परकीय भाषेतील "हिंदी/मराठी डब" चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 August, 2025 - 00:00

परकीय भाषेतील चित्रपटांचा मायबोलीवर धागा असावा. पण बरेचदा माझ्यासारख्यांना त्याचा काही फायदा होत नाही. कारण सर्वांनाच परकीय भाषेतील संवाद कळत नाहीत. तसेच चित्रपट बघताना सोबत सबटायटल वाचणे त्रासदायक ठरते. ते देखील बरेचदा इंग्लिशमध्येच असल्याने सर्वांनाच ते कळत नाहीत किंवा पटपट वाचणे जमत नाहीत. त्यामुळे बरेच जण हिंदीमध्ये डब केलेल्या चित्रपटांना प्राधान्य देतात. काही मराठीत देखील असतात. पण त्या डबिंगचा दर्जा तितका चांगला नसल्याने म्हणून म्हणा तितकी मजा येत नाही. सुधारणा झाली तर आवडेल.
असो,

तर अश्या सर्व चित्रपट प्रेमींसाठी हा धागा.

आजकाल ओटीटी किंवा युट्युबवर बरेच चित्रपट हिंदीमध्ये डब केलेले आढळतात. त्यातील आपल्याला आवडलेल्या चित्रपटांबद्दल इथे लिहूया आणि इतरांना सांगूया.

त्याआधी मी हे चित्रपट साधारणपणे कसे वेचतो ते सांगतो.
पहिला मी ट्रेलर बघतो. तसेच कुठला जॉनर नमूद केला आहे ते बघतो. म्हणजे मूडनुसार कुठला चित्रपट बघायचा हे ठरवता येते. उदाहरणार्थ, हलके फुलके बघायचे असल्यास ड्रामा कॉमेडी रोमान्स असले चित्रपट आधी निवडतो. त्यानंतर जे शॉर्ट लिस्ट होतात त्यांचे नाव गुगल सर्च करून त्याचे IMDB रेटिंग बघून घेतो. किंवा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बघतो. बरेचदा चांगले मास चित्रपट बॉक्स ऑफिस कमाईवरून कळतात.
रेटिंग आणि बॉक्स ऑफिस कमाई दोन्ही कमी असेल तर सहसा वेळ वाया घालवायची रिस्क घेत नाही. किंवा थोडावेळ फॉरवर्ड करत बघतो आणि नाही आवडल्यास सोडून देतो.

चला, प्रतिसादात सुरुवात मीच करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Saba Nayagan
Hindi dubbed
ओरिजिनल भाषा – तामीळ
वर्ष – २०२३
कुठे बघाल – Jio Hotstar
जॉनर – RomCom म्हणजेच रोमँटिक कॉमेडी.
IMDB रेटिंग - ६.७

चेन्नईतल्या कुठल्यातरी रस्त्यावर पोलिसांना एक बेवडा (चित्रपटाचा हिरो) सापडतो आणि ते त्याला जीप मध्ये टाकतात. त्यानंतर तो पोलिसांना आपण दारू का प्यायलो याची दर्दभरी रोमांटिक दास्तान सांगू लागतो. अगदी शाळेपासून...पहिल्या प्रेमापासून..

शाळेची लव्हस्टोरी बघताना आत्मपेमफ्लॅट या मराठी चित्रपटाचे वाईबस येतात. एकीकडे स्कूलक्रश, दुसरीकडे मैत्री, तिला इम्प्रेस करणे, तिच्यासमोर लाज जाणे, मित्रांनी मदत करणे आणि शेवटी मैत्री निभावायच्या चक्करमध्ये तिला आपले प्रेम न कळताच ती आयुष्यातून निघून जाणे..

त्यानंतर कॉलेजमध्ये दुसऱ्या मुलीमध्ये जीव गुंतणे. यावेळी कॉलेज स्टाईल लव स्टोरी. थोडी स्टाईल, थोडे राडे.. त्यानंतर तिचा होकार. पण काही कारणाने ती सुद्धा दुसरा कोणीतरी पकडून आयुष्यातून निघून जाणे..

