Submitted by बिपिनसांगळे on 7 September, 2025 - 11:12
गणपती विसर्जनाचा दिवस. डीजेचा दणदणाट आसमंताला भिडलेला. एका मंडळापुढे पोरं तर्राट नाचत होती. एकजण खेळण्यातला हाडाचा सापळा घेऊन नाचत होता. बेभानपणे !
तशा गर्दीत एक लहान मुलगी घुसली. भिक मागायला. सापळावाला तिच्याकडे बघून हसला. त्याने तिला तो सापळा देऊन टाकला. भिक म्हणून . वारे औदार्य!
ती घाबरली ; पण ते एक खेळणंच तर होतं. तो घेऊन ती एका मांडवाच्या मागे गेली. आडोशाला. तिथे तिची आई होती. झोपलेली. तिने आईकडे पाहिलं. मग त्या सापळयाकडे पाहिलं. आणि तिला एकदम हुंदकाच फुटला. तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि तिने तो सापळा एकदम लांब फेकला.
तिची आई म्हणजे हाडाचा एक जिवंत सापळाच तर होती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
कथा पोहोचली!
बाप रे! भेदक वाटली.
बाप रे!
भेदक वाटली.