कुणाला स्मरू अन कुणा विस्मरू

Submitted by द्वैत on 1 September, 2025 - 08:47

कितीदा नव्याने रकाने भरू
कुणाला स्मरू अन कुणा विस्मरू

कशाला कुणा दोष देऊ इथे
दिले मीच त्यांना मला वापरू

पुरा कोसळू दे असा एकदा
नको हात देऊ नको सावरू

असू दे पसारा जरा भोवती
उद्या वाटले तर बघू... आवरू

अशी शीळ घालून झाडांतुनी
कळेना उडाले कुठे पाखरू

दिसे संपले सर्वकाही तरी
पुन्हा जोर लावू पुन्हा नांगरू

तिच्या शून्य डोळ्यांत डोकावता
तुझे "द्वैत" का लागते ओसरू?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!

खूप छान. वाचताच केशवसुमार यांची 'कोणत्या मापात मी पेला भरू?' ही अपतिम गझल आठवली. मूळ गझल इथे आहे, पण मिपावरील फॉर्मटिंग गंडले आहे, त्यामुळे केशवसुमार यांची क्षमा मागून त्यांच्या वतीने इथे कॉपी पेस्ट करत आहे.

कोणत्या मापात मी पेला भरू?
आमचे होईल मग फुलपाखरू
आमची होणार वाताहत अता
लागली दारू जशी ही ओसरू

रोज मी तेव्हाच गुत्ता सोडतो
लागता ती बारबाला आवरू
सोडती घरला बरोबर सोबती
लागते अमुचे जसे माथे फिरू

लडखडाया लागला पाया किती!
बिल भरू ? की हा अधी गल्ला धरू ?
प्यायली इतकी अता मग मी कसे
प्यायलो नक्की किती पेले स्मरू?

---------कलम १ -----------------

खूप नक्षीदार आहे बाटलीही
उद्या पाण्यास आता वापरू
पेग भरण्या वेळ दवडाया नको
बाटली उघडू, तिचे पेले करू

बायकोने नेत्र आहे रोखले
(सांग मी पुढचा कसा पेला भरू?)
ही विदेशी आणि देशी हातभट्टी
बोल "केश्या" ही भरू की ती भरू

टीप: नियमात बसत नसेल तर माझी प्रतिक्रिया/कविता इथून उडवावी ही नम्र विनंती. प्रताधिकार भंग करण्याचा अजिबात उद्देश नाही.