Submitted by द्वैत on 5 August, 2025 - 05:56
आले आभाळ भरून
उन्हे कलली जराशी
ओल्या मातीचा सुगंध
नाते सांगतो नभाशी
थेंब टपोरे टपोरे
निळ्या पाण्यात वाजती
गवताची गर्द पाती
एका लयीत डोलती
नदी वाहता वाहता
मागे वळून पहाते
डोळे मिटून कधीचे
कोण काठाशी भिजते
पंख झाडून पाखरु
डोकावते डोलीतून
ओसरती सर पुन्हा
जोर धरते कुठुन
शोधे झाडाचा आडोसा
मागे राहिले वासरू
दूर पिंपळाच्या मागे
नभ लागले उतरू
रान हिरवे हिरवे
थिरकते ओलेचिंब
झाले पुसट किनारे
निवळते प्रतिबिंब
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा..!!
अहाहा..!!
खूप सुंदर.चित्रमय. भिजायला
खूप सुंदर.चित्रमय. भिजायला झाले.
सुंदर...
सुंदर...
सुरेख !
सुरेख !
सुरेख. तुम्ही फार छान लिहिता.
सुरेख. तुम्ही फार छान लिहिता.
वाह!
वाह!