“यावेळचा गणेशोत्सवाचा धागा बघितलास का..?”
“बघितला ना! काय केलंय..? त्या पाककृती स्पर्धेच्या धाग्यावर शंभर अटी घातल्यात आणि वर अध्याहृत असलेल्या वेगळ्या..”
“ हो ना ते पूर्ण वाचून होईपर्यंत, वरण भात शिजून, सजावट करून insta ला #HomeFoodrRestaurantStyle वाला फोटो टाकला तर शंभर लाईक्स पण येतील. ”
“हा हा हा आणि शशक ? त्यात शंभर तर फक्त नियमव आहेत.. आहेस कुठे? “
“तर काय? हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?”
“हम्म.. पुढच्या वर्षीपासून शशक स्पर्धेचाचा मसुदा शंभर शब्दात लिहायची अट संयोजकांनाच लागू केली तर..? काय वाटतं तुला ? ”
“अं.....”
****
तळटीप -
संयोजक स्वतः चे व्याप सांभाळून हे उपक्रम राबवायला मेहनत घेतायत त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि आभार!
शशक क्र ३ चे आवश्यक वाक्य वाचून विचार केल्यावर आठवली ती अनेक वेगवेगळ्या धाग्यांवर येत गेलेल्या नियम/ अटी/ अध्याहृत नियम वगैरे वगैरे.
त्यातच शशक वर येणाऱ्या पोस्टी ( ज्यातील काही द्विशतकी असतात) वाचून सुचलेले...
दोन्ही एकत्र करून असं काहीस झालं.
संयोजक, कृपया व्यक्तिशः किंवा टीका म्हणू.न घेऊ नये.
तळटीप शशक पेक्षा मोठी होऊ लागलीये ..
छान आहे. अटीच्या प्रस्तावाला
छान आहे. अटीच्या प्रस्तावाला माझे अनुमोदक
छान
छान
अटीच्या प्रस्तावाला माझे
अटीच्या प्रस्तावाला माझे अनुमोदक >>

विचार करकरून आठवलं संयोजकांच अति.. अटी असेल का??
मा बो वाचक आणि सामो धन्यवाद,!
अगदी अटीतटीवर येऊन ?
अगदी अटीतटीवर येऊन ?
अगदी अटीतटीवर येऊन ? >>
अगदी अटीतटीवर येऊन ? >>
नाही हो..
तसं वाटतंय का?
काही दिवसांपासून जो काही धुमाकुळ चालू आहे . त्यातून (अतिशयोक्ती अलंकार(?) वापरून) सहज सुचलेलं.
कोणाला असं काही वाटेल असं तेव्हा डोक्यात आलं नाही.
(No subject)
(No subject)
छान आहे !
छान आहे !
छान.
छान.
धनि, हरचंद पालव, कुमार१, आणि
धनि, हरचंद पालव, कुमार१, आणि शर्मिला धन्यवाद!