचाव पक्ष म्हणणारच की खून हे पोलिसांनी रचलेले कुभांड आहे आणि साक्षीदार खोटारडे आहेत ! मुलाची साक्ष ग्राह्य धरली तरी त्याचे महत्त्व मारहाणीच्या गुन्ह्यापर्यंत असेल.
बायकोशी पटत नसलेला व्यसनी सेड्रिक खरंच तिच्या खुनापर्यन्त मजल मारू शकतो का, या प्रश्नाभोवतीच खटला एकवटला जाईल. यातून खुनाचा परिस्थितीजन्य पुरावा समोर येऊ शकेल ?
लवकरच पाहूया, खटल्यातून काय काय ‘दृश्य’मान होतंय ते.
****************************************************************************
संदर्भ :
https://www.bbc.com/news/articles/cz69nppezlzo
आणि अन्य डिजिटल बातम्या व वृत्तान्त
चित्रसौजन्य : सरलनामा
खरी घटना असल्यामुळे..
खरी घटना असल्यामुळे..
जर खून झाला असेल तर ती दुर्दैवी जीव आहे.
नसेल झाला तर ते दोघेही दुर्दैवी आहेत किंवा मग तो एकटाच.
कुतूहल वाटावे असे लिहिले आहे.
कुतूहल वाटावे असे लिहिले आहे..
पण मला दृश्यम नाही तर दुसरे दोन चित्रपट आठवले.
पहिला म्हणजे एक रुका हुआ फैसला..
ठोस पुरावा नसेल तर शिक्षा होऊ नये हेच योग्य
दुसरा चित्रपट तलवार आठवला...
पण तो बघितल्यावर फार अस्वस्थ झालेलो. पुन्हा बघायची हिम्मत झाली नव्हती.
* खरंय, दुर्देवी नक्की कोण
* खरंय, दुर्देवी नक्की कोण ते आता सांगणे अवघड आहे.
* एक रुका हुआ फैसला >> होय, पाहिला आहे. ज्युरींचे पूर्वग्रह . . .
* तलवार >>> नाही पाहिलेला
सर,
सर,
इथे हा मुद्दा अस्थानी आहे का ते कृपया क्ळवावे.
जर या घटनेवर कुणीही कथा रचली तर फक्त सत्य घटनेवर आधारीत एव्हढाच दावा करावा. कोणत्या घटनेवर याचा उल्लेख असू नये. कारण काही सत्य घटना या संबंधितांसाठी वेदनादायी असतात. त्या पुस्तकाच्या / सिनेमाच्या अनुषंगाने त्यावर पुन्हा चर्चा होऊ नये.
रोचक आहे प्रकरण.
रोचक आहे प्रकरण.
ह्या साऱ्यात त्या ऑनलाइन प्रियकराची चौकशी झाली असेल ना
* फक्त सत्य घटनेवर आधारीत
* फक्त सत्य घटनेवर आधारीत एव्हढाच दावा >>> अगदी बरोबर. त्यातून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
. . .
* ऑनलाइन प्रियकराची चौकशी ? >>
मी मोफत असलेले २-३ ऑनलाईन संदर्भ चाळले. त्यात तरी याचा काही उल्लेख आढळला नाही. अन्य काही संदर्भ, विशेषतः फ्रान्समधले सशुल्क आहेत.
कदाचित तो साक्षीदारांपैकी एक असू शकेल ?
Gone girl चित्रपट आठवला .
Gone girl चित्रपट आठवला .
सेड्रीक. काय म्हणावे त्याच्याबद्दल ? अत्यंत बुद्धिमान गुन्हेगार, नशीबवान व्यसनी बुद्दू की गरीब बिचारा निर्दोष नवरा?>>
गरीब बिचारा नवरा आणि अत्यंत बुद्धिमान बायको.
