Submitted by चीकू on 11 August, 2025 - 13:28
अजय, बलबीर आणि कपिल हे तिघे एकमेकांचे कट्टर दुश्मन आहेत. एकदा तिघांची गाठ अचानक एका मोकळ्या मैदानात पडते. साहजिकच तिघेही आपापल्या बंदुका सरसावून सज्ज होतात पण अंदाधुंद गोळीबार करण्यापेक्षा नाणेफेक करून प्रत्येकाने पाळीपाळीने एक गोळी चालवायची असे ते ठरवतात. त्यानुसार अजय, बलबीर आणि मग शेवटी कपिल असा क्रम लागतो. एक फेरी झाल्यावर पुन्हा याच क्रमाने प्रत्येकाने (किंवा जीवित असेल त्या क्रमाने) गोळी झाडायची असे ठरते.
अजयची निशाणेबाजी ५०% बिनचूक असते. बलबीरची निशाणेबाजी ७५% तर कपिलची १००% बिनचूक असते.
अजयला काहीही करून निदान पहिल्या फेरीतून बचावून जिवंत राहायचं आहे. तोपर्यंत आपले काही मित्र आपल्या मदतीला पोचतील अशी त्याला आशा आहे. तो काय करेल मग?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गांधीजी किंवा बुद्धाचं चं नाव
गांधीजी किंवा बुद्धाचं चं नाव घेऊन हवेत गोळी मारली तर इतर दोघांचं हृदयपरिवर्तन होऊन आनंदी आनंद होईल. त्यांच्या हृदयावर (आणि डोक्यावर) काही परिणाम झाला नाही तर पुन्हा गोळी मारायची पाळी येईपर्यंत अजयला मरण नाही.
अजबराव
अजबराव
ब ला मारले तर क ला गोळी मारायला कुणी शिल्लक नाही. पहिली फेरी इथेच संपली. अ वाचला.
ब ला मारले तर क ला गोळी
ब ला मारले तर क ला गोळी मारायला कुणी शिल्लक नाही. पहिली फेरी इथेच संपली. >>>> मला वाटते नाही. अ आणि क अजून जिवंत आहेत आणि क ची पाळी यायची आहे, ती आल्यावर तो अ ला खलास करेल कारण त्याचा निशाणा अचूक आहे.
अजय देवगण 50
अजय देवगण 50
बलबीर पाशा 75
कपिल शर्मा 100
प्रत्येक जण अश्या व्यक्तीला मारायला बघणार ज्याची निशानेबाजी जास्त अचूक आहे.
अजयने कपिलवर निशाणा धरावा पण मुद्दाम चुकवावा.
कारण जर चुकून कपिल मेला तर बलबीर अजयला मारणार
पण जर कपिल जिवंत असेल तर बलबीर 100 टक्के अचूक निशाणा असलेल्या कपिललाच मारणार.
आता बलबीरच्या गोळीने कपिल मेला तर दुसरी फेरी संपली.
पण कपिल वाचला तर कपिल देखील 50% अचूक निशाणा असलेल्या अजयला न मारता 75 टक्के निशाणा असलेल्या बलबीरला टार्गेट करणार आणि शंभर टक्के उडवणार. अजय हमखास वाचणार.
प्रत्येकजण जास्त अचूक
बरोबर ऋन्मेष!
अरे वा! ऋन्मेष किती पटकन
अरे वा! ऋन्मेष किती पटकन सोडवलेस !
अजबराव
मी खरेतर तिघांची आडनावे
मी खरेतर तिघांची आडनावे लिहायला आलो होतो.
मग विचार केला बघूया पटकन सुटण्यासारखे असेल तर एकाच पोस्ट मध्ये काम होईल.. आणि सुटले खरेच. (मानवमामांनी बरोबर म्हटले म्हणजे सुटले असे खात्रीपूर्वक म्हणू शकतो)
बाकी अजबराव यांच्या
बाकी अजबराव यांच्या पोस्टमध्ये जे हवेत गोळी मारणे आहे तेच माझ्याही उत्तरात आहे. फक्त ते दोघांना कळू न येता सुमडीत करायचे आहे. नाहीतर ते दोघे युती करून गेम करतील.
वेगवेगळे एआय काय उत्तर
सर्वांची उत्तरं आली आहेत. मग आता एआय ला पण विचारूयात एकदा.
वेगवेगळे एआय काय उत्तर देताहेत हे पाहिलंय का ?
ग्रोक ने हे उत्तर दिले आहे.
अजयने आपल्या पहिल्या फटक्यात मुद्दाम चुकवायचे (किंवा आकाशात किंवा जमिनीवर गोळी झाडायची) ठरवले पाहिजे. कारण जर त्याने बलबीर किंवा कपिल यांच्यापैकी कोणावरही निशाणा साधला आणि तो लागला, तर त्याची पहिल्या फेरीत जिवंत राहण्याची शक्यता कमी होईल. मुद्दाम चुकवल्यास बलबीर आणि कपिल एकमेकांना लक्ष्य करतील, आणि अजय पहिल्या फेरीत निश्चित जिवंत राहील.
