IMDb च्या जगातील टॉप १० सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये (२०२५-२०२६) स्थान मिळवणारी क्रिती सॅनन ही एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
सौंदर्य, प्रतिभा आणि जागतिक प्रभावाचा सन्मान करणाऱ्या या यादीत क्रिती सॅनन ने पाचवे स्थान पटकावले आहे.
2021 साली तिला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
------------------
बातमी संपली.
आता माझे चार शब्द.
याआधी देखील मी इथे तिथे क्रितीचे क्रिती तरी कौतुक केले आहे. तसे मी दर दुसऱ्या हिरोईनीचे करत असल्याने ते चटकन उठून दिसत नाही पण विशेष करून "तेरी बातो मे ऐसा उलझा जिया" चित्रपटानिमित्त विशेष कौतुक केले होते. कारण त्यात ती रोबोटची भूमिका अक्षरशा जगली होती.
मागे एकदा कुठेतरी कोणीतरी तिच्याबद्दल म्हणाले होते की ती इतकी सुंदर असल्याने तिला चित्रपटात भूमिका मिळत नाही. इतकी आखीव रेखीव असल्याने तिचे सौंदर्य AI generated वाटते. त्यामुळे कुठल्या हिरोला ती शोभत नाही. इन आदर वर्डस, कुठला हिरो तिला शोभत नाही.
पण वैयक्तिकरीत्या मला कार्तिक आर्यन सोबत तिची जोडी बघायला छान वाटते. कदाचित त्यासोबत तिचे सौंदर्य आणखी खुलून येत असावे. दोघांचा लुक्काछुपी चित्रपट फार आवडला होता आणि शेहजादे चित्रपट बंडल असला तरी दोघांचे सीन आणि केमिस्ट्री आवडली होती.
आज तिचे वय चेक केले तर ३५ वर्षे बघून मला हलकासा शॉक बसला. ती मला त्या वयाची वाटत नव्हती ते सोडा. पण त्या मानाने तिला तितके चांगले चित्रपट मिळाले नाही याचा खेद झाला. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे "बरेली की बर्फी" रूपाने तिचा गोडवा कायम लक्षात राहील.
आज या निमित्ताने अजून एक गोष्ट जाणवली की मी आजवर तिचा एकही चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही. भारतातली IMDB rated आजघडीची सर्वात सुंदर हिरोईन आणि तिला मोठ्या पडद्यावर पाहिले नाही ही एक शरमेची गोष्ट म्हणू शकतो. त्यामुळे लवकरच तिला बिग बॅनरचे चित्रपट मिळावेत आणि बॉक्स ऑफिसवर राडा करत माझ्यासह जास्तीत जास्त लोकांनी तिला मोठ्या पडद्यावर बघावे या शुभेच्छा
अभिनंदन क्रिती!
धन्यवाद,
-------------
ताक - डॉन 3 चित्रपटात ती मेन हिरोईन म्हणून झळकणार अश्या अफवा आहेत.
डोक्याचे दही - पण त्या चित्रपटात शाहरुख नसणार अशी पक्की खबर आहे.
क्रिती????? बाप रे!! उग्र
क्रिती????? बाप रे!! उग्र वाटते मला ती.
छे हो..
छे हो..
तिने माझ्या आयुष्यातील प्रियांका चोप्राची जागा भरून काढली
रोबोटची भूमिका अक्षरशा जगली
रोबोटची भूमिका अक्षरशा जगली होती. >> हे कौतुक आहे?? मला शालजोडीतले वाटले
अमितव
अमितव
तुम्ही म्हणजे. काय बोलू, हहपुवा!
रोबोटची भूमिका अक्षरशा जगली
रोबोटची भूमिका अक्षरशा जगली होती. >> हे कौतुक आहे?? मला शालजोडीतले वाटले Lol
>>>>>>>
मला हा प्रतिसाद अपेक्षितच होता
म्हणून मी तिला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराला बोल्ड केले आहे. अभिनय आपल्याला येतो हे तिने दाखवले आहे.