गरीब बिचारा नवरा आणि अत्यंत
गरीब बिचारा नवरा आणि अत्यंत बुद्धिमान बायको.>> ही एक शक्यता (फ्रॉम Gone girl)
>>>>>या जोडप्याचा मोठा मुलगा
>>>>>या जोडप्याचा मोठा मुलगा आता ६.५ वर्षाचा झाला असून त्याच्या म्हणण्यानुसार त्याने आई-वडिलांची झटापट आणि धक्काबुक्की पाहिली होती. आता तो बापाकडे रागाने बघत म्हणतो आहे,
" होय, यानेच माझ्या आईला मारले".
ना आई राहीली ना बाप!!
* Gone girl
* Gone girl
>>> याची कथा वाचली. खरच भन्नाट आहे. त्यातला Uxoricide ( = स्वतःच्या बायकोचा खून करणे) हा शब्द वेगळाच असून नव्याने समजला. त्याचा विरुद्धार्थ Mariticide (स्वतःच्या नवऱ्याचा खून).
*अत्यंत बुद्धिमान बायको >>> अगदी बरोबर
* Submitted by धनश्री- on 25
* Submitted by धनश्री- on 25 September, 2025
>>> अच्छा ! हे नवे बारसे तर . . .
स्वागत
खूपच रोचक. विवाहित
खूपच रोचक. विवाहित स्त्रियांच्या खूनामागे बहुतांशी त्यांचे जोडीदारच असतात असे एका सिनेमात पाहिले होते.
पण दुसरी बाजू, मृतदेह गायब करणे एव्हडे सोपे नसावे.
कदाचित ती जिवंत असेल आणि लपून असेल. जबाबदाऱ्यांपासून सुटका किंवा नवऱ्याला अद्दल किंवा इतर काही कारणांसाठी.
किंवा ती निघून गेली असेल आणि नंतर कोणीतरी तिचा खून केला असेल या शक्यता सुद्धा असू शकतील.
>>>> अच्छा ! हे नवे बारसे तर
>>>> अच्छा ! हे नवे बारसे तर . .
होय कुमार सर. जे व्हावेसे वाटते ते आहेच असे धरुन चालणे आणि त्या व्हायब्रेशन्स आकर्षित करणे असे सगळे उपद्व्याप आहे. हे नाव फार आवडलेले आहे. सहसा मनाच्या चंचलतेमुळे काहीच एक असे आवडत नाही, सतत भटकी शोध घेण्याची वृत्ती रहाते.
पण हे नाव त्याला अपवाद.
रोचक आहे प्रकरण. नवरा बायको
रोचक आहे प्रकरण. नवरा बायको दोघेही बनेल असू शकतात.
*पोलिसांनी तर त्याला खुनाच्या
खूप उत्कंठा वाढवणारं प्रकरण !
*पोलिसांनी तर त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे.* - असं जर असेल, तर त्याच्याकडूनच खरं काढून घेणं वास्तविक अशक्य नसावं; फ्रान्सच्या पोलिसांना बहुतेक आपण सर्रास ऐकतो, वाचतो ते ' टायरमध्ये घालून फोडून काढणे ', ' बर्फाच्या लादीवर झोपवणे ' इ. उपाय माहीत नसावेत किंवा मान्य नसावेत !
(मला फार पूर्वीचा Alfred Hichcock चा Rear Window ' हा खूप गाजलेला रहस्य सिनेमा आठवला ( James Stewart, Grace Kelly ) . जायबंदी झालेला एक फोटोग्राफर प्लास्टरमधला आपला पाय संभाळत वेळ जाण्यासाठी खिडकीतून समोरच्या बिल्डिंग मधीलहालचाली बघत बसलेला असतो. अचानक एका माणसाच्या संशयास्पद वागण्याने त्याचं कुतूहल जागृत होतं .त्यातूनच त्या माणसाने बायकोचा खून करून तिचं प्रेत खालच्या बागेत पुरलं असावं असा त्याला संशय येतो व तो खराही ठरतो. अप्रतिम दिग्दर्शन व अभिनय यामुळे तो सिनेमा अविस्मरणीय होतो.)
खूप उत्कंठा वाढवणारं प्रकरण !
खूप उत्कंठा वाढवणारं प्रकरण !.....+१.