वेगवेगळे एआय काय उत्तर
वेगवेगळे एआय काय उत्तर देताहेत हे पाहिलंय का ?
>>>
अरे नको...
एकापेक्षा अधिक उत्तरे असतील तर इतर कुठे न बघता स्वतः शोधूया
हे कृत्रिम बुद्धिमत्ता येत्या पिढीची नैसर्गिक बुद्धिमत्ता खाणार असे वाटते.
ऋन्मेष, exactly . म्हणूनच
ऋन्मेष, exactly . फक्त एक करेक्शन "बलबीरच्या गोळीने कपिल मेला तर दुसरी फेरी संपली.". इथे पहिली फेरी संपते. एक फेरी म्हणजे जिवंत असलेल्या प्रत्येकाला एकेकदा गोळी झाडायची पाळी मिळणे. आणि हवेत गोळी झाडून अजयला फक्त पहिल्या फेरीत जीवदान मिळेल. पुढच्या फेऱ्यांमध्ये तो मरू शकतो म्हणूनच पहिल्या फेरीअखेर त्याचे काही मित्र त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील असं कलम घातलंय.
म्हणूनच हवेत गोळी झाडावी म्हटलं आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम न झालेला असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. जर players irrational असतील तर ऑल बेट्स आर ऑफ. अजयने काजोलशी लग्न केल्याची खुन्नस वगैरे बलबीर किंवा कपिलच्या डोक्यात असेल तर स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता त्याच्यावर निशाणा साधतील
चीकू यांचं कोडं आधी सोडवून मग
चीकू यांचं कोडं आधी सोडवून मग ग्रोक किंवा तत्सम तंत्रज्ञानाचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायला आवडतं. पण एकदम ग्रोकची मदत घेऊ नये असं वाटतं. जर कोडं सुटलंच तर मग द्यायला हरकत नसावी.
ऋन्मेषचे उत्तर बरोबर आहे.
ऋन्मेषचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन पटकन कोडं सोडवल्याबद्दल
फक्त एक करेक्शन "बलबीरच्या
फक्त एक करेक्शन "बलबीरच्या गोळीने कपिल मेला तर दुसरी फेरी संपली.". इथे पहिली फेरी संपते.
>>>>
हो तो टायपो झाला.. डोक्यात दुसऱ्या गोळीतच पहिली फेरी संपली असे होते ते डायरेक्ट दुसरी फेरी संपली लिहिले गेले.
धन्यवाद सर्वांचे
पण एकदम ग्रोकची मदत घेऊ नये
पण एकदम ग्रोकची मदत घेऊ नये असं वाटतं. जर कोडं सुटलंच तर मग द्यायला हरकत नसावी.
>>>>>
बरोबर.. आणि तरी कोणी घेतली मदत आणि त्यांना एकापेक्षा जास्त आणि इथल्यापेक्षा वेगळे उत्तर मिळाले तर ती सुद्धा फोडू नयेत. फक्त अजून उत्तरे आहेत असे इथे सांगावे जेणेकरून ज्यांना ती शोधण्यात आनंद मिळत असेल ती लोकं तो घेतील
>>>>>पण कपिल वाचला तर कपिल
>>>>>पण कपिल वाचला तर कपिल देखील 50% अचूक निशाणा असलेल्या अजयला न मारता 75 टक्के निशाणा असलेल्या बलबीरला टार्गेट करणार आणि शंभर टक्के उडवणार. अजय हमखास वाचणार.
कपिल माबोवरती आला नाही का कधी? डूखी वृत्ती त्याला परिचित नसावी
सामो
सामो
पण खरे आहे. मानवी स्वभाव फार विचित्र असतो. कोड्यात त्याचे लॉजिक बसवू शकत नाही.
(No subject)
ब ला मारले तर क ला गोळी
ब ला मारले तर क ला गोळी मारायला कुणी शिल्लक नाही. पहिली फेरी इथेच संपली. >>>> मला वाटते नाही. अ आणि क अजून जिवंत आहेत आणि क ची पाळी यायची आहे >>>>> पटले नाही. ब जर मेला तर त्याची गोळी मारायची पाळी चुकली. ब नंतरच क ची पाळी आहे. त्यामुळे ब मेला तर गेम तिथेच संपला. क चा चान्स गेला.
Runmesh चे उत्तर आवडले.
डूखी वृत्ती त्याला परिचित
डूखी वृत्ती त्याला परिचित नसावी >>> आपण आहोत कि गाईड करायला.
नाहीतर दोन दोन वर्षे न फिरकताही ट्रोलिंग होईल त्याचं
ऋन्मेष यांचे उत्तर चपखल
ऋन्मेष यांचे उत्तर चपखल वाटते. काल मॅथेमॅटिक्स फोरमवरती हे कोडे सापडले पण वाचायचा मूड नव्हता.