काही मराठी पुस्तकांची यादी

Submitted by संप्रति१ on 5 September, 2025 - 13:54

मराठीतल्या आजवरच्या काही आवडलेल्या जुन्या-नव्या पुस्तकांची नावं एकाजागी उपलब्ध असावीत म्हणून ही यादी केलेली आहे. इन केस कुणाकडचा स्टॉक संपला असेल आणि शोध वैयक्तिक पातळीवर चालू असेल तर या यादीची मदत होऊ शकेल. बाकी, यातून बरीचशी नावं अनावधानाने किंवा विस्मृतीमुळे किंवा अज्ञानापोटी (किंवा मुद्दामही !) राहून गेलेली असण्याची शक्यता गृहीत धरलेली आहे. भविष्यात अनेकांच्या नजरेखालून गेल्यानंतर हा प्रकार अपडेट होत राहिल्यास, किंवा यानिमित्ताने कुणाला आणखी काही आठवल्यास आनंदच आहे.

१. तर उदाहरणार्थ कादंबऱ्या :-

  • रणांगण-- विश्राम बेडेकर
  • कोसला-- भालचंद्र नेमाडे
  • सात सक्कं त्रेचाळीस-- किरण नगरकर
  • बिढार, हूल, जरीला, झूल -- भालचंद्र नेमाडे
  • हिंदू..जगण्याची समृद्ध अडगळ-- भालचंद्र नेमाडे
  • कोंडुरा, रात्र काळी घागर काळी -- चि त्र्यं खानोलकर
  • चक्र -- जयवंत दळवी
  • बनगरवाडी--व्यंकटेश माडगूळकर
  • रथचक्र, तुंबाडचे खोत-- श्री ना पेंडसे
  • पालखी-- दि बा मोकाशी
  • कादंबरी एक-- विजय तेंडुलकर
  • मुंबई दिनांक--अरूण साधू
  • अंताजीची बखर, बखर अंतकाळाची-- नंदा खरे
  • उद्या, संप्रति-- नंदा खरे
  • हारण, ताम्रपट-- रंगनाथ पठारे
  • नामुष्कीचे स्वगत, चोषक फलोद्यान-- रंगनाथ पठारे
  • सातपाटील कुलवृत्तान्त-- रंगनाथ पठारे
  • धग-- उद्धव शेळके
  • डांगोरा एका नगरीचा-- त्र्यं वि सरदेशमुख
  • एम टी आयवा मारू, ओश्तोरीज-- अनंत सामंत
  • एन्कीच्या राज्यात--विलास सारंग
  • गौतमची गोष्ट--अनिल दामले
  • एकेक पान गळावया-- गौरी देशपांडे
  • रीटा वेलिणकर-- शांता गोखले
  • नातिचरामि-- मेघना पेठे
  • ब्र, भिन्न -- कविता महाजन
  • चारीमेरा, बारोमास-- सदानंद देशमुख
  • मेड इन इंडिया--पुरूषोत्तम बोरकर
  • वाटसरू--यशवंत भागवत
  • बिनधास्त, उभयान्वयी अव्यय, विषयांतर-- चंद्रकांत खोत
  • गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी-- मकरंद साठे
  • अच्युत आठवले आणि आठवण-- मकरंद साठे
  • ऑपरेशन यमू, त्रिविधा-- मकरंद साठे
  • मंत्रचळ उर्फ वास्तुशांती-- दामोदर प्रभू
  • गवत्या-- मिलिंद बोकील
  • प्रेम आणि खूप खूप नंतर-- श्याम मनोहर
  • कळ, आम्ही हळहळ पावलो, अखेरीस नयनाची गोष्ट -- श्याम मनोहर
  • श्रीमंत गोपिकाबाईंची बखर, अस्वस्थ वर्तमान, डॉ. मयांक अर्णव-- आनंद विनायक जातेगावकर
  • व्हाया सावरगाव खुर्द-- दिनकर दाभाडे
  • बाकी शून्य -- कमलेश वालावलकर
  • एक दोन चार अ, पुरोगामी-- राकेश वानखेडे
  • अतीत कोण ? मीच-- प्रसाद कुमठेकर
  • पान पाणी आणि प्रवाह, एका लेखकाचे तीन संदर्भ--अवधूत डोंगरे
  • खिडकीचा आरसा-- अवधूत डोंगरे
  • खेळघर-- रविन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • नवल-- प्रशान्त बागड
  • विश्वामित्र सिण्ड्रोम--पंकज भोसले
  • अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट-- आनंद विंगकर
  • दिसें वाया गेलों--अरविंद रे
  • बांडगूळ आख्यान-- मोहन पाटील
  • भुई भुई ठाव दे-- सीताराम सावंत
  • जंजाळ, श्वास-- विक्रम त्र्यंबक भागवत
  • कोबाल्ट ब्ल्यू, मोनोक्रोम-- सचिन कुंडलकर
  • आदिमायेचे, श्वासपाने-- राही अनिल बर्वे
  • करुणापटो -- मृद्गंधा दीक्षित
  • आटपाट देशातल्या गोष्टी, मनसमझावन -- संग्राम गायकवाड
  • जाईच्या घरी जाई-- जी के ऐनापुरे
  • अवकाश, ओस निळा एकांत-- जी के ऐनापुरे
  • खून पहावा करून --इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर
  • कानविंदे हरवले, दंशकाल -- हृषीकेश गुप्ते
  • माया महा ठगनी-- संवेद गळेगावकर
  • गुरू--नितीन कोतापल्ले
  • निळावंती-- नीतीन भरत वाघ
  • सिद्ध-- राजन खान