* Alfred Hichcock चा Rear
* Alfred Hichcock चा Rear Window >> रोचक माहिती.
युट्युबवर दिसतो आहे.
. .
या प्रकरणाच्या बातम्या वाचत असताना फ्रेंच पोलिसांच्या संदर्भात सातत्याने gendarme हा शब्द वापरलाय. त्याचा अर्थ 'men-at-arms'. हे पोलीस दलातील सैनिक आहेत.
सामान्य पोलिसांपेक्षा यांच्या जवळ अधिक आणि आधुनिक शस्त्रात्रे असतात. हे सैनिक ग्रामीण भागातील अंतर्गत सुरक्षेसाठी तैनात केलेले असतात.
* Alfred Hichcock चा Rear
दु प्र
जर बेपत्ता व्यक्ती चे प्रेत
जर बेपत्ता व्यक्ती चे प्रेत कधीच मिळाले नाही तरी खुनाचा आरोप सिद्ध होतो का?
बेपत्ता होऊन 7 वर्षे झाली आणि
बेपत्ता होऊन 7 वर्षे झाली आणि शोध लागला नाही की मृत घोषित करतात असे ऐकलेले तर अश्या केस मध्ये मृत घोषित केल्यावर नक्की काय होईल त्याचे
या बाबतीत प्रत्येक देशाचे
या बाबतीत प्रत्येक देशाचे कायदे थोडेफार वेगळे असणार. बेपत्ता व्यक्तीचे प्रेत न सापडतात देखील न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवल्याची प्रकरणे वाचायला मिळतात.
या प्रकरणात तर बायको बेपत्ता झाल्यानंतर 40 वर्षांनी तिच्या नवऱ्याला दोषी ठरवलं गेलं आहे.
रोचक व उत्कंठा वाढवणारं
रोचक व उत्कंठा वाढवणारं प्रकरण.
+१
Rear Window >>>
Rear Window >>>
@ भाऊ, धन्यवाद !
या चित्रपटाची टीव्ही आवृत्ती युट्युबवर असून ती पाहिली. खरोखर अप्रतिम.
हिचकॉकचा मूळ चित्रपट 1954 चा आहे.
तर १९९८च्या टीव्ही आवृत्तीची कथा स्तिमित करणारी आहे. Christopher Reeve हा अमेरिकी अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यात घोड्यावरून पडल्याने पॅरालिसीस होऊन जायबंदी होतो. हीच खरीखुरी भूमिका करत त्याने रेअर विंडोची टीव्ही आवृत्ती सादर केलेली आहे.
अप्रतिम अभिनय !
जरूर बघा : https://www.youtube.com/watch?v=cxHT2vhHDb4
. . .
रच्याकने,
या अभिनेत्याने दिव्यांग जीवन वाट्याला आल्यावर व्हीलचेअरवर बसून मणक्याच्या अपघातांसंबंधी संशोधन केलेले आहे, ज्यामध्ये मूळ पेशींच्या संशोधनाचा देखील समावेश आहे.
कौतुकास्पद !!
*हिचकॉकचा मूळ चित्रपट 1954 चा
(*हिचकॉकचा मूळ चित्रपट 1954 चा आहे.* खरंय. पण मला आठवतं, त्यावेळी हॉलिवुडचे सिनेमा भारतात प्रत्यक्ष प्रदर्शित व्हायला कित्येक वर्ष लागत व टीव्ही, व्हिडिओ, यू ट्यूब इ साधनांच्या अभावी बाहेर देशात गाजलेल्या सिनेमांची वाट बघत बसणं खूप त्रासदायक असे. शिवाय, मुंबईत फक्त मोजक्या सिनेमागृहात ( मेट्रो, रिगल, न्यू एम्पायर , इरॉस ) व मर्यादित काळात हे सिनेमा पहायला मिळत. )
* मुंबईत फक्त मोजक्या
* मुंबईत फक्त मोजक्या सिनेमागृहात >>
होय, आणि पुण्यात वेस्टएंड आणि राहुल हेच मुख्यतः. अन्य मोजक्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता इंग्लिश सिनेमे कधीतरी लागायचे.
