पाककृती स्पर्धा ३ - सफरचंदाचे रसम- मायबोली आयडी -आ_रती

Submitted by आ_रती on 5 September, 2025 - 14:24

टोमॅटो रसम. पेपर रसम वगैरे नेहमीच केले जाते . पण हे अँपल किंवा सफरचंदाचे रसम ही खूप मस्त लागते. याला किंचित गोडसर चव येते. त्यामुळे थोडे वेगळे रसम लागते. कृती एकदम सोपी व कमीतकमी साहित्य आहे.

साहित्य :

सफरचंद - १ मोठा किंवा २ लहान. मी शक्यतो ग्रॅनी स्मिथ / हिरवेच वापरते कारण ते थोडेसे आंबट गोड चव देते.
तूर डाळ - १ /४ कप
टोमॅटो - २
हिरव्या मिरच्या - २
मिरे - ८ /१ ० दाणे
जिरे - १ टीस्पून
हळद पावडर - ½ टीस्पून
हिंग - चिमूटभर
मीठ - चवीनुसार
तेल
कोथिंबीर - सजवण्यासाठी
फोडणीसाठी - तूप, मोहरी, जिरे, कढीलिंब
IMG_5002.jpg

कृती :
१ . प्रथम तूर डाळ प्रेशर कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावी .
IMG_5009.jpg
२ . सफरचंद स्वच्छ धुवून साल काढून घ्यावे . अर्ध्या सफरचंदाचे बारीक तुकडे करावे . अर्धे वाटणात ठेवावे .
३ . आता मिक्सरमध्ये टोमॅटो, उरलेले सफरचंद, जिरे, मिरे आणि हिरव्या मिरच्या एकत्र थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
४ . एका सॉसपॅनमध्ये १ कढईत १ चमचा तेल गरम करून त्यात थोडे जिरे व चिरलेली सफरचंद घालून ५ मिनिटे परतून घ्यावे .
IMG_5011.jpg
५ . आता त्यात वाटण घालावे. हळद पावडर, मीठ घालावे. एक उकळी येऊ द्यावी.
६ . शिजवलेली तुरीची डाळ घोटून घ्यावी व १ कप पाणी घालून पातळ करावी.
७ . टोमॅटो-सफरचंद मिश्रण साधारण १० मिनिटे उकळले की, त्यात डाळीचे पाणी घालावे. छान उकळल्यानंतर गॅस बंद करा.
८ . फोडणी- १ चमचा तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीलिंब, सुकी मिरची घालावी. ही फोडणी रसममध्ये घालावी व झाकण बंद करून थोडा वेळ ठेवावे.
IMG_5020.jpg

सफरचंद रसम कोथिंबीरने सजवावे. गरमागरम रसम भाताबरोबर किंवा नुसते सूपसारखे खाता येईल.
टीप
१. यात कांदा वगैरे घालू नये.
२ . रसम मध्ये आवडीनुसार पाणी घालून पातळ करून घ्यावे.
३ . शक्यतो ग्रॅनी स्मिथ (हिरवे) सफरचंद वापरावे किंवा लाल सफरचंद आंबट निघाल्यास ते वापरावे.
IMG_5024.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त.

सर्वांचे धन्यवाद .

चव कशी असेल काय कळत नाही.>>> चव किंचितशी गोड लागते व सफरचंदाचा distinct फ्लेवर येतो. नेहमी रसम जसे tangy spicy असते तसे नाही लागत.

छान दिसत आहे..
जेवणाआधी हे प्यायला आवडेल.. ज्याने तोंडाला चव येईल