त्यानंतर पुन्हा योगायोगाने स्कूल क्रश आयुष्यात येणे. यावेळी तिला कसेही करून पटवायला खोटे बोलणे, मग लपवाछपवी, त्यात कॉमेडी, शेवटी पकडले जाणे... तिने माफ सुद्धा करणे.. पण.. कहानी मे ट्विस्ट, तो आता सांगत नाही. क्लायमॅक्सची मजा जाईल.

मग एमबीएला ऍडमिशन घेणे. तिथे एक मॉडर्न विचारांची मुलगी आयुष्यात येणे. मग थोडा ड्रामा तिथेही..

एका मागोमाग एक लव स्टोरी जोडत चित्रपट पुढे सरकत आहे असे वाटत असतानाच चित्रपटात एक ट्विस्ट येतो, एक सस्पेन्स उघड होते आणि आतापर्यंत त्याने ज्या सगळ्या लव्हस्टोरीज सांगितल्या त्यांचे अचानक संदर्भ उलगडले जातात. अगदी पहिल्या सीनपासून.. त्यामुळे चित्रपटाची सुरुवात चुकवू नका.

टिपिकल साऊथ इंडियन चुरचुरीत संवाद असलेली कॉमेडी, स्वॅगवाला रोमान्स आणि स्टायलिश ऍक्शन आहे. चित्रपट आवडला तर कधीतरी पुन्हा बघावासा वाटेल असा आहे.

तीन-चार सुंदर हिरोईन बघणे इन्क्लूडिंग हिरोची बहीण हा बोनस आहे.

असेच फुरसतीने एकेका चित्रपटाबद्दल लिहितो..

क्या बात.. शोधला लगेच प्रेमम.
माझ्या सवयीप्रमाणे IMDB रेटिंग बघितली.. ८.३ आहे. भारी.

हॉटस्टार वर आहे पण हिंदी वर्जन नाही.
युट्युब वर सापडले.. त्याची लिंक शेअर करतो.
लवकरात लवकर बघेन. नवीन धागा काढून सविस्तर कथा लिहिणे वसूल झाले. धन्यवाद Happy

https://youtu.be/HH6byjAU74s?si=6xW2oOhrehq8dX37

वरच्या लिंक मधील हिंदी डबिंग फार काही छान जमली नाही असे वाटते.. थोडासा वरवर चाळला.. नंतर वीकेंडला बघेन.

त्या आधी आता गेल्या वीकेंडला पाहिलेल्या एका छान चित्रपटाबद्दल लिहितो.

Court – state vs a nobody
Hindi dubbed
ओरिजिनल भाषा – तामीळ
वर्ष – २०२५
कुठे बघाल – नेटफ्लिक्स
जॉनर – नावाप्रमाणेच कोर्ट ड्रामा
IMDB रेटिंग - ७.९

Highly Recommended

न्यू रिलीज चित्रपट आहे. ४ ते ५ कोटी रुपयामध्ये बनवला आणि ५७ कोटी कमावले. एखाद्या चांगल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिस सक्सेस मिळालेले बघून बरे वाटले.

सुरुवात साधारण सैराट सारखी होते. वॉचमनचा मुलगा आणि श्रीमंत राजकारण्याची मुलगी. फक्त इथे सीन असा असतो की मुलगा असतो १९ वर्षांचा आणि मुलगी १७ वर्षांची. जेव्हा तिच्या घरी हे कळते तेव्हा मुलावर POCSO Act अंतर्गत केस टाकली जाते.

The POCSO Act, or the Protection of Children from Sexual Offences Act, is a comprehensive Indian law enacted in 2012 to protect children from sexual assault, sexual harassment, and pornography.

सुरुवातीचे अर्धा पाऊण तास साधा सुधा वाटणारा चित्रपट कोर्ट ड्रामा सुरू झाल्यावर जबरदस्त रंगत जातो.
केस लढणाऱ्या वकिलाची आपली एक कहाणी आहे. त्याची ही पहिलीच केस असते. त्याला स्वतःला सिद्ध करायचे असते. त्या मुलाच्या घरच्यांना आधी दुसऱ्या एका वकिलाने फसवल्यावर हा त्यांची केस घेतो. त्याचे काम जबरदस्त झाले आहे. आधी साधासुधा सपोर्टिंग कलाकार वाटणारा वकील नंतर हिरोच्या आवेशात केस लढू लागतो हा आत्मविश्वासातील बदल छान दाखवला आहे.

