Submitted by ऋन्मेऽऽष on 6 September, 2025 - 08:47
लोकांनी एकत्र यावे म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. साधारण हाच उद्देश ठेवून हा धागा काढत आहे.
इथे तुमच्या विभागातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा. गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्ती आणि गणपती मंडळाने केलेले छान छान देखावे येऊ द्या.
@ admin - सामान्य सभासदांनी गणेशोत्सव ग्रूपमध्ये हा धागा काढणे योग्य की कसे ते माहीत नाही. पण अयोग्य असल्यास कृपया इतर विभागात दाखल करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल शुक्रवारी पावसाळी
काल शुक्रवारी पावसाळी वातावरणाचा फायदा उचलत ऑफिसला सुट्टी टाकली आणि छत्री सोबत न घेता पावसात भिजत भिजत वाशीतील दोन गणपती बघून आलो.
खरे तर किमान चार ते पाच तास भटकून जास्तीत जास्त गणपती बघायचा प्लान होता. वातावरण इतके सुंदर आणि पावसाळी होते की जराही घाम अथवा थकवा येणार नव्हता. पण दुर्दैवाने ऑफिसमधून अर्जंट कामाचा कॉल आल्याने फक्त दोनच गणपती बघता आले.
१) पहिला वाशी डेपो जवळील वाईल्ड लाईफ जंगल थीम गणपतीबद्दल मायबोलीकर सामीने सुचवले होते.
अर्थात तिने मुलांसाठी म्हणून सुचवले होते. पण त्यांनी ऐनवेळी टांग दिली. तरी मी प्लान न बदलता एकटाच बघून आलो.
बाहेरचे प्रवेशद्वार पाहता खात्री पटली की आत काहीतरी वेगळे बघायला जात आहोत.
आणि आत प्रवेश करताच वेगळ्याच
आणि आत प्रवेश करताच वेगळ्याच विश्वात आल्यासारखे वाटले. चमचमणारे कलरफुल जंगल होते. मुलांना नक्कीच आवडले असते असे वाटले.
.
काही प्राणी हलत होते. पाणी
काही प्राणी हलत होते. पाणी झुळझुळत होते. आणि गवताची सुद्धा सळसळ होती. त्यामुळे चलचित्र इफेक्ट आला होता.
२) दुसरा गणपती तिथलाच वाशी
२) दुसरा गणपती तिथलाच वाशी हायवे जवळचा पाहिला. दरवर्षी तिथे जातोच. कारण त्यांचा नेहमीच काहीतरी देखावा असतो. अश्या ठिकाणी फार गर्दी नसल्यास छान वाटते. कोणी हाकलेपर्यंत बाहेर जाऊ नये असेच वाटते. मधल्या वारी दुपारची वेळ असल्याने दोन्ही ठिकाणी ते माझ्या नशिबात होते. मुले सोबत नसल्याने दोन्ही ठिकाणी मनसोक्त फोटोच नाही तर स्टार्ट टू एंड व्हिडिओ सुद्धा काढता आले. इथे मात्र आता फोटोच देतो.
.
अहाहा भव्य आणि दिव्य!
अहाहा भव्य आणि दिव्य!
आणि हा आमच्या मुंबईतील
आणि हा आमच्या मुंबईतील घरासमोरचा,
अंजीरवाडीतील सुप्रसिद्ध गणपती.
काही वैयक्तिक कारणांनी काल रात्री जाता आले नाही आणि आज सकाळीच दर्शनाला गेलो तर ते मिरवणूक लवकर काढत असल्याने मी पोहोचायच्या आधीच मूर्ती मंडपाच्या बाहेर काढली होती.
रिकाम्या मंडपाचे फोटो काढावेत की नाही या शास्त्राबद्दल कल्पना नाही. पण मूर्तीशिवाय भव्यदिव्य मखर सुद्धा किती भकास वाटते याची प्रचिती आली.
सुंदर फोटो आहेत सगळेच.
सुंदर फोटो आहेत सगळेच.
ऋ, भारीच! मजा आली पाहताना.
सुंदर आहेत सगळे देखावे. मला
सुंदर आहेत सगळे देखावे. मला विशेष आवडला तो अंजीरवाडीचा..
Save wild life वालाही कल्पक.
धाग्याची कल्पना आवडली.
वाईल्ड लाईफ फार आवडला.
वाईल्ड लाईफ फार आवडला. तुमच्या धाग्यामुळे हे सगळं भारतात असतं - ते पहायला मिळाले ऋन्मेष. तुमचे बागांचे, राणीबागचे फोटो असेच आवडतात.
तुमच्या धाग्यामुळे हे सगळं
तुमच्या धाग्यामुळे हे सगळं भारतात असतं - ते पहायला मिळाले >> +१
शाळेत असताना सगळे मिळून गणपती पाहायला जायचो, ते आठवलं. तेव्हा देखाव्यांच्या स्पर्धा सुरू झाल्या होत्या एकेक करून..
