शशक १,२ - मायलेक भाग २ - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 1 September, 2025 - 21:50

मायलेक भाग १
पुढे ...

मायलेक भाग २

आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले..

“थांब गणू… मला वाटलं नव्हतं, तू कधी असा वागशील.
अरे राजा, हे तुंदील तनु, गोजिरवाणे गोड रूपडे हीच तर तुझी खरी ओळख आहे. दहा दिवसांसाठी जातोस आणि नको ती खुळं घेऊन येतोस.. ”

“माते, चिंता नसावी! ते तर उगाच #trending म्हणून सांगायला. मला माझ्या दिसण्याची काळजी नाही पण खरा मुद्दा फक्त तुला म्हणून सांगतो. काम कर इकडे.”

“अगं, परत कार्तिकदादाने स्पर्धेसाठी आव्हान दिले तर आतापासून तयारी करतोय. तुम्हाला प्रदक्षिणा घालून मग पृथ्वीप्रदक्षिणही करणार तेही दादाच्या आधी. हे तुझं माझं गुपित आहे आणि हो उंदीरमामांचही… आता तरी येऊ.”

“मुषकमहाराज, चालत ना, मंडळी खोळंबली असतील”

“आई, येतो ग..”

PC : Image is AI generated

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मस्तच. दोन्हीही भाग.
फक्त व्यायामामुळे गणपतीचे पोट कमी होऊ नये हीच इच्छा. आम्हाला ते लंबोदरच आवडतात. Happy