२. कथासंग्रह :-

  • चिमणरावांचे च-हाट-- चिं वि जोशी
  • काजळमाया, सांजशकुन, पिंगळावेळ, रमलखुणा--जी ए कुलकर्णी
  • ऑर्फियस-- दि पु चित्रे
  • विवेक मोहन राजापुरे यांच्या कथा-- लोकवाड्मयगृह प्रकाशन
  • गाभ्यातील प्रकाश, चित्रमय चतकोर, जोखमीच्या सावल्या-- रंगनाथ पठारे
  • स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग, तीव्र कोमल दुःखाचे प्रकरण-- -- रंगनाथ पठारे
  • आहे हे असं आहे-- गौरी देशपांडे
  • कांतार, तळ्याकाठच्या सावल्या-- अनिल रघुनाथ कुलकर्णी
  • अदृष्ट, रक्तातल्या समुद्राचं उधाण, शुभवर्तमान -- भारत सासणे
  • हंस अकेला, आंधळ्याच्या गाई -- मेघना पेठे
  • पिवळा पिवळा पाचोळा-- अनिल साबळे
  • दीड दमडीना, हुसेनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका--वर्जेश सोळंकी
  • लिहायची राहिलेली पाने-- पृथ्वीराज तौर
  • फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा-- जयंत पवार
  • दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी-- बालाजी सुतार
  • बाळूच्या अवस्थांतराची डायरी, श्रीलिपी -- किरण गुरव
  • राखीव सावल्यांचा खेळ, क्षुधाशांती भुवन--किरण गुरव
  • हरवलेल्या कथेच्या शोधात--सीताराम सावंत
  • गॉगल लावलेला घोडा-- निखिलेश चित्रे
  • नऊ चाळीसची लोकल-- शिल्पा कांबळे
  • हलते डुलते झुमके-- मनस्विनी लता रवींद्र
  • विवादे विषादे प्रमादे प्रवासे-- प्रशान्त बागड
  • डेथबेडवरून क्लायमॅक्स-- सतीश तांबे
  • निकटवर्तीय सूत्र, नासमाया-- जी के ऐनापुरे
  • हिट्स ऑफ नाईंटी टू-- पंकज भोसले
  • 5960 आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा-- इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर
  • डेट विथ देवदास-- योजना यादव
  • भास ११.२४-- भास प्रकाशन

३. ललित :-

  • डोह-- श्रीनिवास विनायक कुलकर्णी
  • किमया, जास्वंद, पत्र-- माधव आचवल
  • आणि मी - विजय तेंडुलकर
  • सांजी-- मनोहर सप्रे
  • मौनराग, त्रिबंध-- महेश एलकुंचवार
  • बिन्दूनादकलातीत-- महेश एलकुंचवार
  • कालकल्लोळ--अरुण खोपकर
  • जी.ए. एक पोर्ट्रेट-- सुभाष अवचट (संस्मरण, आठवणी)
  • कुब्र -- सत्यजीत पाटील