@ वरचे वाक्य,
रोबोट किंवा एखाद्या डॉल सारखे आखीव रेखीव सुंदर दिसणे ते ही इतके की एखाद्या माणसाला माहित आहे ती रोबोट आहे तरी त्याने तिच्या प्रेमात पडावे. ते देखील साधासुधा माणूस नाही तर वन ऑफ द मोस्ट हँडसम हिरो चक्क शाहिद कपूर.. आणि हे सगळे प्रेक्षक म्हणून आपल्याला विश्वासार्ह सुद्धा वाटावे हे एकूणच कौतुकास्पद आहे
लेखात फोटो टाकला आहे सामो
लेखात फोटो टाकला आहे सामो
याला उग्र म्हणत असाल तर मी स्वतःला उग्रवादी म्हणवोन घ्यायला तयार आहे
अश्या नाकाची व्यक्ती मला
अश्या फेंदरलेल्या नाकाची व्यक्ती मला उग्रच वाटते
हे असे हातात नसलेल्या बाबीवरुन ताशेरे मारणे कुरुप आहे हे मी जाणते बट इट इज डिमांड ऑफ धिस थ्रेड.
तुम्हीच रुपावरुन कौतुक सुरु केलत.
उग्रवादी
सध्याच्या अभिनेत्रींमध्ये
सध्याच्या अभिनेत्रींमध्ये क्रितीच आवडते. दिसायला छान असताना तिचा अभिनय पण चांगला आहे. मिमी , दो पत्ती मध्ये मस्त काम केलेलं आहे तिने. मला तर ती हाऊसफुल, भेडिया यात पण आवडली होती.
सामो, उग्र म्हणणे इट्स ओके.
सामो, उग्र म्हणणे इट्स ओके.
)
त्यात काही तुम्ही तिला रूपावरून हिणवले आहेत असे मला वाटत नाही.
(मुळात एखाद्या सुंदर हिरोइनला आपण रूपावरून नावे ठेवत आहोत हे किती हास्यास्पद होईल
तर तुम्ही इथे फक्त तिचा लूक कुठल्या टाईपचा आहे ते सांगितले आहे, आणि ती तुमची चॉईस नाही हे नमूद केले आहे.
काही वेळा मलाही ती वाटते तशी पण मला तिचे ते रूप सुद्धा आवडते
कुणाला काय हास्यास्पद वाटावे
कुणाला काय हास्यास्पद वाटावे हा त्या त्या व्यक्तीच्या जाण, समज , विनोदबुद्धी वगैरे वगैरे चा भाग आहे
धनि हो,
धनि हो,
मलाही ती एक चांगली पॅकेज वाटते.
हाउसफुल पाहिला नाही अजून पण भेडीयामध्ये जेव्हा शेवटी सत्य समजले तेव्हा अगदी माझेच ब्रेकअप झाले इतके वाईट वाटले होते
अहो सामो मी तुमच्या बाजूनेच
अहो सामो मी तुमच्या बाजूनेच म्हणत आहे, की दिसण्यावरून टिप्पणी करणे म्हणजे नेहमीच हिणवणे किंवा ताशेरे मारणे असे नसते.
तुम्ही ते म्हणालात ना <ताशेरे मारणे कुरुप आहे हे मी जाणते> म्हणून तसे म्हणालो.
तुम्ही त्या हास्यास्पदवरून काही गैरसमज करून घेऊ नका
मला क्रिती आवडते कारण ती
मला क्रिती आवडते कारण ती इंजिनीअर आहे
.
अवांतर
तापसी सुद्धा इंजिनीर आहे पण मला ती कुरळ्या केसांमुळे आवडते.
.
समय रैना इंजिनीअर आहे, कुरुळे केस आहेत पण तरी मला आवडत नाही.
अवांतर समाप्त
ऋन्मेष मी कर्क चं राशीच्या
ऋन्मेष मी कर्क चं राशीच्या लोकांबद्दल कधीच गैरसमज करुन घेत नाही
हीरोइन म्हणजे सुंदरच असावी
हीरोइन म्हणजे सुंदरच असावी ऐसे अध्याह्रुत (
) समीकरण छेदणारे प्रकरण
किल्ली
किल्ली
Yes, Kriti Sanon is an engineer. She holds a Bachelor of Technology degree in Electronics and Communication Engineering from Jaypee Institute of Information Technology, Noida
सामो ओके.. मी कर्क आहे हे
सामो ओके.. मी कर्क आहे हे माहीत आहे तर मग प्रश्नच मिटला.
कोणी आपल्यामुळे चिडला इरिटेट झाला तर चालते, पण दुखावला गेला नाही पाहिजे इति संवेदनशील मनाची कर्क राशी जनता
असो,
क्रीतीची रास शोधून येतो. धागा तिचा आहे
हाहाहा मला सगळ्यांचे बड्डेज व
हाहाहा मला सगळ्यांचे बड्डेज व राशी लक्षात रहातात. तुमचा ११ ऑगस्टला होता ना?
