पाककृती स्पर्धा २: ओव्हरनाइट ओट्स ‘टेस्ट भी हेल्थ भी‘ - दीपांजली

Submitted by दीपांजली on 7 September, 2025 - 03:09

‘चुल न पेटवता + पोटभर‘ म्हंटल्यावर डोक्यात आली ती माझी फेवरेट रेसिपी, ‘पोटभरीचे ओव्हरनाइट ओट्स !
रिच इन न्युट्रियन्ट्स आणि करायला प्रचंड सोपी : हाय इन प्रोटीन, फायबर्स, गुड फॅट्स, हेल्दी कार्ब्ज, ओमेगा थ्री , कॅल्सिअम , अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट्स !
पोट तर इतक मस्तं तृप्तं होऊन भरतं, अगदी रेग्युलर पोळीभाजी भात जेवणापेक्षा जास्त वेळ फुल्ल रहातं !
गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून पण आवडेल !
तर ही घ्या कृति !
साहित्य :
क्विक ओट्स
चिया सिड्स
ग्रीक योगर्ट्/कोणतेही दही
२-३ चमचे दूध
प्रोटिन पावडर (मी व्हॅनिला फ्लेवर घेतली आहे.)
जास्तं पिकलेलं केळं (कुस्करून/ मॅश करून)
फ्रेश स्ट्रॉबेरीज
पीनट बटर (ऑप्शनल)
मनुका/रेझिन्स
फ्रोजन ब्लुबेरीज
बदाम, ड्राय क्रॅनबेरीज, ग्लेझ्ड वॉलनट्स (आवडी प्रमाणे स्लाइस्ड नट्स.)
A6174E6D-41A9-4695-9C40-68123E3B2E54.jpegकृति:
सर्व प्रथम एका कन्टेनर मधे १ चमचा चिया सिड्स टाकून त्यात २-३ चमचे दूघ घालून मिक्स करून घ्या.
यात एक मोठा चमचा ओट्स आणि १ चमचा प्रोटीन पावडर टाका.
एका छोट्या वाटीत ग्रीक योगर्ट थोडं पातळ करून घ्या ,दह्या मधे मनुका टस्क्स्स, कलर आवडत असेल तर मिक्सर मधून काढलेली ब्लुबेरी/ आवडत्या बेरीज/केशर किंवा इतर कुठलाही ऑर्गॅनिक कलर टाका . मी उबे पावडर (पर्पल याम पावडर टाकली आहे.)
261B0B4C-4569-4C82-9D47-363904E2430C.jpegB9E8C124-DDAA-4861-A747-4FB0C271061D.jpeg
हे पातळ केलेलं दही ओट्स मधे टाकून मिक्स करा , यात मॅश केलेलं केळं, आवडत असेल तर पिनट बटर घालून सगळे मिश्रण नीट ढवळा.
315B8144-FB81-4404-A471-9FA043FACBEF.jpeg
साइडने स्ट्रॉबेरीजचे काप लावा.
78195B8E-4172-4DDA-8228-DAF9F2E27B0D.jpeg6A65360A-4AC8-4A30-B79C-9A75D2BA1ECA.jpeg
टॉपिंग मधे फ्रोजन ब्लुबेरीज ठेवा,गार्निश करण्या साठी आवडते नट्स / ड्राय फ्रुट्स टाका.
A5ADAB08-05FB-4F13-811F-771D10A4D739.jpeg
आता डब्याला झाकण लाऊन फ्रिज मधे ठेऊन द्या.
दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्ट्/ब्रन्चला सेट झालेले ओव्हरनाइट्स रेडी आहेत !
सगळे लेयर मस्तं मिळून आले असतील.. चिया सिड्स फुलून आल्या असतील, ओट्स मऊ झाले असतील..मनुका टम्मं फुगल्या असतील.. त्याचा स्विटनेस दह्यात मिक्स झाला असेल…. पिनट बटर बनाना कॉम्बो मुरले असेल , नट्सचा थोडासा क्रन्चीनेस अनुनही तसाच असेल.. मस्तं बॉटम पासून स्कुप बनवा आणि एन्जॉय द बाइट !

CC0411FB-F9E5-4A2F-951B-CDCBAA8A560F.jpeg

प्लेटिंग करताना मी साइडने उबे पावडर (पर्पल याम पावडर स्प्रेड केली आहे.)

E803BF71-3AB6-4173-9B3D-311C5433EF6D.jpegया रेसिपीचा शॉर्ट व्हिडिओही टाकला आहे :
https://youtube.com/shorts/jckFTnhf1T8?si=juGOy9izkPzxQAtL

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भार्री प्लेटिंग! खरोखर पोटभरीचे, टेस्टी आणि हेल्दी . डीजेकडे गेले की हे ब्रेफाला आयते खायला मिळणे ही एक चंगळ असते!

सुंदर दिसत आहेत!! ओट्स इतके छान दिसू शकतात यातच या रेसिपीचे यश आहे Happy

डीजे कडे आता ओट्स खायला जावे लागणार Lol

फारच हेल्दी रेसिपी आहे. खूप सारे ingradients आहेत, पण एखाद दुसरा नसला तरी चवीत फारसा फरक पडणार नाही असं वाटतं.
पर्पल याम पावडरची कल्पना आवडली. त्या निमीत्ताने अशी पावडर असते / मिळते हे कळले. आता शोधणे आले.

थँक्स सगळ्यांना.
शुगोल,
हो, रेसिपी मधे एखादा इनग्रेडियन्ट मिस झाला तर फरक पडणार नाही !
दही+ कुठलही मऊ गर असणारं फळ, बेरीज याची बरीच व्हेरीएशन्स करता येतील.
पर्पल याम पावडरला स्वतःचा स्वाद काहीच नसतो, त्यामुळे आइसक्रिम , कपकेक्स किंवा बर्‍याच मिल्क बेस्ड पदार्थांमधे मस्त रंग येतो !
मी एकदा लॅव्हेन्डर कलरचे डोसे पण केले होते Happy

ओव्हरनाइट फ्रिजमध्ये ठेवण्याची आयडिया आवडली.

एरवी मी थोड्या दुधात ओट्स शिजवते, जरा गार करून त्यात थंडगार दूध घालते, मग राजगिरा लाह्या, सातूचं पीठ, सुका मेवा आणि चमचाभर गुलकंद! - कमाल लागतं.

आता उन्हाळ्यात हे ओव्हरनाईट व्हर्जन करून बघेन.

फारच सुरेख दिसतोय हा पदार्थ.
ओट्स अजिबात आवडत नाहीत. पण कधीतरी काही कारणाने आणलेले उरलेत. कधीतरी करून बघेन. ब्रेकफास्ट ला तिखट आवडते, पण दिवसभरात गोड खायची इच्छा झाली तर स्नॅक म्हणून छान आहे हे.

फोटोत बघून इथे मिळतेय का बघितली पर्पल याम पावडर. मिळतेय. रंगीत ब्रेडसाठी आणून बघायची आहे एकदा.