४. वैचारिक/ निबंध/ प्रबंध/ रिपोर्ताज/ लेखसंग्रह :-

  • शेतकऱ्याचा आसूड-- रा. जोतीराव फुले
  • हाल सातवाहनाची गाथासप्तशती--संपादन: स आ जोगळेकर
  • लीळाचरित्र-- संपादन: डॉ. वि भि कोलते
  • आज्ञापत्र--रामचंद्रपंत अमात्य
  • शूद्र कोण होते, जातिव्यवस्थेचे निर्मूलन -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • राजर्षी शाहू : पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ-- ( संपादक: डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. मंजुश्री पवार)
  • तुकाराम दर्शन-- डॉ. सदानंद मोरे
  • लोकमान्य ते महात्मा--डॉ. सदानंद मोरे
  • व्यासपर्व-- दुर्गा भागवत
  • युगांत-- इरावती कर्वे
  • शिवरात्र, जागर, आकलन, मागोवा, व्यासांचे शिल्प-- नरहर कुरुंदकर
  • आस्थेचे प्रश्न, सत्त्वाची भाषा, प्रश्नांकित विशेष -- रंगनाथ पठारे
  • टीकास्वयंवर, निवडक मुलाखती, सोळा भाषणे-- भालचंद्र नेमाडे
  • वैवाहिक जीवन-- के पी भागवत
  • भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास--वि का राजवाडे
  • नपेक्षा-- अशोक शहाणे
  • निवडक अबकडइ-- संपादक: सतीश काळसेकर, अरुण शेवते
  • भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता-- प्रा. फकरुद्दीन बेन्नूर
  • व्यक्ती आणि व्याप्ती-- विनय हर्डीकर
  • विठोबाची आंगी-- विनय हर्डीकर
  • ऐवज - स ह देशपांडे
  • आयडियाज् आर डेंजरस - राजू परुळेकर
  • छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती-- रंगनाथ पठारे, सुमती लांडे (रिपोर्ताज)
  • माणदेश : दरसाल दुष्काळ-- आनंद विंगकर (रिपोर्ताज)
  • जनाचे अनुभव पुसतां-- मिलिंद बोकील (रिपोर्ताज)
  • साहित्य, भाषा आणि समाज-- मिलिंद बोकील
  • वैचारिक घुसळण-- आनंद करंदीकर
  • नाही मानियले बहुमता-- नंदा खरे
  • रेघ-- अवधूत डोंगरे

५. काव्य :-

  • गाथा-- तुकाराम बोल्होबा आंबिले-मोरे
  • मेलडी, देखणी, सट्टक -- भालचंद्र नेमाडे
  • एकूण कविता-- दि पु चित्रे
  • जेजुरी-- अरुण कोलटकर
  • नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता-- नारायण सुर्वे
  • जंगलझडी-- उत्तम कोळगावकर
  • गोलपिठा, तुही यत्ता कंची ?-- नामदेव ढसाळ
  • भिजकी वही-- अरुण कोलटकर
  • नंतर आलेले लोक-- अरुण काळे
  • ग्लोबलचं गावकूस -- अरुण काळे
  • आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते-- सुदाम राठोड
  • स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना-- विशाखा विश्वनाथ
  • काळ्या जादूचे अवशेष-- सत्यपाल सिंग राजपूत
  • वेरविखेर-- वर्जेश सोळंकी
  • धांदलमोक्ष-- स्वप्नील शेळके

