ए आई ~~

Submitted by आईची_लेक on 14 September, 2025 - 12:43

ध्यानीमनी नसताना आई गेल्या रविवारी आई गेली
आम्ही छान गप्पा मारत चालत होतो आणि अवघ्या दहा मिनिटांत आई गेली हे जग सोडून
माझं सगळ जग माझी जिवाभावाची मैत्रीण जिच्याशिवाय आयुष्य जगणं ही कल्पनाही अशक्य वाटायची ती माझी लाडकी आई गेली
आई आणि वडील दोघांचही कर्तव्य पार पाडून मुलांच्या सुखासाठी, आनंदासाठी कायम धडपडणारी माझी आई
सगळ्या संकटांना तोंड देऊन स्वभावाने अगदी निरागस, लहान मुलांसारखी भाबडी असणारी, कुटुंबावर मुलांवर भरभरून प्रेम करणारी माझी आई
आई प्रत्येक अडचणीत पाठीशी उभी राहिलीस, प्रत्येक हौस पूर्ण केलीस
स्वतःच्या आयुष्यात अनंत स्वप्न,इच्छा अपुऱ्या राहिलेल्या असतानाही आमच्या इच्छा पूर्ण करायची अखंड धडपड करत राहिलीस, आमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानलास
किती अपरिमित दुःख सहन केलीस पण सदैव आनंदीत राहिलीस

आई ए आई कशी जगू तुझ्याशिवाय ?
तुला माहितीये ना तुला पाहिल्याशिवाय तुझ्याशी बोलल्याशिवाय मला अजिबात चैन पडत नाही
भविष्याचे किती प्लॅन्स ठरवले होते आपण , दिवाळी कशी साजरी करायची,कुठे कुठे फिरायला जायचं, तू यावर्षी माझ्या सासरी येणार होतीस ना दिवाळीसाठी
अर्धवट सोडून अशी कशी ग गेलीस ?
अजिबात जमत नाहीये तुझ्याशिवाय रहाणं
पुढचे अनेक जन्म तुझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे तूच हवी आहेस ग मला आई म्हणून

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे... खूप वाईट वाटले.
आई नसणे ही अगदी हताश करणारी अवस्था असते..
प्रत्येक क्षण अर्धवट वाटतो...
तुझी मनस्थिती समजू शकते कारण गेले तीन वर्ष मी तोच अनुभव घेतेय.
अचानक जाणे ही अजून धक्कादायक कारण आपल्याला mentally prepare vhyayala वेळ नाही मिळत. आणि ती तगमग खूप जीवघेणी होते.
A warm hug to you...

तुमच्या आईंना श्रद्धांजली. शरीराने सोडून गेल्या असतील तरी त्या सतत तुमच्या सोबत राहतील.
या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना !

तुमच्या आईला श्रद्धांजली. तुम्हाला यातून सावरायचे बळ मिळो.

आठवणी येत राहतीलच पण अश्या व्यक्तीकडून आपल्याला आयुष्यात निरपेक्ष प्रेम मिळाले हेच लक्षात ठेवून समाधान मानायचे.

आईंना श्रद्धांजली.
आईबाप कोणालाच आयुष्यभर नाही पुरत, पण आठवण बनून मनात सदैव राहतात.

अरेरे Sad तुमचा आयडी इतकी वर्षे पाहतोय, तोच खूप काही सांगून जात होता. त्यावरून असं काही वाचायला मिळणं हे फार यातनादाई.

आईंना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_ तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरायचे बळ मिळो हि परमेश्वराकडे प्रार्थना.

अगदी हा अनुभव घेतलाय.. माझ्याच मनातलं लिहिलंय असं वाटलं.
आईला जाउन आता ६ वर्ष झाली पण अजुनही खरं वाटत नाही की ती नाहिये..
तुम्हाला एक घट्ट मिठी... सांभाळा... आई शरीराने जाते पण मनातुन नाही.. आपल्या आत आत असतेच ती रुजलेली..

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
देव तुम्हाला स्वतः ला सावरण्याचे बळ देवो..
आई तुमच्या सोबत च आहे कायम तुमच्या मनात..

भावपूर्ण श्रद्धांजली.
तुम्हाला ह्या धक्क्यातून सावरायचं बळ परमेश्वर देऊ दे...

आईंना भावपूर्ण श्रद्धांजली .तुम्हाला यातून सावरायचे बळ मिळो. स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला एक घट्ट मिठी... सांभाळा...

आई _/\_

तुम्हाला यातून सावरायला बळ मिळो