Submitted by छन्दिफन्दि on 5 September, 2025 - 02:25
स्थळ : बँक, अमेरिका
काउंटरवरच्या बाईने हसून हिंदीत त्याच गाव विचारलं, स्वतःच सागितलं.
साहजिकच त्यालाही जरा आपलेपणा वाटला.
म्हणूनच चेक देताना तो अवघडत बोलून गेला, “आकडा तसा छोटा आहे पण बऱ्याच अवधीने पगाराचा चेक मिळालाय.”
मंदसं हसली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
“आकडा असू दे, पण पगाराचा चेक मिळालाय,नोकरी आहे ते जास्त महत्वाचं. गुडलक!”
तिच्या धीराच्या शब्दांनी सुखावलेला तो ही “गुडलक” म्हणत वळला.
तशी तिचं हसू मावळलं, “Thank you. I need it badly. Blanket ऑपरेशन कॉस्ट कमी करणार असल्याची नोटीस सकाळीच आलीय.. ही नोकरी जातेय की राहतेय, कोणास ठाऊक..?” पुटपुटत तिने दीर्घ विश्वास सोडला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे, आवडली.
छान आहे, आवडली.
सहमत. पगार थोडा कमी असला तरी हाताला काम असणे महत्वाचे.
अच्छा कंपनीचं बजेट नाहिये.
अच्छा कंपनीचं बजेट नाहिये. आत्त कळली.
माबो वाचक आणि सामो धन्यवाद!
माबो वाचक आणि सामो धन्यवाद!
तुमचे प्रतिसाद वाचताना जाणवलं की गोष्टीत नीट क्लॅरिटी नाही दिसत आहे. थोडे बदल केलेत. .