म्हटले तर केस मध्ये तितकाही दम नसतो. पण आपल्याकडे फार काही पारदर्शक कारभार चालत नाही. त्यामुळे जर कोणी आपले पद आणि पैशाच्या जीवावर या कायद्याचा गैरवापर करायचे ठरवले तर काय होऊ शकते याची झलक बघायला मिळते. शेवट त्याच नोटवर केला आहे. पण सत्याच्या बाजूने आहे. आवर्जून बघा.

इथला रेको वाचून Court – state vs a nobody पहिला आणि आवडला. चित्रपटाची तांत्रिक बाजू खूप छान आहे. चित्रपटावर घेतलेली मेहनत चित्रपट पाहताना दिसून येते. कोर्ट, पोलीस स्टेशन इथले डिटेलिंग एकदम जबरदस्त. आजूबाजूला असणाऱ्या गर्दीमुळे चित्रपट खरा वाटतो. चित्रपटात सीन्स ची संख्या भरपूर आहे. पात्रांची संख्या पण भरपूर आहे, त्यामुळे चित्रपट इंगेंजीग होतो. वाटत नाही कि एव्हड्या कमी पैशात बनला असेल. हॅट्स ऑफ. कोर्ट चालू झाले कि चित्रपट वेगवान होतो. सर्वांचा अभिनय जबरदस्त.
रेकोसाठी धन्यवाद ऋन्मेऽऽष

Kannum Kannum Kollaiyadithaal (२ ० २ ० )
IMDB रेटिंग - ७ .६
कॉमेडी , drama , रोमान्स थ्रिलर
मूळ भाषा - मल्याळी
कुठे बघाल - यु ट्यूब

दोन स्कॅमर्स scam करून पैसे मिळवत असतात आणि एके दिवशी एका मुलीच्या प्रेमात पडतात . काही दिवसांनी त्यांच्या लक्षात एक गोष्ट येते ..... ती काय असते आणि पुढे काय काय घडतं हे बघणं विलक्षण आहे , क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं. तपशिलाच्या मोजून चुका असतील . .. त्या हि क्षुल्लक .
सलमान डुलकर आवडायला लागलाय मला आजकाल .

केशवकूल तुम्ही दिलेला व्हिडिओ आपल्या देशात ब्लॉक आहे असा मेसेज येतोय Sad

दक्षिणा यांची पोस्ट वाचून उत्सुकता वाढली आहे.
त्यात सलमान डूलकर सुरुवातीपासूनच आवडीचा ..

माबोवाचक धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण पोस्टला +७८६

लिंक द्या. भारतात दिसत नाहीये.

ड पौ

Kannum Kannum Kollaiyadithaal
पाहिला मी हा चित्रपट
मस्त होता. आवडला. कमालीची झोप येत होती पण शेवटचा पाऊण तास राहिला होता तो सोडणे अवघड होते.
रेको बदल धन्यवाद Happy

यात जो मध्यंतरानंतर ट्विस्ट आहे तो पाहून नुकताच पाहिलेला मारिसन चित्रपट आठवला. अर्थात त्याची जातकुळी वेगळी आहे.
नेटफ्लिक्सवर आहे. त्यावर सुद्धा या धाग्यावर लिहिणार होतो पण गणपतीच्या नादात लिहायचे राहिले.

केशवकूल, वर दिले आहे ते चेक करतो वीकेंडला निवांत!

Thudarum
कुठे बघाल - नेटफ्लिक्स
रेटिंग - ७ .६

एका अत्यंत प्रामाणिक आणि सध्या सुध्या टॅक्सी ड्रायव्हर ला नियती एका अशा वळणावर आणून सोडते जिथे तो पेटून उठतो , आणि काय करतो हे बघायचं असेल तर हा उत्कंठावर्धक सिनेमा पहिलाच पाहिजे .
थोड्या हिंट्स देते , पोलीस याचा वापर याच्याच विरुद्ध करतात . एक खून झालेला असतो . पण त्यावर टॅक्सी ड्रायव्हर मात कशी करतो हे सॉलिड आहे .

