
कैरीच्या सीझनमध्ये झटपट कैरीचे लोणचे तर आपण नेहमीच बनवत असतो . पण कैऱ्या नसतील तेव्हा मी हे इन्स्टंट ग्रीन अॅपल लोणचे बनवते. अगदी १० मिनिटात बनते. पोळीबरोबर किंवा नुसतेच खायला मस्त. स्पर्धेसाठी हा विषय आला तेव्हा पहिल्यांदा हेच लोणचे आठवले. बरेच जण करतही असतील.
टीप : ग्रॅनी स्मिथ किंवा हिरवे सफरचंदच घ्यावे . ते चवीला आंबटगोड असल्याने लोणच्याला मस्त चव येते.
साहित्य :
२ ग्रॅनी स्मिथ सफरचंद,
चिमूटभर हिंग, मीठ , आवडीनुसार लाल तिखट, काश्मिरी लाल तिखटही थोडेसे टाकल्यास लोणच्याला मस्त रंग येतो. नसल्यास काही फरक पडत नाही .
एका सफरचंदासाठी १ /४ टीस्पून भाजलेली मेथी पावडर. त्याने छान चव येते .
फोडणीसाठी - तेल, मोहरी, हिंग
कृती :
कसलेही डाग नसलेले दोन हिरवे सफरचंद (ग्रॅनी स्मिथ ) धुवून पुसून घ्या. त्याचे चार भाग करा आणि बिया काढून छान एकसारखे लहान तुकडे करा.
चिरलेली सफरचंद एका भांड्यात ठेवा. त्यात लाल तिखट, भाजलेली मेथी पावडर, हिंग आणि मीठ घाला.
मिक्स करा
तेल, मोहरी, हिंगाची फोडणी करून थंड झाल्यावर सफरचंदांवर असलेल्या मसाल्यांवर टाका .सर्व मिक्स करा. झटपट लोणचे तयार. मुरण्याची वाट पाहायची गरज नाही.
फोटो पाहून खरंच तोंपासु.
फोटो पाहून खरंच तोंपासु.
तोंपासु!
तोंपासु!
तोंपासु!
तोंपासु!
वा! ते तेल टाकण्याआधीचा फोटो
वा! ते तेल टाकण्याआधीचा फोटो पाहुन मी तर तसेच गट्टम करेन
मस्त
मस्त
मस्त पाकृ.
मस्त पाकृ.
ंमस्त . फोटो तोंपासु आहे
ंमस्त . फोटो तोंपासु आहे
मस्त पाककृती.फोटो तोंपासु आहे
मस्त पाककृती.फोटो तोंपासु आहे.
थँक्स भरत, मॅगी, निल्सन,
थँक्स भरत, मॅगी, निल्सन, निकु झंपी, माधव, जाई, सिमरन
Wow...
Wow...
फोटो.. म्हणजे पदार्थच.. खरेच तोपासु
मस्तच दिसतय लोणच
मस्तच दिसतय लोणच
मस्त आहे पाकृ.
मस्त आहे पाकृ.
करून बघणार. क्रमवार कृती आणि फोटो छान.
मुरण्याची वाट पाहायची गरज नाही.>>>> हे पटलं अगदी
आंबट सफरचंद मिळाली कि लगेच
आंबट सफरचंद मिळाली कि लगेच करणार. एकदम तोंपासु लोणचे आहे.
मस्त पाकृ
मस्त पाकृ
झकास.
झकास.
लाल/ हिरवी सफरचंदे ( सफरचंदाचे plural हो ) + अक्रोड असे सलाद करतो. आता लोणचे करून पाहणार. हिरवे सफरचंद सालीसकट वापरणार. 👍
जय हो.
रेसिपी आणि फोटो. मस्तच
रेसिपी आणि फोटो. मस्तच