६. आत्मचरित्रं / चरित्र :-

  • स्मृतिचित्रे -- लक्ष्मीबाई टिळक
  • निवेदन -- धर्मानंद कोसंबी
  • एक झाड दोन पक्षी-- विश्राम बेडेकर
  • मी हिंदू झालो-- डॉ. रविन थत्ते
  • अर्धविराम, माझं संचित-- यशवंतराव गडाख
  • हमरस्ता नाकारताना -- सरिता आवाड
  • आयदान-- उर्मिला पवार
  • वानप्रस्थ-- गणेश देवी
  • दगडावर दगड, विटेवर वीट-- नंदा खरे
  • एक होता कार्व्हर-- वीणा गवाणकर
  • बुद्धलीला, भगवान बुद्ध-- धर्मानंद कोसंबी
  • टॉलस्टॉय एक माणूस-- सुमती देवस्थळे
  • नाझी भस्मासुराचा उदयास्त-- वि ग कानिटकर
  • व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ-- वि ग कानिटकर
  • नरकातला स्वर्ग -- संजय राऊत (तुरुंगवासातील अनुभवकथन)
  • तुरूंगरंग -- रवींद्रनाथ पाटील (तुरुंगवासातील अनुभवकथन)
  • नशायात्रा -- तुषार नातू (अनुभवकथन)
  • रूळानुबंध -- गणेश मनोहर कुलकर्णी (अनुभवकथन)
  • आपुले आपण – जैत (अनुभवकथन)

७. 'बुक ऑन बुक्स' :-

  • वाचणाऱ्याची रोजनिशी-- सतीश काळसेकर
  • लीळा पुस्तकांच्या-- नितीन रिंढे
  • पासोडी -- नितीन रिंढे
  • वाचन प्रसंग -- नीतिन वैद्य
  • आडवाटेची पुस्तकं -- निखिलेश चित्रे
  • पुस्तकनाद-- जयप्रकाश सावंत
  • नवं जग नवं साहित्य-- विश्राम गुप्ते
  • कवडसे पकडणारा कलावंत (चेकॉव्ह आणि त्याची कथा)-- विजय पाडळकर

८. पत्रसंग्रह :-

  • विश्रब्ध शारदा-- संपादन: ह. वि. मोटे
  • जी. एं. ची निवडक पत्रे (चार खंड)-- जी ए कुलकर्णी
  • प्रिय जी.ए.-- सुनीता देशपांडे
  • पत्र आणि मैत्र -- दिलीप माजगावकर

९. अध्यात्मिक/ स्पिरिच्युअल :-

  • आत्मज्ञान आणि परात्मयोग -- निसर्गदत्त महाराज
  • सुखसंवाद - निसर्गदत्त महाराज
  • अमृतानुभवाच्या वाटेने-- डॉ. व दि कुलकर्णी
  • ज्ञानेश्वरी: एक अपूर्व शांतिकथा-- डॉ. व दि कुलकर्णी
  • जग दर्शन का मेला-- रमणाश्रित

१०. प्रवास वर्णन :-

  • माझा प्रवास-- गोडसे भटजी
  • नर्मदे हर हर-- जगन्नाथ कुंटे
  • दुर्गभ्रमणगाथा-- गो नी दांडेकर
  • पायपीट-- सतीश काळसेकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्गीकरण केले आहे. अगदी संग्रही ठेवण्यासारखे. यातली बरीचशी वाचली आहेत पण पुष्कळ न वाचलेलीही आहेत. धन्यवाद.‌ Happy

एकूण यादी व्यक्तिसापेक्ष आहे असे वाटले त्यामुळे इतरेजन त्यात भर कशी टाकणार? तरी पण
मिसिंग
ज्ञनेश्वर माउली. बा सी मर्ढेकर मंगेश पाडगावकर आरती प्रभू ग्रेस. केशवसुत, कुसुमाग्रज, गडकरी, मतकरी.
आणि आमचे विज्ञान कथा लेखक. कदाचित ते अभिजात वाङ्मय ह्या प्रकारात मोडत नसावे.

आत्ता मी जर लिहिले की मी बाबुराव अर्नाळकर आणि नारायण धारप ह्यांचा फॅन आहे तर तुम्ही हसणार. त्यांची नावे ह्या यादीत नाहीत याबद्दल अजिबात तक्रार करणार नाही.

त्याचे काय आहे ना की आपण म्हणजे मराठी वाचक कुठल्या तरी दुसरया विश्वात रहात आहोत.
मी इथेच प्रश्न केला होता की "Blade Runner" कुणी पाहिला आहे का? Dead Silence.
तसेच एका नोबल विजेत्या लेखकाने लिहिलेले पुस्तक "Clara and the Sun" बद्दल लिहिले होते, कुणालाही इंटरेस्ट नाही.
कसे होणार?