अni
अni

आधीच इथे तो क्रीती एक जोडशब्द आहे जो प्रत्येक वेळी वेगळा लिहिला जातोय..
त्यात तुम्ही आता अध्याहृत आणू नका
माबोवरती अवांतर होणार हे तर
माबोवरती अवांतर होणार हे तर अध्याहृतच आहे
बापरे सामो.. खतरनाक
बापरे सामो.. खतरनाक
मी फेसबुकवर वाढदिवसाची सेटिंग सुद्धा हाईड करून ठेवतो की कुणाला तारीख कळू नये. आणि रात्री बारापासून शुभेच्छांचा ओघ चालू होऊ नये.. आणि तुम्ही कुठेतरी धाग्यात प्रतिसादात लिहिलेली बरोबर लक्षात ठेवली.. ग्रेट!
हाहाहा
हाहाहा
माबोवरती अवांतर होणार हे तर
माबोवरती अवांतर होणार हे तर अध्याहृतच आहे Wink

>>>
होऊ दे मग.. 100 प्रतिसाद झाले की धाग्याची लिंक क्रीतीला टॅग करून पाठवतो. तेवढेच खुश होऊन मला पर्सनली थँक्यू म्हणाली आणि प्रतिसादात माझ्या वाढदिवसाची तारीख आली आहे ती वाचून आणि लक्षात ठेवून गिफ्ट पाठवली तर चांगलेच आहे.
बाकी तिला उग्र वगैरे काही कळणार नाही त्यामुळे टेन्शन नसावे
>>>समीकरण छेदणारे प्रकरण +१
>>>समीकरण छेदणारे प्रकरण
+१
मला वाटतं दीपिका पदुकोणे लाही असाच सन्मान मिळलेला का?
पण ती ही मला खास आवडत नाही.
मला क्रिती सॅनन सुंदर वाटते.
मला क्रिती सॅनन सुंदर वाटते. 'बरेली की बर्फी'त खरीच बर्फी वाटलीये. तिचा अभिनय व नृत्यही आवडते. सध्या एवढी उंच, सडपातळ आणि आकर्षक दुसरी कोणी चटकन आठवत नाही.
क्रिती छान आहे. तिचं ‘बरेली
क्रिती छान आहे. तिचं ‘बरेली की बर्फी’मधलं काम आवडलं होतं. तिची उंची मस्त आहे.
पण जगातील १० सुंदर अभिनेत्रींपैकी १ याचं वगैरे काही खरं नाही. कोणतीही संस्था कुणालाही सुंदर जाहिर करते आणि सौंदर्य सोडून त्यांचे कायच्या काय क्रायटेरीआ असतात.
Criteria माहीत नाही पण धागा
Criteria माहीत नाही पण धागा काढण्याआधी IMDB साईट वर जाऊन चेक केले होते त्यात या दहा जणींची नावे दिसली आणि ती पाचव्या क्रमांकावर आहे हे सुद्धा खरे आढळले.
Top 10 Most Beautiful Actress in the World 2025 - 2026 https://share.google/kKAju6w4DnsbcOiQw
बाई दवे,
आमच्या लहानपणी सलमान खान जगातला अमुक तमुक क्रमांकाचा हॅण्डसम हिरो आहे, त्याचा नंबर पुढे आला, घसरला वगैरे म्हणून खूप चर्चा चालायच्या.
अस्मिता +७८६
अस्मिता +७८६
तुझे हे क्रिती बद्दलचे मत मागे सुद्धा वाचलेले मी चित्रपट धाग्यावर .. तेव्हाही तिथे +७८६ वगैरे असेल आसपास.
जर ती नेपोकिड असती तर तिला
जर ती नेपोकिड असती तर तिला पिक्चर सुद्धा अजून चांगले मिळाले असते आणि त्यातल्या तिच्या भूमिका सुद्धा वजनदार असत्या, महत्वाचे म्हणजे तिच्यासाठी लिहिल्या गेल्या असत्या.
तिचे मूल्यमापन तिला मिळालेल्या चित्रपटावरून आणि त्यातील भूमिकांतून करणे अवघड आणि तिच्यावर अन्यायकारक..
तरी तिने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला ही मोठी गोष्ट आहे.
ऋन्मेष तुम्ही तुमचे कौतुक इतक
.
Pages