लोक थंड डोक्याने खून करतात पण मोहनलाल थंड डोक्याने अभिनय करतो . माझा जीव जडलाय याच्यावर जेव्हापासून मी दृश्यम २ बघितला . देवगण यांच्यासमोर अगदीच मिळमिळीत .

Thudarum पाहिला आहे मी. छान आहे.
स्पेशली पूर्वार्ध क्लास आहे.
उत्तरार्धाने मात्र निराश केले. म्हणजे वाईट आहे असे नाही, पण मारधाड करत ॲक्शन हिरो सारखे बदला घेणे मला अपेक्षित नव्हते. बुद्धीचा वापर करत प्लॅनिंग करणे अपेक्षित होते.

जेव्हा सुरक्षा यंत्रणाच कायदा सुव्यवस्थेचा गैरफायदा घेते तेव्हा सामान्य माणसाला कायदा हातात घ्यावा लागतो रे ऋन्मेष . त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा .

त्या कोर्टात एका गुन्हेगाराला ५ ० बायकांनी मारले तो किस्सा माहित असेल तुला , त्यातलीच गत आहे या सिनेमाची .

तेव्हा सामान्य माणसाला कायदा हातात घ्यावा लागतो रे ऋन्मेष
>>>>
दक्षिणा, उत्तरार्ध आवडला नाही असे नाही. फक्त अपेक्षा वेगळ्या पद्धतीने बदला घेतला जाईल या होत्या. पूर्वार्ध इतका भारी जमलेला असताना आणि मोहनलाल सारखा कलाकार हाती असताना याहून वेगळेपणाची अपेक्षा चुकीची सुद्धा नव्हती Happy

लकी भास्कर अर्थातच पाहिला. मला असले स्कॅम चित्रपट त्यातही शेअर मार्केटचे आवडतात. यातले फार काही कळत नसल्याने कुठल्याही चुका न काढता एन्जॉय करता येतात Happy

Maareesan / मारिसन
Hindi dubbed
ओरिजिनल भाषा – तामीळ
वर्ष – २०२५
कुठे बघाल – नेटफ्लिक्स
जॉनर – Comedy, drama, thriller
IMDB रेटिंग - ७.५

कथेचा पहिला नायक एक छोटी मोठी चोरी करणारा चोर.
जो एका घरात चोरी करायला शिरतो. जिथे त्याला कथेचा दुसरा नायक भेटतो. आणि त्याला अल्झायमर झाला असतो.
हा त्याला थोडेफार पैशांना लुटतो आणि लुटत असतानाच त्याच्या लक्षात येते अरे ही तर सोन्याची कोंबडी आहे. याला आपण त्याच्या आजाराचा फायदा उचलत आणखीही बरेच लुटू शकतो.
त्यामुळे हा त्याला उलट्यासुलट्या भूलथापा मारून आपल्यासोबत एका रोड ट्रिपला घेऊन जातो. या ट्रिपमध्ये काही प्रासंगिक विनोद घडतात.

हल्ली या अल्झायमर आजाराचे अचानक खूप सारे चित्रपट का बनवू लागले आहेत कल्पना नाही पण इथला आजार वाटतो तितका साधा सरळ नसतो.
यात कधीतरी कुठेतरी एक हलकासा ट्विस्ट येतो आणि हलक्या फुलक्या पद्धतीने पुढे सरकणाऱ्या कथेला आणि आधीच्या सर्वच प्रसंगांना एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. जणू चित्रपट डोक्यावर फिरतो.

कोणाला कमी आवडेल कोणाला जास्त. पण वेगळ्या धाटणीचा चित्रपट आणि प्रमुख पात्रांच्या अभिनयातील सहजता म्हणून एकदा पूर्ण जरूर बघाल.

रजनी अण्णाचा कुली

तोच तोच पणा !
तुम्हे पता है ये कौन है ?

बाशा पासून एकच एक फॉर्मुला !

