शशक २ - पत्र - अni

Submitted by अni on 31 August, 2025 - 02:49

गणपतीला गावी आलेल्या आपल्या नातवाला ट्रंकेतला खजिना दाखवत आजोबा म्हणाले -
“तुझ्या आजीसाठी लिहलेलं पहिले पत्र”
इंस्टा व्हाट्सएपवाला नातू हसला, आजोबा शांत झाले.
दोन क्षणाच्या स्तब्धतेनंतर तो स्वतःच बोलला -
“आज पुन्हा एक पत्र लिहा….”

थरथरणाऱ्या हातांनी वहीच्या पानावर अर्धशतकाहुन जास्त संसाराच्या रेषा सावकाश उमटू लागल्या.
“प्रिय…”

एवढं लिहिलं तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

नातवाने आजोबांचा हात धरला आणि म्हणाला,
“मी लिहितो, तुम्ही फक्त बोला.”

शब्द सांगायला सुरुवात झाली… प्रत्येक वाक्यात आठवणींचा सुगंध होता. पत्र पूर्ण झाल्यावर त्याने आजीला दाखवले.

ओलसर डोळ्यांनी आणि सुरकुतलेल्या हास्याने ती एवढंच म्हणू शकली - " मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!”

आज दोन पिढ्या एका पत्रात एकवटल्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्तच!
मीम बनवणारे अni हेच का ते असे वाटले Happy
मला सहजच ते गोलमाल १ मधील आजी आजोबा आठवले..

छान.
दिलेल्या वाक्यातली सर्वात जास्त आवडलेली कथा.

छान!

मलाही नाही समजली!
कोणाला म्हणाली आजी? नातवाला की आजोबांना ?

@छल्ला ...
ते नातवाला प्रकट स्वरुपात आणि आजोबाना त्या अर्धशतकापूर्वीच्या एक दूजे के लिए मोड़ मध्ये जाऊन मनातल्या मनात म्हणाल्या आहेत आजीबाई