शशक १ - Cleansing - रॉय

Submitted by रॉय on 4 September, 2025 - 14:45

सहस्रकांतून लाभणारा क्षण! अभ्युत्थानमधर्मस्य युगानुयुगानंतर संभवलेले प्रधानसारथी मंचावर उतरले. रक्तगडासमोर लाखो लोकांचा जल्लोष सुरू झाला. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला दीडशे वर्षापूर्वीचा गौरवशाली हॉलोकॉस्ट याची डोळा पाहायला मिळणार म्हणून आनंदाने चिरकाळ्या फुटल्या. ड्रोन्सचा मोहोळ उठला होता. घराघरात, रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकात प्रचंड स्क्रीन्सवर, कार्यालये-शाळाशाळांतून थेट प्रक्षेपण चालेलेले. अतिशूद्र म्हणून समाजसेवा करण्याला नकार देणाऱ्या परधर्मियांना चेचून मारण्याच्या स्वच्छता अभियानाचा आता शुभमुहूर्त. प्रधानसारथींच्या इशाऱ्याची वाट पाहणाऱ्या परशू घेतलेल्या क्षात्रडोंबांनी त्याच्या डोक्यावरचे काळे वस्त्र दूर केले.

आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले. धक्क्याने हातातले औक्षणाचे ताट स्क्रीनसमोरच पडले. आपल्या गेटेड सोसायटीचा रक्षक. क्षत्रिय, अग्निवीर होतो म्हणून सांगायचा. राजधानीत चांगलं काम शोधायला मागच्याच आठवड्यात तो निघून गेलेला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Black Mirror!!