पाककृती स्पर्धा ३ - पेअर, सफरचंद आणि गाजराचे सूप - अनिता

Submitted by अनिता on 5 September, 2025 - 03:42

पेअर, सफरचंद आणि गाजराचे सूप
घटक पदार्थ:
पेअर - १
सफरचंद - १ (मी हिरवे सफरचंद घेतले)
गाजराचे तुकडे - १ कप
बदाम (भिजवून सोललेले) - ९ ते १०
किसलेले आले - १/४ चहाचा चमचा
तिखट - १/२ चहाचा चमचा
जिरेपूड - १/४ चहाचा चमचा
जिरे - १/२ चहाचा चमचा
तमालपत्र - १
दालचिनी - एक तुकडा (चित्रमध्ये आकार दिसेल)
लवंगा - ६
काली मिरी - १०
मीठ - १/२ चहाचा चमचा (आपापल्या चवीनुसार)
पाणी -दीड कप
(Unsalted) बटर - १ टेबलस्पून
सजावटी साठी
बदामाचे काप - ३ बदामाचे
आल्याचे लांबट तुकडे - ८ ते १०
नारळाचे घट्ट दूध - २ टेबलस्पून
संत्र्याच्या सालीचा झेस्ट - १/२ चमचा
चिली ऑइल - एक चमचा
बरोबर खाण्यासाठी - केळ्याचे वेफर्स (ऐच्छिक)

कृती

(१) एका छोट्या वाटीमध्ये अर्धा-पाव (चिमूटभर) तिखट आणि १/२ चमचा तेल घालून ठेवावे. हे chilli oil नंतर सजावटीसाठी वापरायचे आहे.
(२) मसाल्याचे पदार्थ (तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे आणि जिरे) आणि गाजराचे तुकडे गरम पाण्यात ५ ते ८ मिनिटे उकळावे. झाकण लावून १० मिनिटे ठेवावे, त्याने मसाल्यांचा स्वाद उतरेल.
(३) पेअर आणि सफरचंदाचे साल काढून तुकडे करावे. (एक कप गाजराला ३ कप फळांचे तुकडे असावेत).
(४) स्टेप १ मध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि मिरी बाजूला काढून घ्यावे. उकडलेले गाजराचे तुकडे, सोललेले बदाम आणि स्टेप २ मधील फळांचे तुकडे ब्लेंडर मधून फिरवून घ्यावे.
(५) स्टेप ४ मधील बाजूला काढून ठेवलेले लवंग आणि मिरीचे दाणे पुन्हा वापरता येतील. दुसऱ्या भांड्यामधे बटर गरम करून त्यात तीन चार लवंगा आणि चार पाच मिरी दाणे परतून घ्यावे. गाजर आणि फळांचा पल्प त्यावर घालावा.
(६) अजून अर्धा कप पाणी घालून उकळण्यास ठेवावे. उकळताना त्यात, तिखट, मीठ, जिरेपूड घालावे. एक उकळी आली की झाकण लावून ५ मिनिटे मुरू द्यावे.
(६) मोठ्या बाउल मध्ये काढून सजावटीचे सामान (नारळाचे दूध, आल्याचे तुकडे, बदामाचे काप, किसलेली संत्र्याची साल आणि chilli oil पसरावे.
(७) बरोबर खाण्यासाठी crispy पदार्थ, जसे की बनाना चिप्स.

फोटो:
Screenshot 2025-09-05 113108.pngScreenshot 2025-09-05 113528.pngScreenshot 2025-09-05 113648.png

टीपा:
(१) गाजर हे घट्टपणा येण्यासाठी वापरले आहे. गाजराऐवजी रताळे, भोपळा किंवा बीट वापरता येईल. इंटरनेटवर रताळे आणि पीच सूप अशी रेसिपी आहे, पण त्याचा रंग जरासा फिकट येतो. बीट वापरले तर त्याच्या गोड़ चवीमुळे मसाले आणि तिखट थोडे जास्त वापरावे लागेल.
(२) मी घेतलेले सफरचंद आंबट होते, त्यामुळे आंबट चवीसाठी काही घातले नाही. जर सफरचंद आंबट नसेल तर आंबटपणासाठी लिंबू किंवा संत्र्याचा ज्यूस सर्व्ह करताना घालता येईल.
(३) संपूर्ण बदामाऐवजी बदाम पावडर पण घालता येईल.
(४) पाणी दीड कपापेक्षा जास्त घेऊन थोडे पातळ करता येईल, पण असे घट्टसर सूप पोटभरीचे होते.
(५) हे सूप एक्दम गरम पिण्यापेक्षा थोडे थंड झाल्यावर जास्त चांगले लागते. मसाल्याची चव मुरते.
(६) मी ह्यात साखर घातली नाहीये, पण तुम्ही घालू शकता.

Source: Internet + My experiments

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे रेसीपी. अगदी पोटभरीचे होईल.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे फॉल मध्ये गाजरा ऐवजी भोपळा घालून मस्त होईल. आणि थंडीत प्यायला गरम चांगले लागेल.

नवीन प्रतिसाद लिहा