ए आय च्या सौजन्याने
इथे कुली, जेलर, पेट्टा, अन्नात्ते आणि दरबार या रजनीकांत यांच्या चित्रपटांमधील व्यक्तिरेखा आणि कथानकातील साम्ये मांडले आहेत:

समान व्यक्तिरेखा वैशिष्ट्ये

दुहेरी ओळख / गुप्त राहणीमान

कुली, जेलर, पेट्टा, दरबार : रजनीकांत साधा माणूस किंवा सामान्य जबाबदारी पार पाडणारा म्हणून दिसतो; पण योग्य वेळी त्याची खरी ताकद, भूतकाळातील गँगस्टर, पोलिस अधिकारी किंवा संरक्षक अशी ओळख उघड होते.

कुटुंब व निरपराधांचे रक्षण

प्रत्येक चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेची खरी प्रेरणा म्हणजे कुटुंबाची किंवा समाजातील निरपराधांची सुरक्षा.

प्रियजनांना धोका निर्माण करणाऱ्या खलनायकांशी तो झुंज देतो.

वडीलधारी / मार्गदर्शक भूमिका

पेट्टा : वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा संरक्षक.

जेलर : स्वतःच्या मुलाचे संरक्षण करणारा पिता.

अन्नात्ते : बहिणीचा काळजीवाहू मोठा भाऊ.

दरबार : मुलीसाठी झगडणारा पोलिस पिता.

कुली : पारंपरिक रक्षक आणि कुटुंबासाठी आधारवड.

साईडकिक हिरो / साथीदार

बहुतांश चित्रपटात रजनीकांतच्या भूमिकेला रंग देण्यासाठी दुसरा एक नायकसदृश साईडकिक पात्र असते (उदा. पेट्टा मधील विजय सेतुपतीसमोर नवा नायक , जेलर मध्ये मोहनलाल/शिव राजकुमार यांची उपस्थिती).

खलनायकाची व्यक्तिरेखा

खलनायक जवळजवळ नेहमीच गुन्हेगारी, भ्रष्टाचार, माफिया किंवा सत्तेचा गैरवापर करणारा दाखवला जातो.

नायकाच्या प्रियजनांना लक्ष्य करणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो.

कॅमिओ उपस्थिती

प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी इतर मोठे तारे कॅमिओ स्वरूपात दाखवले जातात (उदा. जेलर मध्ये मोहनलाल, शिवाराजकुमार; पेट्टा मध्ये नव्या पिढीचे कलाकार, कुली मध्ये आमीर खान ).

कथानकातील समानता

सूडकथा व न्याय

दरबार, जेलर, पेट्टा , कुली मध्ये प्रमुख संघर्ष म्हणजे कुटुंब किंवा समाजाला इजा करणाऱ्यांना शिक्षा करणे.

न्यायव्यवस्थेबाहेर, नायक स्वतःच वन-मॅन आर्मी बनून न्याय मिळवतो.

भावनिक केंद्रबिंदू

जेलर, दरबार : वडील–मुलगा/मुलगी यांच्यातील बंध.

अन्नात्ते : भाऊ–बहिणीचे नाते.

पेट्टा : गुरु–शिष्य / मार्गदर्शकाचे नाते.

कुली - वडील मुलीचे नाते

स्टायलिश क्लायमॅक्स

प्रत्येक चित्रपटात उत्कंठावर्धक शेवट असतो जिथे रजनीकांत आपल्या करिश्मा, स्टाईल आणि ‘मास’ एक्शनसह खलनायकांचा पराभव करतो.

सर्व चित्रपटांमधील समान थीम्स

कुटुंब हा प्रेरणास्रोत → कथानकाचा केंद्रबिंदू नेहमीच प्रियजनांचे रक्षण.

गुप्त ताकद उलगडणे → साध्या भूमिकेतून सुरूवात, पण शेवटी अजेय योद्धा.

न्याय विरुद्ध भ्रष्टाचार → खलनायक बहुधा गुन्हेगारी किंवा सत्तेचा गैरवापर करणारे.

रजनीकांतची आभा → करिष्मा, पंच डायलॉग्ज, स्लो-मोशन एंट्री, अनोखी स्टाईल.

Thudarum ची थीम चांगली आहे , पण मारधाड करून बदला घेतलेला वास्तववादी वाटत नाही, पहिल्या भागात खून दाखवून दुसऱ्या भागात थंडपणे घेतलेला बदला दाखवायला हवा होता.. जास्त इफेक्टीव वाटला असता