"राहुल-70 mm" अशी जोरदार जाहिरात असायची त्या काळी !
"अन्य मोजक्या ठिकाणी सकाळी नऊ
"अन्य मोजक्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता इंग्लिश सिनेमे कधीतरी लागायचे.* - मुंबईत मात्र बऱ्याच सिनेगृहात नियमितपणे रविवारी जुने इंग्लिश चित्रपट ' मॉर्निंग शो ' म्हणून दाखवले जात. त्याची जाहिरात होत नसे म्हणून आम्ही दोनतीन मित्र सदोदित सिनेमागृहाबाहेर लावलेले बोर्ड वाचून रविवारचा कार्यक्रम ठरवत असू. हॉलिवूडचे बरेच ' क्लासिक ' आम्ही असे पाहिले आहेत.
रोचक प्रकरण.
रोचक प्रकरण.
त्या मुलाचे वय त्यावेळी १८ महिने. त्यानंतर त्याची साक्ष घेतली असणार. त्या मुलाची साक्ष ग्राह्य धरणार?
ऑनलाईन प्रियकराचे काय झाले.
सीसीटीव्ही फुटेज मधून काहीच हाती लागले नाही का?
प्रेत किंवा खुनासंबधी सबळ पुरावा मिळत नाही तोपर्यंत तो अटकेत राहणार म्हणजे.
* त्या मुलाची साक्ष ग्राह्य
* त्या मुलाची साक्ष ग्राह्य धरणार? >>> बरोबर. तिकडचे कायदेकानू पहावे लागतील.
. .
प्रेत न सापडून देखील आरोपीवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याची अमेरिकेतली 366 प्रकरणे इथे दिली आहेत. त्यात 90% वेळा आरोपी दोषी ठरले आहेत.
इंग्लंडमधले हे प्रकरण तर भन्नाटच आहे. या खुन्याने अनेकांना मारून नंतर त्यांची हाडे ऍसिडचा वापर करून नष्ट केली होती. परंतु त्याच्या शेवटच्या खुनामध्ये संबंधित मृताचा कृत्रिम दात सापडला. तो संबंधित दंतवैद्याने ओळखला आणि हा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले व फासावर चढवले.
*सीसीटीव्ही फुटेज मधून काहीच
*सीसीटीव्ही फुटेज मधून काहीच हाती लागले नाही का?
>>>
या खटल्याचा आतापर्यंतचा वृत्तांत वाचून काही रोचक गोष्टी समजल्या.
जर खून झाला असेल तर,
सेड्रिक त्या प्रेताची (?) विल्हेवाट लावण्यासाठी किती लांब गेला असावा याचा अंदाज घेण्यासाठी त्याच्या फोनमधील pedometer ची तपासणी केली होती. त्यात त्या वेळेच्या पावलांची संख्या खूप कमी दाखवल्याने तो त्यांच्या घरापासून फार लांब गेला नसावा असा निष्कर्ष.
तसेच पोलिसांच्या कुत्रा प्रशिक्षकाचीही साक्ष झाली आहे. त्यात त्यांनी सांगितले की पोलिसांचा कुत्रा सेड्रिकच्या घराभोवतीच तीस मिनिटे वर्तुळाकार फिरत राहिला होता.
*प्रेत न सापडून देखील आरोपीवर
*प्रेत न सापडून देखील आरोपीवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याची अमेरिकेतली 366 प्रकरणे...* -
' The Client ' पुस्तक कुणी वाचलंय, सिनेमा (१९९०) कुणी पाहिलाय ? सिनेटरचा खून झालाय व तो कुणी केला असावा याबाबत अमेरिकेत FBI ला जवळ जवळ खात्री असते पण प्रेत न मिळाल्याने तपास पुढे सरकत नसतो. प्रेताचा सुगावा कसा लागतो, हे कमालीच्या कल्पकतेने व रंजकपणे पुस्तकात व सिनेमात दाखवलं आहे.
Pages