हो, त्या सुरुवातीच्या काळात
अस्मिता, सामो, छन्दिफन्दि धन्यवाद
आणि हो, त्या सुरुवातीच्या काळात देखाव्यांच्या स्पर्धा सिरीयसली घेतल्या जायच्या. त्यात त्यांचा शो असला की दर वेळी ठराविक लोकं आत घ्यायचे. जिथे फार विशेष नसायचे तिथे देखील लोकं तासतासभर लाईन लाऊन असायचे. आज एखाद्याला प्रश्न पडावा की इतके लाईनीत जीव जाळत उभे राहावे असे त्यात काही विशेष असायचे का? पण त्या काळातली मजा त्या काळातच कळते. लोकं आवड म्हणूनच रांगेत उभे राहायचे.
असो, आजच्या अंजीरवाडी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचे फोटो उद्या शेअर करतो. अजूनही छोटेमोठे गणपती बघणे झाले ते ही घेतो. तोपर्यंत अजून कोणी आपल्या इथल्या गणपतींचे फोटो शेअर केले तर आवडेल. स्पेशली पुणेकरांनी मनावर घेतले तर तिथले बघायला मिळतील
>>>>>स्पेशली पुणेकरांनी मनावर
>>>>>स्पेशली पुणेकरांनी मनावर घेतले तर तिथले बघायला मिळतील Happy
वाड्यावर आम्हाला दगडूशेठचे दर्शन घडलेले. पण जिलब्या मारुती, अमकी आळ तमकी बाग असे बरेच आहेत पुण्यात.
हो पुण्याचे मानाचे पाच असतात
हो पुण्याचे मानाचे पाच असतात ना!
त्यांच्या शिस्तबद्ध मिरवणुकी... मला वाटतं ढोल ताशा, लेझीम मिरवणुकीच मूळ तिकडेच आहे .
मुंबई मध्ये उगाच धांगड धिंगा, गुलाल... आता माहीत नाही. अर्थात तरी आम्ही मिरवणुका बघायला थांबायचो.
एकच मंडळ होतं ज्यात ते ७-८ ट्रक न्यायचे. त्यात वेगवेगळे लोक नृत्य करणारे ग्रुप्स असायचे, पुढे झेंडे, लेझीम वगैरे असायचं.. त्यांचा गणपती उशिरा जायचा... मोठी माणसं पण यायची बघायला.
ठाण्याला तलाव पाळीवर गणपती जायचे.
त्यात त्यांचा शो असला की दर
त्यात त्यांचा शो असला की दर वेळी ठराविक लोकं आत घ्यायचे. >>
काही ठिकाणी / वर्षी चांगल असे. आणि बक्षीस मिळालं की रिपीट करायचे थीम थोडासा बदल करून..
सेव्ह वाइल्ड लाइफ वाल्यांचे
सेव्ह वाइल्ड लाइफ वाल्यांचे सगळे थर्मोकॉल, प्लास्टिक आणि तत्सम ट्रॅश जंगलात जाऊन वाइल्ड लाइफच्याच मुळाशी उठणार आहे हे जाणवून माझा आनंद मावळला.
पण मला वाटते १९९३ ते २००० हा देखावे लाईटिंग यांचा सुवर्णकाल म्हणावे लागेल. मधे एक स्वीट पीरियड येऊन गेला जेव्हा DJ नवाचा प्रकारच बोकाळाला नव्हता आणि मंडळांमध्ये हलत्या देखव्यांची सुप्त स्पर्धा असायची.
सेव्ह वाइल्ड लाइफ वाल्यांचे
सेव्ह वाइल्ड लाइफ वाल्यांचे सगळे थर्मोकॉल, प्लास्टिक आणि तत्सम ट्रॅश जं.>>> मी अध्याह्रृत धरलं की त्यांनी थर्माकोल वापरलं नसेल. Reusable/ recycle able असेल सगळं..
(No subject)
(No subject)
दरवर्षी या गणपतीवर तसेच देवीवर आमच्या बिल्डिंगमधून कल्पक पद्धतीने पुष्पवृष्टी होते. पण यंदा आदल्या दिवशीच एक अप्रिय घटना घडल्याने ते टाळले. मिरवणुकीने सुद्धा सन्मान दाखवत आमची बिल्डिंग ओलांडेपर्यंत ढोलताशे वाजवायचे थांबवले.
सुरेख फोटो ऋ ! ह्या सगळ्यांशी
सुरेख फोटो ऋ ! ह्या सगळ्यांशी संबंधच राहिला नाही आता, फक्त नॉस्टॅल्जिया. चांगले वाटले पाहून.