Submitted by अni on 29 August, 2025 - 00:22
एका मोठ्या शेतात कोंबड्यांची अंडं घालण्याची स्पर्धा भरली.
कोंबड्या अंड्यांवर खूप मेहनत करत.
पण रामू कोंबड़ा रोज त्याना चिड़वायचा
"मी आरवल्यामुळेच तुम्ही अंडी देता"
खुप समजावूनही रामूचा माज काही कमी होईना.
कोंबड्यांनी एक योजना आखली.
एका अंड्याला रंगवून, सजवून थेट परिक्षकांसमोर ठेवण्यात आलं.
"हे काय? सोनं चमकतंय वाटतं!"
ह्यावर अंडं स्वतःच बोलू लागले :
"हो, मी खास अंडं आहे! वरण भात माझे मम्मी पप्पा आहेत !"
अंडं कोंबडयाला बोललं:
"तू आरव किंवा नको आरवू – मी तरी तयार होणारच, कारण मी मेहनतीचं फळ आहे, तुझ्या आवाजाचं नव्हे!"
कोंबड्या टाळ्या वाजवतात!
कोंबडा गपगुमान ऊंच फांदीवर जाताजाता एवढेच बोलतो - "अंडे तर बनवाल ऑमलेट कुठून आणाल.."
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंडे अंडे पे लिखा आहे वरणभात
अंडे अंडे पे लिखा आहे वरणभात का नाम.
अंडे का फंडा,
रामू मेला - गिरे भी तो टांग
रामू मेला - गिरे भी तो टांग ऊपर आहे
अंडे तर बनवाल ऑमलेट कुठून
अंडे तर बनवाल ऑमलेट कुठून आणाल..
या वाक्याला फसकन हसायला आले...
बाई दवे,
तोच वरणभात कोलसवून थापला की झाले ऑमलेट