शशक ३ – मागोवा – प्राचीन

Submitted by प्राचीन on 5 September, 2025 - 09:46

दशकानुदशकं मायबोलीवरील गणेशोत्सव
गवसलेले काही स्पर्धा \उपक्रम अभिनव.
कथासाखळी, स्वरचित आरत्या फुलविती प्रतिभा,
मुलाखती, चित्रचारोळ्या वाढविती शोभा.
फोटोंना नाव, कवितेवरून चित्र, एकपानी कथा आवडती सकळां,
हास्य चित्र, आमंत्रण लेखन यांतून खुलती नाना कळां.
ठो - उपमा, अतरंगी जाहिराती, ‘उंदीरमामा टोपी हरवली’ हे विषय आगळे,
माझी युक्ती, कथापूर्ति, बकेट लिस्ट अन् हस्तलेखनाने रमती सगळे.
अप्रसिद्ध गणपती मंदिरे, लॉकडाऊनचे अनुभव अनिवार्य,
लेकरांसाठी खास उपक्रम, पाककृतींचे फोटो नसती अपरिहार्य.
शशकसारख्याच रोचक सोळा आण्यांच्या गोष्टी ,
संयोजनासाठी पूर्वी 'याहू' न, वेगळी ‘मेलामेलीची’ सृष्टी..
गणेशवंदनातून, जगभरातील मराठी मनांचे जुळतसे सुरेख स्पंदन..
म्हणून म्हटतेय, " हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही? ”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>गणेशवंदनातून, जगभरातील मराठी मनांचे जुळतसे सुरेख स्पंदन..
+१००
प्रत्येक आयडी खास आहे. मराठी आहे म्हणुन आपल्याला एकमेकांविषयी किती आत्मियता वाटते. किती एका मातृभाषेच्या धाग्याने आपण सारे बांधलेलो आहोत. मतभेद व भांडणं पण आहेत Wink पण जास्त प्रेम आहे.

छान लिहिले आहे प्राचीन
आतापर्यंतच्या सर्व संयोजकांच्या कामाची ही पावती आहे..
खरेच अती करतात. वाचूनच दम लागला Happy